Apple Music व गोपनीयता
Apple Music तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहे आणि तुम्ही काय शेअर करता हे निवडण्यासाठी तुम्हाला एनेबल करते.
![]()
- तुम्ही सदस्यता घेतलेल्या सेवांना वैयक्तिकृत करण्यासाठी, तुम्हाला नोटिफिकेशन पाठवण्यासाठी आणि तुमच्या भागीदारांची भरपाई करण्यासाठी Apple तुम्ही प्ले केलेली गाणी आणि तुम्ही ती किती वेळ प्ले करता ह्यासारखी तुमची Apple Music आणि Apple Music Classical ॲक्टिव्हिटी संकलित करते.
- तुमची Apple क्लाउड लायब्ररी तुमच्या डिव्हाइसवरील संगीत लायब्ररीमधून Apple ला गाणे आणि कलाकारांची नावे ह्यासारखी माहिती पाठवते, ज्यामुळे तुमच्या कोणत्याही गाण्याच्या कॉपी ओळखून अनलॉक केले जाऊ शकते, जे Apple Music मध्ये देखील उपलब्ध आहे.
- जोपर्यंत तुमच्याकडे सदस्यता आहे तोपर्यंत आणि त्यानंतर थोड्या काळापर्यंत आम्ही तुमची क्लाउड लायब्ररी माहिती तुमच्यासह संलग्न करतो. वित्तीय अहवाल कळवणेशी संबंधित लागू कायद्यांद्वारे निर्दिष्ट केलेल्या कालावधीसाठी तुम्ही प्ले केलल्या गाण्यांचे रेकॉर्ड आम्ही राखून ठेवतो.
- ओळखण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यात मदतीसाठी, तुमचे फोन कॉल किंवा तुम्ही पाठवलेल्या आणि प्राप्त केलेल्या ईमेलच्या अंदाजे संख्येच्या माहितीसह तुम्ही तुमच्या डिव्हाइसचा वापर कसा करता, ह्या माहितीचा वापर तुम्ही खरेदी करण्याचा प्रयत्न करत असताना डिव्हाइस विश्वसनीयता स्कोअरची गणना करण्यासाठी केला जाईल. ‘सबमिशन’ अशा रितीने डिझाइन करण्यात आलेली आहेत की Apple तुमच्या डिव्हाइसवरील मूळ मूल्यांना जाणून घेऊ शकत नाही. स्कोअर आपल्या सर्व्हरवर एका निश्चित वेळेसाठी स्टोअर केले जातात.
तुमच्या माहितीची गोपनीयता आणि सुरक्षा हे Apple मधील सर्वांसाठी प्राधान्य आहे. केवळ तुमचा अनुभव उत्तम करण्यासाठी आम्ही आम्हाला आवश्यक असलेला डेटा संकलित करण्यासाठी खूप मेहनत घेतो, आणि आम्ही जेव्हा डेटा संकलित करतो तेव्हा आम्ही काय संकलित करत आहोत आणि आम्हाला ते गरजेचे का आहे हे तुम्हाला माहित असणे महत्वाचे असते, जेणेकरून तुम्ही तुमच्या निवडी ठरवू शकाल. Apple च्या प्रत्येक उत्पादन आणि सेवेप्रमाणे, Apple Music आणि Apple Music Classical देखील त्या तत्त्वांना लक्षात घेऊन डिझाइन केलेले आहेत.
Apple Music मध्ये सेवा आणि फीचर प्रदान करण्यासाठी आम्ही तुमचा वैयक्तिक डेटा वापरतो. ह्या माहितीमध्ये तुमचे नाव आणि तुम्ही सेट केलेले असल्यास Apple अकाउंटचे छायाचित्र समाविष्ट असते, जे तुम्ही Apple Music च्या शेअरिंग फीचर्ससह वापर करण्यासाठी Apple Music च्या ॲप सेटिंगमध्ये जाऊन ॲक्सेस करू शकता आणि बदलू शकता, त्याचबरोबर त्यामध्ये अकाउंट आणि पेमेंट माहितीचा समावेश असतो जी तुम्ही सेटिंग किंवा सिस्टीम सेटींगमधून ॲक्सेस करू शकता आणि बदलू शकता.
जेव्हा तुम्ही Apple Music ची सदस्यता घेता, तेव्हा तुमच्या सदस्यतेमध्ये Apple Music आणि Apple Music Classical च्या संपूर्ण ॲक्सेसचा समावेश केला जातो. तुमच्या संगीतातील आवडीनुसार वैशिष्ट्यांना जुळवण्यासाठी, तुम्ही Apple Music आणि Apple Music Classical कसे वापरता याबाबतची माहिती Apple संकलित करते. ह्या वैशिष्ट्यांमध्ये तुम्ही निवडलेले अल्बम आणि प्लेलिस्ट, आणि तुमच्या आवडीच्या आर्टिस्ट आणि शैलींनुसार निवडी प्ले करतात अशा वैयक्तीकृत केलेल्या शिफारसींचा समावेश असतो. आम्ही येत्या दिवसातील रिलीज, नवीन आर्टिस्ट आणि तुम्हाला आवडू शकेल असे Apple Music आणि Apple Music Classical वर नवीन जे काही घडत असेल त्याबाबत ईमेल आणि Push नोटिफिकेशनमार्फत तुमच्याशी संपर्क साधू शकू यासाठी देखील ही माहिती आम्ही वापरतो.
काही ब्रॉडकास्ट रेडिओ स्टेशन यासारखे काही Apple Music फीचर, तुमच्या प्रदेशामध्ये उपलब्ध नसू शकतात. तुमच्या स्थानाचा अंदाज घेण्यासाठी आणि उपलब्धता निश्चित करण्यासाठी Apple तुमच्या इंटरनेट कनेक्शनच्या IP ॲड्रेसचा वापर करू शकते.
