Apple नकाशे व गोपनीयता
Apple नकाशा (‘नकाशा’) अगदी सुरुवातीपासून तुमच्या गोपनीयतेची सुरक्षा करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. आम्ही तुमच्या ‘नकाशा’ वापराशी संबंधित वैयक्तिक डेटा संकलित करत नाही.
‘नकाशा’ ॲप तुमच्या माहितीचे संरक्षण करण्यासाठी डिझाइन केले आहे. केवळ तुमचा अनुभव उत्तम करण्यासाठी आम्ही आम्हाला आवश्यक असलेला डेटा संकलित करण्यासाठी खूप मेहनत घेतो. जेव्हा आम्ही डेटा संकलित करतो, तेव्हा आम्ही हा डेटा का संकलित करत आहोत आणि आम्हाला हे करणे गरजेचे का आहे, हे तुम्हाला माहीत असणे महत्त्वाचे समजतो.
साइन इन आणि सिंक करा
‘नकाशा’ चा वापर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या Apple अकाउंटमध्ये साइन इन करावे लागत नाही. तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये साइन इन करणे निवडल्यास आणि तुमचे टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन एनेबल असल्यास, ‘नकाशा’ एंड-टू-एंड एनक्रिप्शनचा वापर करून तुमच्या सर्व डिव्हाइसवर तुमचा डेटा सिंक ठेवेल. उदाहरणार्थ, तुमचे पिन केलेली स्थाने, अलीकडे भेट दिलेली ठिकाणे आणि गाइड्स एंड टू एंड एनक्रिप्ट केलेली असतात ज्यामुळे Apple त्यांना वाचू शकत नाही. जेव्हा तुम्ही इतर नकाशा यूझरसह तुमचे ETA शेअर करता, तेव्हा शेअर केलेले स्थान Apple पाहू शकत नाही.
तुम्ही साइन इन केले असता तुमच्यासाठी उपलब्ध असलेली विशिष्ट फीचर जाणून घेण्यासाठी, तुम्ही प्रौढ आहात की लहान मूल आहात अशाप्रकारची तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित माहिती देखील नकाशा वापरेल. नकाशा ती माहिती स्टोअर करत नाही.
स्थान
बहुतांश नकाशा फीचर सर्वाधिक चांगल्या रितीने तेव्हा काम करतात जेव्हा ते तुमच्या स्थानाचा वापर करतात. तुमचे स्थान तुमची ओळख स्पष्ट करू शकत असल्यामुळे आम्ही नेमक्या स्थानांना 24 तासांमध्ये कमी-अचूक स्थानांमध्ये बदलतो. तुम्ही नॅव्हिगेशनसाठी नकाशांचा वापर करता तेव्हा आम्ही तुमच्या मार्गाच्या आरंभापासून नेमक्या स्थानांचे रूपांतर कमी अचूक परिसरामध्ये करतो.
तुम्ही सेटिंग > ॲप्स > नकाशा > स्थान वर जाऊन ‘अचूक स्थान बंद करा’ वर टॅप करून तुमच्या iOS, iPadOS, किंवा visionOS डिव्हाइसवर ‘नकाशा’ ॲपची स्थान आधारित फंक्शनॅलिटी डिसेबल करू शकता. Mac वर, सिस्टीम सेटिंग > गोपनीयता व सुरक्षा’ वर जा आणि स्थान सेवा यादीमध्ये, ‘नकाशा’ ॲप बंद करण्यासाठी क्लिक करा. तुम्ही ही सेटिंग डिसेबल केल्यास टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसारखी नकाशाची विशिष्ट वैशिष्ट्ये उपलब्ध नसतील.
स्थान सेवा सुरू केल्यास रूटिंग, ट्रॅफिक आणि जवळपासचे स्वारस्य असलेले घटक यांबाबतची माहिती नकाशा ॲपमध्ये सुधारणा करण्यासाठी निनावी, एकत्रित स्वरूपामध्ये वापरली जाईल. तुम्ही सेटिंग > गोपनीयता व सुरक्षा > स्थान सेवा > ‘सिस्टीम सेवा’ वर जाऊन ‘राउटिंग व ट्रॅफिक बंद करा’ वर टॅप करून तुमच्या iOS, iPadOS, किंवा visionOS डिव्हाइसवर हे डिसेबल करू शकता.
