Apple News व गोपनीयता

Apple News ला अधिक चांगले बनवण्यासाठी आणि वैयक्तिकृत करण्यासाठी Apple कडून News मध्ये तुमच्या अशी ॲक्टिव्हिटी संकलित केली जाते, जी तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित नसते. जेव्हा तुम्ही चॅनेलसाठी नोटिफिकेशन सुरू करता, तेव्हा चॅनेल तुमच्या Apple अकाउंटला संलग्नित केले जाऊ शकते. तुमच्या डिव्हाइसचा सीरियल नंबर सेवा ऑफरसाठी पात्रता तपासण्यास केला जाऊ शकतो.
 

Apple News, तसेच Apple News+, तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहेत आणि तुम्ही काय शेअर करता हे निवडण्यासाठी तुम्हाला एनेबल करतात.


Privacy Icon

  • News आणि ‘स्टॉक’ ॲप मधील तुमची वाचन व श्रवण ॲक्टिव्हिटी News आणि ‘स्टॉक’ ॲपसाठी विशिष्ट अशा आयडेंटिफायरला लिंक केलेली असते आणि ती तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित केलेली किंवा इतर Apple सेवांना लिंक केलेली नसते.
  • आम्ही तुमच्या वैयक्तिक आवडीनुसार फीचर तयार करण्यासाठी तुम्ही Apple News कसे वापरता ह्याबद्दलची माहिती वापरतो. ही माहिती तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित केलेली नाही.
  • News आणि ‘स्टॉक’ मधील जाहिराती तुमच्याशी संबंधित आहेत ह्याची खात्री करण्यासाठी, आम्ही तुमचे अकाउंट, तुम्ही वाचता त्या कथांचे विषय आणि श्रेण्या, आणि तुम्ही फॉलो करत असलेली, सदस्यता घेतलेली, किंवा नोटिफिकेशन चालू केलेली प्रकाशने ह्याबद्दलची माहिती वापरू शकतो. App Store वर तुमच्या जाहिराती वैयक्तिकृत करण्यासाठी आम्ही तुमच्या सदस्यतांची माहिती देखील वापरू शकतो. खाली वर्णन केल्याप्रमाणे, तुमच्याकडे ह्या जाहिरातीच्या संदर्भात पर्याय आहेत.
  • Apple News मध्ये वापरल्या जाऊ शकणाऱ्या कोणत्याही सक्रिय सदस्यतांसाठी आम्ही तुमचे Apple अकाउंट तपासतो.
  • जेव्हा तुम्ही चॅनेलसाठी नोटिफिकेशन सुरू करता, तेव्हा आम्ही ते चॅनेल तुमच्या Apple अकाउंटशी संलग्न करू शकतो.

तुमच्या माहितीची गोपनीयता आणि सुरक्षा हे Apple मधील सर्वांसाठी प्राधान्य आहे. केवळ तुमचा अनुभव उत्तम करण्यासाठी आम्ही आम्हाला आवश्यक असलेला डेटा संकलित करण्यासाठी खूप मेहनत घेतो. जेव्हा आम्ही डेटा संकलित करतो, तेव्हा आम्ही हा डेटा का संकलित करत आहोत आणि आम्हाला हे करणे गरजेचे का आहे, हे तुम्हाला माहीत असणे महत्त्वाचे समजतो, जेणेकरून तुम्ही अचूक निवड करू शकाल. Apple च्या प्रत्येक उत्पादन आणि सेवेप्रमाणे, Apple News देखील त्या तत्त्वांना लक्षात घेऊन डिझाइन केलेले आहे.

Apple News प्रदान करणे

तुम्ही वाचत आणि ऐकत असलेल्या स्टोरी व्यक्तिगत गोष्ट आहे हे आम्ही समजू शकतो; त्यामुळेच आम्ही ‘News’ आणि ‘स्टॉक’ असे डिझाइन केले आहे जेणेकरून तुमचे वाचन आणि ऐकण्याची ॲक्टिव्हिटी आणि तुम्ही Apple News कसे वापरता हे तुमच्या Apple अकाउंटशी संबद्ध नसेल आणि इतर Apple सेवांशी लिंक केलेले नसेल. आम्ही संकलित करत असलेला डेटा विशेषकरून News आणि ‘स्टॉक’ ॲपमधील आयडेटिंफायरशी संबद्ध असतो.