Apple Music Classical
Apple Music च्या सबस्क्रायबरना Apple Music Classical चा ॲक्सेस असतो. हे एक शास्त्रीय संगीताचे ॲप आहे, जे तुम्हाला शास्त्रीय संगीतातील गाणी आणि अल्बम शोधण्यास आणि तुमच्या आवडीची शास्त्रीय गाणी एका मध्यवर्ती ठिकाणी जतन करून ठेवण्यास बनवलेले आहे. तुम्ही सदस्यतेशिवाय Apple Music Classical चा कॅटेलॉग ब्राउझ करू शकता मात्र Apple Music Classical चे सर्व फीचर ॲक्सेस करण्यासाठी तुमच्याकडे Apple Music ची सदस्यता असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे सक्रिय Apple Music सदस्यता नसल्यास, तुम्हाला Apple Music Classical चा पूर्ण ॲक्सेस मिळवण्यासाठी Apple Music ची सदस्यता घेण्याचा पर्याय दिला जाईल.
क्लाउड लायब्ररी
तुमच्या Apple Music सदस्यतेचा लाभ असलेली ‘Apple क्लाउड लायब्ररी’ तुम्हाला तुमच्या कोणत्याही डिव्हाइसवरील लायब्ररीतील गाणी, आणि प्लेलिस्ट्स ॲक्सेस करण्याची अनुमती देते. हे फीचर तुमच्या डिव्हाइसवरील लायब्ररीवरून Apple कडे गाणी आणि कलाकारांची नावे यांसारखी माहिती पाठवते जेणेकरुन तुमची अशा गाण्यांच्या प्रती ज्या Apple Music आणि Apple Music Classical वर असतील त्या ओळखता येतील आणि अनलॉक करता येतील. Apple Music मध्ये न सापडणारी गाणी तुमच्या वैयक्तिक क्लाउड लायब्ररीमध्ये अपलोड केली जातात, जेणेकरुन तुम्ही Apple Music मार्फत तुमच्या कोणत्याही डिव्हाइसवर तुमच्या संपूर्ण संकलनाचा ॲक्सेस करू शकाल. तुमच्या iOS, iPadOS, किंवा visionOS डिव्हाइसवरील तुमची क्लाउड लायब्ररी सिंक करायचे थांबवण्यासाठी, सेटिंग > ॲप > संगीत वर जा आणि लायब्ररी सिंक करणे बंद करण्यासाठी टॅप करा. Mac वर, Apple Music उघडा आणि सेटिंग > सामान्य वर जा, नंतर सिलेक्ट केलेले ‘लायब्ररी सिंक करा’ रद्द करा.
Apple Music प्रोफाइल
तुम्हाला Apple Music वापरणाऱ्या इतर लोकांशी कनेक्ट व्हायचे किंवा शेअर करायचे असल्यास, तुम्ही यूझर हॅण्डल (उदाहरणार्थ @johnappleseed) डिस्प्ले नाव आणि, इच्छा असल्यास, प्रोफाइल छायाचित्र, आणि इतर माहिती प्रदान करून देऊन एक वैयक्तिक प्रोफाइल बनवू शकता. Apple ही माहिती तुमच्या अकाउंटसह संग्रहित करते ज्यामुळे तुम्ही ती तुमच्या कोणत्याही डिव्हाइसवरून ॲक्सेस करू शकाल. तुमचे यूझर हॅण्डल, डिस्प्लेचे नाव आणि प्रोफाइल छायाचित्र तुम्ही पोस्ट केलेल्या कोणत्याही कॉण्टेण्ट आणि Apple Music वर तुम्ही शेअर करत असलेल्या ॲक्टिव्हिटीसह दाखवली जाऊ शकते. कॉण्टेण्ट शेअरिंग आणि पोस्ट करणे सध्या लहान मुलांसाठीच्या Apple अकाउंटसाठी उद्देशित किंवा उपलब्ध नाही.
तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारावर इतर लोकांना तुमची Apple Music प्रोफाइल शोधता येऊ शकेल.
तुम्ही तुमच्या प्रोफाइलवरील ऐकण्याची ॲक्टिव्हिटी आणि प्लेलिस्ट यासारखे कॉण्टेण्ट केवळ तुम्ही निवडलेल्या व्यक्तींसाठी उपलब्ध करू शकता. तथापि, तुमचे हॅंडल, डिस्प्ले नाव, छायाचित्र, तुमचे फॉलोअर्स, आणि तुम्ही ज्यांना फॉलो करत आहात ह्यासारखी तुमची प्रोफाइल माहिती डिफॉल्टनुसार प्रत्येकाला दिसेल. यूझरला तुमचे प्रोफाइल पाहण्यापासून ब्लॉक करण्यासाठी, यूझर प्रोफाइल वर जा, ‘अधिक’ वर टॅप करा, नंतर ‘ब्लॉक’ वर टॅप करा. तुम्ही ब्लॉक केलेले लोक तुम्हाला संगीतमध्ये पाहू किंवा Apple Music मध्ये तुमचे प्रोफाइल शोधू शकणार नाहीत.
