ॲडव्हांस्ड डेटा संरक्षण ॲनालिटिक्स व गोपनीयता
Apple च्या क्लाउड डेटा सुरक्षेची सर्वोच्च पातळी प्रदान करण्यासाठी ॲडव्हांस्ड डेटा संरक्षण एंड टू एंड एनक्रिप्शनचा वापर करते आणि ते तुमच्या माहितीचे संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
![]()
- तुमचा अधिकाधिक iCloud डेटा केवळ तुमच्या विश्वसनीय डिव्हाइसनेच डीक्रिप्ट केला जाईल ह्याची खात्री करण्यासाठी ॲडव्हांस्ड डेटा संरक्षण एंड टू एंड एनक्रिप्शनचा वापर करते.
- तुम्ही ॲडव्हांस्ड डेटा संरक्षण एनेबल करण्यासाठी रिकव्हरी की आणि/किंवा अजून रिकव्हरी संपर्क सेट अप केले पाहिजेत. जर तुम्ही ॲक्सेस गमावला तर Apple कडे तुमचा डेटा पुनर्प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या कीज नसल्यामुळे केवळ तुमच्या अकाउंट रिकव्हरी कृती तुम्हाला तुमचा डेटा परत मिळवण्यास मदत करू शकतील.
- डेटा पुनर्प्राप्त करण्याचे महत्त्व लक्षात घेऊन,जेव्हा तुम्ही ॲडव्हांस्ड डेटा संरक्षण एनेबल करता, तेव्हा Apple तुमचा फीचरचा वापर, अकाउंट पुनर्प्राप्ती पध्दतींसह तुमचे परस्परसंवाद, आणि अकाउंट आणि डेटा पुनर्प्राप्ती प्रक्रियेची विश्वासार्हता सुधारण्यासाठी आणि सुनिश्चित करण्यासाठी तुमच्या एनक्रिप्शन ‘की’ कशा प्रकारे हाताळल्या जातात ह्याबद्दलची मर्यादित माहिती संकलित करते.
केवळ तुमचा अनुभव उत्तम करण्यासाठी आम्ही आम्हाला आवश्यक असलेला डेटा संकलित करण्यासाठी खूप मेहनत घेतो, आणि आम्ही जेव्हा डेटा संकलित करतो, तेव्हा आम्ही काय संकलित करत आहोत आणि आम्हाला ते गरजेचे का आहे हे तुम्हाला माहित असणे महत्वाचे असते, जेणेकरून तुम्ही तुमच्या निवडी ठरवू शकाल. Apple च्या प्रत्येक उत्पादन आणि सेवेप्रमाणे, ॲडव्हांस्ड डेटा संरक्षण देखील त्या तत्त्वांना लक्षात घेऊन डिझाइन केलेला आहे.
iCloud साठी ॲडव्हांस्ड डेटा संरक्षण ही एक वैकल्पिक सेटिंग आहे जी तुमच्या बहुतांशी iCloud डेटाला एंड टू एंड एनक्रिप्शन ऑफर करून Apple चे सर्वोच्च स्तराचे क्लाउड डेटा संरक्षण प्रदान करते. iCloud आधीपासूनच पासवर्ड, iCloud कीचेन, आणि आरोग्य डेटासारख्या संवेदनशील डेटा श्रेणींना एंड टू एंड एनक्रिप्शनने सुरक्षित ठेवत असताना, ॲडव्हांस्ड डेटा संरक्षण iCloud बॅकअप, नोट्स, छायाचित्रे, आणि अधिक यांच्या समावेशासह अतिरिक्त श्रेणींना एंड-टू-एंड एनक्रिप्शनने संरक्षित डेटाच्या श्रेणींना विस्तारित केले जाते.
ॲडव्हांस्ड डेटा संरक्षण एनेबल केलेले असताना, तुमचा एंड टू एंड एनक्रिप्ट करण्यात आलेला डेटा पुनर्प्राप्त करण्यासाठी गरज असणाऱ्या एनक्रिप्शन की Apple कडे नसतात. तुम्ही तुमच्या अकाउंटचा ॲक्सेस कधी गमावल्यास तुम्हाला तुमच्या iCloud वरील डेटा पुनर्प्राप्त करण्यासाठी अकाउंटच्या रिकव्हरीची एक पद्धत — तुमच्या डिव्हाइसचा पासकोड किंवा पासवर्ड, तुमचा रिकव्हरीचा संपर्क किंवा रिकव्हरी की — वापरावी लागेल ज्याबद्दल Apple ला माहिती नसते. तुमच्या iCloud वरील बहुतांशी डेटा एंड टू एंड एनक्रिप्शनने संरक्षित असल्यामुळे, तुम्ही ॲडव्हांस्ड डेटा संरक्षण चालू करण्यापूर्वी तुम्हाला किमान एक रिकव्हरी संपर्क किंवा एक रिकव्हरी की सेट अप करण्यास सांगितले जाईल.
- अकाउंट आणि डेटा रिकव्हरी प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि त्यांची विश्वासार्हता जपण्यासाठी तुम्ही ॲडव्हांस्ड डेटा संरक्षण एनेबल केल्यावर Apple तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित विशिष्ट मर्यादित माहिती संकलित करते ज्यामध्ये हे समाविष्ट असते :
- ॲडव्हांस्ड डेटा संरक्षण एनेबल किंवा डिसेबल करणे यशस्वी किंवा अयशस्वी होण्याचा दर.