Apple तुमच्या वैयक्तिक आवडींशी वैशिष्ट्यांना जुळवून घेण्यासाठी तुम्ही Apple News चा आपण वापर कसा करता याच्याबद्दल Apple माहिती संकलित करते ज्यामुळे तुमच्या व्यक्तिगत रूचीनुसार फीचर तयार केले जाऊ शकतील. उदाहरणार्थ, ‘आज’ हे वैशिष्ट्य तुम्हाला तुमच्या आवडीच्या चॅनेल आणि विषयांबाबतच्या सर्वोत्तम स्टोरींना अधोरेखित करणाऱ्या वैयक्तिक न्यूजफीड देते. तुमच्या Apple News सोबतच्या प्रतिसादाबाबतची माहिती, ज्यामध्ये तुम्ही कोणत्या स्टोरी वाचता, जतन करता किंवा शेअर करता आणि तुम्ही फॉलो करत असलेले विषय आणि चॅनेल्स ही माहिती संकलित करून Apple ला ह्या फीचरना बनविणे शक्य होते.

Apple News मधील शिफारशी या तुमच्या डिव्हाइसवर स्टोअर केलेल्या माहितीच्या आधारावर असतात. तुमच्या iOS डिव्हाइसवर तुमची वाचन आणि ऐकण्याची हिस्ट्री क्लिअर करण्यासाठी, ‘फॉलोइंग’ > ‘हिस्ट्री’ वर जा आणि ‘क्लिअर करा’ वर टॅप करा. तुमच्या iPadOS डिव्हाइसवर, ‘हिस्ट्री’ वर जा आणि ‘क्लिअर करा’ वर टॅप करा. Mac वर, News > ‘हिस्ट्री क्लिअर करा’ वर जा आणि ‘हिस्ट्री क्लिअर करा’ वर क्लिक करा. हे News आणि ‘स्टॉक’ साठी वापरलेले आयडेंटिफायर देखील रीसेट करेल. तुम्ही तुमच्या iOS, iPadOS, किंवा visionOS डिव्हाइस वर सेटिंग > ॲप्स > News, मध्ये जाऊन ‘आयडेंटिफायर रीसेट करा’ वर टॅप करून तुमचे रीडिंग आणि ऐकण्याची हिस्ट्री क्लिअर न करता देखील आयडेंटिफायर रीसेट करू शकता. Mac वर, News उघडा, नंतर News > ‘हिस्ट्री क्लिअर करा’ वर जा आणि ‘आयडेंटिफायर रीसेट करा’ वर क्लिक करा.

तुम्ही जेव्हा Apple News मधील एखाद्या चॅनेलसाठी नोटिफिकेशन चालू करता तेव्हा आम्ही महत्त्वाच्या स्टोरीज आणि चॅनेलवरील नवीन माहितीबाबत तुम्हाला कळवण्यासाठी ती माहिती स्टोअर करून ठेवतो आणि अशी माहिती तुमच्या Apple अकाउंटशी संबद्ध करू शकतो. (नवीन माहितीपत्रकाची नोटिफिकेशन्स केवळ Apple News+ सदस्यता घेतलेल्यांसाठी, आणि केवळ iOS व iPadOS डिव्हाइसेसवर उपलब्ध आहेत.) तुम्ही लाइव्ह ॲक्टिव्हिटीसह एखाद्या इव्हेंटला फॉलो करत असताना, आम्ही त्या इव्हेंट दरम्यान अपडेट्स पाठवण्यासाठी तो इव्हेंट तुमच्या Apple अकाउंटशी संबद्ध करू शकतो.

तुम्ही Apple News मध्ये सर्चचा वापर करता तेव्हा तुम्हाला संबद्ध सर्च परिणामांची सर्च क्वेरी देण्यासाठी आणि सर्चला अधिक चांगले बनवण्यासाठी Apple ला तुमच्या सर्च क्वेरीबरोबर सब्सक्रिप्शन सह माहिती पाठवली जाते. ही माहिती तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित केलेली नाही.