जेव्हा तुम्ही Apple Music वर प्रोफाइल तयार करता, तेव्हा ज्यांच्याशी तुम्हाला फ्रेंड म्हणून कनेक्ट व्हायचे असेल अशा इतर Apple Music सदस्यांची आम्ही शिफारस करू शकतो. फ्रेंड्सच्या शिफारशी करण्यासाठी तपासत असताना Apple तुमच्या संपर्कांची माहिती जाणून घेत नाही किंवा संग्रहित करत नाही. Apple ला तुमच्या संपर्कांमधील केवळ संक्षिप्त आणि एनक्रिप्ट केलेल्या फोन नंबर आणि ईमेल ॲड्रेसचे हॅश पाठवले जातात आणि त्यानंतर शिफारस करण्यासाठी जुळणाऱ्या Apple Music सबस्क्रायबरना स्थानिकरित्या तुमच्या डिव्हाइसवर ठरवले जाते. Apple Music भविष्यात नवीन फ्रेंड्सची शिफारस करण्यासाठी वेळोवेळी तुमचे संपर्क तपासू शकेल; तुम्ही अकाउंट सेटिंग > गोपनीयता व ॲक्सेस > Apple Music वर संपर्क येथे जाऊन यावर नियंत्रण ठेवू शकता. जर तुम्ही इतर लोकांच्याजवळ त्यांच्या संपर्कामध्ये असलेल्या Apple अकाउंट संपर्क माहितीच्या आधारावर शोधले जाऊ इच्छित नसल्यास, तुम्ही अकाउंट सेटिंग > गोपनीयता व ॲक्सेस > मध्ये ‘Apple अकाउंटने शोधले जाण्याची अनुमती द्या’ मध्ये जाऊन हे बदलू शकता.
तुमच्या प्रोफाइलमध्ये प्रदान केलेली माहिती तुम्ही कोणत्याही क्षणी अपडेट करू शकता किंवा काढून टाकू शकता. तुम्ही जेव्हा ऑनलाईन शेअर करता, तेव्हा तुम्हाला सार्वजनिक केल्या जाणाऱ्या माहितीबद्दल काळजीपूर्वक विचार करून निर्णय घेतला पाहिजे. तुम्ही Apple Music वरुन इतर संकेतस्थळे किंवा सोशल नेटवर्क्सवर काही शेअर करता तेव्हा तुम्ही जे शेअर करता ते त्या इतर सेवांच्या गोपनीयता धोरणांच्या अधीन असते.
SharePlay
जेव्हा तुम्ही Apple Music ची सदस्यता घेता, तेव्हा तुम्ही Apple TV, HomePod, CarPlay ला कनेक्ट केल्यावर किंवा Bluetooth चा वापर करत असताना SharePlay सत्रांना होस्ट करू शकते. SharePlay सह इतर Apple Music चे सदस्य तुमच्या SharePlay सेशनमध्ये जॉइन होऊ शकतात आणि Apple Music च्या माध्यमातून संगीत प्ले करणे नियंत्रित करू शकतात. SharePlay हे Apple Music ची सदस्यता नसलेल्या यूझरना देखील तुमच्या SharePlay सेशनमध्ये सामील होऊ देते. तुमच्या डिव्हाइसवर Bluetooth एनेबल्ड असल्यास, Apple द्वारे त्याचा वापर केला जातो, ज्यामुळे तुमच्या जवळपासचे संपर्क Apple Music सेशन शोधू शकतील आणि त्यामध्ये सहभागी होण्याची विनंती करू शकतील. संपर्कांनी तुमचे डिव्हाइस शोधून काढणे आणि तुमच्या Apple Music सेशनमध्ये जॉइन होण्याची विनंती करणे तुम्हाला नको असल्यास, तुम्ही Apple Music ॲपच्या सेटिंगवर जाऊन ‘जवळपासच्या संपर्कांनी शोधून काढणे’ बंद करू शकता. Apple Music च्या ॲप सेटिंगमध्ये किंवा कारमध्ये SharePlay सेशनमध्ये असल्यास वाहनाच्या इंटरफेसवर डिस्प्ले केलेला QR कोड स्कॅन करून ‘संपर्क’ ॲप त्याचप्रमाणे इतर सहभागी देखील सेशनमध्ये जॉइन होऊ शकतात.
सेशनमधील सहभागीचे नाव आणि प्रोफाइल छायाचित्र सेशनमधील प्रत्येकाला दृश्यमान असेल. SharePlay सेशनसाठीची योगदाने अशा व्यक्तींना ॲट्रिब्युट केलेली असतात ज्यांनी ती तयार केलेली असतात आणि त्या यूझरचे नाव आणि प्रोफाइल छायाचित्र प्रदान केलेली असल्यास संबंधित केलेली असतात, जी Apple Music च्या ॲप सेटिंगमधून कोणत्याही क्षणी संपादित केली जाऊ शकतात. तुम्ही होस्ट करत असलेल्या Apple Music ॲपमधील SharePlay आयकॉनवर टॅप करून, त्यानंतर काढून टाकायचे असलेल्या सहभागीला सिलेक्ट करून तुम्ही SharePlay सेशनमधून सहभागींना काढून टाकू शकता. एखादे SharePlay सेशन सोडण्यासाठी, Apple Music ॲपमधील SharePlay आयकॉनवर टॅप करा आणि नंतर ‘सोडा’ वर टॅप करा. तुम्ही होस्ट करत असलेले SharePlay सेशन समाप्त करण्यासाठी Apple Music ॲपमधील ‘समाप्त करा’ वर टॅप करा. SharePlay सेशन संपल्यानंतर Apple तुमचे संपर्क किंवा सेशन जॉइन करणाऱ्या इतर सहभागींची माहिती राखून ठेवत नाही.
