Apple जाहिरात व गोपनीयता
Apple-वितरित जाहिराती यूझरच्या गोपनीयतेचा आदर करत लोकांना ॲप, उत्पादने, आणि सेवा शोधण्यात मदत करतात. Apple चा जाहिरात प्लॅटफॉर्म तुमच्या माहितीचे संरक्षण करण्यासाठी आणि आम्ही तुमची माहिती कशी वापरतो ह्याचे नियंत्रण तुम्हाला देण्यासाठी डिझाइन केलेला आहे. आमचा जाहिरात प्लॅटफॉर्म वैयक्तिक डेटा थर्ड पार्टीसह शेअर करत नाही.
Apple च्या जाहिरात प्लॅटफॉर्मद्वारे ज्या जाहिराती डिलिव्हर केल्या जातात त्या App Store, Apple News, स्टॉक आणि Apple TV ॲपवर दिसू शकतात. Apple चा जाहिरात प्लॅटफॉर्म तुम्हाला ट्रॅक करत नाही, याचा अर्थ असा आहे की तो लक्ष्यित जाहिराती किंवा जाहिरात मूल्यांकनाच्या उद्देशाने आमच्या ॲपद्वारे गोळा केलेल्या यूझर किंवा डिव्हाइस डेटाला थर्ड पार्टीने गोळा केलेल्या यूझर किंवा डिव्हाइस डेटासोबत लिंक करत नाही आणि डेटा ब्रोकरसोबत यूझर किंवा डिव्हाइस डेटा शेअर करत नाही.
संदर्भित माहिती
सेशनदरम्यान संदर्भित माहितीचा वापर करून संबंधित जाहिराती निवडल्या जाऊ शकतात, जसे की :
- डिव्हाइसची माहिती : तुमच्या कीबोर्ड आणि डिव्हाइसच्या भाषा सेटिंग, डिव्हाइस प्रकार, OS व्हर्जन, दिवसाची वेळ, आणि कनेक्शनचा प्रकार.
- डिव्हाइसचे अंदाजे स्थान : स्थान सेवा चालू केलेल्या असल्यास आणि तुम्ही App Store, Apple News किंवा Apple TV ॲपना तुमचे स्थान ॲक्सेस करण्याची परवानगी दिली असल्यास, तुमच्या भौगोलिक स्थानाशी संबंधित जाहिराती दाखवण्यासाठी तुमचे अंदाजित स्थान वापरले जाऊ शकते. Apple चा जाहिरात प्लॅटफॉर्म तुमच्या स्थानावरून प्रोफाइल तयार करत नाही, आणि जरी तुम्ही ॲपला अचूक स्थान ॲक्सेस करण्याची अनुमती दिली तरी तुमचे अचूक स्थान वापरत किंवा स्टोअर करून ठेवत नाही. ह्या सेटिंग ॲक्सेस करण्यासाठी, सेटिंग > गोपनीयता व सुरक्षा > स्थान सेवावर जा.
- App Store: तुमच्या सर्च टर्म आणि तुम्ही बघत असलेल्या पृष्ठाविषयी माहिती.
- Apple News आणि ‘स्टॉक’ : तुम्ही वाचत असलेल्या स्टोरीचा प्रकार.
- Apple ‘नकाशा’ ॲप : तुमच्या सर्च टर्म आणि तुम्ही सर्च करत असताना नकाशाचा व्ह्यू.
तुमचा जाहिरात अनुभव सुधारण्यासाठी आणि जिथे उपलब्ध असेल तिथे, तुमचे डिव्हाइस अतिरिक्त संदर्भात्मक माहिती — जसे की तुम्ही सध्या इन्स्टॉल केलेली ॲप आणि तुमच्या सध्याच्या सेशनदरम्यान तुम्ही काय टॅप करता किंवा पाहता — कोणती जाहिरात डिस्प्ले करायची हे ठरवण्यासाठी वापरू शकते. हे विश्लेषण थेट तुमच्या डिव्हाइसवर होते आणि Apple जाहिरात ला पाठवले जात नाही.