- तुम्ही Apple अकाउंटमध्ये साइन इन करताना, तुमच्याकडे आधीपासून असलेल्या मालकीच्या डिव्हाइसचा वापर करून नवीन डिव्हाइस सेटअप करताना, तुमच्या Apple अकाउंटच्या सेटिंग अपडेट करत असताना आणि तुमचा डेटा ॲक्सेस करण्यासाठी तुमचे अकाउंट ऑथेंटिकेट करण्याची प्रक्रियेबरोबरचा तुमचा अनुभव आणि किती वेळा तुम्ही यशस्वी झालात किंवा काही समस्यांना तोंड द्यावे लागले.
- इव्हेंट जी तुमच्याकडून रिकव्हरी संपर्क तयार करणेआणि त्यांचा वापर करण्याची कार्यक्षमता आणि विश्वसनीयतेला कॅप्चर करता, ज्यामध्ये रिकव्हरी संपर्क असाइन करत आणि तुमच्या डेटाचा ॲक्सेस रिकव्हर करण्यासाठी रिकव्हरी संपर्काचा वापर करताना तुमच्या आंतरक्रियांचा समावेश असतो. Apple कडे तुमच्या रिकव्हरी संपर्कांची माहिती किंवा त्यांचा ॲक्सेस नसतो.
- इव्हेंट ज्या तुमच्या कडून रिकव्हरी की बनवण्यासाठी आणि त्यांचा वापर करण्याची कार्यक्षमता आणि विश्वासार्हता कॅप्चर करतात, ज्यामध्ये रिकव्हरी की बनवण्याची प्रक्रियेबरोबर तुमच्या आंतरक्रिया आणि जेव्हा तुम्ही तुमच्या डेटाचा ॲक्सेस रिकव्हर करण्यासाठी रिकव्हर कीचा वापर करता त्यावेळेच्या प्रक्रियेशी संबंधित इव्हेंटचा समावेश असतो. Apple कडे तुमच्या रिकव्हरी कीची माहिती किंवा त्यांचा ॲक्सेस नसतो.
- इव्हेट ज्या तुमच्या डेटाचा ॲक्सेस रिकव्हर करण्यासाठी तुमच्या डिव्हाइस पासकोड किंवा पासवर्डचा वापर करण्याच्या कामगिरीला आणि विश्वसनीयतेला कॅप्चर करतात, ज्यामध्ये तुमच्या पासकोडच्या माहितीचा वापर करताना रिकव्हर करण्याचा प्रयत्न करताना तुम्ही किती वेळा यशस्वी झाला होता किंवा समस्यांना तोंड देता आणि रिकव्हरीतच्या पद्धतीच्या स्वरूपात तुमच्या पासकोडचा वापर करताना रिकव्हरी प्रक्रियेबरोबर तुमचे अनुभव आणि आंतरक्रिया यांचा समावेश असतो. Apple कडे तुमच्या डिव्हाइसचा पासकोड किंवा पासवर्डची माहिती किंवा त्याचा ॲक्सेस नसतो.
- तुम्ही ॲडव्हांस्ड डेटा संरक्षण एनेबल किंवा डिसेबल केल्यावर एनक्रिप्शन कीजा कितपत वारंवार फिरवल्या जातात आणि अयशस्वी अकाउंट आणि डेटा रिकव्हरीचा परिणाम जाणून घेण्यासाठी तुमचा iCloud वरील संपूर्ण डेटा रीसेट आणि हटवण्याच्या प्रक्रियेशी संबंधित इव्हेंट्स त्याचबरोबर एनक्रिप्शन कीज तुमच्या डिव्हाइसवर कशारीतीने मॅनेज केल्या जातात याबद्दल हे आहे.
वैयक्तिक डेटा प्रोसेस करण्यासाठी लागू होणारे कायदेशीर आधार
आम्ही तुमच्या व्यक्तिगत डेटावर सर्वसाधारणपणे Apple सोबतच्या तुमच्या कराराच्या कार्यवाहीसाठी प्रक्रिया करतो जसे की सेवा प्रदान करायला आणि आमच्या कायदेशीर बंधनाच्या पालनासाठी आवश्यक आहेत. जिथे संमती हाच उचित कायदेशीर आधार असतो, तिथे आम्ही त्याला लागू होणाऱ्या स्थानिक कायद्याचा आधार देण्याचा प्रयत्न करतो.
रिटेन्शन
Apple कडून ज्या उद्देशांसाठी वैयक्तिक डेटा संकलित केला गेला होता ज्यामध्ये सूचनेमध्ये वर्णन केल्यानुसार आणि Apple च्या गोपनीयता धोरणाला अनुसरून किंवा कायद्याने आवश्यक असेल त्यानुसार उद्देश पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीपुरताच तो स्टोअर केला जातो. राखून ठेवण्याच्या कालावधीचा हिशेब करत असताना आम्ही संकलित केलेला वैयक्तिक डेटा राखून ठेवणे आवश्यक आहे का याला काळजीपूर्वक तपासतो आणि तो राखून ठेवणे आवश्यक असल्यास कायद्याने परवानगी असलेल्या वैयक्तिक डेटा राखून ठेवण्याच्या सर्वात कमी कालावधीसाठी तो राखून ठेवतो.
Apple ने संकलित केलेली माहिती नेहमी Apple च्या गोपनीयता धोरणानुसार हाताळली जाईल, जे www.apple.com/in/privacy वर मिळू शकते
2025-12-12