तुम्ही SharePlay सेशन ‘संदेश’ मध्ये किंवा FaceTime कॉलदरम्यान इतरांसह संगीत सिंकमध्ये शेअर करण्यासाठी देखील एनेबल करू शकता. सेशन सुरू करण्यासाठी तुम्हाला ऐकायचे असलेले संगीत सिलेक्ट करा, नंतर संगीत पर्यायांमध्ये SharePlay वर टॅप करा, ज्यांच्यासह शेअर करायचे आहे ते संपर्क प्रविष्ट करा, नंतर ‘संदेश’ किंवा ‘FaceTime’ वर टॅप करा आणि सुरू करा.
तयार करा आणि प्लेलिस्ट्सवर सहयोग करा
Apple Music सदस्य त्यांच्या स्वतःच्या प्लेलिस्ट्स तयार करू शकतात किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून प्लेलिस्ट उत्पन्न करण्यासाठी, जिथे उपलब्ध असेल तिथे, Playlist Playground वापरू शकतात. जेव्हा तुम्ही Playlist Playground वापरता, तेव्हा तुम्हाला काय ऐकायचे आहे ते तुम्ही वर्णन कराल, जे मूड, शैली किंवा थीम समजून घेण्यासाठी प्रोसेस केले जाईल. कस्टमाइझ केलेली प्लेलिस्ट तयार करण्यासाठी ही माहिती तुमच्या ऐकण्याच्या हिस्ट्री आणि इतर वापर डेटासह एकत्र केली जाईल. तुम्ही प्लेलिस्ट जतन करण्यापूर्वी ती चांगली करू शकता आणि तुम्ही कधीही उत्पन्न केलेली प्लेलिस्ट हटवू शकता किंवा बदलू शकता.
तुम्ही Apple Music च्या इतर सदस्यांसह प्लेलिस्ट्सवर सहयोग करू शकता. तुम्ही प्लेलिस्टचे निर्माते असल्यास तुम्ही प्लेलिस्टमध्ये सामील होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मंजूर करण्याचे निवडू शकता किंवा तुम्ही प्लेलिस्टची लिंक असलेल्या कोणालाही ओटोमॅटीकली जॉइन होण्याची अनुमती देऊ शकता. सर्व सहभागी प्लेलिस्टमध्ये गाणी समाविष्ट करू शकतात किंवा त्यातून काढून टाकू शकतात आणि इमोजी प्रतिक्रिया समाविष्ट करू शकतात. योगदाने अशा व्यक्तींना ॲट्रिब्युट केलेली असतात ज्यांनी ती तयार केलेली असतात आणि त्या यूझरचे नाव आणि प्रोफाइल छायाचित्र प्रदान केलेली असल्यास संबंधित केलेली असतात, जी Apple Music च्या ॲप सेटिंगमधून कोणत्याही क्षणी संपादित केली जाऊ शकतात. प्लेलिस्टमधील सर्व सहभागी आणि प्लेलिस्टचा ॲक्सेस असलेले कोणीही इतर सहभागींचे नाव आणि छायाचित्र पाहू शकतात. प्लेलिस्टमधील सहभागी इतर सहभागींनी समाविष्ट केलेली सर्व गाणी आणि प्रतिक्रिया बघू शकतात. सहयोग थांबवण्यासाठी, स्वतःला प्लेलिस्ट सेटिंगमध्ये जाऊन प्लेलिस्टमधून काढून टाका किंवा तुम्ही क्रिएटर असल्यास, प्लेलिस्ट सेटिंगमध्ये ‘सहयोग मॅनेज करा’ वर जाऊन सहयोग करणे थांबवा. प्लेलिस्ट क्रिएटरने सहयोग समाप्त केल्यास, प्लेलिस्ट ‘शेअर केलेली प्लेलिस्ट’ बनते जिचा ॲक्सेस सहयोगींच्या Apple Music लायब्ररीमध्ये असेल.
कॉन्सर्ट्स
जर तुम्ही Apple Music ला तुमचे स्थान ॲक्सेस करण्याची अनुमती दिली, तर तुम्हाला जवळपासचे कॉन्सर्ट्स यासारखी स्थानिक पातळीवर संबंधित माहिती प्रदान करण्यासाठी तुमच्या आवडीचे शहर जतन करण्यासाठी तुमचे अंदाजित स्थान वापरले जाऊ शकते. जर तुम्ही Apple Music ला तुमचे स्थान ॲक्सेस करण्याची अनुमती न देण्याचे निवडले, तर तुम्ही त्या शहरातील कॉन्सर्ट्स शोधण्यासाठी मॅन्युअली तुमच्या आवडीचे शहर प्रविष्ट करू शकता. सिंकिंग एनेबल केले असल्यास तुमच्या आवडीचे शहर डिव्हाइसवर सिंक केले जाईल. तुम्ही सेटिंग > गोपनीयता व सुरक्षा > स्थान सेवा > ‘संगीत’ वर जाऊन तुमच्या iOS किंवा iPadOS डिव्हाइसवर कधीही तुमच्या स्थानावर आधारित सेटिंग बदलू शकता.