तुम्ही Apple News ला तुमचे स्थान ॲक्सेस करण्याची अनुमती दिल्यास, स्थानिक बातम्या, हवामान, सर्च रिझल्ट, आणि जाहिराती ह्यासारखी स्थानाशी संबंधित माहिती प्रदान करण्यासाठी तुमचे अंदाजित वापरले जाऊ शकते. त्याशिवाय, तुम्हाला तुमचे स्थान आणि Apple News मधील तुमचे स्थान आणि तुमच्या ॲक्टिव्हिटीच्या आधारावर तुम्हाला चॅनेल्स आणि विषय सुचवले जाऊ शकतात. तुम्ही स्थानिक पातळीवर संबंधित माहिती शोधण्यासाठी मॅन्युअली स्थान किंवा पिन कोड देखील प्रविष्ट करू शकता. ही माहिती तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित केलेली नाही.

तुम्ही सेटिंग > गोपनीयता आणि सुरक्षा > स्थान सेवेमध्ये जाऊन News वर टॅप करून त्यानंतर कधीही नाही निवडून iOS किंवा iPadOS डिव्हाइसवर स्थान-आधारित कार्यक्षमतेमधून कोणत्याही वेळी बाहेर पडू शकता. Mac वर, सिस्टीम सेटिंग > गोपनीयता व सुरक्षा > गोपनीयता > स्थान सेवा वर जा, नंतर सिलेक्ट केलेले News रद्द करा.

Siri तुमच्याकडून वापरल्या गेलेल्या ॲप आणि Safari वर तुमच्याकडून पाहिलेल्या संकेतस्थळावरून घेतल्या गेलेल्या माहितीवर ऑन-डिव्हाइस प्रक्रिया करून तुम्हाला आवडतील अशा स्टोरी, चॅनेल्स आणि विषय सुचवते. ही माहिती Apple ला पाठवली जात नाही. तुम्ही तुमच्या iOS किंवा iPadOS डिव्हाइसवर सेटिंग >ॲप > News > ‘Siri व सर्च’ वर जाऊन, आणि ’ॲपमध्ये दाखवा’ बंद करण्यासाठी टॅप करून कोणत्याही क्षणी हे डिसेबल करू शकता. तुमच्या visionOS डिव्हाइसवर, सेटिंग > ॲप > News वर जा, आणि ‘ॲपमध्ये दाखवा’ बंद करण्यासाठी टॅप करा. Mac वर, सिस्टीम सेटिंग > Siri व Spotlight वर जा, Siri सूचना व गोपनीयतेवर क्लिक करा, News वर क्लिक करा, नंतर सिलेक्ट केलेले ‘ॲपमध्ये Siri सूचना दाखवा’ रद्द करा.

तुमच्या सोयीसाठी, Apple News तुमच्या सर्व डिव्हाइसवरील तुमच्या अनुभवाचे सर्व पैलू अप टू डेट ठेवण्यासाठी iCloud चा वापर करते. उदाहरणार्थ, तुम्ही कोणते चॅनल्स आणि विषय फॉलो करता, तुमची वाचनाची आणि ऐकण्याची हिस्ट्री, तुमची वाचनाची व ऐकण्याची प्राधान्ये, तुम्ही एखाद्या पाककृतीला दिलेली रेटिंग्ज आणि नोट्स लक्षात ठेवण्यासाठी Apple News कडून iCloud चा वापर केला जाईल जेणेकरून तुम्हाला तुमच्या कोणत्याही डिव्हाइसवरून त्याच Apple News चा अनुभव घेता येईल. तुमची वाचनाची आणि ऐकण्याची हिस्ट्री जास्तीत जास्त तीन महिन्यांपर्यंत स्टोअर केली जाते. तुम्ही एखादे चॅनेल किंवा विषयाला अनफॉलो केल्यास किंवा एखादी स्टोरी जतन केलेल्या स्टोरीमधून काढून टाकल्यास किंवा तुमच्या वाचन हिस्ट्रीमधून हटवल्यास ती माहिती Apple च्या सर्व्हरवरून त्वरित हटवली जाईल. तुम्ही Apple News साठी iCloud बंद करून ही क्षमता कोणत्याही क्षणी डिसेबल करू शकता. तुमच्या iOS, iPadOS, किंवा visionOS वर असे करण्यासाठी, सेटिंग > [तुमचे नाव] > iCloud वर जा, त्यानंतर ‘News’ बंद करण्यासाठी टॅप करा. Mac वर, सिस्टीम सेटिंग > [तुमचे नाव] > iCloud वर जा, नंतर सिलेक्ट केलेले News रद्द करा. तुम्ही हे फीचर डिसेबल केलेले असल्यास, iCloud बॅकअप एनेबल केलेले असताना तुम्ही फॉलो करत असलेली चॅनेल्स आणि विषय, तुमची वाचनाची व ऐकण्याची हिस्ट्री आणि तुमची वाचण्याची व ऐकण्याची प्राधान्यांचा तरीही बॅकअप घेतला जाईल.