वैयक्तिकृत जाहिराती आणि सेगमेंट
App Store, Apple News, आणि ‘स्टॉक’ वर वैयक्तिकृत जाहिराती प्रदान करण्यासाठी आम्ही विभाग तयार करतो. Apple नकाशा वर वैयक्तिकृत जाहिरातींना सपोर्ट नाही, तिथे तुम्हाला फक्त वरील माहितीवर आधारित संदर्भात्मक जाहिराती दिसतील. सेगमेंट हे समान गुण असणाऱ्या लोकांचे गट असतात. तुमच्याशी संबंधित माहितीचा वापर हे ठरवण्यासाठी केला जातो की तुम्हाला कोणत्या सेगमेंट नेमून दिल्या आहेत आणि त्यामुळे तुम्हाला कोणत्या जाहिराती दाखविल्या जातील. तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी, 5,000 पेक्षा जास्त लोकांनी जाहिरातदाराने सिलेक्ट केलेले लक्ष्यीकरण निकष पूर्ण केले तरच वैयक्तिकृत जाहिराती वितरीत केल्या जातात.
आम्ही तुम्हाला सेगमेंटमध्ये नेमण्यासाठी पुढील माहितीचा वापर करू शकतो :
- अकाउंटची माहिती : तुमचे नाव, पत्ता, वय, लिंग, आणि तुमच्या Apple अकाउंटवर नोंदणीकृत डिव्हाइस. तुमच्या Apple अकाउंट नोंदणी पृष्ठावर तुमचे नाव किंवा तुमच्या Apple अकाउंटमधील संबोधन यासारख्या माहितीचा वापर तुमचे लिंग शोधण्यासाठी केला जाऊ शकतो. account.apple.com वर Apple अकाउंट संकेतस्थळावर तुम्ही तुमची अकाउंट माहिती अपडेट करू शकता.
- डाउनलोड्स, खरेदी व सदस्यता : तुम्ही डाउनलोड केलेले संगीत, चित्रपट, पुस्तके, टिव्ही कार्यक्रम आणि ॲप, तसेच कोणतीही इन ॲप खरेदी व सदस्यता. जोपर्यंत लक्ष्यित करण्याची क्रिया ॲपच्या डेव्हलपरद्वारे केली जात नाही तोपर्यंत App Store मधून एखाद्या विशिष्ट ॲपच्या डाउनलोडच्या आधारे किंवा विशिष्ट ॲपमधील (सदस्यतेसह) खरेदीच्या आधारे लक्ष्य करण्याची अनुमती देत नाही.
- Apple News आणि ‘स्टॉक’ : तुम्ही वाचता त्या कथांचे विषय आणि श्रेण्या आणि तुम्ही फॉलो करत असलेली, सदस्यता घेतलेली, किंवा नोटिफिकेशन चालू केलेली प्रकाशने.
- जाहिरात : Apple च्या जाहिरात प्लॅटफॉर्मकडून डिलीव्हर केल्या जाणाऱ्या जाहिरातींबरोबर तुमच्या आंतरक्रिया.
जेव्हा तुम्ही अनेक जाहिरातींमधून कोणती जाहिरात दाखवायची हे निवडता, जी निवडण्यास तुम्ही पात्र आहात, तेव्हा असे होऊ शकते की वर उल्लेख केलेली काही माहिती त्याचप्रमाणे तुमचे App Store सर्च आणि ब्राउझिंग ॲक्टिव्हिटी यांचा वापर आम्ही हे ठरवण्यासाठी करू शकतो की कोणती जाहिरात तुमच्याशी सर्वाधिक संबद्ध असू शकते. App Store च्या ब्राउझिग ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही App Store ब्राउझ करताना टॅप केलेल्या आणि पाहिलेल्या कॉण्टेण्ट आणि ॲपचा समावेश असतो. ह्या माहितीमध्ये सर्व यूझर समुच्चित केले जातात जेणेकरून ते तुम्हाला ओळखू शकणार नाही.
जाहिरात धोरण आणि परफॉर्मन्स
Apple चा जाहिरात प्लॅटफॉर्म तुम्ही तीच जाहिरात किती वेळा पाहता हे मर्यादित करण्यासाठी धोरणे लागू करते. आम्ही वय धोरण, जाहिरात कॉण्टेण्टची उपयुक्तता आणि उपलब्धतेवरील निर्बंध लागू करण्यासाठी आणि स्थानिक कायद्यांचे पालन करण्यासाठी ऑन-डिव्हाइस लॉजिकचाही वापर करतो.