तुम्ही ‘भेट दिलेली ठिकाणे’ एनेबल करणे निवडल्यावरच नकाशा ॲपला तुम्ही अलीकडे भेट दिलेल्या ठिकाणांबद्दल माहितीचा ॲक्सेस असेल, जसे की रेस्टॉरंट किंवा उद्याने. तुम्ही ‘भेट दिलेली ठिकाणे’ एनेबल केल्यावरच तुम्ही भेट दिलेल्या ठिकाणांचा डेटा नकाशा ॲपसह शेअर केला जाईल. तुम्ही भेट दिलेली ठिकाणे एंड टू एंड एनक्रिप्ट केलेली आहेत आणि Apple द्वारे वाचली जाऊ शकत नाहीत. ‘नकाशा’ ॲपद्वारे तुमची ‘भेट दिलेली ठिकाणे’ किती काळासाठी स्टोअर केली जावी हे तुम्ही निवडू शकता, तुम्ही कधीही नकाशा ॲपमध्ये लायब्ररी > ‘भेटी’ मध्ये जाऊन ‘संग्रहण कालावधी’ ॲड्जस्ट करण्यासाठी ‘भेटी संग्रहित ठेवा’ वर टॅप करून हा संग्रहण कालावधी बदलू शकता.
जर तुम्ही ‘प्राधान्य दिलेले मार्ग’ आणि ‘अंदाजित गंतव्यस्थाने’ एनेबल करणे निवडले, तर तुम्ही नेहमी जात असलेल्या मार्गाची माहिती नकाशा ॲपबरोबर शेअर केली जाईल. तुमच्या गंतव्यस्थानासाठी मार्ग सर्च करताना, ‘नकाशा’ ॲप Apple ला तुमचे प्राधान्य असलेले एक किंवा अधिक मार्ग आणि आगामी मार्ग पाठवू शकते. ‘नकाशा’ ॲप Apple ला तुमचे प्राधान्य असलेले एक किंवा अधिक मार्ग आणि अंदाजित मार्ग देखील पाठवू शकते, जेणेकरून हे मार्ग नकाशा विजेटवर डिस्प्ले होतील किंवा तुमच्या पुढील गंतव्यस्थानासाठी तुम्हाला कधी निघणे आवश्यक आहे ह्याबद्दल सूचना देता येतील. ही माहिती तुमच्या Apple अकाउंटबरोबर जोडलेली नाही, आणि हा प्राधान्य असलेला मार्ग किंवा अंदाजित गंतव्यस्थान आहे हे Apple ला समजू नये म्हणून आम्ही पुढील 24 तासात कारवाई करू.
‘भेट दिलेली ठिकाणे’ आणि ‘प्राधान्य दिलेले मार्ग’ आणि ‘अंदाजित गंतव्यस्थाने’ ही फीचर्स ‘नकाशा’ ॲपमध्ये एनेबल करण्यासाठी, तुम्हाला महत्त्वपूर्ण स्थाने व मार्ग एनेबल करायला हवे आणि ‘नकाशा’ ॲपला तुमच्या सध्याच्या स्थानाचा ॲक्सेस द्यायला हवा. तुम्ही सेटिंग > ॲप्स > नकाशा > ‘नकाशा’ ॲपला ॲक्सेसची अनुमती द्या >स्थान > ‘अधिक स्थान ॲक्सेससाठी अनुमती द्या’ मध्ये जाऊन ‘भेट दिलेली ठिकाणे’ किंवा ‘प्राधान्य दिलेले मार्ग व अंदाजित गंतव्यस्थाने’ बंद करण्यासाठी क्लिक करून ‘नकाशा’ ॲपमध्ये तुमची ‘भेट दिलेली ठिकाणे’ किंवा ‘प्राधान्य दिलेले मार्ग’ व ‘अंदाजित गंतव्यस्थाने’ डिसेबल करू शकता. ‘भेट दिलेली ठिकाणे’, ‘प्राधान्य दिलेले मार्ग’ आणि ‘अंदाजित गंतव्यस्थाने’ सह स्थान सेवांबाबतच्या अधिक माहितीसाठी www.apple.com/legal/privacy/data/en/location-services वर जा.