Apple Music आणि Apple Music Classical वैयक्तिकृत करणे आणि त्यामध्ये सुधारणा करणे
जेव्हा तुम्ही तुमची Apple Music ची सदस्यता वापरता किंवा तुमच्या लायब्ररी बाहेरील निःशुल्क कॉण्टेण्ट प्ले करता तेव्हा तुम्ही प्ले केलेली किंवा तुमच्या संगीत लायब्ररीमध्ये समाविष्ट केलेली गाणी आणि व्हिडिओंबाबतची (लागू असेल तिथे) किंवा प्लेलिस्ट आणि कलाकार व कॉण्टेण्ट आवडते म्हणून निवडता किंवा शेअर करता याबाबतची माहिती आम्ही संकलित करू शकतो. अकाउंट, IP ॲड्रेस, आणि डिव्हाइस, ॲप यासारखी माहिती किंवा तुम्ही Apple Music किंवा Apple Music Classical प्ले केले तेव्हा प्ले करण्यासाठी वापरलेला कार इंटरफेस आणि ते किती कालावधीसाठी प्ले केले गेले याची नोंद केली जाते आणि ते Apple ला पाठवली जाते. आम्ही ह्या माहितीचा वापर तुमचे अनुभव कस्टमाइझ करण्यासाठी, तुम्हाला ईमेल आणि नोटिफिकेशन पाठवण्यासाठी, आणि Apple Music व Apple Music Classical कसे वापरले जातात हे समजावून घेण्यात आमची मदत होण्यासाठी करतो, जेणेकरून आम्ही आमच्या सेवांमध्ये सुधारणा करू शकू. उदाहरणार्थ, ह्या माहितीने आम्हाला संगीत, व्हिडिओ, आणि कलाकारांचे कॉण्टेण्ट निवडण्यास मदत मिळू शकते जी आम्ही तुम्हाला Apple Music आणि Apple Music Classical मध्ये दाखवतो. हे आम्हाला तुमच्यासाठी इतर शिफारसी करण्यास देखील अनुमती देते ज्यातून तुमच्या आवडी दिसून येतात, तुम्हाला शहरानुसार ट्रेंडिंग संगीत दाखवणारे शहर चार्ट तयार करतात आणि तुमची श्रवण हिस्ट्री आणि तुमच्या आवडीच्या शैली ह्यासारख्या संमिश्र माहितीचा वापर करून वैयक्तिकृत Apple सर्च परिणाम प्रदान करतात. आम्ही या माहितीचा वापर रॉयल्टी पे करण्यासाठी आणि Apple मीडिया सेवांच्या अटी आणि शर्ती किंवा लागू होणाऱ्या कायद्याचे उल्लंघन होणे टाळण्यासाठी किंवा उल्लंघन करणाऱ्या ॲक्टिव्हिटींविरुद्ध कारवाई करण्यासाठी देखील करू शकतो.
तुम्ही Apple Music वर इतर यूझरसह कॉण्टेण्ट ऐकण्यासाठी SharePlay वापरत असल्यास, Apple Music ॲप तुम्ही SharePlay सेशन दरम्यान ऐकलेल्या कॉण्टेण्टविषयी आणि सेशनमधील सहभागींची अंदाजे संख्या याविषयी माहिती संकलित करेल, परंतु SharePlay सेशनमधील सहभागींना ओळखण्यासाठी कोणतीही माहिती राखून ठेवणार नाही.
आम्ही Apple Music चे समर्थन देणाऱ्या मॉडेलमध्ये सुधारणा करण्यासाठी Apple Music च्या सर्च डेटाचा वापर करतो. उदाहरणार्थ, एकत्रित केलेल्या Apple Music सर्च क्वेरींचा वापर Apple Music च्या सर्च मॉडेलला अधिक चांगले करण्यासाठी केला जातो.
तुमच्याशी संवाद साधणे
Apple कडून तुमच्याकडे असलेली Apple उत्पादने, तुम्ही डाउनलोड केलेली Apple ॲप आणि तुमच्या Apple सेवांच्या सदस्यता यासारख्या तुमच्या अकाउंटशी संबंधित माहितीचा वापर Apple Music Classical आणि Apple One च्या समावेशासह, Apple Music आणि इतर Apple उत्पादने, सेवा, आणि तुम्हाला रुची असू शकेल अशा ऑफर याविषयी कम्युनिकेशन्स करण्यासाठी केला जाऊ शकतो. तुमच्या डिव्हाइसचा सिरिअल नंबर आणि इतर हार्डवेअर आयडेंटिफायर किंवा तुमच्या संबद्ध App Store सदस्यतांबाबतचे तपशील यांचा वापर Apple सेवा ऑफरसाठीची पात्रता तपासण्यासाठी केला जाऊ शकेल. तुम्ही कौटुंबिक शेअरिंग गटात असल्यास, Apple तुम्हाला कौटुंबिक शेअरिंगमार्फत उत्पादने, सेवा आणि तुम्हाला उपलब्ध असलेल्या ऑफरविषयी कम्युनिकेशन करू शकते. तुम्ही Apple One ची सदस्यता खरेदी केली असल्यास, तुम्ही सदस्यता घेतलेल्या त्या प्रत्येक सेवांच्या फीचरविषयी आम्ही तुम्हाला ईमेल आणि Push नोटिफिकेशन पाठवू शकतो. तुम्हाला Apple Music आणि Apple Music Classical वरील उपलब्ध नवीन फीचर्स, कॉण्टेण्ट, इव्हेंट्स आणि उपलब्ध ऑफर्सबद्दल ईमेल आणि Push नोटिफिकेशन पाठवण्यासाठी Apple हे Apple Music च्या सवलतीच्या दरातील उपलब्ध सदस्यतांसाठी (Apple Music विद्यार्थी सारख्या) पात्रता पडताळून पाहण्यासाठी Apple Music आणि Apple Music Classical मधील तुमच्या ॲक्टिव्हिटी आणि वापरल्या जाणाऱ्या सेवांशी होणाऱ्या संवादाबाबतच्या माहितीचा वापर देखील करू शकते. तुम्हाला प्राप्त होणारी नोटिफिकेशन्स फिल्टर करण्यासाठी, काही संपर्कांसाठी हार्डवेअर आयडेंटिफायर वापरला जातो. तुम्ही account.apple.com वर जाऊन तुमची ईमेल प्राधान्ये बदलू शकता आणि हे ईमेल प्राप्त करणे बंद करू शकता. तुमच्या iOS, iPadOS, किंवा visionOS डिव्हाइसवर तुमची नोटिफिकेशन प्राधान्ये अपडेट करण्यासाठी सेटिंग > नोटिफिकेशन > संगीत वर जा. Mac वर, Apple Music उघडा आणि सेटिंग > सामान्य > नोटिफिकेशन वर जा. Apple आपल्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी नोटिफिकेशन्ससह आमच्या संवादासोबतच्या तुमच्या इंटरॅक्शनबद्दलच्या माहितीचा वापर करते.