तुम्ही तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित नसलेला रॅंडम आयडेंटिफायर वापरून टॅप केलेल्या आणि बघितलेल्या जाहिरातींविषयीची माहिती आम्हाला मिळते. Apple नकाशावर, ही माहिती प्रति तास अनेक वेळा फिरणाऱ्या सेशन आयडेंटिफायरशी संबंधित आहे आणि तुमच्या Apple अकाउंटशी जोडलेली नाही. दीर्घकाळ सक्रिय राहणारे आयडेंटिफायर एकत्रित वापर मेट्रिकसाठी आणि सेवेची अखंडता राखण्यासाठी वापरले जातात. हे दीर्घकाळ टिकलेले आयडेंटिफायर तुमच्या Apple अकाउंटशी किंवा तुमची ओळख स्पष्ट करणाऱ्या इतर माहितीशी अटॅच नसतात.
Apple कोणताही वैयक्तिक डेटा थर्ड पार्टीसह शेअर करत नाही. आमची उत्पादने आणि सेवा प्रदान करण्यासाठी, Apple ला ग्राहकांना मार्केटिंग करण्यास मदत करण्यास, आणि Apple च्या वतीने जाहिराती विकण्यास आम्ही Apple सोबत काम करणाऱ्या आमच्या जाहिरातदारांना आणि महत्त्वाच्या भागीदारांना काही वैयक्तिक नसलेला डेटा उपलब्ध करुन देतो. कोणताही Apple Pay व्यवहार किंवा हेल्थ ॲपचा डेटा Apple च्या जाहिरात प्लॅटफॉर्मला ॲक्सेस करण्यासाठी उपलब्ध नाही, किंवा जाहिरातीच्या उद्देशासाठी वापरता येत नाही. Apple तुमच्या लैंगिक अभिमुखता, धार्मिक विश्वास किंवा राजकीय संलग्नतेविषयी माहिती ठेवत नाही किंवा जाहिरातदारांना उपलब्ध करुन देत नाही.
जाहिरात प्राधान्ये
ह्या जाहिरातीविषयी माहिती
तुम्हाला App Store, Apple नकाशा, Apple News किंवा ‘स्टॉक’ वर एखादी विशिष्ट जाहिरात का दाखवली जाते हे समजून घेण्यासाठी जाहिरातीवरील ‘जाहिरात’ बटणावर टॅप करा. यामुळे असे सेगमेंट आणि लोकसंख्याशास्त्रीय माहितीसारखा इतर डेटा सादर केला जाईल ज्यांचा वापर तुम्हाला कोणती जाहिरात प्राप्त होईल हे ठरवण्यासाठी केला होता.
जाहिरातकर्ता पूर्ण फीड किंवा पृष्ठ पुरस्कृत करत आहे हे सूचित करण्यासाठी काही जाहिरातींमध्ये ‘जाहिरात’ बटणाऐवजी केवळ ‘ह्यांनी सादर केले’ किंवा त्यासारखी भाषा असू शकते, पण अशा प्लेसमेंट्सना लक्ष्य करण्यासाठी कोणतेही सेगमेंट्स वापरलेले नसतात.
जाहिरात लक्ष्यीकरण माहिती
तुमच्याबद्दल अशी माहिती पाहण्यासाठी जिचा वापर Apple च्या जाहिरात प्लॅटफॉर्मद्वारे लक्ष्यित जाहिराती पाठवण्याच्या उद्देशासाठी केला जाऊ शकतो, यामध्ये सेगमेंट देखील आहेत ज्यामध्ये तुम्ही सामील आहात.
ही माहिती तुमच्या iOS, iPadOS, किंवा visionOS डिव्हाइसवर पाहण्यासाठी, सेटिंग > गोपनीयता व सुरक्षा > Apple जाहिरात वर जा आणि ‘जाहिरात लक्ष्यीकरण माहिती बघा’ वर टॅप करा. Mac वर, सिस्टीम सेटिंग > गोपनीयता व सुरक्षा > Apple जाहिरात वर जा, आणि नंतर ‘जाहिरातीला लक्ष्य करणारी माहिती पहा’ वर क्लिक करा.
तुमच्या विषयी दिलेली माहिती तुम्हाला चुकीची वाटत असल्यास, तुम्ही तुमची Apple अकाउंट माहिती अपडेट करू शकता.
स्थान आधारित जाहिराती
जर तुम्ही App Store, Apple नकाशा, Apple News किंवा Apple TV ॲपला तुमचे स्थान ॲक्सेस करण्याची अनुमती दिली, तर Apple चा जाहिरात प्लॅटफॉर्म तुम्हाला भौगोलिकदृष्ट्या लक्ष्यित जाहिराती प्रदान करण्यासाठी तुमच्या डिव्हाइसच्या सध्याच्या अंदाजित स्थानाचा वापर करू शकतो.