नकाशा वापरणे
तुम्ही नकाशा वापरता, तेव्हा पुढील माहिती Apple कडे पाठवली जाते :
- तुमच्या विनंतीची वेळ
- डिव्हाइस मॉडेल आणि सॉफ्टवेअर व्हर्जन
- इनपुट भाषा
- डिव्हाइसचे स्थान, तुम्ही ‘नकाशा’ ला तुमचे स्थान ॲक्सेस करण्यासाठी अधिकृत केलेले असल्यास
- तुमच्या डिव्हाइसवर दिसत असलेल्या नकाशाच्या सीमारेषा
- तुम्ही वापरत असलेल्या सर्च टर्म्स आणि तुमच्याकडून वापरल्या जाणाऱ्या फीचरसह नकाशाबरोबर तुमच्या आंतरक्रिया, तुमच्याकडून पाहिल्या जाणारी स्थाने आणि नकाशाकडून मिळणाऱ्या नोटिफिकेशनबरोबर तुमच्या आंतरक्रिया
‘नकाशा’ वापरत असताना आम्ही ॲप्लिकेशन, डिव्हाइस आणि नेटवर्क कॉन्फिगरेशन व कामगिरीसंबंधी डेटा देखील संकलित करतो. प्रत्येक तासाला रोटेट होत राहणारे वैयक्तिक वापराचे मेट्रिक्स हे आयडेंटिफायरशी संबंधित असतात आणि ते तुमच्या Apple अकाउंटशी जोडलेले नसतात. याचा अर्थ असा होतो की नकाशा कडून तुमच्याशी किंवा तुमच्या डिव्हाइसशी लिंक केलेल्या आयडेंटीफायरच्या आधारावर तुमच्या बद्दलच्या माहितीला शोधू शकत नाही. ॲप्लिकेशनची कामगिरी, समुच्चित वापर मेट्रिक आणि सेवेची विश्वासार्हता राखण्यासाठी दीर्घकाळ कार्यरत आयडेंटिफायरचा वापर केला जातो. हे दीर्घकाळ टिकलेले आयडेंटिफायर तुमच्या Apple अकाउंटशी किंवा तुमची ओळख स्पष्ट करणाऱ्या इतर माहितीशी अटॅच नसतात.
त्याचबरोबर, तुम्ही नॅव्हिगेशन किंवा दिशानिर्देश करण्याची विनंती करण्यासाठी ‘नकाशा’ चा वापर करता, तेव्हा तुमच्या मार्गाबद्दलचे तपशील Apple कडे पाठवले जातात, ज्यामध्ये हे समाविष्ट असते :
- तुम्ही विनंती केल्यावर आणि तुमच्या नॅव्हिगेशन सेशन दरम्यान तुम्ही जर तुमचे स्थान ॲक्सेस करण्यासाठी ‘नकाशा’ ला अधिकृत केले असल्यास डिव्हाइसचे मूळस्थान आणि वर्तमान स्थान
- गंतव्यस्थान
- प्रवासाचे माध्यम, ज्यामध्ये तुम्ही CarPlay शी कनेक्ट केलेले आहे की नाही
- तुम्ही तुमच्या नॅव्हिगेशन सेशन दरम्यान दिशानिर्देश आणि एक्झिट्सबद्दल विचारले असता तयार केला जाणारा रॅण्डम आयडेंटिफायर
तुम्ही EV रुटिंगचा वापर करत असल्यास, तुमचे EV रुटिंग विनंतीच्या सुरुवातीला चार्ज करण्याच्या स्थितीमध्ये असताना तुमच्या वाहनाच्या चार्जविषयी तुमच्या प्रवासादरम्यानची माहिती देखील Apple कडे पाठवली जाते. त्याचप्रमाणे, तुम्ही EV रुटिंगमध्ये सुधारणा करणे सुरू केल्यास, तुम्ही तुमचा प्रवास ऑप्टिमाइझ करण्यासाठी दिशानिर्देशांची विनंती