सदस्यता

तुम्ही Apple News+ ची सदस्यता घेतल्यास, तुम्हाला विविध प्रकाशनांचा सदस्यता कॉण्टेण्ट ॲक्सेस करता येईल. त्याऐवजी, तुम्ही अनेक मार्गांपैकी कोणत्याही एका मार्गाने वैयक्तिक प्रकाशनांकडील सदस्यता कॉण्टेण्ट ॲक्सेस करू शकता.

सर्वप्रथम, Apple News तुमचे Apple अकाउंट हे पाहण्यासाठी तपासू शकते की तुमच्याकडे App Store वर इतर कोणत्याही सक्रिय सदस्यता आहेत की नाही जिचा वापर Apple News मध्ये केला जाऊ शकतो. असे असल्यास, Apple News तुमची सदस्यता ऑटोमॅटिकली अनलॉक करेल आणि तुम्हाला प्रकाशनांच्या सशुल्क स्टोरीचा ॲक्सेस देईल. दुसरे म्हणजे, तुम्ही News ॲपमधून थेट वैयक्तिक प्रकाशनाची सदस्यता खरेदी करू शकता ज्यामध्ये तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती प्रकाशनासोबत शेअर करणे निवडू शकता. तिसरे म्हणजे, तुम्ही ह्यापूर्वी थेट प्रकाशनाकडून सदस्यता खरेदी केली असेल (उदाहरणार्थ, प्रकाशनाच्या संकेतस्थळावरून) तर प्रकाशक तुम्हाला तुमच्या सदस्यता अकाउंटवरून Apple News मध्ये साइन इन करण्याची अनुमती देऊ शकतात. प्रकाशन त्यानंतर तुमच्या सदस्यतेची पडताळणी करेल आणि तुम्हाला Apple News मधील त्यांच्या सदस्यता कॉण्टेंटचा ॲक्सेस देईल.

तुमच्याकडे Apple News+ चा भाग असलेल्या प्रकाशनाची वैयक्तिक सदस्यता असल्यास, तुमच्याकडे Apple News+ सदस्यता नसेल तरीही तुम्ही त्या प्रकाशनाचे सशुल्क कॉण्टेण्ट ॲक्सेस करू शकाल.

काही देशांमध्ये, तुम्ही निवडक स्टोरीचे ऑडिओ व्हर्जन आणि Apple News च्या संपादकांच्या दिवसभरातील सर्वोत्तम स्टोरीचे ऑडिओ वर्णन ऐकू शकता. ऑडिओ iPhone, iPod touch, आणि CarPlay वर उपलब्ध आहे. संपूर्ण ऑडिओ स्टोरी केवळ Apple News+ च्या सदस्यांसाठी उपलब्ध असतील. सदस्यता नसलेले एक संक्षिप्त प्रिव्ह्यू ऐकू शकतात. ऑडिओ वर्णन सदस्य असलेल्या आणि सदस्य नसलेल्यांसाठी उपलब्ध आहे.

स्टोरी आणि वर्णनांचे ऑडिओ व्हर्जन ॲक्सेस नियंत्रण आणि डिजीटल कॉण्टेंटच्या एनक्रिप्शनसाठी Apple च्या ‘फेअरप्ले स्ट्रीमिंग डिजिटल राइट्स मॅनेजमेंट’ (DRM) फ्रेमवर्कने संरक्षित असतात. Apple News एकाधिक कॉण्टेण्ट फाइलसाठी डिक्रिप्शन ‘की’ शेअर करते ज्यामुळे Apple त्या ‘की’ द्वारे तुमची ऐकण्याची हिस्ट्री मिळवू शकत नाही ज्यातून तुमच्या डिव्हाइसला विनंती केली गेली आहे ह्याची खात्री केली जाते.