फसवणूक आणि इतर नुकसानकारक ॲक्टिव्हिटी टाळणे
जेव्हा तुम्ही खरेदी करण्याचा प्रयत्न करता तेव्हा, आम्ही तुमच्या डिव्हाइसवर ‘डिव्हाइस विश्वसनीयता स्कोअर’ ची गणना करतो, ज्यासाठी तुम्ही अंदाजे किती फोन कॉल करता किंवा ईमेल पाठवता आणि प्राप्त करता ह्यासह तुम्ही तुमचे डिव्हाइस कसे वापरता ह्याबद्दलच्या माहितीचा वापर केला जातो. ‘सबमिशन’ अशा रितीने डिझाइन करण्यात आलेले आहे की Apple तुमच्या डिव्हाइसवरील अंतर्निहित मूल्यांना जाणून घेऊ शकत नाही. स्कोअर आमच्या सर्व्हरवर निश्चित वेळेसाठी संग्रहित केला जातो. Apple Music च्या सदस्यतेच्या नूतनीकरणावर प्रक्रिया करण्यासाठी आणि पेमेंट सहभागीच्या अधिकृततेपूर्वी तुमच्या सदस्यतेचा निरंतर ॲक्सेस प्रदान करायचा की नाही हे निश्चित करण्यासाठी Apple तुमच्या Apple बरोबरच्या व्यावसायिक संबंधांची माहिती देखील वापरू शकते.
थर्ड पार्टींना करायचे प्रकटीकरण
रेडिओ स्टेशन
जेव्हा तुम्ही ब्रॉडकास्ट ऐकण्यासाठी Apple Music चा वापर करता, तेव्हा तुम्हाला विनंती केलेला कॉण्टेण्ट प्रदान करण्यासाठी तुमचे डिव्हाइस थेट ब्रॉडकास्ट रेडिओ स्टेशनशी कनेक्ट करते. हे जेव्हा कनेक्ट होईल तेव्हा तुमच्या डिव्हाइसचा IP ॲड्रेस ब्रॉडकास्ट रेडिओ स्टेशनला दिसेल. ब्रॉडकास्ट रेडिओ स्टेशनाद्वारे तुमच्या IP ॲड्रेसची हाताळणी ही ब्रॉडकास्ट रेडिओ स्टेशन किंवा त्यांच्या प्रदात्यांच्या गोपनीयता धोरणाच्या नियंत्रणाखाली असते.
रेकॉर्ड लेबल्स, कलाकार आणि चार्ट कंपायलर
आम्ही Apple Music आणि Apple Music Classical च्या वापराविषयीचा काही एकत्रित वैयक्तिक नसलेला डेटा, तसेच वयोगट आणि लिंग यासारखी एकत्रित केलेली यूझर लोकसंख्यासास्त्रीय माहिती (जी तुमच्या Apple अकाउंटमधील तुमचे नाव आणि संबोधन ह्यासारख्या माहितीवरून अनुमानित केली जाऊ शकते) रेकॉर्ड लेबल, प्रकाशक आणि कलाकारांना प्रदान करण्यास बांधील असतो, जेणेकरून ते त्यांच्या सर्जनशील कार्याच्या कामगिरीचे मापन करू शकतील आणि रॉयल्टी व अकाउंटिंग विषयक आवश्यकता पूर्तता करू शकतील. त्याचबरोबर, आम्ही जगभरातील संगीत चार्टसाठी एकत्रित केलेली ऐकण्याची ॲक्टिव्हिटी चार्ट कंपायलरसह शेअर करतो, जेणेकरून लेबल आणि कलाकारांना एंगेजमेंटचे मोजमाप करता येते ज्यामध्ये रिअल-टाइम आणि लेबल व कलाकारांना श्रोत्यांपर्यंत पोहोचण्यास मदत करणाऱ्या मार्केटिंग प्लॅटफॉर्मचा समावेश असतो. तुम्ही मोबाइल नेटवर्क प्रदात्यासारख्या थर्ड पार्टी पार्टनरद्वारे Apple Music ची सदस्यता घेतल्यास, तुमच्या सदस्यतेची पात्रता निश्चित करण्यासाठी किंवा तुमची खरेदी पूर्ण करण्यासाठी आम्ही वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य मर्यादित माहिती त्या पार्टनरसह शेअर करतो.