केल्यावर Apple तुम्हाला तुमचे वाहन केव्हा चार्ज करायचे आहे हे सांगण्यासाठी आणि तुमचा मार्ग संपल्यावर अंदाजे किती चार्जिंग शिल्लक आहे हे सांगण्यासाठी तुमच्या इलेक्ट्रिक वाहनाचा डेटा वापरू शकते. ह्या माहितीमध्ये बॅटरीची क्षमता, चार्जची स्थिती आणि रेंजवर परिणाम करू शकतील अशी वाहनांची इतर वैशिष्ट्ये समाविष्ट असतात. तथापि, ह्यापैकी कोणतीही माहिती तुमच्या Apple अकाउंटशी सुसंगत केली जात नाही. EV राऊटिंगबाबत अधिक माहितीसाठी www.apple.com/in/legal/privacy/data/en/improve-ev-routing ला भेट द्या.
तुम्ही प्रगत नॅव्हिगेशन अचूकतेसाठी, स्थान सुधारित करणे किंवा AR वॉकिंगसाठी नॅव्हिगेशन वैशिष्ट्यांचा वापर करत असल्यास, ‘नकाशा’ तुमचे स्थान आणि दिशानिर्देशांची अचूकता सुधरण्यासाठी आणि तुम्हाला स्वतःला दिशा देण्यात मदत करण्यासाठी तुमचा कॅमेरा आणि मोशन सेन्सर वापरतात. हा डेटा स्टोअर केलेला नाही आणि तुमच्या डिव्हाइसच्या बाहेर जात नाही. तुम्ही ‘AR स्थान अचूकता सुधारा’ चालू करण्याचे निवडल्यास, तुम्ही ‘नकाशा’ मध्ये स्थान सुधारित करा किंवा AR वॉकिंग वापराल तेव्हा तुमच्या सभोवतालच्या इमारती आणि इतर प्रत्यक्ष वैशिष्ट्यांचे माप आणि आकार ह्याबाबतचा डेटा तुमच्या डिव्हाइसच्या कॅमेरावरुण Apple कडे पाठवला जाईल जेव्हा हा डेटा तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित नाही आणि तुमची किंवा इतरांची ओळख स्पष्ट करत नाही. तुम्ही सेटिंग > ॲप > ‘नकाशा’ मध्ये जाऊन, दिशानिर्देश विभागामध्ये जाऊन, वॉकिंगवर टॅप करून, नंतर ‘वर्धित’ बंद करण्यासाठी टॅप करून ‘वर्धित नेव्हिगेशन अचूकता’ डिसेबल करू शकता. तुम्ही सेटिंग > गोपनीयता व सुरक्षा > ‘ॲनालिटिक्स व सुधारणा’ वर जाऊन त्यानंतर ‘AR स्थान अचूकता सुधारा’ बंद करण्यासाठी टॅप करून ‘AR स्थान अचूकता सुधारा’ बंद करू शकता.
तुम्ही व्हिज्युअल इंटेलिजन्सचा वापर केल्यास, ‘नकाशा’ ॲप व्यवसाय, खुणेची ठिकाणे आणि आवडीच्या इतर ठिकाणांविषयीची माहिती प्रदान करू शकते. जेव्हा ‘नकाशा’ ती माहिती प्रदान करते, तेव्हा Apple शिफारस केलेल्या आवडीच्या ठिकाणांविषयी आणि ‘नकाशा’ ने देऊ केलेल्या माहितीसह तुमच्या आंतरक्रियांविषयीचा डेटा संकलित करू शकते.
नकाशा आणि इतर स्थान-आधारित उत्पादने आणि सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी Apple तुमच्या ‘नकाशा’ च्या वापरातून संकलित केलेल्या माहितीचा वापर करू शकते.