Apple Podcasts

Apple News ऑडिओ कॉण्टेण्ट Apple Podcasts वर उपलब्ध आहे. तुम्ही Apple Podcasts मध्ये असे कॉण्टेण्ट ऐकल्यास, तुमची ऐकण्याची ॲक्टिव्हिटी www.apple.com/in/legal/privacy/data/en/apple-podcasts वरील Apple Podcasts व गोपनीयताच्या अधीन असेल. उदाहरणार्थ, सर्व डिव्हाइसवर सिंक करण्यासाठी, तुम्ही ऐकत असलेले सर्व पॉडकास्ट एपिसोड प्ले करण्याची स्थिती Apple ला माहित असते.

Game Center

तुम्ही ‘गेम सेंटर’, मध्ये जेव्हा साइन इन करता तेव्हा Apple ला तुमची पझल ॲक्टिव्हिटी प्राप्त होईल ज्यामध्ये गुणसंख्या, सोडवण्याची वेळ आणि इतर कामगिऱ्यांचा समावेश असेल. तुम्ही तुमच्या iOS, iPadOS किंवा visionOS डिव्हाइसवर सेटिंग >ॲप > News > News+कोडी वर जाऊन, आणि Game Center बंद करण्यासाठी टॅप करून कोणत्याही क्षणी हे डिसेबल करू शकता. Mac वर, News > सेटिंग वर जा, आणि सिलेक्ट केलेले Game Center रद्द करण्यासाठी क्लिक करा. www.apple.com/in/legal/privacy/data/en/game-center वर जाऊन तुम्ही Game Center आणि गोपनीयतेविषयी अधिक माहिती जाणून घेऊ शकता.

Apple News सुधारणे

Apple तुमच्या Apple News च्या वापराविषयी तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित नसलेली माहिती देखील गोळा करते. ह्यामध्ये तुम्ही वापरत असलेले फीचर्स आणि तुम्ही वाचलेल्या किंवा बघितलेल्या स्टोरीज, लाइव्ह ॲक्टिव्हिटीजसह तुमच्या परस्परक्रिया, तसेच ॲपच्या कार्यक्षमतेबद्दलची माहिती जसे की लोड टाइम, नोटिफिकेशन डिलिव्हरी आणि त्रुटी आणि क्रॅशेस ह्यांबद्दलची माहिती समाविष्ट असते. ह्यामध्ये डिव्हाइसचा प्रकार आणि तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमचे व्हर्जन ह्यासारखी तुमच्या डिव्हाइसची माहिती देखील समाविष्ट असते. आम्ही ही माहिती तुमच्यासाठी आणि इतरांसाठी Apple News सुधारण्यासाठी आणि ऑप्टिमाइझ करण्यासाठी वापरतो.

तुमच्याशी संवाद साधणे

Apple कडून तुमच्याकडे असलेली Apple उत्पादने, तुमच्या Apple सेवांच्या सदस्यता आणि तुम्ही डाउनलोड केलेली Apple ॲप यासारख्या तुमच्या अकाउंटशी संबंधित माहितीचा वापर Apple One च्या समावेशासह Apple News+ आणि इतर Apple उत्पादने, सेवा, आणि तुम्हाला आवड असू शकेल अशा ऑफर याविषयी कम्युनिकेशन्स करण्यासाठी केला जाऊ शकतो. तुमच्या डिव्हाइसचा सीरिअल नंबर किंवा तुमच्या Apple News+ च्या सदस्यतेविषयी तपशील Apple च्या ऑफरची पात्रता तपासण्यासाठी वापरले जाऊ शकतात. तुम्ही कौटुंबिक शेअरिंग गटात असल्यास, Apple तुम्हाला कौटुंबिक शेअरिंगमार्फत उत्पादने, सेवा आणि तुम्हाला उपलब्ध असलेल्या ऑफरविषयी कम्युनिकेशन करू शकते. तुम्ही Apple One ची सदस्यता खरेदी केली असल्यास, तुम्ही सदस्यता घेतलेल्या त्या प्रत्येक सेवांच्या फीचरविषयी आम्ही तुम्हाला ईमेल आणि Push नोटिफिकेशन पाठवू शकतो. Apple News मधील उपलब्ध नवीन फीचर, कॉण्टेण्ट आणि ऑफरविषयी ईमेल आणि Push नोटिफिकेशन पाठवण्यासाठी Apple कडून Apple News मधील तुमच्या ॲक्टिव्हिटीच्या माहितीचा वापर केला जाऊ शकतो. तुम्ही account.apple.com वर जाऊन तुमची ईमेल प्राधान्ये बदलू शकता आणि हे ईमेल प्राप्त करणे बंद करू शकता. तुमच्या iOS, iPadOS, किंवा visionOS डिव्हाइसवर तुमची नोटिफिकेशन प्राधान्ये अपडेट करण्यासाठी सेटिंग > नोटिफिकेशन > News वर जा. Mac वर, News उघडा आणि फाइल > ‘नोटिफिकेशन व ईमेल मॅनेज करा’ वर जा. Apple आपल्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी नोटिफिकेशसह आमच्याबरोबर तुमच्या संवादाच्या आंतरक्रियांबद्दलच्या माहितीचा वापर करते.

