Apple Card व गोपनीयता

अर्जावर प्रक्रिया करण्यासाठी, ओळख पडताळणीसाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी तुमची अर्जाची माहिती Apple, Goldman Sachs आणि ओळख पडताळणी सेवेबरोबर शेअर केली जाईल.
 

Apple Card गोपनीयतेला लक्षात घेऊन डिझाइन केलेले आहे जेणेकरुन तुम्ही तुमच्या वित्तीय स्थितीवर लक्ष केंद्रित करु शकता.


Privacy Icon

  • तुमच्या Apple Card ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही प्रदान करत असलेल्या माहितीचा वापर Apple ची पूर्ण मालकी असलेली उपकंपनी व Goldman Sachs कडून केला जाईल आणि तुमची ओळख पडताळणी करण्यासाठी व फसवणूक टाळण्यासाठी थर्ड पार्टी पडताळणी सेवा प्रदात्यासह ती शेअर केली जाईल.
  • Goldman Sachs, Apple Card’ ची जारीकर्ता बॅंक, आणि Mastercard, Apple Card चे वैश्विक पेमेंट नेटवर्क ह्यांना तुमच्या Apple Card व्यवहारांची माहिती प्राप्त होते, परंतु ते मार्केटिंग किंवा जाहिरातीसाठी तुमची व्यवहाराची माहिती तृतीय पक्षांना शेअर करत नाहीत किंवा विकत नाहीत.
  • खर्चाच्या सारांशांसारखी व्यवहाराची हिस्ट्री वापरणारी Apple Card फीचर, ऑन डिव्हाइस तयार केली जातात. Apple ला तुमच्या व्यवहार हिस्ट्रीविषयी माहिती नसते.

Apple Card साठी अर्ज करणे

जेव्हा तुम्ही Apple Card साठी अर्ज करता, तेव्हा Apple आणि Goldman Sachs Bank USA, Salt Lake City Branch (‘Goldman Sachs’) कडून तुमचे नाव, जन्म तारीख, संपर्क माहिती, आणि डिव्हाइस फोन नंबर यांचा वापर तुमची ओळख पडताळणी करण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी केला जातो. Goldman Sachs तुमचे अकाउंट सेटअप करण्यासाठी आणि आवश्यक योग्य प्रयत्नांसाठी देखील ह्या माहितीचा वापर करते. Goldman Sachs अकाउंट मालकांच्या अंशतः किंवा संपूर्ण सामाजिक सुरक्षा क्रमांक आणि राष्ट्राच्या नागरिकत्वाचा देश यांची पडताळणी करण्यासाठी थर्ड पार्टी ओळख पडताळणी सेवा प्रदाता वापरते; Apple ही माहिती वाचत किंवा स्टोअर करत नाही.

तुमची ओळख पडताळणी करण्यासाठी अधिक माहितीची आवश्यकता असल्यास, तुम्हाला तुमचा वाहन चालक परवाना किंवा राज्य प्राधिकरणने जारी केलेले छायाचित्र असलेले ID स्कॅन करण्यास सांगतिले जाऊ शकते. तुमच्या फोटो आयडीची इमेज तुमच्या ओळख पडताळणीसाठी आणि फसवणुकीला प्रतिबंध करण्यासाठी एका तृतीय-पक्षीय ओळख पडताळणी सेवा प्रदात्याकडे सुरक्षितरीत्या ट्रान्सफर केली जाते. Apple तुमचे छायाचित्र असलेल्या ID ची इमेज वाचत किंवा संग्रहित करत नाही, परंतु Apple Card अर्जामध्ये फसवणूक टाळण्यासाठी ओळख पडताळणी करण्यासाठी तुमचे छायाचित्र असलेल्या ID वरून नाव आणि पत्ता प्राप्त करते.

तुम्हाला क्रेडिट द्यावे की नाही आणि क्रेडिट म्हणून किती रक्कम द्यावयाची हा निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी तुम्हाला Goldman Sachs ला तुमच्या वार्षिक उत्पन्नाचा अंदाज सांगण्यासाठी देखील सांगितले जाऊ शकेल. Apple तुमचे वार्षिक उत्त्पन्न वाचत नाही किंवा स्टोअर करत नाही.

तुम्ही Apple Card च्या अटी आणि शर्तींचा स्वीकार करत नाही तोपर्यंत तुमचा अर्ज Goldman Sachs कडे क्रेडिट निर्णय घेण्यासाठी सबमिट केला जाणार नाही. जर Goldman Sachs ला तुमच्या अर्जावर प्रक्रिया करण्यासाठी अतिरिक्त माहिती हवी असल्यास, तर तुमच्या अर्जाबाबतची माहिती तुमच्या डिव्हाइसवर 30 दिवसांपर्यंत स्टोअर करून ठेवली जाईल. तुम्ही अर्जाच्या प्रक्रियेदरम्यान कुठे पॉज केले याबद्दलची माहिती Apple संकलित करते आणि तुमच्या अर्धवट भरलेल्या अर्जाबाबत आठवण करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी Apple किंवा Goldman Sachs तुमच्याशी संपर्क साधू शकेल.

