Apple Pay व गोपनीयता

कार्ड संबंधित माहिती, स्थान, डिव्हाइस सेटिंग आणि डिव्हाइस वापर पॅटर्न संबंधित माहिती Apple ला पाठवली जाऊ शकते आणि अकाउंट माहितीसह ह्यांचा वापर Apple Pay सेटअप करण्यासाठी आणि व्यवहारातील फसवणूक टाळण्यासाठी तुमच्या कार्ड जारीकर्त्याला किंवा पेमेंट नेटवर्कला मूल्यांकन प्रदान करण्यासाठी केला जाऊ शकतो.
 

Apple Pay तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहे आणि तुम्ही काय शेअर करता हे निवडण्यासाठी तुम्हाला एनेबल करते.


Privacy Icon

  • जेव्हा तुम्ही Apple Pay मध्ये कार्ड जोडता, तेव्हा कार्डशी संबंधित माहिती, स्थान व डिव्हाइस सेटिंग आणि वापराचे पॅटर्न Apple ला पात्रता निश्चित करण्यासाठी पाठवले जाऊ शकतात.
  • वरीलपैकी काही माहिती, अकाउंट संबंधित माहिती, आणि पेअर केलेल्या डिव्हाइसचा तपशील पात्रता निश्चित करण्यासाठी आणि फसवणूक विरोधी हेतूंसाठी तुमच्या कार्ड जारीकर्त्यासह किंवा बॅंकेसह शेअर केले जाऊ शकतात.
  • तुम्ही ॲपमध्ये आणि वेबवर Apple Pay वापरता तेव्हा, पेमेंट प्रोसेस करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती ॲप किंवा संकेतस्थळासह शेअर केली जाईल. तुमचा वास्तविक कार्ड नंबर मर्चंटसह शेअर केलेला नाही.
  • Apple द्वारे Apple Pay डेटा ज्याचा ह्यापुढे तुमच्याशी संबंध जोडला जाऊ शकणार नाही, तो Apple Pay आणि इतर Apple उत्पादने आणि सेवा सुधारण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
  • Apple Pay ही तंत्रज्ञान सेवा Apple Inc. च्या सहयोगी संस्थांद्वारे प्रदान केली जाते जे तुमच्या वैयक्तिक डेटासाठी जबाबदार असतात.

Apple Pay तुम्हाला स्टोअर, ॲप आणि वेबवर तुमच्या डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड कार्डचा वापर करून सुरक्षित खरेदी करण्याची अनुमती देते.

Apple Pay ही तंत्रज्ञान सेवा Apple Inc. च्या सहयोगी संस्थांद्वारे प्रदान केली जाते जे तुमच्या वैयक्तिक डेटासाठी जबाबदार असतात. तुमच्या स्थानानुसार तुमचा Apple Pay प्रोव्हायडर वेगवेगळा असू शकेल, जसे युनायटेड स्टेट्स मध्ये Apple Payments Services LLC आहे. तुमच्या वैयक्तिक डेटावर प्रक्रिया करण्यासाठी जबाबदार असलेल्या Apple च्या एंटिटीजच्या अधिक माहितीसाठी, apple.com/privacy वर जाऊन Apple चे गोपनीयता धोरण आणि www.apple.com/legal/privacy/en/affiliated-company वर जाऊन Apple शी संलग्न कंपन्यांना भेट द्या.

Apple Pay मध्ये कार्ड समाविष्ट करणे

तुम्ही स्टोअर, क्रेडिट, डेबिट आणि प्रीपेड कार्डांसारखी कार्डे Apple Pay वर जोडता तेव्हा तुम्ही तुमच्या कार्डाबद्दल दिलेली माहिती आणि एनेबल केलेल्या विशिष्ट डिव्हाइस सेटिंग Apple Pay आणि त्याची वैशिष्ट्ये एनेबल करण्यासाठी तुमची पात्रता जाणून घेण्यासाठी Apple कडे पाठवले जाण्याची शक्यता आहे. तुमचे डिव्हाइस फसवणूक ओळखण्यात मदत करण्यासाठी डिव्हाइस वापराच्या पॅटर्नचे (उदाहरणार्थ, डिव्हाइस किती वेळ क्रियाशील होते ह्याची टक्केवारी, दर आठवड्याला कॉलची अंदाजे संख्या) देखील मूल्यमापन करू शकते. तुमच्या डिव्हाइसने मूल्यमापन केलेली माहिती जी कोणत्याही प्रकारे तुमच्याशी जोडली जात असेल ती Apple सोबत शेअर केली जात नाही.