जाहिरात

आघाडीच्या प्रकाशकांकडून तुम्हाला उत्तम कॉण्टेण्ट प्रदान करण्यासाठी, Apple News ला जाहिरातीने सपोर्ट केलेला आहे. ‘वैयक्तिकृत जाहिराती सेटिंग’ चालू केलेले असल्यास, तुमच्याशी अधिक संबंधित जाहिराती प्रदान करण्यासाठी, Apple चा जाहिरात प्लॅटफॉर्म तुमचे अकाउंट, तुम्ही वाचता त्या कथांचे विषय आणि श्रेण्या, आणि तुम्ही फॉलो करत असलेली, सदस्यता घेतलेली, किंवा नोटिफिकेशन चालू केलेली प्रकाशने ह्याबद्दलची माहिती वापरू शकतो. App Store वर तुमच्या जाहिराती वैयक्तिकृत करण्यासाठी आम्ही तुमच्या सदस्यतांची माहिती देखील वापरू शकतो. वैयक्तिकृत जाहिराती बंद केल्याने Apple ला जाहिरात लक्ष्यीकरणासाठी ही माहिती वापरण्यापासून प्रतिबंधित केले जाईल. ह्यामुळे तुम्हाला प्राप्त होणाऱ्या जाहिरातींची संख्या कमी होणार नाही, परंतु त्या जाहिराती तुमच्याशी कमी संबंधित असू शकतात. तुमच्या iOS, iPadOS, किंवा visionOS डिव्हाइस वर, तुम्ही सेटिंग > गोपनीयता व सुरक्षा > Apple जाहिरात वर जाऊन आणि ‘वैयक्तिकृत जाहिरात’ बंद करण्यासाठी टॅप करून वैयक्तिकृत जाहिरात डिसेबल करू शकता. Mac वर, सिस्टीम सेटिंग > गोपनीयता व सुरक्षा > Apple जाहिरात वर जा, आणि सिलेक्ट केलेल्या वैयक्तिकृत जाहिराती रद्द करा. तुम्ही Apple News मध्ये वाचत आणि ऐकत असलेल्या स्टोरीचा वापर केवळ तुम्ही News किंवा स्टॉक ॲपमध्ये असताना तुम्हाला जाहिराती पाठवण्यासाठी केला जाईल.