तुमच्याकडे ‘मानांकन व छायाचित्र’ मध्ये सहभागी होण्याचा पर्याय आहे, जे तुम्हाला स्वारस्यांच्या घटकांमध्ये मानांकने, छायाचित्रे आणि इतर कॉण्टेण्ट सार्वजनिकरित्या पोस्ट करण्याची अनुमती देते. तुमचे छायाचित्र सबमिशन तुमच्या Apple अकाउंटला जोडले जाईल. मानांकने आणि छायाचित्रांविषयी अधिक माहितीसाठी www.apple.com/in/legal/privacy/data/en/ratings-photos वर जा.
‘समस्या रिपोर्ट करा’ फीचरचा वापर करून तुम्ही ‘नकाशा’ मध्ये समस्या देखील रिपोर्ट करू शकता. काही अहवाल तुमच्या Apple अकाउंटशी लिंक केलेले असतात. समस्या कळवण्याविषयी अधिक माहितीसाठी, visit www.apple.com/in/legal/privacy/data/en/maps-report-an-issue वर जा.
नकाशा वैयक्तिकृत करणे
नकाशा ॲपमधील वैयक्तिकृत केलेली बरीचशी फीचर्स जसे की ‘भेट दिलेली ठिकाणे’ ‘पार्क केलेली कार’, ‘निघण्याची वेळ’, पिन केलेली स्थाने आणि सूचना (‘आगामी गंतव्यस्थाने’ यांसारखी) तुमच्या डिव्हाइसवर जनरेट केलेल्या डेटाच्या आधारावर तयार केली जातात. हे तुमच्या डिव्हाइसवरून पाठवण्यात आलेल्या डेटाचे प्रमाण कमी करण्यात मदत करते.
प्राधान्य दिलेले मार्ग व अंदाजित गंतव्यस्थानासाठी Apple ला प्राधान्य दिलेले मार्ग व अंदाजित गंतव्यस्थानाची भूमिती पाठवणे आवश्यक आहे जेणेकरून नॅव्हिगेशन संबंधित विनंत्या सुचवल्या आणि पूर्ण केल्या जाऊ शकतात. ही माहिती तुमच्या Apple अकाउंटशी जोडलेली नाही आणि Apple ला हा प्राधान्य दिलेले मार्ग किंवा अंदाजित गंतव्यस्थान आहे हे समजू नये म्हणून आम्ही 24 तासात आवश्यक कारवाई करतो.
जाहिरात
‘नकाशा’ ॲपमध्ये Apple द्वारे प्रदान केलेल्या जाहिराती तुम्हाला केवळ संदर्भात्मक माहितीचा वापर करून संबंधित व्यवसाय आणि सेवा शोधण्याची अनुमती देतात. तुम्ही कुठे जाता आणि तुम्ही ‘नकाशा’ ॲपमध्ये ज्या जाहिराती पाहता आणि त्यांच्याशी संवाद साधता त्या तुमची ओळख किंवा तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित नाहीत.
तुमच्या सध्याच्या सर्च टर्म, तुम्ही सर्च करत असताना नकाशाचा व्ह्यू आणि – जर तुम्ही आम्हाला परवानगी दिली तर – अंदाजित डिव्हाइस लोकेशनचा वापर करून संबंधित जाहिराती निवडल्या जाऊ शकतात. याव्यतिरिक्त, तुमच्या डिव्हाइस भाषेविषयी माहिती, डिव्हाइस प्रकार, OS व्हर्जन, आणि दिवसाची वेळ तुम्हाला जाहिराती दाखवण्यासाठी वापरली जाऊ शकते.
