Apple अकाउंट व गोपनीयता
Apple अकाउंट तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहे आणि तुम्ही काय शेअर करता हे निवडण्यासाठी तुम्हाला एनेबल करते.
![]()
- तुमच्या Apple अकाउंटने साइन इन केल्यावर तुम्ही ह्या iPhone वर iCloud, App Store, iMessage आणि ‘शोधाशोध’ यासारख्या सेवांना एनेबल करू शकाल.
- तुमचे संपर्क, दिनदर्शिका, छायाचित्रे, डॉक्युमेंट, आरोग्य, ॲक्टिव्हिटी, आणि इतर ॲप डेटा ह्याच्या समावेशासह काही विशिष्ट डेटा Apple कडे संग्रहित करण्यासाठी आणि तुमच्यासाठी बॅकअप घेण्यासाठी पाठवला जाईल.
- ह्याव्यतिरिक्त, तुम्हाला अधिक चांगली सेवा आणि सपोर्ट प्रदान करण्यासाठी तुमचे डिव्हाइस तुमच्या Apple अकाउंटशी संलग्न केले जाईल.
तुमचे Apple अकाउंट आणि सर्व Apple सेवांना अगदी सुरुवातीपासून तुमच्या गोपनीयतेची सुरक्षा करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. केवळ तुमचा अनुभव उत्तम करण्यासाठी आम्ही आम्हाला आवश्यक असलेला डेटा संकलित करण्यासाठी खूप मेहनत घेतो. जेव्हा आम्ही डेटा संकलित करतो, तेव्हा आम्ही हा डेटा का संकलित करत आहोत आणि आम्हाला हे करणे गरजेचे का आहे, हे तुम्हाला माहीत असणे महत्त्वाचे समजतो, जेणेकरून तुम्ही अचूक निवड करू शकाल.
Apple अकाउंट हे iCloud, App Store आणि इतर Apple ऑनलाइन स्टोअर, iMessage, आणि FaceTime सारख्या Apple सेवा ॲक्सेस करण्यासाठी आणि तुमची सर्व डिव्हाइस आणि वेबवरील तुमचा कॉण्टेण्ट ॲक्सेस करण्यासाठी तुमच्याकडून वापरला जाणारा वैयक्तिक अकाउंट असते. तुमच्या Apple अकाउंटमध्ये साइन इन करण्यासाठी तुम्ही वापरत असलेली माहिती तसेच संपर्क, पेमेंट आणि विश्वसनीय फोन नंबर किंवा सुरक्षा प्रश्न यासारखे सुरक्षा तपशील यांचा समावेश असतो ज्यांचा वापर तुम्ही सर्व Apple सेवांसाठी करता. Apple तुमच्या डिव्हाइसचे नाव, अनुक्रमांक, आणि इतर हार्डवेअर आयडेंटिफायरची माहिती तुम्हाला जास्त चांगली सेवा आणि सपोर्ट देण्यासाठी राखून ठेवते ज्यामध्ये तुम्ही डिव्हाइस सक्रिय केल्यावर तुमच्या डिव्हाईसचे वॉरंटी स्टेटस डिस्प्ले करण्याची सोय आणि सर्व्हिस ऑफरबद्दल तुमची पात्रता तपासणे समाविष्ट असते. तुम्ही account.apple.com वर तुमच्या Apple अकाउंट पृष्ठावर तुमच्या Apple अकाउंटची माहिती संपादित करू शकता आणि तुमच्या डिव्हाइस व फोन नंबरची यादी पाहू शकता.
तुमच्या Apple अकाउंटने साइन इन केल्यावर तुम्ही ह्या iPhone वर iCloud, App Store, iMessage FaceTime आणि ‘शोधाशोध’ यासारख्या सेवा एनेबल कराल. तुमच्या संबंधित फोन नंबरसह तुमची Apple अकाउंट माहिती प्रत्येक सेवेसह वापरली जाईल, ज्यामुळे ॲनालिटिक्स माहिती उत्पन्न केली जाईल ज्याचा वापर त्या सेवा राखण्यासाठी आणि सुधारण्यासाठी केला जाऊ शकतो. ह्याव्यतिरिक्त, तुमचे सिलेक्ट केलेले प्रोफाइल छायाचित्र, तुमचे संपर्क, दिनदर्शिका, छायाचित्रे, डॉक्युमेंट, आरोग्य, ॲक्टिव्हिटी, Safari टॅब, आणि इतर ॲप डेटा ह्याच्या समावेशासह तुमच्या डिव्हाइसमधील काही विशिष्ट डेटा Apple कडे संग्रहित करण्यासाठी आणि तुमच्यासाठी बॅकअप घेण्यासाठी पाठवला जाईल.
तुमचे डिव्हाइस तुमच्या डिव्हाइसच्या देश किंवा प्रदेशावर आधारित काही कायदेशीर आवश्यक फीचर आणि सेवांसाठी पात्र आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी Apple तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित माहिती संकलित करते. तुम्ही इन्स्टॉल करता त्या ॲपची देखील माहिती आम्ही संकलित करतो, ज्यामध्ये तुम्ही ते कोठून इन्स्टॉल करता (उदाहरणार्थ, संकेतस्थळ, किंवा ॲप मार्केटप्लेस), तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित लेखांकन, अहवाल, ॲनालिटिक्स,आणि ह्या कायदेशीररित्या आवश्यक फीचर आणि सेवा एनेबल करण्याच्या संबंधित फसवणूक शोधण्याच्या हेतूंचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, आम्ही काही प्रकरणांमध्ये तुमच्या गोपनीयता अधिकारांबद्दल वय-उपयुक्त माहिती प्रदान करण्यासह आमच्या दायित्वांचे पालन करण्यासाठी तुमच्या Apple अकाउंटशी संलग्न वयाचा वापर करतो.
तुम्ही प्रौढ आहात की नाही ह्याची पुष्टी करण्यासाठी काही देशांमध्ये किंवा प्रदेशांमध्ये तुम्हाला क्रेडिट कार्ड किंवा शासनानी जारी केलेले ID ह्यांसारखी अतिरिक्त माहिती सादर करणे आवश्यक असू शकते. तुम्ही ह्या आवश्यकता असलेल्या देशात किंवा प्रदेशात आहात की नाही हे ठरवण्यासाठी आम्ही अकाउंटची माहिती आणि ऑन डिव्हाइस तंत्रज्ञान एकत्रितरित्या आणि काही प्रसंगी तुमच्या इंटरनेट कनेक्शनचा IP ॲड्रेस वापरतो. तुम्हाला App Store मधून ॲप्स डाउनलोड करणे, वेब कॉण्टेण्ट फिल्टर आणि कम्युनिकेशन्स सुरक्षा सारखी ऑनलाइन सुरक्षा फीचर्स डिसेबल करणे आणि अल्पवयीन व्यक्तीसाठी Apple अकाउंट तयार करणे ह्यासारख्या काही कृती करण्याची अनुमती देण्यासाठी, जिथे कायदेशीररित्या आवश्यक आहे तिथे आम्ही वयाच्या पुष्टीकरणाच्या अतिरिक्त माहितीची विनंती करतो. आम्ही तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित दिनांक, पद्धत आणि देश किंवा प्रदेशाविषयी वयाच्या पुष्टीकरणाची माहिती स्टोअर करतो. तुम्ही खरेदीसाठी किंवा वॉलेटमध्ये डिजिटल क्रेडेंशिअल वापरण्यासारख्या इतर कारणांसाठी ते स्टोअर करणे स्वतंत्रपणे निवडल्याशिवाय आम्ही ते डॉक्युमेंटच स्टोअर करत नाही.
