Apple Arcade व गोपनीयता
Apple Arcade तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहे आणि तुम्ही काय शेअर करता हे निवडण्यासाठी तुम्हाला एनेबल करते.
![]()
- तुम्हाला खरेदी, डाउनलोड किंवा अपडेट करण्यासाठी हवा असलेला कॉण्टेण्ट आम्हाला प्रदान करता यावा ह्यासाठी आम्ही तुमचा वैयक्तिक डेटा स्टोअर करतो.
- App Store वरील जाहिराती, Apple News, आणि ‘स्टॉक्स’, जेथे उपलब्ध आहेत, हे तुमच्याशी संबंधित आहेत ह्याची खात्री करण्यासाठी जाहिराती प्रदान करण्यासाठी, आम्ही तुमचे अकाउंट, खरेदी, आणि App Store आणि Arcade मधील डाउनलोड ह्यासारखी माहिती देखील वापरतो. खाली वर्णन केल्याप्रमाणे, तुमच्याकडे ह्या जाहिरातीच्या संदर्भात पर्याय आहेत.
- आम्ही App Store आणि Arcade मध्ये तुमची गेमिंग ॲक्टिव्हिटी, खरेदी, डाउनलोड आणि इतर ॲक्टिव्हिटीविषयी माहितीचा वापर फीचरला तुमच्या गरजेनुसार करण्यासाठी, वैयक्तिकृत शिफारशी प्रदान करण्यासाठी करतो आणि Apple Marketing सह तुम्हाला नोटिफिकेशन पाठवू शकतो. खाली वर्णन केल्याप्रमाणे, तुम्ही ह्या उद्देशासाठी हा डेटा वापरण्याची निवड रद्द करू शकता.
- ओळखण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यात मदतीसाठी, तुमचे फोन कॉल किंवा तुम्ही पाठवलेल्या आणि प्राप्त केलेल्या ईमेलच्या अंदाजे संख्येच्या माहितीसह तुम्ही तुमच्या डिव्हाइसचा वापर कसा करता, ह्या माहितीचा वापर तुम्ही सदस्यता घेण्याचा प्रयत्न करत असताना डिव्हाइस विश्वसनीयता स्कोअरची गणना करण्यासाठी केला जाईल. ‘सबमिशन’ अशा रितीने डिझाइन करण्यात आलेली आहेत की Apple तुमच्या डिव्हाइसवरील मूळ मूल्यांना जाणून घेऊ शकत नाही. स्कोअर आपल्या सर्व्हरवर एका निश्चित वेळेसाठी स्टोअर केले जातात.
- App Store आणि Arcade सुधारण्याच्या पद्धती जाणून घेण्यासाठी, आम्ही तुमच्या ब्राउझिंग, खरेदी, सर्च, आणि डाउनलोडविषयी माहितीचा वापर करतो. ह्या नोंदी IP ॲड्रेस, रॅण्डम युनिक आयडेंटिफायर (उपलब्ध असेल तेथे), आणि जेव्हा स्टोअरमध्ये साइन इन करता तेव्हा Apple अकाउंटसह संग्रहित केल्या जाऊ शकतात.
Apple Arcade सुरुवातीपासून तुमच्या गोपनीयतेची सुरक्षा करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. केवळ तुमचा अनुभव उत्तम करण्यासाठी आम्ही आम्हाला आवश्यक असलेला डेटा संकलित करण्यासाठी खूप मेहनत घेतो. जेव्हा आम्ही डेटा संकलित करतो, तेव्हा आम्ही हा डेटा का संकलित करत आहोत आणि आम्हाला हे करणे गरजेचे का आहे, हे तुम्हाला माहीत असणे महत्त्वाचे समजतो, जेणेकरून तुम्ही अचूक निवड करू शकाल.
Apple Arcade प्रदान करणे
Apple Arcade मध्ये सेवा आणि फीचर प्रदान करण्यासाठी Apple तुमच्या वैयक्तिक डेटाचा वापर करते. ह्या माहितीमध्ये तुमच्या अकाउंट आणि पेमेंटची माहिती, जी तुम्ही सेटिंग किंवा सिस्टीम सेटिंगमध्ये जाऊन ॲक्सेस करू शकता व बदलू शकता आणि तुमच्या App Store खरेदी हिस्ट्रीचा समावेश असतो.