तुम्ही स्थान सेवा एनेबल केलेल्या असल्यास, तुमचा अर्ज सबमिट करताना तुमच्या स्थानाच्या ढोबळ माहितीचा वापर Apple आणि Goldman Sachs कडून फसवणुक टाळण्यासाठी केला जातो. तुम्ही Apple Card साठी अर्ज करता किंवा ते मिळाल्यावर Apple Pay वर कोणतीही पेमेंट पद्धत जोडता तेव्हा कोणत्याही विशिष्ट डिव्हाइस सेटिंग एनेबल केल्या आहेत का आणि डिव्हाइसच्या वापराचे पॅटर्न्स (उदाहरणार्थ, डिव्हाइसवर हालचाल जाणवण्याची टक्केवारी, किंवा आठवड्याला कॉल्सची अंदाजे संख्या) अशी तुमच्या डिव्हाइसबद्दलची माहिती ओळख पडताळणीसाठी आणि फसवणुकीला प्रतिबंध करण्यासाठी, Apple कडे पाठवली जाऊ शकेल. फसवणूक टाळण्यासाठी Apple तुमच्या ॲप्लिकेशन फोन नंबरविषयी तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरकडून देखील माहिती प्राप्त करू शकते.

तुम्ही तुमच्या अर्जावर दिलेल्या माहितीच्या आधारावर Goldman Sachs कडून दिल्या जाणाऱ्या काही Apple Card प्रोग्राम्ससाठी तुम्ही पात्र असू शकता. Apple हे माहीत करू शकते की तुम्हाला सहभागी होण्याचे आमंत्रण मिळाले का आणि नाही आणि तुम्ही आमंत्रण स्वीकारले की नाकारले आणि हा कार्यक्रम कार्यान्वित करण्यासाठी ही माहिती Goldman Sachs सोबत शेअर करू शकेल. Apple कडे प्रोग्राममधील तुमच्या सहभागाबाबत अतिरिक्त माहिती नसेल.

Apple Card प्रोव्हिजन करणे

तुमच्या Apple Pay वर Apple Card एनेबल व सेट अप करण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी Goldman Sachs किंवा Mastercard ला देखील Apple माहिती प्रदान करू शकते. शेअर करण्यात आलेली माहिती ही तुम्ही Apple Pay सह कोणतेही कार्ड प्रोव्हिजन करतानाच्या माहितीपेक्षा वेगळी नसते, ज्यामध्ये कदाचित हे समाविष्ट असू शकते :

  • तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित नाव आणि बिलिंग पत्ता
  • तुमच्या Apple अकाउंट, iTunes, आणि App Store अकाउंट ॲक्टिव्हिटीविषयी सामान्य माहिती (उदाहरणार्थ, iTunes मध्ये तुमच्या व्यवहारांची दीर्घ हिस्ट्री आहे की नाही)
  • तुमचे डिव्हाइस, आणि तुम्ही Apple Watch चा वापर करत असल्यास, पेअर केलेल्या iOS डिव्हाइसविषयी माहिती (उदाहरणार्थ, डिव्हाइस आयडेंटिफायर, फोन नंबर, आणि तुमचे डिव्हाइसचे नाव आणि मॉडेल)
  • तुम्ही तुमचे कार्ड जोडले त्यावेळचे अंदाजे स्थान (तुम्ही स्थान सेवा एनेबल केलेली असल्यास)
  • अकाउंट किंवा पेमेंट कार्ड समाविष्ट करण्याची डिव्हाइस हिस्ट्री
  • तुम्ही Apple Pay मध्ये समाविष्ट किंवा जोडण्याचा प्रयत्न केलेल्या पेमेंट कार्डांमधून माहितीची समुच्चित आकडेवारी

तुमच्याकडे असलेली किंवा अलीकडे होती अशी कार्ड्स इतर डिव्हाइसेसवर सेट अप करण्यात मदत करण्यासाठी, Apple कार्डाचा संदर्भ तुमच्या Apple अकाउंटसह स्टोअर करते जो सुरक्षा कोड प्रविष्ट केल्यावर कार्ड जारीकर्त्याकडून किंवा पेमेंट नेटवर्ककडून पुन्हा समाविष्ट करण्यासाठी वापरले जाऊ शकतो. हे Apple Pay फीचर Apple Card सह उपलब्ध आहे.

Apple Card ने पे करणे

तुम्ही एखाद्या ॲपसह वेबवर किंवा Apple Messages for Business वरून Apple Card च्या साहाय्याने पेमेंट करण्यास सुरू करता तेव्हा कर आणि शिपिंग खर्चाच्या हिशेबासाठी तुमचा पिनकोड, पोस्टल कोड किंवा तत्सम माहिती ॲप, संकेतस्थळ किंवा मर्चंटला दिली जाते. तुम्ही पेमेंट अधिकृत केल्यावर, मर्चंटने विनंती केलेली डिव्हाइस विषयक अकाउंट नंबर, तुमचा शिपिंग पत्ता किंवा ईमेल ॲड्रेस ह्यासारखी इतर माहिती देखील प्रदान केली जाते. मर्चंट तुमच्या व्यवहाराशी संबंधित त्यांच्या गोपनीयता धोरणांमध्ये वर्णन केल्यानुसार व्यवहार होतानाच्या तुमच्या स्थानाच्या माहितीसह तुमच्या व्यवहाराची माहिती स्वतंत्रपणे संकलित करेल आणि त्याचा वापर करेल. तुमच्या डिव्हाइसच्या स्थानाचा ॲक्सेस आणि त्याचा वापर नियंत्रित करण्याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी www.apple.com/in/legal/privacy/data/en/location-services वरील स्थान सेवा आणि गोपनीयताला भेट द्या.