iCloud आणि गोपनीयता
iCloud मध्ये साइन इन होत आहे
जेव्हा तुम्ही iCloud वापरता तेव्हा, तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर संग्रहित केलेला विशिष्ट डेटा ऑटोमॅटिकली Apple ला पाठवला जाईल आणि Apple द्वारे संग्रहित केला जाईल. ह्यामुळे तुम्हाला तुमच्या iCloud-एनेबल्ड डिव्हाइसवर किंवा संगणकांवर (‘डिव्हाइस’) तुमचा डेटा ऑटोमॅटिकली ॲक्सेस करण्याची अनुमती दिली जाते. ह्या डेटामध्ये पुढील गोष्टी समाविष्ट असू शकतात :
- संपर्क
- दिनदर्शिका
- रिमाइंडर्स
- बुकमार्क्स
- Safari टॅब
- आरोग्य डेटा
- होम डेटा
- नोट्स
- Freeform
- छायाचित्रे
- Apple Vision Pro ॲप
- डॉक्युमेंट्स
- वॉलेट डेटा
- कीचेन आणि पासवर्ड
- तुमच्या डिव्हाइसवरील फोन नंबर
- डिव्हाइस आणि अकाउंट सेटिंग
- iCloud वापरणाऱ्या इतर Apple ॲप्समधील डेटा
- iCloud वापरणाऱ्या थर्ड पार्टी ॲपचा डेटा
iCloud बॅकअप हे निश्चित करण्यासाठी एनेबल केले जाते की तुम्हाला तुमचे डिव्हाइस बदलण्याची किंवा रीस्टोअर करण्याची गरज पडल्यास तुमच्या डिव्हाइसवर डेटाचा सध्याचा बॅकअप आहे.
तुमच्या डिव्हाइसवरील ‘सेटिंग’ मधून तुम्ही कधीही कोणती iCloud फीचर सक्षम करायची आणि iCloud ला कोणता डेटा पाठवायचा हे ॲडजस्ट करू शकता.
iCloud डेटा सुरक्षा
iCloud तुमची माहिती ट्रांझिटमध्ये असताना ती एनक्रिप्ट करून, ती एनक्रिप्टेड स्वरूपात iCloud मध्ये स्टोअर करून आणि ऑथेंटिकेशनसाठी सुरक्षित टोकन वापरून तिचे संरक्षण करते. काही विशिष्ट माहितीसाठी, Apple कडून एंड टू एंड एनक्रिप्शनचा वापर केला जातो. ह्याचा अर्थ असा होतो की डिझाइनप्रमाणे, केवळ तुम्हीच ही माहिती ॲक्सेस करू शकाल आणि अशाच डिव्हाइसवर ज्यावर तुम्ही iCloud मध्ये साइन इन केलेले आहे. इतर कोणीही, Apple देखील, एंड टू एंड एनक्रिप्ट केलेली माहिती ॲक्सेस करू शकणार नाही. iCloud डेटा सुरक्षेविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी, support.apple.com/102651 ला भेट द्या.
Apple आणि थर्ड पार्टी डेटा सेंटर, दोन्हीही, तुमचा डेटा स्टोअर करण्यासाठी आणि प्रोसेस करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. थर्ड पार्टी डेटा सेंटरमध्ये स्टोअर केलेलं डेटा प्रोसेस करताना, एनक्रिप्शन की केवळ सुरक्षित सर्व्हरवर रन होत असलेल्या Apple सॉफ्टवेअरकडूनच ॲक्सेस केल्या जाऊ शकतात, आणि केवळ आवश्यक प्रोसेसिंग करात असतानाच केल्या जाऊ शकतात.
iCloud कीचेन
iCloud कीचेन तुमच्या Safari संकेतस्थळाचे यूझरनेम आणि पासवर्ड, क्रेडिट कार्डची माहिती, आणि Wi-Fi नेटवर्कची माहिती तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर अद्ययावत आणि उपलब्ध ठेवते. Mail, संपर्क, दिनदर्शिका, संदेश, Facebook, X, LinkedIn ह्यासारख्या ॲप्ससाठी आणि इतर इंटरनेट अकाउंट्ससाठी तुम्ही वापरत असलेल्या अकाउंटची माहिती देखील हे संग्रहित करू शकते आणि तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर ही माहिती ऑटोमॅटिकली समाविष्ट करू शकते.
iCloud कीचेन एंड टू एंड एनक्रिप्शनचा वापर करते आणि हे अशा रितीने डिझाइन केलेले आहे की, फक्त तुम्हीच ही माहिती ॲक्सेस करू शकता आणि फक्त त्याच डिव्हाइसेसवर ज्यावर तुम्ही iCloud मध्ये साइन इन केले आहे. इतर कोणीही, Apple देखील, तुमचा iCloud कीचेन डेटा ॲक्सेस करू शकत नाही. तुम्ही कोणत्याही क्षणी ‘iCloud सेटिंग’ मध्ये जाऊन iCloud कीचेन बंद करणे निवडू शकता.
iCloud बॅकअप
जेव्हा तुम्ही iCloud बॅकअपचा वापर करता, तेव्हा तुमच्या बॅकअपमध्ये छायाचित्रे, व्हिडिओ, संदेश (iMessage, SMS, व MMS), आरोग्य आणि इतर ॲप डेटा, स्थान सेटिंग (तुम्ही सेट अप केलेले स्थान-आधारित रिमाइंडर ह्यासारखी सेटिंग), व्हिज्युअल व्हॉइसमेल, डिव्हाइस सेटिंग, डिव्हाइस वैशिष्ट्ये, आणि तुमच्या सेटिंगवर आधारित तुमच्या iOS किंवा iPadOS डिव्हाइसमधील इतर डेटाचा समावेश असू शकतो.
तुम्ही सेटिंग > [तुमचे नाव] > iCloud > स्टोरेज > ‘बॅकअप्स’ वर जाऊन, बॅकअप सेक्शनमध्ये तुमचे iOS किंवा iPadOS डिव्हाइस सिलेक्ट करून, आणि तुम्हाला ज्या ॲपसाठी बॅकअप डिसेबल करायचे आहे ते ॲप बंद करण्यासाठी टॅप करून, एखाद्या विशिष्ट ॲपसाठी तुमच्या ॲप डेटाचा बॅकअप घेण्यापासून iCloud ला थांबवू शकता.