थर्ड पार्टींसाठी डिसक्लोझर

आम्ही कोणत्याही थर्ड पार्टीसह तुमचा कोणताही व्यक्तिगत शेअर करत नाही. आम्ही विशिष्ट गैर-वैयक्तिक डेटा धोरणात्मक भागीदारांना उपलब्ध करून देण्यासाठी बांधील आहोत, जे आमची उत्पादने आणि सेवा पुरवण्यासाठी Apple बरोबर काम करतात, ग्राहकांना Apple मार्केटमध्ये मदत करतात आणि Apple News मध्ये डिस्प्ले करण्यासाठी Apple च्या वतीने जाहिराती विकतात. उदाहरणार्थ, प्रकाशकांचे पैसे भरण्यासाठी Apple तुमच्या Apple News च्या वापराबाबतचा गैर-वैयक्तिक डेटाचा वापर करू शकेल आणि एकूण अहवाल यूझर त्यांचा कॉण्टेण्ट कशारीतीने वाचतात किंवा त्यांचा वापर करतात हे समजण्यासाठी Apple News प्रकाशकांबरोबर शेअर करू शकतील. ह्यापैकी काही एकूण अहवालांमध्ये वय आणि लिंग (तुमचे नाव आणि तुमच्या Apple Account वरील आदरार्थी उल्लेख अशाप्रकारच्या माहितीवरून घेतले असेल) अशाप्रकारच्या यूझर डेमोग्राफिक्सचा समावेश आहे. Apple माहितीवर प्रक्रिया करणे, ग्राहक सेवा प्रदान करणे, आमच्या उत्पादन आणि सेवांमधील तुमच्या स्वारस्यांचे मूल्यांकन करणे आणि आमच्या वतीने ग्राहक संशोधन किंवा समाधान सर्वेक्षण करण्यासारख्या सेवा देणाऱ्या सेवा प्रदात्यांबरोबर देखील माहिती शेअर करू शकते. या कंपन्यांना तुमच्या माहितीचे संरक्षण करणे बंधनकारक आहे आणि त्या Apple जेथे ऑपरेट करते तेथे स्थित असू शकतात.

जेव्हा तुम्ही Apple News मधील एखाद्या वैयक्तिक प्रकाशनाची सदस्यता खरेदी करता, तेव्हा Apple तुमच्यासाठी आणि प्रकाशकासाठी युनिक असलेला एक सदस्य ID तयार करते. आम्ही प्रकाशकांना अहवाल प्रदान करण्यासाठी सदस्यता ID वापरतो, ज्यामध्ये तुम्ही खरेदी केलेल्या सदस्यता आणि तुमचा देश किंवा निवासी प्रदेशाच्या माहितीचा समावेश असतो जेणेकरून प्रकाशकांना त्यांच्या सदस्यतांची कामगिरी समजून घेऊ शकतात. जर तुम्ही एखाद्या विशिष्ट प्रकाशकाकडील तुमच्या सर्व सदस्यता रद्द केल्या आणि पुन्हा सदस्यता घेतली नाही, तर 180 दिवसांनंतर सदस्य ID रीसेट केला जाईल.

Apple News तुम्हाला इतर संकेतस्थळे किंवा सोशल नेटवर्कसह Apple News चे कॉण्टेण्ट देखील शेअर करण्याची अनुमती देते. जेव्हा तुम्ही Apple News वरील कॉण्टेण्ट संकेतस्थळे किंवा सोशल नेटवर्कसारख्या इतर स्थानांशी शेअर करता, तेव्हा त्या माहितीवर इतर संकेतस्थळे किंवा सोशल नेटवर्कच्या गोपनीयता धोरणाचे नियंत्रण असते. ही माहिती थर्ड पार्टींसह शेअर केली जाऊ नये असे तुम्हाला वाटत असल्यास, Apple News कॉण्टेण्ट थर्ड पार्टीची संकेतस्थळे किंवा सोशल नेटवर्कसह शेअर करू नका.

आम्ही कोणत्याही उद्देशासाठी वैयक्तिक नसलेला डेटा संकलित, ट्रान्सफर, उघड करू शकतो आणि वापरू शकतो. उदाहरणार्थ, आम्ही सेवा सुधारण्यासाठी Apple News च्या इतर यूझरच्या माहितीसह तुमचा वैयक्तिक नसलेला डेटा समुच्चित करू शकतो.

फसवणूक आणि इतर नुकसानकारक ॲक्टिव्हिटी टाळणे

जेव्हा तुम्ही खरेदी करण्याचा प्रयत्न करता तेव्हा, आम्ही तुमच्या डिव्हाइसवर ‘डिव्हाइस विश्वसनीयता स्कोअर’ ची गणना करतो, ज्यासाठी तुम्ही अंदाजे किती फोन कॉल करता किंवा ईमेल पाठवता आणि प्राप्त करता ह्यासह तुम्ही तुमचे डिव्हाइस कसे वापरता ह्याबद्दलच्या माहितीचा वापर केला जातो. ‘सबमिशन’ अशा रितीने डिझाइन करण्यात आलेले आहे की Apple तुमच्या डिव्हाइसवरील अंतर्निहित मूल्यांना जाणून घेऊ शकत नाही. स्कोअर आमच्या सर्व्हरवर निश्चित वेळेसाठी संग्रहित केला जातो. Apple News+ च्या सदस्यतेच्या नूतनीकरणावर प्रक्रिया करण्यासाठी आणि पेमेंट सहभागीच्या अधिकृततेपूर्वी तुमच्या सदस्यतेचा निरंतर ॲक्सेस प्रदान करायचा की नाही हे निश्चित करण्यासाठी आम्ही तुमच्या Apple बरोबरच्या व्यावसायिक संबंधांची माहिती देखील वापरू शकतो.