तुमच्या सोयीसाठी तुमच्या सर्व डिव्हाइसवरील तुमच्या अनुभवाचे सर्व पैलू अप टू डेट ठेवण्यासाठी Apple Arcade, iCloud चा वापर करते. उदाहरणार्थ, Apple Arcade तुमच्या गेमची प्रगती तुमच्या सर्व डिव्हाइसवर सिंक करण्यासाठी iCloud चा वापर करेल. तुमच्या iOS, iPadOS, किंवा visionOS डिव्हाइस वर सेटिंगमध्ये किंवा Mac वरील सिस्टीम सेटिंगमध्ये Arcade गेमसाठी iCloud बंद करून तुम्ही ही क्षमता कोणत्याही क्षणी डिसेबल करू शकता. जर गेम डेव्हलपरने iCloud बॅकअपचा वापर केला, आणि तुम्ही iCloud बॅकअप एनेबल केला असला, तरी सुद्धा गेमच्या प्रगतीचा बॅकअप iCloud वरच केला जाईल.
तुम्ही Game Center मध्ये साइन इन केल्यावर Apple ला तुमची गेमप्ले ॲक्टिव्हिटी प्राप्त होईल, ज्यामध्ये स्कोअर आणि कामगिऱ्या, आव्हाने आणि मल्टीप्लेअर गेमप्ले यांचा समावेश असतो. ह्या शिवाय, तुमची Arcade सदस्यता स्थिती सर्व Game Center यूझरना दिसते. www.apple.com/in/legal/privacy/data/en/game-center वर जाऊन तुम्ही Game Center आणि गोपनीयतेविषयी अधिक माहिती जाणून घेऊ शकता.
Apple Arcade सुधारणे आणि वैयक्तिकृत करणे
तुम्ही दर आठवड्याला जी गेम खेळता, त्याच्याबद्दलची Apple अकाउंट बरोबर जोडलेली मर्यादित माहिती Apple गोळा करते. आम्ही तुमच्या Apple Arcade App Clips मधील गेमप्लेसह, गेमप्ले ॲक्टिव्हिटीविषयी विशिष्ट वैयक्तिक नसलेला डेटा देखील संकलित करतो जो तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित केला जात नाही. गोळा केलेली माहिती आम्ही Apple Arcade आणि इतर गेमिंगशी संबंधित Apple सेवा तुमच्यासाठी आणि इतरांसाठी सुधारण्यासाठी आणि ऑप्टिमाइझ करण्यासाठी आणि तुमचा Apple Arcade, App Store, आणि इतर गेमिंग संबंधित Apple सेवा वैयक्तिकृत करण्यासाठी वापरतो जेणेकरून सर्वात जास्त संबंधित असलेला कॉण्टेण्ट शोधण्यास तुम्हाला मदत होईल. उदाहरणार्थ, तुम्ही यापूर्वी खेळलेल्या आणि App Store वरुन खरेदी केलेल्या गेम्सच्या आधारावर तुम्हाला आवडू शकतील असे आम्हाला वाटत असलेल्या गेम्सची आम्ही तुम्हाला शिफारस करू. वैयक्तिकरण फीचरला App Store च्या सेटिंगमध्ये तुमच्या Apple अकाउंटसाठीच्या वैयक्तिकृत शिफारशींना बंद करा वर स्लाइड करून डिसेबल केले जाऊ शकते.
Apple Arcade आणि Apple Games
जर तुम्ही Apple Games ॲप वापरले, तर ‘Apple Arcade मध्ये सुधारणा करणे आणि वैयक्तिकृत करणे’ सेक्शनमध्ये वर वर्णन केल्याप्रमाणे तुम्ही Apple Arcade कसे वापरता ह्याबद्दलची वरील माहिती, Apple Games ॲपद्वारे तुमचे Apple Games मधील अनुभव वैयक्तिकृत करण्यासाठी, Apple Arcade आणि Apple Games ऑप्टिमाइझ करण्यासाठी आणि सुधारणा करण्यासाठी आणि तुम्हाला माहिती पाठवण्यासाठी वापरली जाईल. Apple Games ॲपबद्दल अधिक माहितीसाठी, www.apple.com/legal/privacy/data/en/apple-games वर जा.