तुम्ही iCloud सेटिंगमधून iCloud बॅकअप पूर्णपणे बंद करू शकता आणि तुमच्या iOS किंवा iPadOS डिव्हाइसचा तुमच्या संगणकावर बॅकअप घेण्यासाठी Finder (macOS Catalina 10.15 किंवा त्यानंतरचे व्हर्जन) किंवा iTunes (macOS Mojave 10.14 किंवा त्यानंतरचे व्हर्जन) वापरू शकता. iCloud वरून तुमचा बॅकअप डेटा पूर्णपणे काढून टाकण्यासाठी, तुम्ही iCloud बॅकअप बंद करण्यापूर्वी तुमचा वैयक्तिक बॅकअप हटवू शकता. नाहीतर, बॅकअप डेटा 180 दिवसांपर्यंत राखून ठेवला जाईल.
iCloud सह डेटा शेअर करणे
जर तुम्ही Notes, Pages, Numbers, Keynote, Freeform, आणि काही विशिष्ट थर्ड पार्टी ॲप्समध्ये, सार्वजनिकरित्या किंवा गोपनीय रीतीने फाइल शेअर करण्यासाठी iCloud वापरण्यास, Apple कडे शेअर केलेल्या फाइलचा ॲक्सेस असेल आणि त्यांना स्टोअर करेल. तुमच्या खात्याशी संबंधित असलेले तुमचे नाव आणि आडनाव (लागू असल्यास), तुमच्या डिव्हाइसचा फोन नंबर आणि फाइलचे नाव अशा कोणत्याही व्यक्तीसाठी उपलब्ध असेल जिच्याकडे शेअरिंग लिंकचा ॲक्सेस आहे, जरी तुमचे शेअर करणे हे खाजगी किंवा सार्वजनिक असेल. खाजगी शेअर सहभागींची ओळख अशा कोणालाही उपलब्ध करून दिली जाणार नाही ज्यांना खाजगी शेअरसाठी आमंत्रित केले गेले नाही आणि ते स्वीकारले गेले नाही.
तुम्ही शेअर केलेली लायब्ररी तयार किंवा जॉइन केल्यास, सर्व सहभागी iCloud द्वारे शेअर केलेल्या लायब्ररीमध्ये छायाचित्रे आणि व्हिडिओ समाविष्ट, संपादित करू शकतात किंवा हटवू शकतात. शेअर केलेल्या लायब्ररीमध्ये मॅन्युअली किंवा ऑटोमॅटिक शेअरिंग वापरुन कॉण्टेण्ट समाविष्ट करण्याचे अनेक मार्ग आहेत. तुम्ही सेटिंग > छायाचित्रे > शेअर केलेली लायब्ररी > तुमच्या iOS किंवा iPadOS डिव्हाइसच्या ‘कॅमेऱ्यामधून शेअर करा’ यावर जाऊन तुम्हाला कॉण्टेण्ट कसा शेअर करायचा आहे हे नियंत्रित करू शकता.
iCloud आणि ॲप्स
काही ॲप्स तुम्ही ॲपला प्रदान करत असलेला डेटा आणि कॉण्टेण्ट स्टोअर करण्यासाठी iCloud वापरतात, ज्यामुळे तुम्ही iCloud एनेबल केलेल्या तुमच्या सर्व डिव्हाइसवर डेटा ॲक्सेस करू शकाल. ॲप तुमचा काही किंवा सर्व डेटा iCloud वर स्टोअर करण्याचा पर्याय निवडू शकते. थर्ड पार्टी ॲपद्वारे तुम्हाला शोधण्याची विनंती केली जाऊ शकते, जेणेकरून त्या ॲप्लिकेशनचे इतर यूझर Apple खात्यानुसार शोधतील तेव्हा तुमचे नाव आणि आडनाव पाहू शकतील.
तुम्ही ॲपचा iCloud ॲक्सेस बंद करुन त्या ॲपला iCloud वर डेटा स्टोअर करण्यापासून थांबवू शकता. असे करण्यासाठी, सेटिंग > [तुमचे नाव] > ‘iCloud’ वर जा आणि ‘यादीमध्ये दाखवलेली ॲप्स’ बंद करण्यासाठी टॅप करा.
iCloud आवश्यक असणाऱ्या Apple सेवा
Apple Pay, ॲक्टिव्हिटी शेअरिंग, होम, Handoff, युनिव्हर्सल क्लिपबोर्ड आणि Apple Watch वापरून अनलॉक’ करा यासारख्या Apple सेवा वापरण्यासाठी तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरून iCloud वर साइन इन असणे आवश्यक आहे. Apple तुमचा iCloud प्लॅन होम ॲपमध्ये सुरक्षित कॅमेरा रेकॉर्डिंग सेट अप करण्यासाठी आणि वापरण्यासाठी तुमच्या पात्रतेची पडताळणी करण्यासाठी वापरते. Apple तुमच्या कॅमेरा रेकॉर्डिंगचा कॉण्टेण्ट ॲक्सेस करू शकत नाही. तुम्ही iCloud ची सर्व फीचर्स वापरण्याची गरज नाही आणि तुमच्या डिव्हाइसेसवरील iCloud सेटिंगमधून तुम्हाला नको असलेली कोणतीही iCloud फीचर्स बंद करू शकता.
iCloud मधून साइन आउट करा
तुम्हाला तुमच्या iOS किंवा iPadOS डिव्हाइसवर आणि कोणत्याही पेअर केलेल्या Apple Watch वर iCloud वापरणे थांबवायचे असल्यास, तुम्ही सेटिंग > [तुमचे नाव] वर जाऊन आणि ‘साइन आउट’ वर टॅप करून iCloud मधून साइन आउट करू शकता. तुमच्या Mac वर iCloud वापरणे थांबवण्यासाठी, सिस्टीम सेटिंग > [तुमचे नाव] वर जा आणि ‘साइन आउट करा’ वर क्लिक करा. तुमच्या Apple अकाउंटचा पासवर्ड आवश्यक असू शकतो.
तुमच्याशी संवाद साधणे
तुमच्याकडे असलेली Apple उत्पादने, तुम्ही डाउनलोड केलेली Apple ॲप्स, तुमच्या अकाउंटवर नोंदणी केलेली डिव्हाइसेस आणि तुमच्या Apple सेवांच्या सदस्यता, त्याचप्रमाणे तुमची विद्यार्थी म्हणून पडताळणी केली गेली आहे की नाही ह्यासारख्या तुमच्या अकाउंटशी संबंधित माहितीचा वापर, Apple तुम्हाला Apple One च्या समावेशासह iCloud आणि इतर Apple उत्पादने, सेवा आणि तुम्हाला रुची असू शकेल अशा ऑफर्स ह्याविषयी कम्युनिकेशन्स पाठवण्यासाठी करू शकते. तुमच्या डिव्हाइसचा सीरियल नंबर सेवा ऑफरसाठी पात्रता तपासण्यास केला जाऊ शकतो. तुम्ही कौटुंबिक शेअरिंग गटात असल्यास, Apple तुम्हाला कौटुंबिक शेअरिंगमार्फत उत्पादने, सेवा आणि तुम्हाला उपलब्ध असलेल्या ऑफरविषयी कम्युनिकेशन करू शकते. तुम्ही Apple One ची सदस्यता खरेदी केली असल्यास, तुम्ही सदस्यता घेतलेल्या त्या प्रत्येक सेवांच्या फीचरबद्दल आम्ही तुम्हाला कम्युनिकेशन करू शकतो. हे संवाद आणि आमच्या सेवा सुधारण्यासाठी, Apple तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित असणाऱ्या आमच्या Apple One च्या संवादांशी तुमच्या परस्परक्रियांबद्दल माहिती संग्रहित करते.
ईमेल मार्केटिंग
तुम्ही ईमेल मार्केटिंग प्राप्त करण्यासाठी संमती दिल्यास, तुम्ही हे कम्युनिकेशन्स ईमेलने प्राप्त करू शकता. तुम्ही account.apple.com वर जाऊन किंवा तुमच्या iOS किंवा iPadOS डिव्हाइसवर सेटिंग > [तुमचे नाव] > वैयक्तिक माहितीवर जाऊन तुमची ईमेल प्राधान्ये बदलू शकता किंवा हे ईमेल प्राप्त करणे बंद करू शकता.