जेव्हा तुम्ही Apple Pay चा वापर करता, तेव्हा तुमचा Apple Card नंबर प्रदान केला जात नाही. तुमची पेमेंटविषयक माहिती ॲप, संकेतस्थळे आणि Apple Messages for Business मध्ये सुरक्षितपणे प्रसारित करण्यासाठी Apple कडे एनक्रिप्ट केलेल्या स्वरूपामध्ये पाठवली जाते, जिथे ती संक्षिप्त स्वरुपात डिक्रिप्ट केली जाते आणि विशिष्ट मर्चंट ‘की’ ने री-एनक्रिप्ट केले जाते, जेणेकरून केवळ मर्चंट, डेव्हलपर किंवा त्यांच्या पेमेंटवर प्रक्रिया करणारे तुमची पेमेंट विषयक माहिती डिक्रिप्ट करू शकतात. Mac वर जेव्हा तुम्ही पेमेंट करता ज्यावर कार्ड समाविष्ट केले जाऊ शकत नाही, तेव्हा Mac आणि अधिकृत डिव्हाइस Apple सर्व्हरमार्फत एनक्रिप्ट केलेल्या चॅनलवरून संवाद साधतात. तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखले जाऊ शकेल अशी ह्यामधील कोणतीही माहिती Apple स्वतःजवळ ठेवत नाही.

तुम्ही Apple Card वापरल्यावर, आमची जारीकर्ता बॅंक आणि पेमेंट नेटवर्क पार्टनर — Goldman Sachs व Mastercard — आणि त्यांच्या सेवा प्रदत्यांना तुमच्या व्यवहाराबद्दल माहिती प्राप्त होते, ज्यामध्ये Apple Card ऑपरेट करण्यासाठी मर्चंट, वेळ आणि रकमेबाबतच्या माहितीचा समावेश असतो. Goldman Sachs किंवा Mastercard तुमच्या व्यवहाराची माहिती तृतीय पक्षांशी जाहिरातीसाठी किंवा मार्केटिंगसाठी शेअर करत नाही किंवा ती विकत नाही.

Apple वैयक्तिक व्यवहाराबाबतची माहिती तुमच्या Apple अकाउंटमध्ये डिलिव्हर आणि संग्रहित करते आणि तुमची व्यवहारांची हिस्ट्री तुमच्या सर्व डिव्हाइसमध्ये अद्ययावत ठेवते. तुमचे व्यवहार iCloud वर एंड-टू-एंड एनक्रिप्शनचा वापर करून उच्च पातळीची डेटा सुरक्षा पातळी वापरून स्टोअर केले जातात. तुमचा डेटा तुमच्या डिव्हाइसनुसार विशिष्ट माहितीवरून निर्माण केलेल्या ‘की’ ने संरक्षित केला जातो ज्यामध्ये केवळ तुम्हाला माहीत असलेल्या डिव्हाइसचा पासकोड असतो. तुमची डिव्हाइस तुमच्या व्यवहाराची हिस्ट्री ॲक्सेस करू किंवा वाचू शकतात, परंतु Apple ही माहिती ॲक्सेस करू शकत नाही. खर्चाच्या सारांशांसारखी व्यवहाराची हिस्ट्री वापरणारी Apple Card फीचर्स, ऑन डिव्हाइस तयार केली जातात.

Apple Card कुटुंब

Apple Card ग्राहक त्यांच्या iCloud कौटुंबिक शेअरिंग गटाच्या पात्र सदस्यांबरोबर त्यांचे Apple Card शेअर करू शकतात ज्यासाठी त्यांना त्या सदस्याला को-ओनर किंवा एक सहभागी बनण्यासाठी आमंत्रित करावे लागेल. Apple Card कुटुंब आमंत्रणाची स्थिती वॉलेटमधील Apple Card पासच्या मागील बाजूस कधीही बघण्यासाठी उपलब्ध असते. आमंत्रित केल्यावर, जेव्हा एखादी ऑफर रिव्ह्यू करण्यासाठी तयार असेल आणि को-ओनर किंवा सहभागी आमंत्रण किंवा ऑफरला प्रतिसाद देतो तेव्हा आमंत्रण मॅनेज करण्यासाठी वॉलेट को-ओनर आणि सहभागींना अलर्ट करेल.