तुमच्याशी संवाद साधणे
तुमच्याकडे असलेली Apple उत्पादने आणि तुमच्या Apple सेवांच्या सदस्यता यासारख्या तुमच्या अकाउंटशी संबंधित माहितीचा वापर Apple One च्या समावेशासह, Apple Arcade आणि इतर Apple उत्पादने, सेवा, आणि तुम्हाला रुची असू शकेल अशा ऑफर याविषयी कम्युनिकेशन्स करण्यासाठी Apple कडून केला जाऊ शकतो. तुमच्या डिव्हाइसचा सीरियल नंबर सेवा ऑफरसाठी पात्रता तपासण्यास केला जाऊ शकतो. तुम्ही कौटुंबिक शेअरिंग गटात असल्यास, Apple तुम्हाला कौटुंबिक शेअरिंगमार्फत उत्पादने, सेवा आणि तुम्हाला उपलब्ध असलेल्या ऑफरविषयी कम्युनिकेशन करू शकते. तुम्ही Apple One ची सदस्यता खरेदी केली असल्यास, तुम्ही सदस्यता घेतलेल्या त्या प्रत्येक सेवांच्या फीचरविषयी आम्ही कदाचित तुम्हाला ईमेल आणि Push नोटिफिकेशन पाठवू. App Store आणि Arcade मध्ये उपलब्ध नवीन फीचर्स, कॉण्टेण्ट आणि ऑफरविषयी ईमेल आणि नोटिफिकेशन्स पाठवण्यासाठी Apple कडून App Store आणि Arcade मधील तुमच्या ॲक्टिव्हिटीच्या माहितीचा वापर केला जाऊ शकतो. तुम्ही account.apple.com वर जाऊन तुमची ईमेल प्राधान्ये बदलू शकता आणि हे ईमेल प्राप्त करणे बंद करू शकता. तुमच्या iOS, iPadOS, किंवा visionOS डिव्हाइसवर तुमची नोटिफिकेशन प्राधान्ये अपडेट करण्यासाठी सेटिंग > नोटिफिकेशन > App Store वर जा. Apple आपल्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी नोटिफिकेशन्ससह आमच्या संवादासोबतच्या तुमच्या इंटरॅक्शनबद्दलच्या माहितीचा वापर करते.
थर्ड पार्टीसोबत शेअरिंग
आम्ही गेमिंग ॲक्टिव्हिटीबाबत Apple Arcade च्या कॉण्टेण्ट प्रोव्हायडरना समुच्चित, वैयक्तिक नसलेला डेटा प्रदान करतो जेणेकरून ते त्यांच्या गेममधील प्लेयर एंगेजमेंटचे मूल्यांकन करू शकतील आणि त्यामध्ये सुधारणा करू शकतील.
जर तुमचा मोबाइल नेटवर्क प्रोव्हायडर Apple Arcade सदस्यता किंवा फ्री ट्रायल्स प्रदान करत असेल, तर तुमच्याकडे Apple Arcade सदस्यता आहे का किंवा तुम्ही मोबाइल नेटवर्क प्रोव्हायडरच्या मार्फत पात्र आहात की नाही हे निश्चित करण्यासाठी Apple द्वारे तुमचा फोन नंबर तपासला जाऊ शकतो. तुम्ही मोबाइल नेटवर्क प्रोव्हायडर किंवा इतर Apple भागीदारामार्फत साइन अप केलेले असल्यास, तुमचे अकाउंट ओळखण्यासाठी आणि तुम्ही तुमची सदस्यता सक्रिय केली आहे हे मोबाइल नेटवर्क प्रोव्हायडर किंवा इतर भागीदाराला कळवण्यासाठी Apple तुमचा फोन नंबर किंवा पार्टनरने शेअर केलेला युनिक अकाउंट आयडेंटिफायर वापरेल. आम्ही तुमच्या सदस्यतेशी संबंधित फोन नंबर किंवा युनिक आयडेंटिफायरचा वापर साइन इन दरम्यान तुमच्या अकाउंटची पडताळणी करण्यासाठी आणि तुमच्या Apple Arcade सदस्यतेला तुमच्या अकाउंटशी जोडण्यासाठी करू.
थर्ड पार्टी कॉण्टेण्ट प्रदात्याकडून डेटा संकलन
Arcade गेम प्रदान करणाऱ्या कॉटेण्ट प्रोव्हायडरना तुमचा वैयक्तिक डेटा संकलित करण्यासाठी तुमची परवानगी मिळवणे आवश्यक आहे. कॉटेण्ट प्रोव्हायडर तुमच्या वैयक्तिक डेटाचा वापर केवळ त्यांनी तुमची परवानगी मागताना सांगितलेल्या उद्देशांसाठी करू शकतात. तुम्ही Apple Arcade कॉटेण्ट प्रोव्हायडरच्या अटी, गोपनीयता धोरणे आणि ते तुमचा डेटा संकलित कसा करा करतात आणि त्याचा वापर कसा करतात हे समजण्यासाठी पद्धतींचा देखील रिव्ह्यू करायला हवा.