नोटिफिकेशन्स
तुम्ही नोटिफिकेशन्सद्वारे देखील हे कम्युनिकेशन्स प्राप्त करू शकता. तुमच्या iOS किंवा iPadOS डिव्हाइसवर तुमची नोटिफिकेशन प्राधान्ये अपडेट करण्यासाठी किंवा नोटिफिकेशन बंद करण्यासाठी सेटिंग > ‘नोटिफिकेशन’ वर जा.
कौटुंबिक शेअरिंग
कौटुंबिक शेअरिंग तुम्हाला आणि तुमच्या कौटुंबिक गटाला सदस्यता, खरेदी आणि स्थान शेअर करण्याची अनुमती देते. कौटुंबिक आयोजक कौटुंबिक गटातील अपत्यांसाठी आणि किशोरवयीन अपत्यांसाठी ‘खरेदीसाठी विचारा’ आणि ‘स्क्रीन टाइम’ ह्यासारखे ‘आईवडीलांचे नियंत्रण’ सेट अप करू शकतात. तुमच्या कौटुंबिक गटातील एखाद्या सदस्याने Apple TV सारख्या विशिष्ट Apple डिव्हाइसेसवर साइन इन केल्यास, ते डिव्हाइस तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे Apple Account नाव आणि प्रोफाइल छायाचित्र दाखवून त्यांना समाविष्ट करण्याचे सुचवू शकते. कौटुंबिक शेअरिंगविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी, www.apple.com/in/legal/privacy/data/en/family-sharing वर जा.
tvOS आणि थर्ड-पार्टी TV वर Apple TV ॲप प्रोफाइल्स
तुम्ही tvOS वर आणि काही थर्ड TV वरील व्हिडिओ ॲपवर तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित प्रोफाइल्स तयार करू शकता, ज्यात मुलांच्या प्रोफाइलचा समावेश असू शकतो. या प्लॅटफॉर्म्सवरील Apple TV ॲपवर ह्या प्रोफाइल्सचा वापर केला जाऊ शकतो आणि त्या Apple TV ॲपवर वैयक्तिकृत अनुभव प्रदान करतात. प्रोफाइल्स ज्या Apple अकाउंटशी संबंधित असतात ती मॅनेजिंग प्रोफाइल आहे. तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित प्रोफाइल तयार करण्यासाठी, तुमचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे. तुम्ही प्रोफाइलसाठी नाव आणि इमेज निवडाल आणि प्रोफाइल लहान मुलासाठी आहे की नाही हे निर्दिष्ट कराल. प्रोफाइल सेटअप दरम्यान आणि सेटिंगमध्ये कधीही, तुम्ही तुमच्या Apple अकाउंटचा वापर करून खरेदी आणि भाड्याने घेण्याची प्रोफाइलची क्षमता नियंत्रित करू शकता. तुम्ही Apple TV ॲपसाठी कॉण्टेण्ट निर्बंध देखील सेट करू शकता. tvOS वर, सेटिंग > ॲप्स > TV > ‘कॉण्टेण्ट निर्बंध’ वर जा, प्रोफाइल सिलेक्ट करा आणि स्टेप्स फॉलो करा.
तुम्ही निवडलेल्या कॉण्टेण्ट मानांकनांच्या अधीन राहून, प्रोफाइल Apple कडून तुम्ही खरेदी किंवा भाड्याने घेतलेला कॉण्टेण्ट आणि तुमचे Apple TV सबस्क्रिप्शन आणि Apple TV चॅनेल ॲक्सेस करू शकते आणि बघू शकते. प्रोफाइल तुमच्या कनेक्ट केलेली थर्ड पार्टी व्हिडिओ ॲप्सदेखील ॲक्सेस करू शकते, पण कॉण्टेण्ट निर्बंध फक्त Apple TV ॲपला लागू होतात.
प्रोफाइल्सविषयी Apple गोळा करते आणि स्टोअर करते ती माहिती व्यवस्थापित प्रोफाइलच्या Apple अकाउंटशी संबंधित असते. यामध्ये, उदाहरणार्थ, प्रोफाइल काय पाहते, ते कधी पाहिले, कोणत्या डिव्हाइसवर पाहिले आणि कॉण्टेण्टमधील प्रोफाइलची प्रगती याबद्दल तपशीलवार प्लेबॅक ॲक्टिव्हिटी समाविष्ट आहे. Apple TV ॲप माहिती कशा प्रकारे गोळा करते आणि वापरते याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी www.apple.com/legal/privacy/data/en/apple-tv-app वर जा.
व्यवस्थापित प्रोफाइलकडून मंजुरी मिळाल्यानंतर सेटिंगमध्ये प्रोफाइलला Apple अकाउंटमध्ये अपग्रेड केले जाऊ शकते. tvOS वर, सेटिंग > ‘प्रोफाइल आणि अकाउंट’ वर जा, प्रोफाइल सिलेक्ट करा, ‘Apple अकाउंट’ ला अपग्रेड करा सिलेक्ट करा आणि स्टेप्स फॉलो करा. जेव्हा प्रोफाइल अपग्रेड केली जाते, तेव्हा त्या प्रोफाइलने काय पाहिले याबद्दलची माहिती आणि पाहण्याच्या हिस्ट्रीशी संबंधित तपशील नवीन Apple अकाउंटला ट्रांसफर केले जातील आणि ते व्यवस्थापित करणाऱ्या प्रोफाइलशी संबंधित असणार नाहीत. तथापि, जेव्हा प्रोफाइल अपग्रेड केली जाते, तेव्हा खरेदी, सदस्यता आणि भाड्याने घेतलेल्या गोष्टी व्यवस्थापित करणाऱ्या प्रोफाइलशी संबंधित राहतील आणि प्रोफाइलच्या नवीन Apple अकाउंटला ट्रांसफर केल्या जाणार नाहीत किंवा त्याच्याशी संबंधित असणार नाहीत. सेटिंगमधील व्यवस्थापित प्रोफाइलद्वारे देखील प्रोफाइल कधीही हटवले जाऊ शकते. tvOS वर, सेटिंग > प्रोफाइल्स आणि अकाउंट्स वर जा, प्रोफाइल निवडा आणि ‘प्रोफाइल डिलीट’ करा निवडा. एकदा डिलीट केल्यावर, प्रोफाइल आणि त्याची वॉच हिस्ट्री व्यवस्थापित प्रोफाइलच्या Apple अकाउंटसाठी उपलब्ध नसेल.
iMessage, FaceTime, आणि iCloud
तुम्ही तुमच्या Apple अकाउंटने तुमच्या iPhone वर साइन इन केल्यावर, तुम्हाला iMessage, FaceTime, iCloud, आणि इतर Apple सेवांवर ऑटोमॅटिकली साइन इन केले जाईल. तुमच्या डिव्हाइसवरील फोन नंबरची देखील पडताळणी केली जाईल आणि तुमच्या Apple अकाउंटबरोबर जोडला जाईल. तुम्ही ज्या लोकांशी संपर्क साधता किंवा ज्यांच्यासह डेटा शेअर करता त्यांना तुमचे Apple अकाउंट किंवा फोन नंबर दाखवले जातील, आणि तुमचे Apple अकाउंट, आणि तुमच्या अकाउंटवरील ईमेल ॲड्रेस किंवा फोन नंबर वापरुन लोक तुमच्याशी संपर्क साधू शकतात. तुम्ही सेटिंग > [तुमचे नाव] > ‘वैयक्तिक माहिती’ वर जाऊन लोकांनी तुमच्याशी संपर्क कसा साधावा हे निवडू शकता. तुम्ही सेटिंग > ‘संदेश’ वर जाऊन आणि iMessage आणि FaceTime आणि गोपनीयतेविषयी माहिती वर टॅप करून देखील iMessage आणि FaceTime आणि गोपनीयतेविषयी अधिक जाणून घेऊ शकता.