तुमचा जाहिरात अनुभव सुधारण्यासाठी, तुमचे डिव्हाइस कोणत्या जाहिराती दाखवायच्या हे ठरवण्यासाठी अतिरिक्त संदर्भात्मक माहिती वापरू शकते – जसे की तुम्ही सेशन दरम्यान बघितलेला किंवा संवाद साधलेला कॉण्टेण्ट. हे विश्लेषण थेट तुमच्या डिव्हाइसवर होते आणि Apple जाहिरात ला पाठवले जात नाही. आम्ही वय धोरण, जाहिरात कॉण्टेण्ट आणि उपलब्धता निर्बंध लागू करण्यासाठी आणि स्थानिक कायद्यांचे पालन करण्यासाठी ऑन-डिव्हाइस लॉजिकचाही वापर करतो.
जर तुम्ही ‘नकाशा’ ॲपला तुमचे स्थान ॲक्सेस करण्याची अनुमती दिली, तर ‘नकाशा’ ॲपमध्ये तुम्हाला भौगोलिकदृष्ट्या संबंधित जाहिराती दाखवण्यासाठी ‘नकाशा’ ॲप फक्त तुमचे अंदाजित स्थान Apple जाहिराती सह शेअर करेल. तुम्ही काहीही निवडले असले, तरी तुमचे स्थान जाहिरातदारांसह शेअर केले जात नाही. तुम्ही सेटिंग > ॲप्स > नकाशा > स्थान वर जाऊन ‘अचूक स्थान बंद करा’ वर टॅप करून तुमच्या iOS, iPadOS, किंवा visionOS डिव्हाइसवर ‘नकाशा’ ॲपची स्थान आधारित फंक्शनॅलिटी डिसेबल करू शकता. Mac वर, सिस्टीम सेटिंग > गोपनीयता व सुरक्षा’ वर जा आणि स्थान सेवा यादीमध्ये, ‘नकाशा’ ॲप बंद करण्यासाठी क्लिक करा. तुम्ही ही सेटिंग डिसेबल केल्यास टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसारखी नकाशाची विशिष्ट वैशिष्ट्ये उपलब्ध नसतील.
तुम्ही पाहता किंवा टॅप करता त्या जाहिरातींबद्दलची माहिती रॅंडम आयडेंटिफायरशी जोडलेली असते, जो दर तासाला अनेक वेळा फिरतो आणि तो कधीही तुमच्या ओळख किंवा तुमच्या Apple अकाउंटशी कनेक्ट केलेला नसतो.
Apple जाहिरात व गोपनीयतेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी www.apple.com/in/legal/privacy/data/en/apple-advertising पहा.
चीनमध्ये नकाशा सेवा
चीनमधील Apple Maps उत्पादन Amap Software Co., Ltd. ह्यांच्या मॅपिंग सेवांचा वापर करते. तुम्हाला चीनमध्ये नकाशा ॲप वापरण्यासाठी तुमच्या Apple अकाउंटने साइन इन करण्याची आवश्यकता नाही आणि तुमची ॲक्टिव्हिटी तुमच्या Apple अकाउंटशी न जोडलेल्या रॅण्डम आणि रोटेटिंग आयडेंटिफायरशी संबंधित केलेली असते. संकलित केलेल्या कोणत्याही माहितीद्वारे तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखले जाऊ नये म्हणून तुमचे स्थान अस्पष्ट करण्यासाठी गोपनीयता राखणारे तंत्र लागू करण्यासाठी Apple Amap बरोबर काम करते.
चीनमधील लायसन्स प्लेटवरील निर्बंध फीचर तुम्हाला सध्याच्या रस्त्याच्या नेटवर्कमधील निर्बंधांविषयी आणि तुमच्या लायसन्स प्लेटच्या आधारावर पर्यायी मार्गांच्या पर्यायांची देखील माहिती देते. Amap सह काम करत ‘नकाशा’ तुमच्या लायसन्स प्लेटच्या आधारे प्रतिबंधित असलेली क्षेत्रे टाळणारे मार्ग शोधून काढते. तुम्ही एखाद्या मार्गाची विनंती करता तेव्हा केवळ तुमच्या लायसन्स प्लेटला लागू होणाऱ्या निर्बंधांविषयीची माहिती शेअर केली जाते, त्यामुळे Apple किंवा Amap ला तुमची लायसन्स प्लेट प्रत्यक्षात पाहता येत नाही आणि यातली कोणतीही माहिती तुमच्या Apple अकाउंटशी केलेली नसते.