जाहिरात
वैयक्तिकृत जाहिरात सेटिंग सुरू केलेले असल्यास Apple चा जाहिरात प्लॅटफॉर्म तुमच्या माहितीचा वापर तुमच्याशी अधिक संबद्ध असलेल्या जाहिराती दाखवण्यासाठी करू शकतो. App Store, Apple News, आणि स्टॉकवरील जाहिराती समर्पक असल्याची खात्री करण्यासाठी तुम्ही डाऊनलोड केलेल्या Arcade ॲपची माहिती आम्ही वापरू शकतो. तुम्हाला Apple च्या जाहिरात प्लॅटफॉर्मवरून तुमच्या आवडींसाठी लक्ष्यित जाहिराती प्राप्त करायच्या नसल्यास, तुम्ही ‘वैयक्तिकृत जाहिराती’ बंद करण्याचा पर्याय निवडू शकता. वैयक्तिकृत जाहिराती बंद केल्याने Apple ला जाहिरात लक्ष्यीकरणासाठी तुमची माहिती वापरण्यापासून प्रतिबंधित केले जाईल. ह्यामुळे तुम्हाला प्राप्त होणाऱ्या जाहिरातींची संख्या कमी होणार नाही, परंतु त्या जाहिराती तुमच्याशी कमी संबंधित असू शकतात.
Apple ॲडव्हर्टायझिंग आणि गोपनीयतेबद्दल www.apple.com/in/legal/privacy/data/en/apple-advertising वर अधिक जाणून घ्या.
App Store, Apple News आणि स्टॉक्समध्ये वैयक्तिकृत जाहिरातींचा पर्याय कसा बंद करायचा हे जाणून घेण्यासाठी support.apple.com/105131 पहा.
वैयक्तिक डेटा प्रोसेस करण्यासाठी लागू होणारे कायदेशीर आधार
आम्ही Apple Arcade मधील तुमच्या वैयक्तिक डेटावर सामान्यतः Apple बरोबर तुमच्या कराराच्या कामगिरीवर प्रक्रिया करण्यास, जसे सेवा प्रदान करण्यासाठी आणि आमच्या कायदेशीर वचनबद्धतेचे पालन करण्यासाठी आवश्यक असेल त्यानुसार, प्रक्रिया करतो. जिथे संमती उचित कायदेशीर आधार असतो, तिथे आम्ही त्याला लागू होणाऱ्या स्थानिक कायद्यानुसार प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो.
जिथे लागू होणारे कायदे निर्देशित करतात, तिथे आम्ही आमच्या किंवा थर्ड पार्टीच्या कायदेशीर स्वारस्यांच्या उद्देशांसाठी गरजेनुसार वैयक्तिक डेटाच्या पुढील श्रेणी प्रोसेस करतो, ज्यामध्ये पुढील माहितीचा समावेश असतो :
- Apple Arcade चा तुमचा वापर
- Apple सेवांवरील तुमच्या सदस्यता, तुमच्या खरेदी व डाउनलोड आणि तुम्ही कौटुंबिक शेअरिंग गटामध्ये आहात की नाही ह्यासारखे तुमचे अकाउंट
- तुम्ही प्रत्येक आठवड्यात खेळत असलेले गेम
या कायदेशीर स्वारस्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे :
- तुमच्यासाठी आणि इतरांसाठी सेवा आणि इतर Apple गेमिंग संबंधित सेवा ऑप्टिमाइझ करणे आणि त्यामध्ये सुधारणा करणे
- तुमच्यासाठी सर्वाधिक संबंधित असलेला कॉण्टेण्ट शोधण्यात मदत करणे
- तुम्हाला Apple Arcade आणि इतर संबंधित Apple उत्पादने आणि सेवांविषयी आणि Apple One सारख्या तुम्हाला आवडू शकतील अशा ऑफरबद्दल माहिती पाठवणे
- कॉण्टेण्ट प्रोव्हायडरसाठी रिपोर्टिंग प्रदान करणे
- फसवणूक आणि इतर नुकसानकारक ॲक्टिव्हिटी टाळणे
रिटेन्शन
आम्ही तुमच्या व्यवहार, डाउनलोड आणि Apple Arcade मधील गेमप्ले ॲक्टिव्हिटींशी संबंधित वैयक्तिक डेटा केवळ आमच्या व्यवसायाच्या आवश्यकता पूर्ण होईपर्यंत, कराराच्या अटींपुरते किंवा कायदेशीर आवश्यकतेची पूर्तता होईपर्यंत राखून ठेवतो. तुम्ही अकाउंट बंद केल्यानंतर किंवा Apple Arcade ची सदस्यता रद्द केल्यानंतरही सदस्यता खरेदीची हिस्ट्री सारखी काही माहिती, परंतु तुमच्या संग्रहित केलेल्या कार्डाचे तपशील नाही, व्यावसायिक नोंदी म्हणून राखून ठेवली जाऊ शकते. चीनसारख्या प्रदेशांमध्ये तो कालावधी 30 वर्षांचाही असू शकेल.