iTunes, App Store आणि संगीत
तुम्ही तुमच्या Apple अकाउंटने तुमच्या iPhone वर साइन इन केल्यावर, तुम्हाला iTunes Store, App Store, आणि Apple Music मध्ये ऑटोमॅटिकली साइन इन केले जाईल, जेणेकरून तुम्ही खरेदी करू शकाल किंवा Apple Music त्वरित आणि सहज वापरणे सुरु करू शकाल. तुम्ही निवडलेल्या कोणत्याही खरेदी आमच्या सिस्टीममध्ये नोंदवल्या जातील जेणेकरून तुम्ही त्यांना कोणत्याही क्षणी पुन्हा डाउनलोड करू शकाल. जर तुम्ही Apple Music वापरत असाल, तर तुमची ऐकण्याची हिस्ट्री जतन केली जाऊ शकते आणि वैयक्तिकृत शिफारसी प्रदान करण्यात मदत करण्यासाठी वापरली जाऊ शकते. तुम्ही Apple Music सेटिंगमधून तुमची ऐकण्याची हिस्ट्री शेअर न करणे निवडू शकता.
तुमच्या प्रदेशात iTunes Match उपलब्ध असल्यास आणि तुम्ही iTunes Match वापरत असल्यास, iCloud तुमच्या iTunes लायब्ररीमधून मीडियाविषयी माहिती संकलित करेल आणि एकतर iTunes Store मध्ये सध्या उपलब्ध असलेल्या गाण्यांसह मीडिया जुळवेल किंवा जी गाणी जुळत नाहीत त्यांना अपलोड करेल, त्यानंतर ती गाणी योग्य डिव्हाइसेसद्वारे ॲक्सेस केली जाऊ शकतात.
ऑटोमॅटिक साइन इन
तुमच्या परवानगीने, Apple तुम्हाला कोणत्याही iPhone, iPad किंवा Apple TV वर अशा काही सहभागी थर्ड-पार्टी ॲप्समध्ये ऑटोमॅटिकली साइन इन करू शकते ज्यामध्ये तुम्ही तुमच्या Apple अकाउंटने साइन इन केलेले आहे. तुमच्या डिव्हाइसेसवर साइन इन एनेबल करण्यासाठी तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित सहभागी ॲपकडून मिळालेले साइन इन टोकन Apple स्टोअर करते. तुम्ही तुमच्या Apple अकाउंट सेटिंगमध्ये प्रत्येक सहभागी ॲपसाठी ही ऑटोमॅटिकली साइन इन करण्याची क्षमता मॅनेज करू शकता. तुमच्या iOS किंवा iPadOS डिव्हाइसवर, सेटिंग > [तुमचे नाव] > मीडिया व खरेदी> ‘कनेक्ट केलेली अकाउंट्स’ वर जा.
पार्टनरच्या माध्यमातून Apple सदस्यता
जर तुमचा मोबाइल नेटवर्क प्रोव्हायडर किंवा इतर Apple भागीदार Apple सेवांसाठी (जसे Apple One, Apple Music, किंवा Apple TV) सदस्यता आणि विनामूल्य ट्रायल्स प्रदान करत असेल, तर विनामूल्य ट्रायल किंवा सदस्यता ओळखण्यासाठी, साइन इनच्या वेळी तुमचे अकाउंट पडताळण्यासाठी आणि तुमची Apple सदस्यता किंवा विनामूल्य ट्रायल तुमच्या Apple अकाउंटशी कनेक्ट करण्यासाठी, Apple तुमच्या फोन नंबरचा किंवा युनिक अकाउंट आयडेंटिफायरचा आणि काही विशिष्ट प्रसंगी भागीदाराने शेअर केलेल्या Apple डिव्हाइस अनुक्रमांकाचा वापर करेल. आम्ही फोन नंबर किंवा एकमेव खाते आयडेंटिफायरचा वापर मोबाइल नेटवर्क प्रदाता किंवा भागीदाराला हे कळवण्यासाठी करू की तुम्ही तुमची मोफत चाचणी किंवा सदस्यता सक्रिय केली आहे.
पेमेंट पद्धती, गिफ्ट कार्ड आणि Apple अकाउंट शिलकीमध्ये रक्कम भरणे
App Store, iTunes, संगीत, आणि इतरांकडून खरेदी करण्यासाठी, तुम्ही तुमच्या Apple अकाउंटमध्ये वैध पेमेंट पद्धत समाविष्ट करणे आवश्यक आहे. iOS वर पेमेंट पद्धत समाविष्ट करण्यासाठी, सेटिंग > [तुमचे नाव] > ‘पेमेंट व शिपिंग’ वर जा, ‘पेमेंट पद्धत समाविष्ट करा’ वर टॅप करा, आणि संबंधित पेमेंट तपशील समाविष्ट करा. तुम्ही मॅन्युअली माहिती प्रविष्ट करून किंवा तुमच्या पेमेंट कार्डचे छायाचित्र घेऊन पेमेंट तपशील समाविष्ट करू शकता. तुम्ही तुमच्या पेमेंट कार्डचे छायाचित्र घेऊन पेमेंटचे तपशील समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्यास, तुमचे डिव्हाइस आवश्यक फील्ड दाखवण्यासाठी इमेजमधून संबंधित माहिती घेईल; ही इमेज Apple कडून पाहिली किंवा संग्रहित केली जाणार नाही. जेव्हा तुम्ही नवीन पेमेंट कार्ड जोडता, तेव्हा Apple तपासते की हे पेमेंट कार्ड दुसऱ्या Apple अकाउंटशी संबंधित आहे का नाही. जर असे असेल, तर Apple हे पेमेंट कार्ड आधीपासूनच फाइलवर असलेल्या Apple अकाउंट धारकाला सूचित करू शकते की हे कार्ड नवीन Apple अकाउंटमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. तुमची वैयक्तिक माहिती आणि Apple अकाउंट तपशील ह्या नोटिफिकेशनचा भाग म्हणून शेअर केले जाणार नाहीत. जर तुम्ही अशा देश किंवा प्रदेशात असाल जिथे आम्ही तुमची प्रौढ असल्याची पुष्टी करणे आवश्यक आहे आणि तुम्ही अशी पेमेंट पद्धत समाविष्ट केलेली आहे किंवा पूर्वी समाविष्ट केलेली आहे जी ही वयाच्या पुष्टीकरणाची आवश्यकता पूर्ण करते, तर आम्ही तुमच्या Apple अकाउंटला प्रौढ व्यक्तीचा अकाउंट म्हणून ओळखण्यासाठी त्या पेमेंट पद्धतीचा वापर करतो.
