ॲक्टिव्हिटी शेअरिंग व गोपनीयता

वर्कआउटचे प्रकार आणि शीर्षक, सक्रिय कॅलरी आणि किलोज्यूल, व्यायामाची मिनिटे, उभे राहण्याचे किंवा रोल करण्याचे तास, पावले, आणि काल विभाग यासारखा ॲक्टिव्हिटी डेटा तुम्ही निवडलेल्या लोकांसह सुरक्षितरित्या शेअर केला जाईल.
 

ॲक्टिव्हिटी तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहे आणि तुम्ही काय शेअर करता हे निवडण्यासाठी तुम्हाला एनेबल करते.


Privacy Icon

  • फ्रेंडबरोबर शेअर केल्या जाणाऱ्या वर्कआउट आणि ॲक्टिव्हिटी डेटामध्ये पुढील गोष्टी समाविष्ट असू शकतात : सक्रिय कॅलरी, व्यायामाची मिनिटे, उभे राहण्याचे आणि रोल करण्याचे तास, पाऊले, काल विभाग, आणि शीर्षक, प्रकार व कालावधी यासारखी वर्कआउट माहिती.
  • तुम्ही ज्यांना आमंत्रित करता किंवा ज्यांचे आमंत्रण तुम्ही स्वीकारता अशा कोणालाही तुमचा Apple अकाउंटशी संलग्न केलेला ईमेल ॲड्रेस दिसेल.
  • तुम्ही हे फीचर वापरल्यास, तुमचा वर्कआउट आणि ॲक्टिव्हिटी डेटा Apple ला पाठवला जाईल जेणेकरुन Apple तुम्ही निवडलेल्या कोणाबरोबरही हा डेटा सुरक्षितपणे शेअर करू शकेल. Apple तुमचा वर्कआउट आणि ॲक्टिव्हिटी डेटा थोड्या कालावधीसाठी राखून ठेवेल आणि फक्त हे शेअरिंग फीचर एनेबल करण्यासाठी ह्या डेटाचा वापर करेल.

फ्रेंडबरोबर शेअर केल्या जाणाऱ्या वर्कआउट आणि ॲक्टिव्हिटी डेटामध्ये पुढील गोष्टी समाविष्ट असू शकतात : सक्रिय कॅलरी किंवा किलोज्यूल, व्यायामाची मिनिटे, उभे राहण्याचे किंवा रोल करण्याचे तास, पाऊले, कालविभाग (ज्याने फ्रेंड्सला कळते की तुम्ही तुमचा दिवस केव्हा सुरू करता), शीर्षक, प्रकार आणि कालावधी, आणि ही माहिती प्रदान करणाऱ्या कोणत्याही थर्ड पार्टी ॲपचे नाव यासारखी वर्कआउट माहिती. शीर्षक किंवा प्रशिक्षक सारखे वर्कआउट तपशील तुमच्या वर्कआउटविषयी संवेदनशील माहिती उघड करू शकतात, जसे की ते प्रसूती पूर्व वर्कआउट आहे की नाही. तुमच्या ॲक्टिव्हिटी आणि वर्कआउट पुरस्करांचे नोटिफिकेशन फ्रेंड्सला देखील प्राप्त होऊ शकतात. फ्रेंड्ससाठी ही माहिती थोड्या वेळेसाठी उपलब्ध असेल. तुम्ही शेअरिंगमध्ये जाऊन ‘फ्रेंड काढून टाका’ पर्याय वापरून कोणत्याही क्षणी फ्रेंडला काढून टाकू शकता. तुम्ही ‘माझी ॲक्टिव्हिटी लपवा’ पर्याय वापरणाऱ्या फ्रेंडपासून तुमची ॲक्टिव्हिटी लपवणे देखील निवडू शकता.

तुम्ही ज्यांना आमंत्रित करता किंवा ज्यांचे आमंत्रण तुम्ही स्वीकारता अशा कोणालाही तुमचा Apple अकाउंटशी संलग्न केलेला ईमेल ॲड्रेस दिसेल.

तुम्ही हे फीचर वापरल्यास, तुमचा वर्कआउट आणि ॲक्टिव्हिटी डेटा Apple ला पाठवला जाईल जेणेकरुन Apple तुम्ही निवडलेल्या कोणाबरोबरही हा डेटा सुरक्षितपणे शेअर करू शकेल. Apple तुमचा वर्कआउट आणि ॲक्टिव्हिटी डेटा थोड्या कालावधीसाठी राखून ठेवेल आणि फक्त हे शेअरिंग फीचर एनेबल करण्यासाठी ह्या डेटाचा वापर करेल. तुम्ही जर iOS 18 किंवा त्यानंतरच्या व्हर्जनचा आणि/किंवा watchOS 11 किंवा त्यानंतरच्या व्हर्जनचा आणि iOS 18 किंवा त्यानंतरचे व्हर्जनचा वापर करत असलेल्या फ्रेंडबरोबर वर्कआऊट आणि ॲक्चिव्हिटी डेटा शेअर करत असाल, तर तुमच्या डेटाला अशा प्रकारे एंड-टू-एंड एन्क्रिप्ट केले जाऊल की तुमच्या फ्रेंडबरोबर तुम्ही जो वर्कआऊट आणि ॲक्टिव्हिटी डेटा शेअर करण्यासाठी निवडण्यासाठी Apple वाचू शकत नाही. तुमच्या ॲक्टिव्हिटीला शेअर करणारी फ्रेंड लिस्ट तुमच्या अकाऊंटशी संबंधित असते आणि तुमच्याकडून इतर कोणत्याही iOS डिव्हाइसवर या अकाउंटचा वापर करून साइन इन केल्यानंतर ती रीस्टोअर केली जाईल.

रिटेन्शन

Apple ने वैयक्तिक डेटा संकलित ज्या उद्देशासाठी केला होता तो उद्देश पूर्ण होईपर्यंतच या सूचनेमध्ये वर्णन केल्यानुसार आणि Apple च्या गोपनीयता धोरणाला अनुसरून किंवा कायद्याने आवश्यक असल्यानुसार डेटा राखून ठेवला जातो. राखून ठेवण्याच्या कालावधीचा हिशेब करत असताना आम्ही संकलित केलेला वैयक्तिक डेटा राखून ठेवणे आवश्यक आहे का याला काळजीपूर्वक तपासतो आणि तो राखून ठेवणे आवश्यक असल्यास कायद्याने परवानगी असलेल्या वैयक्तिक डेटा राखून ठेवण्याच्या सर्वात कमी कालावधीसाठी तो राखून ठेवतो.

Apple ने संकलित केलेली माहिती नेहमी Apple च्या गोपनीयता धोरणानुसार हाताळली जाईल, जे www.apple.com/in/privacy वर मिळू शकते

2025-12-12