Apple Music इतर ॲपबरोबर कनेक्ट करणे
iOS, iPadOS, आणि visionOS ॲप आणि गैर-Apple प्लॅटफॉर्मवरील ॲप तुमच्या Apple Music आणि तुमच्या क्लाउड लायब्ररीच्या ॲक्सेसची विनंती करू शकतील. तुम्ही ॲपला अशी परवानगी दिल्यास, ते डिव्हाइसवरील तुमची क्लाउड लायब्ररी, तुम्ही Apple Music चे सदस्य आहात की नाही, तुमचे संगीत आणि व्हिडिओ प्ले करण्याची ॲक्टिव्हिटी, आणि Apple Music मधील तुमच्या शिफारसी यासारखी माहिती ॲक्सेस करू शकते. परवानगी मिळालेले ॲप तुमच्या लायब्ररी आणि प्लेलिस्टमध्ये कोणती गाणी आहेत यासारख्या तुमच्या अकाउंटशी संबंधित डेटामध्ये बदल देखील करू शकते. तुम्ही छायाचित्र ॲपला Apple Music ॲक्सेस करण्याची परवानगी दिल्यास, छायाचित्र ॲप आठवणींच्या चित्रपटांसह प्ले करण्यासाठी Apple Music मधील गाण्यांचा वापर करेल. जेव्हा तुम्ही ‘छायाचित्र’ मध्ये आठवणींचा कस्टम चित्रपट तयार करता, तेव्हा तुम्ही आठवणी तयार करण्यासाठी प्रविष्ट केलेल्या प्रॉम्प्टची माहिती Apple Music कडे पाठवली जाऊ शकते, जेणेकरून त्या चित्रपटासह प्ले करण्यासाठी संगीत सिलेक्ट केले जाऊ शकेल. सपोर्ट केलेले कॉण्टेण्ट असलेली ‘रिमोट’सारखी Apple ॲप देखील तुम्ही Apple Music ॲप आणि सपोर्ट असलेल्या कॉण्टेण्टचा वापर करण्यास सुरू केल्यावर ऑटोमॅटिकली कनेक्ट केली जातील. तुम्ही तुमचे iOS, iPadOS, किंवा visionOS डिव्हाइसवर सेटिंग > गोपनीयता व सुरक्षा > मीडिया व Apple Music मध्ये जाऊन ॲपचा ॲक्सेस एनेबल करू शकता. Mac वर, सिस्टीम सेटिंग > गोपनीयता व सुरक्षा > गोपनीयता > मीडिया व Apple Music वर जा. तुम्ही iOS 11 च्या आधीचे iOS किंवा iPadOS च्या व्हर्जनचा वापर करून ॲप काढून टाकल्यास किंवा ॲपला ॲक्सेस करण्याची मान्यता दिल्यास, तुम्ही तुमच्या Apple Music अकाउंट सेटिंगमध्ये त्यांचा ॲक्सेस डिसेबल करू शकता.
Apple पार्टनर्सच्या माध्यमातून Apple Music च्या सदस्यता
जर तुमचा मोबाइल नेटवर्क प्रोव्हायडर Apple Music सदस्यता किंवा निःशुल्क चाचणी प्रदान करत असेल, तर तुम्ही मोबाइल नेटवर्क प्रोव्हायडरच्या माध्यमातून पात्र आहात की नाही हे निश्चित करण्यासाठी Apple द्वारे तुमचा फोन नंबर तपासला जाऊ शकतो. तुम्ही मोबाइल नेटवर्क प्रोव्हायडर किंवा इतर Apple भागीदाराद्वारे Apple Music च्या सदस्यतेसाठी किंवा निःशुल्क ट्रायलसाठी साइन अप केले असल्यास, तुमचे अकाउंट ओळखण्यासाठी आणि तुम्ही तुमची सदस्यता सक्रिय केली असल्याचे मोबाइल नेटवर्क प्रोव्हायडर किंवा इतर भागीदाराला कळवण्यासाठी Apple तुमचा फोन नंबर किंवा भागीदाराने शेअर केलेला एकमेव अकाउंट आयडेंटिफायर वापरेल. आम्ही साइन-इन केले जात असताना तुमच्या अकाउंटची पडताळणी करण्यासाठी आणि तुमची Apple Music ॲक्टिव्हिटी तुमच्या अकाउंटशी कनेक्ट करण्यासाठी फोन नंबर किंवा तुमच्या सदस्यतेशी संबंधित युनिक आयडेंटिफायरचा वापर करू. आम्ही तुमच्या विनंतीनुसार तुमच्या मोबाइल नेटवर्क प्रोव्हायडरकडील तुमी सदस्यता रद्द करण्याची विनंती करण्यासाठी तुमच्या फोन नंबरचा देखील वापर करतो.
रिटेंशन
व्यवसायाची गरज, संदर्भित बांधिलकी आणि कायदेशीर आवश्यकतांनुसार आम्ही वेगवेगळ्या कालावधीसाठी तुमच्याद्वारे Apple Music आणि Apple Music Classical चा वापर आणि त्यांच्यासह परस्परक्रिया ह्यांच्याशी संबंधित वैयक्तिक डेटा राखून ठेवतो.
पुन्हा सक्रिय करण्यास समर्थन देण्यासाठी आणि तुम्हाला आवडू शकेल असे संगीत आणि तुम्ही पात्र असू शकता अशा ऑफर्सविषयी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी, तुमच्या ऐकण्याच्या ॲक्टिव्हिटी, लायब्ररी कॉण्टेण्ट, प्लेलिस्ट्स आणि तुमच्या सर्चेसविषयी माहिती तुमची सदस्यता सक्रिय असेपर्यंत आणि अकाउंट रद्द केल्यानंतर जास्तीत जास्त दोन वर्षांपर्यंत राखून ठेवली जाते. आर्थिक अहवालांच्या दायित्यवांचे पालन करण्यासाठी, आवश्यकता असेल तेव्हा आम्ही ही माहिती लागू कायद्याने उल्लेखित केलेल्या कालावधीसाठी राखून देखील ठेवू शकतो, ज्यानुसार कमीत कमी 10 वर्षांचा रिटेंशन कालावधी आवश्यक आहे परंतु चीनसारख्या प्रदेशात हा कालावधी 30 वर्षांपर्यंत वाढू शकतो.