Apple तुमची खरेदी पूर्ण करण्यासाठी, कायद्याचे पालन करण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी, अकाउंट नंबर आणि मुदतबाह्य होण्याचा दिनांक यांच्या समावेशासह तुम्ही प्रदान केलेल्या पेमेंट पध्दतीचा तपशील गोळा करते, स्टोअर करते आणि ट्रांसफर करते. जिथे कायदेशीररित्या आवश्यक आहे, तिथे Apple किंवा आमचे पेमेंट भागीदार (उदाहरणार्थ, पेमेंट प्रोसेस करण्यात सहभागी असलेल्या बॅंका किंवा इतर संस्था) तुमचे व्यवहार प्रोसेस करण्यासाठी आणि कायद्याचे पालन करण्यासाठी शासनाने जारी केलेले ओळखपत्र यासारखी अतिरिक्त वैयक्तिक माहिती गोळा करू शकतात, संग्रहित करू शकतात आणि हस्तांतरित करू शकतात. तुम्ही Apple ला बिलिंग आणि शिपिंगचा पत्ता देखील प्रदान करू शकता, ज्याचा वापर मार्केटिंग आणि ॲनालिटिक्स उद्देशांसह कायद्याचे पालन करण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी केला जाऊ शकतो.
जेव्हा तुम्ही पेमेंट कार्डचा वापर करता, तेव्हा Apple भविष्यातील खरेदी, आवर्ती व्यवहार किंवा तुम्ही अधिकृत केलेल्या इतर वापरांसाठी तुमचे कार्ड नंबर आणि बिलिंग माहिती स्वतःजवळ ठेवू शकते आणि ऑटोमॅटिकली अपडेट करू शकते. Apple ही माहिती तुमच्या वित्तीय संस्था किंवा पेमेंट नेटवर्कवरून प्राप्त करू शकते आणि फसवणूक प्रतिबंधन आणि पडताळणीसाठी देखील वापरू शकते.
तुम्ही Apple Pay एनेबल केलेले असल्यास, Apple तुमच्या Apple अकाउंटमधील फाइलमध्ये पेमेंट पद्धत म्हणून समाविष्ट करण्यासाठी काही Apple Pay पेमेंट पद्धती पात्र आहेत की नाही हे देखील तपासेल आणि त्या पेमेंट पद्धती ‘वॉलेट मध्ये सापडले’ च्या खाली डिस्प्ले केल्या जातील. जेव्हा तुम्ही तुमच्या Apple अकाउंटवरून व्यवहार करता, तेव्हा Apple फाइलवरील कोणत्याही Apple अकाउंट पेमेंट पद्धती Apple Pay साठी योग्य आहेत की नाही हे देखील तपासेल. तसे असल्यास, तुमची पेमेंट माहिती सुरक्षित ठेवण्यात मदत करण्यासाठी, Apple त्या पेमेंट पद्धतीसाठी Apple Pay एनेबल करू शकते. तुम्ही सेटिंग > [तुमचे नाव] > ‘पेमेंट व शिपिंग’ वर जाऊन कोणत्याही क्षणी तुमच्या पेमेंट पद्धती बदलू शकता.
तुम्ही तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित पेमेंट पद्धत वापरुन Apple Gift Card खरेदी करू शकता आणि Apple ला प्राप्तकर्त्याचा ईमेल ॲड्रेस, तुमचे नाव, आणि गिफ्ट कार्डाची रक्कम प्रदान करून त्यांच्याबरोबर गिफ्ट कार्ड शेअर करू शकता. तुम्ही तसे निवडल्यास, तुम्ही संदेश देखील प्रविष्ट करू शकता. Apple प्राप्तकर्त्याच्या माहितीचा वापर गिफ्ट कार्डची विक्री आणि रिडेम्प्शन, कायद्याचे पालन करण्यासाठी आणि फसवणूक रोखण्याच्या उद्देशाने करेल.
तुम्ही तुमच्या Apple अकाउंट शिल्लकीमध्ये गिफ्ट कार्ड मूल्य लागू करून Apple गिफ्ट कार्ड रिडीम देखील करू शकता. जेव्हा तुम्ही Apple Gift Card रिडीम करता, तेव्हा गिफ्ट कार्डाविषयी माहिती Apple अकाउंटच्या शिलकीसह संलग्न केली जाते आणि तिचा वापर Apple कडून कायद्याचे पालन करण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी केला जाऊ शकतो. तुमच्या गिफ्ट कार्डाच्या रिडिम्प्शनविषयी विशिष्ट माहिती, जसे तुम्ही रिडिम केलेल्या गिफ्ट कार्डचे नंबर, यांचा वापर तुमचा रिडिमप्शनचा अनुभव रिडीम केले आहेत यासारखी काही माहिती तुमचा रिडिमप्शन अनुभव आणि Apple कडून तुमच्याशी होणारे कम्युनिकेशन्स वैयक्तिकृत करण्यासाठी देखील वापरली जाऊ शकते. तुम्ही iTunes Store वर जाऊन, तळाशी स्क्रोल करून, Apple अकाउंट > ‘Apple अकाउंट पहा’ वर टॅप करुन आणि वैयक्तिकृत शिफारसी बंद करण्यासाठी टॅप करुन वैयक्तिकृत बनवण्यासाठी गिफ्ट कार्डाच्या माहितीचा वापर करण्यातून बाहेर पडू शकता.
फाइलवरील तुमची पेमेंट पद्धती वापरून तुम्ही थेट तुमच्या Apple अकाउंट शिलकीमध्ये निधी जमा करू शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या Apple अकाउंट शिल्लकीमध्ये निधी समाविष्ट करता, तेव्हा तुमच्याकडे आवर्ती निधी वृद्धीसाठी ऑटोमॅटिक निधी किंवा कालावधी सेट करण्याचा पर्याय असू शकतो. जेव्हा तुम्ही ऑटोमॅटिक निधी वृद्धी सेटअप करता, तेव्हा तुम्हाला तुमची शिल्ल्क किंवा आवर्ती निधी वृद्धी (उदाहरणार्थ, एकदा तुम्ही नावनोंदणी केल्यानंतर पुष्टीकरण नोटिशी, पावत्या आणि रिमाइंडर) शी संबंधित संवाद Apple कडून तुमच्या डिव्हाइस किंवा इमेल वर प्राप्त होईल. तुम्ही तुमच्या Apple अकाउंट सेटिंगमध्ये जाऊन कोणत्याही क्षणी ऑटोमॅटिक निधी वृद्धी अपडेट करू शकता किंवा थांबवू शकता.
तुम्ही गिफ्ट कार्ड रिडीम केल्यानंतर किंवा तुमच्या Apple अकाउंट शिल्लकेमध्ये पैसे भरल्यानंतर, तुमची अपडेट केलेली Apple अकाउंट शिल्लक ‘वॉलेट’ मध्ये दिसेल जेणेकरून Apple Store मधील खरेदीसाठी तुम्हाला तुमच्या Apple अकाउंटमधील शिल्लक सहजपणे वापरता येऊ शकेल.
पेमेंट पद्धती, गिफ्ट कार्ड, आणि तुमच्या Apple अकाउंट शिल्लकीमध्ये निधी समाविष्ट करण्याचा तुमचा अनुभव सुधारण्यासाठी, Apple तुमच्या Apple अकाउंटच्या पेमेंट सेटिंगसह, तुमच्या क्लिक्स आणि टॅप्स ह्यांच्या समावेशासह तुमच्या आंतरक्रियाबद्दल विशिष्ट डेटा संकलित करू शकते.