तुमच्या कार्डाचा जारीकर्ता, विशिष्ट Apple Pay फीचरसाठी असलेली तुमची पात्रता जाणून घेण्यासाठी पेमेंट नेटवर्क किंवा तुमच्या कार्डाच्या जारीकर्त्याने ऑथोराईझ केलेले प्रोव्हायडर कार्डाची फीचर आणि फायदे, ते रिवॉर्ड किंवा इन्स्टॉलमेंटला सपोर्ट करते का नाही अशाप्रकारची माहिती Apple सोबत शेअर करेल. Apple कडून त्या संस्थांना Apple Pay एनेबल करण्यास, कार्ड पात्रता ठरवण्यास, Apple Pay सह तुमचे कार्ड सेटअप करण्यास आणि फसवणूक टाळण्यास देखील Apple कडून माहिती दिली जाऊ शकेल, ज्यामध्ये समावेश आहे :

  • तुमच्या क्रेडिट, डेबिट किंवा प्रीपेड कार्डचा नंबर
  • तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित नाव आणि बिलिंग पत्ता
  • तुमच्या Apple अकाउंट ॲक्टिव्हिटीविषयी सामान्य माहिती (उदाहरणार्थ, iTunes मध्ये तुमच्या व्यवहाराची दीर्घ हिस्ट्री आहे की नाही)
  • तुमचे डिव्हाइस, आणि तुम्ही Apple Watch चा वापर करत असल्यास, पेअर केलेल्या iOS डिव्हाइसविषयी माहिती (उदाहरणार्थ, तुमचे Apple Watch आणि पेअर केलेले iOS अशा दोन्ही डिव्हाइससाठी डिव्हाइस आयडेंटिफायर, फोन नंबर, आणि फोन नंबर आणि मॉडेल)
  • तुम्ही तुमचे कार्ड जोडले त्यावेळचे स्थान (तुम्ही स्थान सेवा एनेबल केलेली असल्यास)
  • अकाउंट किंवा पेमेंट कार्ड जोडण्याची डिव्हाइस हिस्ट्री
  • तुम्ही Apple Pay मध्ये जोडलेले किंवा जोडण्याचा प्रयत्न केलेल्या पेमेंट कार्डांवरील माहितीशी संबंधित समुच्चित आकडेवारी

तुम्ही एखाद्या बॅंकिंग ॲपसारख्या थर्ड पार्टी ॲपचा वापर करून Apple Pay वर एखादे कार्ड समाविष्ट करता, तेव्हा ॲप तुमच्या डिव्हाइसवर एखादा अकाउंट किंवा कार्ड आयडेंटिफायर पाठवते. या माहितीचा वापर Apple आणि तुमचा कार्ड जारीकर्ता तुमच्या कार्डाची पात्रता ठरवण्यासाठी, तुमचे कार्ड Apple Pay बरोबर सेटअप करण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी करतो.

इतर डिव्हाइसेसवर, तुमच्याकडे असलेली किंवा अलीकडे होती अशी Apple Pay कार्ड्स सेटअप करण्यात मदत करण्यासाठी, Apple तुमच्या Apple अकाऊंटवर त्या Apple Pay कार्ड्ससाठी असे कार्ड संदर्भ स्टोअर देखील करते जे सुरक्षा कोड प्रविष्ट केल्यावर कार्ड पुन्हा समाविष्ट करण्यासाठी कार्ड जारीकर्त्याकडून किंवा पेमेंट नेटवर्ककडून वापरले जाऊ शकतात. Apple Pay मूळ क्रेडिट, डेबिट, किंवा प्रीपेड कार्ड नंबर संग्रहित करत नाही. जेव्हा तुम्ही नवीन डिव्हाइसवर जाता, तेव्हा फसवणूक टाळण्यासाठी Apple तुमच्या जवळपासच्या iCloud एनेबल केलेल्या डिव्हाइसबद्दलची माहिती संग्रहित करेल. तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित iCloud एनेबल केलेल्या डिव्हाइसेसबद्दलच्या Apple च्या माहितीच्या वर्णनासाठी, www.apple.com/legal/privacy/data/en/apple-id वर ‘Apple अकाउंट व गोपनीयता’ ला भेट द्या.