वैयक्तिक डेटा प्रोसेस करण्यासाठी लागू होणारे कायदेशीर आधार

सेवा प्रदान करण्यासाठी आणि आमच्या कायदेशीर जबाबदाऱ्यांचे पालन करण्यासाठी, आवश्यकतेनुसार, आम्ही सामान्यतः Apple बरोबरच्या तुमच्या कराराच्या कार्यक्षमतेसाठी Apple News मधील तुमच्या वैयक्तिक डेटावर प्रक्रिया करतो. जिथे संमती उचित कायदेशीर आधार असतो, तिथे आम्ही त्याला लागू होणाऱ्या स्थानिक कायद्यानुसार प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो.

जिथे लागू होणारे कायदे निर्देशित करतात, तिथे आम्ही पुढील कारणांनी आमच्या किंवा थर्ड पार्टीच्या कायदेशीर स्वारस्यांच्या उद्देशांसाठी गरजेनुसार वैयक्तिक डेटावर क्रिया करतो :

  • तुमच्यासाठी उपलब्ध कॉण्टेण्ट दाखवण्यास
  • ऑफरवरील पात्रता तपासणे, तुमच्यासाठी आणि इतरांसाठी सेवा ऑप्टिमाइझ करणे आणि त्यामध्ये सुधारणा करणे, आणि Apple News आणि Apple संबंधित इतर उत्पादने, सेवा आणि Apple One सह तुम्हाला आवडू शकणाऱ्या ऑफरबद्दल तुमच्याशी कम्युनिकेशन करणे
  • फसवणूक आणि इतर नुकसानकारक ॲक्टिव्हिटी टाळा

वापरलेल्या डेटामध्ये हे समाविष्ट आहे :

  • तुमचे डिव्हाइस आणि अकाउंट, प्रकाशने आणि Apple सेवांच्या सदस्यता, तुम्ही ओनर असलेली Apple ची उत्पादने, तुम्ही डाउनलोड केलेली Apple ॲप आणि तुम्ही कौटुंबिक शेअरिंग गटामध्ये आहात की नाही ह्याविषयीचे तपशील
  • तुम्ही ज्यांच्यासाठी नोटिफिकेशन एनेबल केली ते चॅनेल
  • डिव्हाइस विश्वसनीयता स्कोअर

रिटेंशन

आम्ही Apple News शी संबंधित वैयक्तिक डेटा आमची व्यावसायिक गरज, कंत्राटी आवश्यकता किंवा कायदेशीर आवश्यकतेनुसार राखून ठेवतो. तुम्ही अकाउंट बंद केल्यानंतर किंवा Apple News+ ची सदस्यता रद्द केल्यानंतरही सदस्यता खरेदीची हिस्ट्री सारखी काही माहिती, परंतु तुमच्या संग्रहित केलेल्या कार्डाचे तपशील नाही, व्यावसायिक नोंदी म्हणून राखून ठेवली जाऊ शकते. रिटेन्शन कालावधीचे मूल्यांकन करत असताना, आम्ही सर्वप्रथम संग्रहित केलेला वैयक्तिक डेटा राखून ठेवणे आवश्यक आहे की नाही ह्याचे काळजीपूर्वक परीक्षण करतो आणि तो राखून ठेवणे आवश्यक असल्यास, कायद्याने परवानगी दिलेल्या सर्वात कमी कालावधीसाठी वैयक्तिक डेटाला राखून ठेवण्याचे काम करतो.

Apple ने संकलित केलेली माहिती नेहमी Apple च्या गोपनीयता धोरणानुसार हाताळली जाईल, जे www.apple.com/in/privacy वर मिळू शकते.

2026-03-30