तुम्ही जाहिरातीच्या समावेशासह स्थान आधारित ॲप फंक्शनॅलिटी बंद करणे निवडू शकता. तुमच्या iOS, iPadOS किंवा visionOS डिव्हाइसवर, सेटिंग > गोपनीयता व सुरक्षा > स्थान सेवांवर जा आणि एकतर स्थान सेवा बंद करा किंवा जिथे लागू असेल तिथे App Store, Apple Maps, Apple News किंवा Apple TV ॲप परवानगी 'कधीच नाही’ वर सेट करा. Mac वर, सिस्टीम सेटिंग > गोपनीयता व सुरक्षा > स्थान सेवावर जा, आणि स्थान सेवा बंद करा किंवा News किंवा TV साठी स्थान परवानग्या बंद करा. tvOS वर, सेटिंग > सामान्य > गोपनीयता व सुरक्षा > ‘स्थान सेवा’ वर जा आणि ‘स्थान सेवा’ बंद करा किंवा Apple TV ॲप परवानगी ‘कधीच नाही’ वर सेट करा.
जेव्हा तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर स्थान सेवा बंद करता, तेव्हा Apple च्या जाहिरात प्लॅटफॉर्मला अंदाजित डिव्हाइस स्थान प्राप्त होत नाही.
वैयक्तिकृत जाहिरात नियंत्रण
जर तुम्ही वैयक्तिकृत केलेल्या जाहिराती सुरू केल्या असतील, तर Apple चा ॲडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म तुमच्या माहितीचा वापर App Store, Apple News आणि ‘स्टॉक’ मध्ये तुमच्याशी अधिक संबद्ध असलेल्या जाहिराती दाखवण्यासाठी करू शकेल. वैयक्तिकृत जाहिराती बंद केल्याने Apple ला जाहिरात वैयक्तिकरणासाठी ही माहिती वापरण्यापासून प्रतिबंधित केले जाईल. ह्यामुळे तुम्हाला प्राप्त होणाऱ्या जाहिरातींची संख्या कमी होणार नाही, परंतु त्या जाहिराती तुमच्याशी कमी संबंधित असू शकतात. Apple ‘नकाशा’ ॲपवर वैयक्तिकृत केलेल्या जाहिरातींना सपोर्ट नाही, त्यामुळे वैयक्तिकृत केलेल्या जाहिराती सेटिंगचा तुम्हाला तिथे दिसणाऱ्या संदर्भात्मक जाहिरातींवर परिणाम होणार नाही.
तुम्ही तुमच्या iOS, iPadOS किंवा visionOS डिव्हाइस वर सेटिंग > गोपनीयता व सुरक्षा > Apple जाहिरात वर जाऊन आणि ‘वैयक्तिकृत जाहिराती’ बंद करण्यासाठी टॅप करून वैयक्तिकृत जाहिराती बंद करू शकता. Mac वर, सिस्टीम सेटिंग > गोपनीयता व सुरक्षा > Apple जाहिरात वर जा, आणि सिलेक्ट केलेल्या वैयक्तिकृत जाहिराती रद्द करा. तुम्ही अल्पवयीन असल्यास, तुमचे खाते व्यस्थापित असल्यास किंवा जिथे Apple त्याच्या ॲपमध्ये जाहिराती डिलीव्हर करत नाही अशा स्थानावर असल्यास वैयक्तिकृत जाहिराती पर्याय कदाचित उपलब्ध नसेल.
फसवणूक आणि इतर नुकसानकारक ॲक्टिव्हिटी टाळणे
जाहिरातींमधील फसवणूक आणि इतर दुर्भावनापूर्ण ॲक्टिव्हिटी ओळखण्यात आणि रोखण्यात मदत करण्यासाठी, Apple चा जाहिरात प्लॅटफॉर्म App Store मधील तुमचे सर्च, तुम्ही बघता आणि टॅप करता त्या जाहिराती आणि जाहिरातींमधून तुम्ही जे ॲप खरेदी आणि डाउनलोड करता या विषयीचा डेटा वापरू शकतो. ही माहिती तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित नसलेल्या रँडम आयडेंटिफायरकडून संकलित केले जाते.
Apple ने संकलित केलेली माहिती नेहमी Apple च्या गोपनीयता धोरणानुसार हाताळली जाईल, जे www.apple.com/in/privacy वर मिळू शकते.
2026-05-11