जर तुमची सदस्यता समाप्त झाली, तर कॉण्टेण्ट न गमवता पुन्हा सक्रिय करता यावे ह्यासाठी Apple Music तुम्ही समाविष्ट केलेले किंवा Apple Music कॅटलॉगमधून तयार केलेले संगीत आणि प्लेलिस्ट्स वाढीव कालावधीसाठी राखून ठेवू शकते. ह्या कालावधीनंतर, Apple Music कॅटलॉगमधील कॉण्टेण्ट ॲक्सेस करण्यायोग्य नसेल.
जर तुम्ही तुमचे Apple अकाउंट हटवले, तर कायद्यानुसार आवश्यक असेल तिथे किंवा फसवणूकीपासून संरक्षण करण्यासाठी, Apple मीडिया सेवांच्या अटी आणि शर्ती अंमलात आणण्यासाठी किंवा Apple सेवांची सुरक्षा कायम ठेवण्यासाठी काही डेटा राखून ठेवला जाऊ शकतो.
वैयक्तिक डेटा प्रोसेस करण्यासाठी लागू होणारे कायदेशीर आधार
सेवा प्रदान करण्यासाठी आणि आमच्या कायदेशीर जबाबदाऱ्यांचे पालन करण्यासाठी, आवश्यकतेनुसार, आम्ही सामान्यतः Apple बरोबरच्या तुमच्या कराराच्या कार्यक्षमतेसाठी Apple Music मधील तुमच्या वैयक्तिक डेटावर प्रक्रिया करतो. जिथे संमती उचित कायदेशीर आधार असतो, तिथे आम्ही त्याला लागू होणाऱ्या स्थानिक कायद्यानुसार प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो.
जिथे लागू होणारे कायदे निर्देशित करतात, तिथे आम्ही पुढील कारणांनी आमच्या किंवा थर्ड पार्टीच्या कायदेशीर स्वारस्यांच्या उद्देशांसाठी गरजेनुसार वैयक्तिक डेटावर प्रक्रिया करतो :
- तुम्ही Apple Music आणि Apple Music Classical मध्ये ऐकत असलेल्या कॉण्टेंटचा ॲक्सेस प्रदान करणे, ते तुमच्या लायब्ररीमध्ये समाविष्ट करणे किंवा डाउनलोड करणे
- Apple Music आणि Apple Music Classical मधील तुमचा अनुभव वैयक्तिकृत करा
- Apple Music मार्फतही उपलब्ध आहेत अशा तुमच्या गाण्यांच्या प्रती ओळखा आणि अनलॉक करा
- कॉण्टेण्ट तुमच्या प्रदेशात उपलब्ध आहे की नाही आणि ऑफर व सदस्यतांसाठी तुमची पात्रता जाणून घ्या
- तुमच्यासाठी आणि इतरांसाठी Apple Music आणि Apple Music Classical सुधारण्यात आणि ऑप्टिमाइझ करण्यात मदत करण्यासाठी, आणि तुम्हाला Apple Music आणि Apple Music Classical ॲप आणि Apple ची इतर उत्पादने, सेवा आणि ऑफरविषयी कम्युनिकेशन्स पाठवणे ज्यामध्ये तुम्हाला स्वारस्य असू शकते
- तुमची Apple Music प्रोफाइल आणि प्लेलिस्ट तयार करा आणि त्यांची देखभाल करा
- प्रकाशक, कलाकार आणि चार्ट कम्पायलरना रॉयल्टी देणे आणि अहवाल प्रदान करणे
- फसवणूक आणि इतर नुकसानकारक ॲक्टिव्हिटी टाळा
वापरलेल्या डेटामध्ये हे समाविष्ट आहे :
- फीचरसह तुमच्या आंतरक्रिया, इन ॲप नोटिफिकेशन व संदेश आणि Apple Music आणि Apple Music Classical वर तुम्ही ऐकत असलेल्या, सर्च करत असलेल्या, बघत असलेल्या, तुमच्या लायब्ररीमध्ये जोडल्या जात असलेल्या आणि डाउनलोड केल्या जाणाऱ्या कॉण्टेंटच्या समावेशासह Apple Music आणि Apple Music Classical ॲपचा केला जाणारा वापर
- तुमचे डिव्हाइस आणि अकाउंटविषयी तपशील
- तुमचा IP ॲड्रेस
- तुमची Apple Music प्रोफाइल आणि प्लेलिस्ट
- डिव्हाइस विश्वसनीयता स्कोअर
वैयक्तिक नसलेला डेटा
आम्ही कोणत्याही उद्देशासाठी वैयक्तिक नसलेला डेटा संकलित, ट्रान्सफर, उघड करू शकतो आणि वापरू शकतो. उदाहरणार्थ, आम्ही सेवा सुधारण्यासाठी Apple Music च्या इतर यूझरच्या माहितीसह तुमचा वैयक्तिक नसलेला डेटा एकत्रित करू शकतो. जेव्हा तुम्ही Apple Music चा वापर करता, तेव्हा तुमच्या डिव्हाइसवरील रेडिओ फ्रिक्वेन्सीची क्षमता, देश कोड, नेटवर्क कोड आणि मोबाइल रेडिओ ॲक्सेस तंत्रज्ञान असे विशिष्ट कामगिरी निकष देखील संकलित करू शकेल.
Apple Music बद्दल अधिक जाणून घ्या
फीचर आणि किमतींच्या समावेशासह अधिक तपशीलवार माहितीसाठी www.apple.com/in/apple-music वर जा.
Apple Music वेब प्लेयर व गोपनीयतेबाबत अधिक माहितीसाठी www.apple.com/in/legal/privacy/data/en/apple-music-web ला भेट द्या.
Apple ने संकलित केलेली माहिती नेहमी Apple च्या गोपनीयता धोरणानुसार हाताळली जाईल, जे www.apple.com/in/privacy वर मिळू शकते.
2026-03-30