सह-मालकी असलेले अकाउंट : को-ओनर समाविष्ट करण्यासाठी, Apple Card ग्राहकांना कौटुंबिक शेअरिंग गटामधील तो सदस्य सिलेक्ट करावा लागेल ज्याला त्यांना अकाउंटवर को ओनर म्हणून समाविष्ट करायचे आहे. Apple सिलेक्ट केलेल्या कौटुंबिक शेअरिंग गटाच्या सदस्याला को-ओनरशिप मिळवण्यासाठी आमंत्रण पाठवेल आणि आमंत्रित करणाऱ्यांचे Apple Card शेअर करेल. सध्या Apple Card अकाउंट नसलेल्या आमंत्रितांना वर वर्णन केल्याप्रमाणे अर्जविषयक माहिती प्रदान करावी लागेल. Goldman Sachs ला को ओनरशिप असलेल्या Apple Card च्या क्रेडिट लाइनचे मूल्यमापन करण्याची अनुमती देण्यासाठी, Apple Card च्या ग्राहकांना त्यांच्या सध्याच्या उत्पन्नाची माहिती प्रदान करणे गरजेचे असेल. दोन्ही को ओनर Apple Card च्या सध्याच्या शिल्लक असलेल्या कोणत्याही रकमेसाठी जबाबदार असल्याने, को ओनर असलेल्या Apple Card च्या ऑफर अटींचा भाग म्हणून शिलकीबद्दलची सध्याची माहिती उघड केली जाईल. को ओन केलेले अकाउंट तयार केले गेल्यास, प्रत्येक को ओनर Goldman Sachs शी संपर्क साधून एकत्रित केलेल्या अकाउंटमधील मागील व्यवहारांविषयीच्या माहितीच्या ॲक्सेसची विनंती करू शकतो; अलीकडील व्यवहार देखील डिव्हाइसवर उपलब्ध असतील. को-ओनर असलेल्या Apple Card अर्जदारांना त्यांची को-ओनरशिप असलेल्या Apple Card ची ऑफर रिव्ह्यू करण्यासाठी तयार आहे आणि जेव्हा त्यांचा को-ओनर ऑफरच्या अटींना प्रतिसाद देईल तेव्हा Apple अर्जदारांना अलर्ट करेल. प्रत्येक सह-मालकाला येथून पुढे अकाउंटवरील सर्व व्यवहारांच्या माहितीचा ॲक्सेस असेल. शिल्लकीचे तपशील, ज्यामध्ये उपलब्ध क्रेडिट, एकूण शिल्लक रक्कम आणि क्रेडिटची मर्यादा देखील दोन्ही को-ओनरसाठी उपलब्ध असतील.

सहभागी अकाउंट : सहभागी समाविष्ट करण्यासाठी, Apple Card च्या ओनरला ज्यांना अकाउंटमध्ये सहभागी म्हणून समाविष्ट करायचे आहे त्यांना पात्र कौटुंबिक शेअरिंग गटाचा सदस्य म्हणून सिलेक्ट करणे आवश्यक आहे. Apple प्रदान केलेली माहिती ओनरचे Apple Card शेअर करण्यासाठी कौटुंबिक शेअरिंग गटाच्या सदस्याला आमंत्रण पाठवण्यासाठी वापरेल. सहभागी 18 वर्षांपेक्षा कमी वयाचा असल्यास, प्रौढ ओनरला सहभागीचे कायदेशीर नाव आणि जन्मतारखेची पडताळणी करण्यास सांगितले जाईल; सहभागी 18 वर्षे किंवा अधिक वयाचा असल्यास, सहभागीला त्याचे कायदेशीर नाव, जन्मतारीख आणि घराच्या पत्त्याची पडताळणी करण्यास सांगितले जाईल. 18 वर्ष किंवा अधिक वयाच्या सहभागीना कंझ्युमर रिपोर्टिंग एजन्सीकडे असलेल्या त्यांच्या फाइलमध्ये समाविष्ट केलेल्या अकाउंटची माहिती हवी असल्यास, ते त्यांचे सहभागी अकाउंट सेट अप करत असताना Goldman Sachs ला त्यांचा सोशल सिक्युरिटी नंबर प्रदान करू शकतात. सहभागी ऑनबोर्डिंग प्रक्रियेचा भाग म्हणून देऊ केलेली माहिती Goldman Sachs कडे एनक्रिप्ट केली जाईल आणि Apple कडून सहभागी ऑनबोर्डिंग पूर्ण होईपर्यंत किंवा 30 दिवस जाईपर्यंत ती स्टोअर केली जाईल. सहभागी ऑनबोर्डिंग पूर्ण झाल्याची माहिती ओनर आणि सहभागी Apple अकाउंटसह Goldman Sachs कडे Apple Card अकाउंट सेट अप आणि मॅनेज करण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी पाठवली जाईल.

ओनर वॉलेटमधील त्यांच्या Apple Card पासच्या मागील बाजूस जाऊन, सहभागीचे नाव सिलेक्ट करून आणि शिल्लकीचे तपशील दाखवा एनेबल करून उपलब्ध क्रेडिट, एकूण शिल्लक आणि क्रेडिटची मर्यादा यांसारखे शिल्लकीविषयीचे तपशील सहभागीसह शेअर करणे निवडू शकतात. शिल्लकमध्ये योगदान देणाऱ्या सर्व व्यवहारांसाठी ओनर जबाबदार असतात, त्यामुळे ते इतर सर्व ओनर किंवा सहभागींची व्यवहार ॲक्टिव्हिटी बघू शकतात, मात्र सहभागी केवळ त्यांच्या स्वतःच्या व्यवहाराची माहिती बघू शकतात. ओनर सहभागीसाठी व्यवहाराची मर्यादा देखील सिलेक्ट करू शकतात, ज्यामध्ये वॉलेटमधील त्यांच्या Apple Card च्या मागील बाजूस जाऊन सहभागीचे नाव आणि व्यवहार मर्यादा सिलेक्ट करून कोणत्याही क्षणी बदल करू शकतात.