सदस्यता व्यवस्थापन
तुम्ही तुमच्या Apple अकाउंट सेटिंगमध्ये Apple च्या इन ॲप खरेदी सिस्टीमच्या माध्यमातून खरेदी केलेल्या Apple सेवांच्या आणि तृतीय पक्षाच्या सेवांच्या तुमच्या सदस्यता पाहू आणि व्यवस्थापित करू शकता. तुमच्या iOS डिव्हाइसवर, सेटिंग > [तुमचे नाव] > ‘सदस्यता’ वर जा. सक्रिय किंवा अलिकडेच सक्रिय केलेल्या सदस्यतेचे तपशील बघण्यासाठी, त्यांना व्यवस्थापित किंवा रद्द करण्यासाठी, ‘सदस्यता’ वर टॅप करा. तुम्ही iCloud कुटुंबामध्ये असल्यास, तुम्ही तुमच्या कुटुंबासह तुमची सदस्यता शेअर करणे तसेच तुमच्या नुतनीकरण पावतीची प्राधान्येदेखील मॅनेज करू शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या Apple अकाउंटच्या माध्यमातून तुमची सदस्यता बघता आणि मॅनेज करता, तेव्हा Apple तुम्हाला डिस्प्ले करू इच्छित असलेले कोणतेही संदेश किंवा ऑफरची डेव्हलपरकडून विनंती करण्यासाठी Apple तुमच्या सदस्यतेच्या खरेदीच्या वेळी डेव्हलपरना प्रदान केलेल्या पावतीची माहिती वापरू शकते. Apple कडून आपल्या स्वतःच्या गरजेसाठी अशा संदेशांच्या कॉण्टेंटला संग्रहित केले जात नाही किंवा अन्यथा त्याला वापरले जात नाही ज्यांना आम्ही डेव्हलपरच्या वतीने डिस्प्ले करतो, परंतु संदेशांची विनंती डेव्हलपरला हे दर्शवू शकते की तुम्ही तुमची सदस्यता मॅनेज करत आहात, आणि संदेश डिस्प्ले केला गेला होता की नाही आणि कोणत्या प्रकारचा संदेश डिस्प्ले केला गेला ह्याबद्दलची माहिती Apple संकलित करू शकते. तुमचा सदस्यता व्यवस्थापनाबरोबरचा अनुभव सुधारण्यासाठी, Apple तुमच्या Apple अकाउंट सदस्यता सेटिंगमध्ये तुम्ही काय बघता, कशावर क्लिक करता, आणि टॅप करता, ह्याच्यासह तुमच्या आंतरक्रियांबद्दलचा डेटा संकलित करु शकते.
शालेय आणि व्यावसायिक संस्था
जर तुमच्या Apple अकाऊंटशी संबंधित ईमेल ॲड्रेस Apple School Manager किंवा Apple Business Manager संस्थेद्वारे नियंत्रित केले जाणारे डोमेन वापरत असल्यास, ती संस्था त्या डोमेनला नियंत्रित करते याची पडताळणी केल्यानंतर Apple तुमचा ईमेल ॲड्रेस त्या संस्थेसह शेअर करू शकते. तुम्हाला तुमच्या अकाउंटला कार्य किंवा शाळेच्या अकाउंटवर ट्रान्सफर करण्याची अनुमती देऊन किंवा तुमच्या ईमेल ॲड्रेसला रिक्लेम करून संस्था तुमच्या ईमेल ॲड्रेसला तुमच्या Apple अकाउंटशी संबद्ध होण्यापासून रोखू शकते. तुम्ही तुमचे अकाउंट ट्रान्सफर करण्याचा निर्णय घेतल्यास, Apple पात्रता निश्चित करण्यासाठी तुमची सदस्यता आणि खरेदी, पेमेंट पद्धती आणि राहिलेली शिल्लक आणि तुमचे अकाउंट ‘कौटुंबिक शेअरिंग’ गटाचा भाग आहे की नाही ह्यासारखे विविध गुणविशेष तपासू शकते. तुमचे अकाउंट योग्य असल्यास, तुम्ही तुमचे Apple अकाऊंटला संस्थेद्वारे व्यवस्थापित केल्या जाणाऱ्या कार्य किंवा शाळेच्या अकाऊंटकडे ट्रान्सफर करण्याचा पर्याय निवडू शकता, ज्यामुळे संस्थेला अकाउंटशी संबंधित सर्व डेटा ॲक्सेस करण्याची अनुमती मिळेल. तुमचे अकाउंट पात्र नसल्यास, किंवा तुम्हाला सुरू करायचे नसल्यास, तुम्हाला तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित केलेल्या ईमेल ॲड्रेसला अपडेट करावे लागेल. अकाउंट च्या वैशिष्ट्यांची संपूर्ण सूची आणि तुमचा ईमेल ॲड्रेस अपडेट करणे यासह तुमचे अकाउंट ट्रान्सफर करण्याविषयी अधिक माहितीसाठी, support.apple.com/102159 वर जा.
वापर डेटा
सेवा प्रदान करण्यासाठी आणि तिची गुणवत्ता सुधारण्यासाठी आम्ही तुमच्या iCloud वापराशी निगडित डेटा देखील संकलित करतो. ग्राहकाला समस्या उद्भवल्यास तिचे निराकरण करण्यात मदत करण्यासाठी यातील काही डेटा तुमच्या Apple अकाउंटशी जोडला जाऊ शकतो. तुम्ही कोणत्या शहरातून आणि देशातून सेवा ॲक्सेस करत आहात हे ठरवण्यासाठी आम्ही तुमचा IP ॲड्रेस वापरू शकतो, पण आम्ही तो आमच्याकडे ठेवून घेत नाही.
अकाउंट सुरक्षा
तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी Apple सर्वोत्तम सुरक्षा तंत्रज्ञानांचा वापर करते. Apple अकाउंट, Apple सुरक्षा फीचर्स आणि Apple अकाउंट रिकव्हरी प्रोसेसेस यांची सुरक्षा आणि विश्वसनीयता सुधारण्यासाठी आणि निश्चित करण्यासाठी, Apple काही मर्यादित माहिती गोळा करते जी तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित असू शकते, ज्यामध्ये पुढील गोष्टी समाविष्ट असतात :
- Apple अकाउंटमध्ये साइन इन करताना, तुमच्या मालकीच्या जवळच्या इतर डिव्हाइसचा वापर करून नवीन डिव्हाइस सेट अप करताना, डिव्हाइसेस काढून टाकताना, तुमच्या Apple अकाउंट सेटिंग अपडेट करताना आणि तुमचा डेटा ॲक्सेस करण्यासाठी किंवा रिकव्हर करण्यासाठी तुमच्या अकाउंटमध्ये ऑथेंटिकेट करतानाचा तुमचा प्रवास आणि तुम्ही किती वेळा यशस्वी झालात किंवा तुम्हाला किती वेळा समस्या आल्या हे कॅप्चर करणारे इव्हेंट्स
- तुमच्या निर्मितीची कार्यक्षमता आणि विश्वसनीयता आणि रिकव्हरी संपर्क आणि रिकव्हरी कीज किंवा Apple अकाउंटशी संबंधित तत्सम सुरक्षा आणि रिकव्हरी तपशील कॅप्चर करणारे इव्हेंट्स. Apple ला तुमच्या रिकव्हरी संपर्क किंवा रिकव्हरी कीज बद्दल माहिती नाही किंवा त्यांचा ॲक्सेस नसतो
- तुमच्या डेटाचा ॲक्सेस रिकव्हर करण्यासाठी तुमच्या डिव्हाइसचा पासकोड किंवा पासवर्ड वापरण्याच्या कार्यक्षमता आणि विश्वसनीयता कॅप्चर करणारे इव्हेंट. Apple कडे तुमच्या डिव्हाइसचा पासकोड किंवा पासवर्डची माहिती किंवा त्याचा ॲक्सेस नसतो
- तुमच्या अकाउंटमधून डिव्हाइस काढून टाकण्याच्या प्रोसेसशी संबंधित किंवा अयशस्वी अकाउंट आणि डेटा रिकव्हरीचा परिणाम ठरवण्यासाठी तुमचा सर्व iCloud डेटा रीसेट करण्याशी किंवा हटवण्याशी संबंधित इव्हेंट्स
वैयक्तिक डेटा प्रोसेस करण्यासाठी लागू होणारे कायदेशीर आधार
आम्ही तुमचे Apple अकाउंट आणि वर वर्णन केलेल्या संबद्ध माहितीवर सामान्यतः Apple बरोबर तुमच्या कराराच्या कामगिरीवर क्रिया करण्यास, जसे सेवा प्रदान करण्यासाठी आवश्यक असेल, आणि आमच्या कायदेशीर वचनबद्धतेचे पालन करण्यासाठी आवश्यक असेल त्यानुसार, क्रिया करतो. जिथे संमती उचित कायदेशीर आधार असतो, तिथे आम्ही त्याला लागू होणाऱ्या स्थानिक कायद्यानुसार प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो.