कौटुंबिक शेअरिंग
तुम्ही Apple Arcade ची सदस्यता घेता, तेव्हा ती सदस्यता तुमच्या कुटुंबाच्या इतर सदस्यांसाठी उपलब्ध असते. ‘स्क्रीन टाइम’ मधील कॉण्टेण्ट व गोपनीयता निर्बंधांसह तुम्ही विशिष्ट ॲप्समध्ये घालवली जाणारी वेळ मर्यादित करू शकता आणि तुमच्या अपत्याच्या डिव्हाइसवरील फीचर ब्लॉक करू शकता. अश्लील कॉण्टेण्ट, खरेदी व डाउनलोड, आणि गोपनीयतेसाठी तुम्ही iPhone, iPad, iPod touch, किंवा Apple Vision Pro वर सेटिंगला देखील निर्बंधित करू शकता. तुम्हाला Arcade सदस्यता तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह शेअर करावयाची नसल्यास, तुम्ही खरेदी शेअरिंग डिसेबल करू शकता. तुमच्या iOS किंवा iPadOS डिव्हाइसवर, सेटिंग > [तुमचे नाव] > कौटुंबिक शेअरिंग > ‘खरेदी शेअरिंग’ वर जा. Mac वर, सिस्टीम सेटिंग > [तुमचे नाव] > कुटुंब शेअरिंग > खरेदी शेअरिंग वर जा.
फसवणूक आणि इतर नुकसानकारक ॲक्टिव्हिटी टाळणे
आम्ही Apple Arcade आणि इतर Apple ॲप व सेवांमध्ये फसवणूक आणि इतर नुकसानकारक ॲक्टिव्हिटी टाळण्यासाठी देखील वैयक्तिक डेटा संकलित करतो. ह्या माहितीमध्ये डिव्हाइसचे प्रकार आणि सॉफ्टवेअर व्हर्जन, स्थान माहिती (उपलब्ध असल्यास, तुमच्या इंटरनेट कनेक्शनच्या IP ॲड्रेसच्या भौगोलिक प्रदेशाशी अंदाजे जुळवलेले), डाउनलोड आणि खरेदी हिस्ट्री, सर्च आणि Apple Arcade व इतर ॲप आणि सेवांशी असलेल्या आंतरक्रिया ह्यासारखी माहिती समाविष्ट असते.
जेव्हा तुम्ही सदस्यता घेण्याचा प्रयत्न करता तेव्हा, आम्ही तुमच्या डिव्हाइसवर ‘डिव्हाइस विश्वसनीयता स्कोअर’ ची गणना देखील करू शकतो, ज्यासाठी तुम्ही अंदाजे किती फोन कॉल करता किंवा ईमेल पाठवता आणि प्राप्त करता ह्यासह तुम्ही तुमचे डिव्हाइस कसे वापरता ह्याबद्दलच्या माहितीचा वापर केला जातो. ‘सबमिशन’ अशा रितीने डिझाइन करण्यात आलेले आहे की Apple तुमच्या डिव्हाइसवरील अंतर्निहित मूल्यांना जाणून घेऊ शकत नाही. स्कोअर आमच्या सर्व्हरवर निश्चित वेळेसाठी संग्रहित केला जातो.
Apple ने संकलित केलेली माहिती नेहमी Apple च्या गोपनीयता धोरणानुसार हाताळली जाईल, जे www.apple.com/in/privacy वर मिळू शकते.
2025-12-12