नोटिफिकेशन्स : ओनर Apple Card कुटुंब अकाउंटवरील ॲक्टिव्हिटीविषयीची नोटिफिकेशन वॉलेटमधील त्यांच्या Apple Card पासच्या मागील बाजूस जाऊन को-ओनरचे किंवा सहभागीचे नाव सिलेक्ट करून आणि नोटिफिकेशन एनेबल किंवा डिसेबल करून मॅनेज करू शकता. विशिष्ट डॉलर रकमेपेक्षा जास्त व्यवहार ह्यासारखी विशिष्ट मर्यादा गाठल्यास, ओनर नोटिफिकेशन प्राप्त करणे निवडू शकतात. Apple कडून नोटिफिकेशन मॅनेज करण्यासाठी नोटिफिकेशन सेटिंगबद्दलच्या माहितीचा वापर केला जाईल; नोटिफिकेशन सेटिंग अकाउंटवरील इतरांबरोबर शेअर केल्या जाणार नाहीत. व्यवहाराची नोटिफिकेशन एनेबल केली असताना, ओनरना खरेदीचा दिनांक आणि वेळ, खरेदीची रक्कम, मर्चंट आणि उपलब्ध असल्यास स्थान दाखवणारे Push नोटिफिकेशन प्राप्त होतील. व्यवहारांवर मर्यादा असलेल्या सहभागींबाबत नोटिफिकेशनसाठी, सहभागींनी महिन्याभरात केलेल्या एकूण खर्चाबाबतचे नोटिफिकेशन देखील दाखवले जाईल.

Apple Card आणि स्थान

तुम्ही जेव्हा Apple Pay सह Apple Card चा वापर करता, तेव्हा मर्चंट आणि स्थानाविषयीची माहिती तुमच्या डिव्हाइसवरून Apple नकाशा मध्ये तुमच्याशी कनेक्ट केली जाणार नाही अशा पद्धतीने पाठवली जाते, जेणेकरून पत्ता आणि संपर्कविषयक डेटा यांसारखी वर्धित मर्चंट माहिती प्रदान केली जाऊ शकेल. तुम्ही प्रत्यक्ष Apple Card वापरल्यास, व्यवहारासाठी योग्य मर्चंट ओळखण्यात Apple नकाशाची मदत करण्यासाठी तुमच्याकडे तुमच्या डिव्हाइसचे स्थान वापरण्याचा पर्याय असेल. तुम्ही ‘वॉलेट’ ॲपमध्ये स्थान सेवा एनेबल केलेली असल्यास, जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष Apple Card ऑर्डर करता किंवा ते बदलता किंवा उर्वरित पेमेंट शेड्यूल करता तेव्हा ह्यासारख्या Apple Card वापराशी संबंधित स्थानविषयक माहितीचा वापर फसवणूक ओळखण्यात आणि तिला प्रतिबंध करण्यात मदत करण्यासाठी Apple कडून केला जाऊ शकतो. तुम्ही Apple Card वापरता तेव्हा Apple तुमचे स्थान संकलित करत नाही. ऑनलाइन व्यवहारांसाठी, तुम्ही Apple Card ने पैसे भरल्यावर, Goldman Sachs ला फसवणुकीला प्रतिबंध करणाऱ्या थर्ड पार्टी सेवा प्रदात्याकडून स्थान डेटा प्राप्त होऊ शकेल, ज्याचा वापर Goldman Sachs केवळ फसवणुकीला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने करेल.

Apple Card आणि ॲनालिटिक्स

Apple Card मध्ये सुधारणा करण्यात मदत करण्यासाठी, Apple हे Apple Card च्या अर्जप्रक्रियेबाबत आणि वॉलेट ॲपमधील Apple Card फीचर्सचा वापर करण्याबाबतची माहिती संकलित केली जाते आणि ती माहिती तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखता येणार नाही अशा स्वरूपामध्ये संग्रहित केली जाते. या माहितीमध्ये अर्ज पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ आणि मासिक ॲक्टिव्हिटी व्ह्यूसारखे Apple Card चे कोणते फीचर सर्वाधिक वारंवार वापरले जातात ह्यांचा समावेश असतो. Apple ही माहिती इतर Apple उत्पादने आणि सेवा सुधारण्यासाठी, मार्केटिंगसाठी आणि फसवणूक प्रतिबंध आणि सुरक्षिततेसाठी देखील वापरू शकते.

Apple तुमच्या Apple सह असलेल्या अकाउंटबद्दलची माहिती जसे की, तुमच्याकडे Apple Card आहे अशाप्रकारची तथ्यपूर्ण माहिती वित्तीय अंदाजासारख्या अंतर्गत संशोधन आणि ॲनालिटिक्स उद्देशांसाठी वापरू शकते. Apple तुम्ही Apple ची कोणती उत्पादने खरेदी केली आहेत, तुमच्याकडे Apple अकाउंट कधीपासून आहे आणि Goldman Sachs ला क्रेडिटबद्दलचा निर्णयात सुधारणा करण्यात सहाय्य करतील असे Apple मेट्रिक्स ओळखण्यास मदत करून Apple Card मध्ये सुधारणा करण्यासाठी तुम्ही Apple बरोबर किती वेळा व्यवहार करता ह्यासारख्या तुमच्या Apple सह संबंधांची माहिती वापरू शकते. संबंधित Apple मेट्रिक्सची ओळख करता येण्यासाठी तुमच्या Apple बरोबरच्या संबंधाविषयीचा कोणताही वैयक्तिक डेटा Goldman Sachs सह शेअर केला जाणार नाही. तुम्ही ‘Apple रिलेशनशिप डेटा आणि Apple Card.’ ह्या सब्जेक्ट लाइनसह dpo@apple.com वर आमच्या गोपनीयता टीमला ईमेल करून तुमच्या Apple सोबतच्या रिलेशनशिप माहितीचा वापर करणे बंद करू शकता. अर्जकर्ते आणि कार्डधारक त्यांच्या क्रेडिटच्या ऑफरचे पुन्हा मूल्यांकन करण्यासाठी किंवा त्यांची क्रेडिट लाइन वाढवण्यासाठी Goldman Sachs सह ओळखण्यात आलेले मेट्रिक्स शेअर करण्याचा पर्याय निवडू शकतात.