थर्ड पार्टीसोबत शेअरिंग
Apple हालचालीबाबतचा डेटा, POI चा डेटा, आणि समुच्चित यूझर ॲनालिटिक्स आमच्या पार्टनरसोबत शेअर करते. तथापि, ह्या भागीदारांना कोणत्याही विशिष्ट नकाशा यूझरशी ही माहितीत पुन्हा परस्परसंबंधित करण्यापासून रोखण्यासाठी, विशिष्ट किमान थ्रेशोल्ड पूर्ण केल्यावरच डेटा शेअर केला जातो.
जेव्हा तुम्ही जाहिरात पाहता किंवा तिच्याशी संवाद साधता, तेव्हा Apple जाहिरात इंप्रेशन आणि संवादांबद्दल वैयक्तिक नसलेली माहिती तसेच एकत्रित जाहिरात मेट्रिक, ‘नकाशा’ ॲपमध्ये जाहिराती देणाऱ्या जाहिरातदारांबरोबर शेअर करते.
तुम्ही ‘CarPlay मार्ग शेअरिंग’ एनेबल करणे निवडल्यास, तुम्ही नॅव्हिगेशन विनंती करण्यासाठी ‘नकाशा’ ॲप वापरता तेव्हा वाहन नॅव्हिगेशन आणि ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम्सना सपोर्ट करण्यासाठी Apple तुमच्या मार्गाबद्दलचा तपशील तुमच्या वाहनाबरोबर शेअर करेल, ज्यामध्ये पुढील गोष्टी समाविष्ट असतात :
- तुम्ही विनंती करता तेव्हा आणि तुमचा मार्ग बदलतो तेव्हा मूळ स्थान आणि सध्याच्या डिव्हाइसचे स्थान
- डेस्टिनेशन
- मार्गाची रेषा
ही माहिती तुमच्या Apple अकाउंटशी संलग्न केलेली नाही. तुमच्या वाहनाद्वारे माहितीचा वापर वाहनाच्या गोपनीयता धोरणाच्या अधीन आहे. सेटिंग > सामान्य > CarPlay > माझी कार > ‘रूट शेअरिंग’ वर जाऊन तुम्ही तुमच्या वाहनासाठी ‘CarPlay रूट शेअरिंग’ डिसेबल करू शकता.
तुम्ही जेव्हा ‘नकाशा’ मधील थर्ड पार्टी डेटा प्रदात्याला संबंधित समस्या रिपोर्ट करता तेव्हा Apple थर्ड पार्टीला ती समस्या सोडवण्यासाठी तुम्ही रिपोर्ट केलेल्या समस्येविषयी माहिती प्रदान करू शकेल. Apple अशा थर्ड पार्टींशी माहिती तेव्हाच शेअर करते जेव्हा समस्या सोडवणे आवश्यक असते आणि सर्वप्रथम तुमची ओळख स्पष्ट करणारी त्यातील कोणतीही माहिती हटवण्याचा प्रयत्न करते.
Apple ला पाठवण्यात आलेल्या डेटावर विश्वासार्ह सेवा प्रदात्याकडून प्रक्रिया केली आणि स्टोअर केला जाऊ शकतो.
रिटेन्शन
आम्ही तुमच्या ‘नकाशा’ वापराशी संबंधित वैयक्तिक डेटा संकलित करत किंवा आमच्या जवळ ठेवत नाही. तुम्हाला तुमच्या ‘नकाशा’ वापराविषयी काही प्रश्न असल्यास किंवा आमच्या डेटा संरक्षण अधिकाऱ्याशी संपर्क साधायचा असल्यास, तुम्ही www.apple.com/in/legal/privacy/contact येथे आमच्याशी संपर्क साधू शकता.
Apple ने संकलित केलेली माहिती नेहमी Apple च्या गोपनीयता धोरणानुसार हाताळली जाईल, जे www.apple.com/in/privacy वर मिळू शकते.
2026-05-11