जिथे लागू होणारे कायदे निर्देशित करतात, तिथे आम्ही आमच्या किंवा थर्ड पार्टीच्या तर्कसंगत स्वारस्यांच्या उद्देशांसाठी गरजेनुसार वैयक्तिक डेटाच्या पुढील श्रेणींवर क्रिया करतो, ज्यामध्ये त्यांच्याबद्दलच्या माहितीचा समावेश असतो :
- साइन इन करण्यासाठी तुम्ही वापरत असलेली माहिती तसेच संपर्क, पेमेंट आणि विश्वसनीय फोन नंबर किंवा सुरक्षा प्रश्न यासारखे सुरक्षा तपशील यांसह तुमचे Apple अकाउंट, ज्यांचा वापर तुम्ही सर्व Apple सेवांसाठी करता
- तुम्ही इन्स्टॉल केलेले ॲप आणि तुम्ही ते कुठून इन्स्टॉल केले आहेत (उदाहरणार्थ, संकेतस्थळ किंवा ॲप मार्केटप्लेस)
- तुमचे डिव्हाइस कोणत्या देशात किंवा प्रदेशात आहे, त्याच्या आधारावर तुमचे डिव्हाइस कायद्याने आवश्यक सेवा आणि फीचरसाठी पात्र आहे की नाही
- तुमच्या डिव्हाइसचे नाव, सिरियल नंबर आणि इतर हार्डवेअर आयडेंटीफायर यांच्या समावेशासह तुमचे डिव्हाइस
- iCloud, iTunes Store, App Store, Apple संगीत आणि Apple One यासारख्या विविध Apple सेवांचा तुमच्याकडून होणारा वापर आणि त्यांची सदस्यता
- अकाउंट नंबर आणि कालबाह्यता दिनांक, बिलिंग आणि शिपिंग पत्ता आणि गिफ्ट कार्ड रिडिम्प्शन माहिती यांच्या समावेशासह पेमेंटचे तपशील
या कायदेशीर स्वारस्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे :
- तुम्हाला आणि इतरांना लेखांकन, अहवाल कळवणे, आणि ॲनालिटिक्स हेतूंसाठी अधिक चांगली सेवा आणि सपोर्ट प्रदान करणे
- कायद्याने आवश्यक फीचर आणि सेवांची उपलब्धता ठरवणे आणि त्यांना एनेबल करणे
- तुमचे ज्यात स्वारस्य असू शकेल, अशा ईमेल आणि Push नोटिफिकेशनद्वारे ऑफर पाठवण्यासाठी तुमचा डेटा वापरणे
- ऑफरसाठी पात्रता तपासणे
- फसवणूक आणि इतर नुकसानकारक ॲक्टिव्हिटी टाळणे
रिटेन्शन
जेव्हा तुम्ही सदस्यतेसारखी एखादी खरेदी करता, तेव्हा आम्ही आर्थिक रिपोर्टिंगशी निगडित लागू कायद्यांनी निर्धारीत केलेल्या कालावधीसाठी तुमच्या खरेदीशी संबंधित वैयक्तिक डेटा राखून ठेवतो आणि हा अवधी प्रत्येक प्रदेशासाठी वेगळा असतो. बहुतेक ग्राहकांसाठी, धारण कालावधी कमीत कमी 10 वर्षांचा असण्याची आवश्यकता आहे, परंतु चीनसारख्या प्रदेशात कालावधी 30 वर्षे असू शकतो. आम्ही iCloud संबंधित सेवांसह तुमच्या आंतरक्रियांचे रेकॉर्ड देखील राखून ठेवू शकतो. ही रेकॉर्ड आपल्याला कायदा किंवा कायद्याच्या प्रक्रियेद्वारे जास्त काळ स्टोअर करायची आवश्यकता नसल्यास साधारणपणे 30 दिवस स्टोअर केली जातात पण कदाचित ती तीन वर्षांपर्यंतदेखील एकत्रित स्वरूपामध्ये स्टोअर केली जाऊ शकतात.
तुम्ही तुमचे Apple अकाउंट हटवल्यास, आम्ही वर वर्णन केल्याप्रमाणे कायदेशीर बंधनांचे पालन करण्यासाठी हटवलेल्या अकाउंटची नोंद स्वतःजवळ ठेवतो आणि अकाउंट सुरक्षेच्या तर्कसंगत फायद्यासाठी जोपर्यंत गरजेचे आहे तोपर्यंत स्वतःजवळ ठेवतो. तुम्ही नंतर नवीन अकाउंट तयार करणे निवडल्यास, तुम्ही जे अकाउंट हटवण्याची आम्हाला विनंती केली आहे त्या अकाउंटशी संबंधित नसलेल्या ईमेल ॲड्रेसचा तुम्हाला वापर करावा लागेल. जर तुम्ही तुमचा अकाउंट तयार करण्यासाठी फोन नंबर वापरला, तर तो त्याच कारणांसाठी दुसरा अकाउंट तयार करण्यासाठी वापरता येऊ शकत नाही. अकाउंट तयार करण्यासाठी तुम्ही अकाउंटच्या प्राथमिक ईमेल ॲड्रेस किंवा फोन नंबरचा वापर केलेला असल्यास, तुम्हाला तो काढून टाकता येणार नाही. न्यायालयीन निर्णय किंवा इतर समतुल्य अनिवार्य प्रक्रियेचे पालन करण्यासाठी देखील आम्हाला माहिती राखून ठेवून घ्यावी लागू शकते.
जेव्हा आम्ही अकाउंट हटवतो, तेव्हा तुमच्या अकाउंटशी संलग्न सर्व वैयक्तिक डेटा हटवण्यासाठी आम्ही आमच्याकडून सर्वोत्तम प्रयत्न करतो. आम्ही तुमचा वैयक्तिक डेटा हटवल्यास, आम्ही तुमच्याशी संबंधित विशिष्ट वैयक्तिक डेटा कायमस्वरुपी पुनर्प्राप्त न करण्यायोग्य आणि विशिष्ट वैयक्तिक डेटा ओळखता येणार नाही असा करू.
Apple ने संकलित केलेली माहिती नेहमी Apple च्या गोपनीयता धोरणानुसार हाताळली जाईल, जे www.apple.com/in/privacy वर मिळू शकते.
2025-12-12