Apple Card आणि संवाद

Apple कडून तुम्ही Apple Card अकाउंटसाठी अर्ज केला आहे की नाही किंवा सध्या तुमच्याकडे ते अकाउंट आहे की नाही ह्यासारख्या तुमच्या Apple Card अकाउंटच्या स्टेटसचा वापर मार्केटिंग संदेशासह कोणताही एखादा संदेश तुमच्याशी संबंधित आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी केला जाऊ शकतो. Apple तुमच्या डिव्हाइसवर संदेश देखील पाठवू शकते, जे तुम्हाला आणि तुमच्या डिव्हाइसला माहीत असलेल्या परंतु Apple ला माहीत नसलेल्या तुमच्या व्यवहार हिस्ट्री आणि स्थान ह्यासारख्या माहितीचा वापर एखादा संदेश तुमच्याशी संबंधित आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी करू शकते. उदाहरणार्थ, Apple तुमच्या डिव्हाइसवर खासकरून प्रवासाची खरेदी करणाऱ्या लोकांशी संबंधित असलेला संदेश पाठवू शकते. तुम्ही प्रवासाची खरेदी केली की नाही ते Apple ला माहीत असण्याची गरज नाही — तुमचे डिव्हाइस, संदेश तुमच्याशी संबंधित आहे की नाही हे ठरवण्यासाठी तुमच्या व्यवहार हिस्ट्रीचा वापर करू शकते. हे तुम्ही तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करत असताना तुम्हाला संबंधित कम्युनिकेशन्स प्राप्त होत असल्याची खात्री करण्यास मदत करते. तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर कोणते संदेश पाहता ह्याची माहिती Apple ला नसते.

तुमच्याशी संबद्ध केली जाऊ शकत नाही अशी निनावी आणि समुच्चित माहिती देखील Apple Card चे मार्केटिंग आणि इतर संदेश पाठवण्यासाठी वापरली जाऊ शकते. तुम्ही मार्केटिंग ईमेलमधील ‘सदस्यता रद्द करा’ लिंकवर क्लिक करून किंवा Apple Card साठी नोटीफिकेशन बंद करून मार्केटिंगचे संदेश मिळवणे बंद करू शकता.

Apple ॲप्स आणि संकेतस्थळे तुमच्याकडे Apple Card आहे की नाही हे तपासू शकतील

तुम्ही Apple Pay एनेबल केले आहे की नाही हे तपासू शकणारी Apple ॲप्स आणि संकेतस्थळे तुमच्याकडे Apple Card आहे की नाही हे देखील तपासू शकतात. iOS वर आणि Safari मध्ये, तुम्ही तुमच्या सेटिंग बदलून तुमच्याकडे Apple Card आहे की नाही हे तपासण्यापासून Apple ॲप्स आणि संकेतस्थळांना डिसेबल करू शकता. iOS वर, सेटिंग > ॲप्स > ‘Safari’ वर जा आणि ‘Apple Pay साठी तपासा’ बंद करण्यासाठी टॅप करा. Mac वर, Safari > सेटिंग > ॲडव्हान्स वर जा आणि सिलेक्ट केलेले ‘Apple Pay आणि Apple Card तपासण्यासाठी संकेतस्थळांना अनुमती द्या’ रद्द करा.

Daily Cash

तुमच्याकडे Apple Cash असल्यास तुमच्या Apple Card दैनिक रोख रक्कम डिसबर्समेंटवर Apple Payments Services LLC च्या सहकारी कंपनी असलेल्या परवानाकृत मनी ट्रांसमीटर Apple Payments Inc.मार्फत प्रक्रिया केली जाते. तुम्ही वॉलेट उघडून, तुमच्या Apple Cash कार्डवर टॅप करून, ‘अधिक’ बटणावर टॅप करून आणि त्यानंतर ‘तुमचा डेटा कशारीतीने मॅनेज केला जातो ते पाहा’ वर टॅप करून Apple Payments Inc तुमच्या गोपनीयतेचे कसे संरक्षण करते त्याबाबत अधिक जाणून घेऊ शकता.

Apple Card सपोर्ट

तुम्हाला Apple Card विषयी काही प्रश्न असल्यास, तुम्ही संदेश ॲप सुरू करून तुमच्या वॉलेट ॲपद्वारे सपोर्टशी संपर्क साधू शकता. तुम्ही शेअर करत असलेली वैयक्तिक डेटासारखी कोणतीही माहिती, Apple तुमच्या विनंतीवर प्रक्रिया करण्यासाठी वापरेल. सेवा देण्यासाठी तुमची चौकशी Goldman Sachs कडे पाठवणे आवश्यक असल्यास, Apple तुमच्याविषयी आणि तुमच्या चौकशीविषयीची माहिती Goldman Sachs सह शेअर करेल जेणेकरून ते तुम्हाला अधिक चांगल्या रितीने मदत करू शकतील. सेवा देण्यासाठी Goldman Sachs कडे पाठवलेली कोणतीही वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य आर्थिक माहिती Apple राखून ठेवणार नाही. प्रश्नांसाठी तुम्ही 877-255-5923 वर कॉल करून सपोर्टशी थेट संपर्क देखील साधू शकता.

तुमचे Apple Card अकाउंट बंद करणे

तुम्ही तुमचे Apple Card अकाउंट बंद केल्यास, तुमच्या Apple Card अकाउंटविषयीची माहिती तुम्ही वॉलेट ॲपमधून Apple Card काढून टाकत नाहीत तोपर्यंत वॉलेटमध्येच राहील.

तुमची माहिती अपडेट केली जात आहे

तुम्ही तुमच्या Apple Card शी संबंधित तपशील संपादित करून वॉलेट ॲपमध्ये तुमचा बिलिंग पत्ता अपडेट करू शकता. तुम्ही Goldman Sachs शी संपर्क साधून तुमच्या Apple Card अकाउंटची माहिती देखील अपडेट करू शकता. Goldman Sachs हे Apple Card च्या सेवा प्रदान करण्यासाठी, अपडेट केलेली Apple Card अकाउंटची माहिती कदाचित Apple सह शेअर करू शकते.

Apple लाइन ऑफ क्रेडिट

Apple लाइन ऑफ क्रेडिट Apple Card चे फीचर आहे. तुम्ही apple.com वर Apple Card साठी अर्ज केल्यास तुम्ही कदाचित Apple लाइन ऑफ क्रेडिट फीचरसाठी पात्र असू शकाल आणि Apple तुमच्या माहितीपैकी काही माहितीवर तुम्ही पात्र Apple डिव्हाइसवर Apple Card साठी अर्ज करता तेव्हा जशी प्रक्रिया केली जाते त्यापेक्षा वेगळ्या प्रकारे प्रक्रिया करेल.

जर तुम्ही apple.com वर Apple Card साठी अर्ज केलात आणि Apple लाइन ऑफ क्रेडिटसाठी पात्र असाल, तर तुमच्या अर्जाची माहिती वेबवरून संकलित आणि सबमिट केली जाईल. तुमच्या डिव्हाइसऐवजी तुमच्या ॲप्लिकेशन फोन नंबर ची माहिती Apple कडे ओळख पडताळणीसाठी आणि फसवणुकीला प्रतिबंध करण्यासाठी पाठवली जाईल. ह्याव्यतिरिक्त, Apple ॲप्लिकेशन करताना ब्राउझरचा प्रकार आणि IP ॲड्रेस संकलित करेल आणि Apple आणि Goldman Sachs ह्या माहितीचा वापर फसवणुकीला प्रतिबंध करण्यासाठी करतील. Goldman Sachs ला तुमच्या ॲप्लिकेशनवर प्रक्रिया करण्यासाठी अतिरिक्त माहितीची गरज असल्यास, तुम्ही एखाद्या पात्र डिव्हाइसवरून Apple Card साठी ॲप्लिकेशन करता त्याप्रमाणे, अतिरिक्त माहिती प्रदान करताना तुमच्या ॲप्लिकेशन विषयीची माहिती तुमच्या डिव्हाइसवर संग्रहित केली जाणार नाही. Apple लाइन ऑफ क्रेडिटमध्ये सुधारणा करण्यात मदत करण्यासाठी Apple Card च्या Apple लाइन ऑफ क्रेडिट फीचरशी संबंधित अर्ज प्रक्रियेविषयीची माहिती Apple संकलित करते.

Apple लाइन ऑफ क्रेडिटचा वापर कदाचित केवळ Apple शी संबंधित व्यवहार करण्यासाठी केला जाऊ शकतो. Apple लाइन ऑफ क्रेडिटने पैसे देत असताना, Apple कर आणि शिपिंग खर्चाचा हिशोब करणे एनेबल करण्यासाठी तुमचा पिनकोड किंवा इतर त्यासारख्या माहितीचा वापर करते. तुमच्या व्हर्च्युअल पेमेंट अकाउंट नंबर, शिपिंग पत्ता आणि ईमेल पत्त्याचा वापर तुमच्या व्यवहारावर प्रक्रिया करण्यासाठी केला जाऊ शकतो. Apple लाइन ऑफ क्रेडिट अचूक स्थान माहितीचा वापर करत नाही.

Apple तुमच्याशी ईमेलमार्फत आणि तुम्ही Apple सह संपर्क करण्यासाठी वापरत असलेल्या इतर चॅनलमार्फत संवाद साधू शकते. Apple Card प्रमाणे, Apple तुमच्या डिव्हाइसवर केवळ तुम्हाला आणि तुमच्या डिव्हाइसला माहित असलेली परंतु Apple ला माहित नसलेली माहिती वापरून Apple च्या लाइन ऑफ क्रेडिटविषयी संदेश पाठवणार नाही. तुम्ही मार्केटिंग ईमेलमधील ‘सदस्यता रद्द करा’ लिंकवर क्लिक करून Apple लाइन ऑफ क्रेडिटचे मार्केटिंग संदेश मिळवणे बंद करू शकता.

Apple लाइन ऑफ क्रेडिटविषयी तुम्हाला प्रश्न असल्यास, तुमचा वैयक्तिक डेटा अपडेट करायचा असल्यास किंवा तुमचे अकाउंट बंद करायचे असल्यास, तुम्ही 877-255-5923 वर कॉल करून सपोर्टशी संपर्क साधू शकता. एखाद्या पात्र डिव्हाइसवर Apple Card प्रोव्हिजनिंग केल्यानंतर, वॉलेट ॲपद्वारे संदेश सुरू करण्याची सपोर्ट फंक्शनॅलिटी ॲक्सेस केली जाऊ शकते.

Apple Card वेब पोर्टल

तुम्ही card.apple.com वर तुमच्या Apple अकाउंटने साइन इन करून, Apple Card चे वेब सर्व्हिसिंग वापरून Apple Card आणि Apple लाइन ऑफ क्रेडिट हे फीचर मॅनेज करू शकता. पेमेंट करण्यासाठी, तुम्ही त्या बॅंक अकाउंटविषयी माहिती प्रदान करू शकता ज्यावरून पेमेंट केले जाईल. ही माहिती केवळ तुमचे पेमेंट प्रोसेस करण्यासाठी वापरली जाते. Apple तुम्ही पेमेंट शेड्यूल केले किंवा पेमेंट केले की नाही यासारखी तुम्ही पोर्टलवर केलेल्या कृतींविषयीची माहिती संकलित करेल आणि त्या माहितीचा वापर तुमची विनंती पूर्ण करण्यासाठी किंवा समस्या सोडविण्यासाठी आणि यासारख्या गोष्टींसाठी करेल. Apple तुमच्या विनंतीची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असेल त्यानुसार संकलित केलेली विशिष्ट माहिती Goldman Sachs सह शेअर करू शकते. तुमच्या पोर्टलच्या वापराबाबतची माहिती जी तुमच्याशी लिंक केली जाऊ शकत नाही तिचा वापर कदाचित Apple Card मध्ये सुधारणा करण्यासाठी Apple करू शकते.

अधिक माहिती

Apple तुमची Apple Card संबंधित माहिती कायद्याचे पालन करण्यासाठी किंवा फसवणुकीला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक असेल त्यानुसार तुम्ही तुमचे अकाउंट बंद केल्यानंतरही वापरू शकते. Apple सोबतच्या तुमच्या संबंधाविषयीची माहिती Apple आमच्या सेवा प्रदात्यासह शेअर करू शकते, ज्यांना ही नोटिस आणि Apple सूचनांसह सुसंगतपणे माहिती हाताळणे बंधकारक असते, प्राप्त होणाऱ्या कोणत्याही वैयक्तिक डेटाला सुरक्षित ठेवण्यासाठी रास्त सुरक्षा उपायांचा वापर करणे आवश्यक असते आणि त्यांनी सेवा समाप्त झाल्यानंतर लवकरात लवकत वैयक्तिक डेटा हटवायला हवा जोपर्यंत ही माहिती बाळगणे कायदेशीरपणे आवश्यक नसेल.

Apple कायद्याने आवश्यक असलेली आणि फसवणुकीला प्रतिबंध करण्यासाठी तुमची माहिती Goldman Sachs सह शेअर करू शकते. Apple ला फसवणुकीला प्रतिबंध करण्यासाठी तुमच्याबद्दलची Apple Card संबंधित माहिती Goldman Sachs कडून प्राप्त देखील होऊ शकते. Goldman Sachs हे तुमची वैयक्तिक माहिती कशी सुरक्षित ठेवतात ह्याबाबत तुम्ही https://www.goldmansachs.com/privacy-and-cookies वर उपलब्ध असलेले त्यांचे गोपनीयता धोरण रिव्ह्यू करून अधिक जाणून घेऊ शकता. Apple किंवा त्यांच्या सहयोगी कंपन्या हे बॅंक नाही आणि ही सूचना तुम्हाला Goldman Sachs कडून प्राप्त होणाऱ्या कोणत्याही सूचनांव्यतिरिक्त आहे.

Apple ह्या सूचनेमध्ये वर्णन केलेल्या वैयक्तिक डेटावर प्रक्रियेसंदर्भात डेटा कंट्रोलर म्हणून कार्य करते, अन्यथा नमूद केल्याशिवाय, ह्यासारख्या ॲक्टिव्हिटी Apple ची संपूर्ण मालकी असलेल्या उपकंपनी Apple Payments Services LLC, द्वारे प्रदान केल्या जातात. Apple Card वापरून, तुम्ही Apple आणि तिच्या उपकंपन्या व एजंटच्या प्रेषण करणे, संकलित करणे, देखभाल करणे, प्रक्रिया करणे, आणि वर वर्णन केल्याप्रमाणे तुमच्या माहितीच्या वापराला सहमती आणि संमती देता.

Apple ने संकलित केलेली माहिती नेहमी Apple च्या गोपनीयता धोरणानुसार हाताळली जाईल, जे www.apple.com/in/privacy वर मिळू शकते.

2025-12-12