तुमच्या ‘iCloud कीचेन’ मध्ये स्टोअर केलेली ‘जतन केलेली ऑटोफिल कार्ड्स’ सेटिंग > ‘वॉलेट व Apple Pay’ वर जाऊन आणि ‘Apple Pay सह कार्ड वापरा’ एनेबल करुन Apple Pay मध्ये समाविष्ट केली जाऊ शकतात. Apple Pay ची पात्रता ठरवण्यासाठी, एनेबल केल्यानंतर, तुमचे डिव्हाइस तुमच्या कार्डच्या पेमेंट नेटवर्कसह तुमच्या ‘iCloud कीचेन’ मधून ऑटोफिल कार्ड नंबर्स शेअर करते. अधिक सुरक्षित व्यवहार एनेबल करण्यात मदत करण्यासाठी, पात्र असल्यास तुम्ही तुमचे जतन केलेले ‘ऑटोफिल’ कार्ड्स Apple Pay मध्ये समाविष्ट करणे चालू ठेऊ शकता. एकदा तरतूद केल्यावर, संबंधित Apple Pay पासेसच्या मागे तुमचे जतन केलेले ऑटोफिल कार्ड नंबर्स तुमच्या सोयीसाठी डिस्प्ले केले जातील. तुमचे जतन केलेले ऑटोफिल कार्ड नंबर्स iCloud कीचेन मध्ये स्टोअर केले जातात, हे Apple कडून ॲक्सेस केले जाऊ शकत नाहीत, आणि Apple Pay व्यवहारांसाठी वापरले जात नाहीत.

Apple Pay ने पे करणे

तुम्ही एखादे पेमेंट चालू करता तेव्हा कराचा आणि शिपिंग खर्चाचा हिशेब करण्यासाठी तुमचा पिनकोड, पोस्टल कोड किंवा इतर अशाच प्रकारची माहिती ॲप, संकेतस्थळ किंवा मर्चंटला दिली जाऊ शकेल. तुम्ही एखाद्या थर्ड पार्टी ब्राउझरमध्ये पेमेंट करायला सुरुवात करता तेव्हा ब्राउझर तुमच्या Apple Pay चा सपोर्ट असलेल्या डिव्हाइसवर एक QR कोड किंवा ॲप क्लिप कोड जनरेट करतो. स्कॅन झाल्यावर, Apple ब्राउझर आणि Apple Pay-सपोर्ट करणाऱ्या डिव्हाइस दरम्यान संवाद सुरू करते, ज्याच्या माध्यमातून ब्राउझर आणि डिव्हाइस संबंधित व्यवहार आणि व्यवहारावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेली बिलिंग आणि/किंवा शिपिंगबाबतची माहिती शेअर करतात.

जर ‘हप्त्याने भरा’ किंवा ‘पुरस्कारासह पेमेंट करा या सारखी सुधारलेली Apple Pay ची फीचर एनेबल केली असता, तुम्ही Apple Pay ने खरेदी करणे सुरू केल्यानंतर, Apple तुमच्या वॉलेटवर तुमच्याकडे कोणती कार्डे उपलब्ध आहेत आणि त्या कार्डांचे जारीकर्ता Apple ला प्रदान केलेल्या लाभ आणि फिचर यांच्या आधारावर तुमच्यासाठी कोणते पेमेंट पर्याय उपलब्ध आहेत ते ओळखेल. तुम्ही Apple कडून अतिरिक्त पेमेंट पर्याय दिले जाण्याचे देखील निवडू शकता जे तुमच्यासाठी उपलब्ध असतील आणि ते अद्याप तुमच्या वॉलेटमध्ये उपलब्ध नव्हते. असे करण्यासाठी, Apple तुमच्या मर्चंट आणि रक्कम यासारख्या व्यवहाराविषयी माहितीचा वापर त्या व्यवहारासाठी अतिरिक्त पेमेंट पद्धती उपलब्ध आहेत की नाही हे निश्चित करण्यासाठी करेल. Apple व्यवहाराबद्दल आणि पेमेंट पद्धतीच्या पात्रतेच्या तपासणीबद्दलची माहिती ती तुमच्याशी लिंक होऊ शेल अशा कोणत्याही प्रकारे राखून ठेवली जात नाही. तुम्ही नवीन पेमेंट पद्धतीसाठी अर्ज करणे निवडल्यास, तुमच्या अर्जाची माहिती थेट जारीकर्त्यासह शेअर केली जाईल आणि Apple कडून पाहिली किंवा संग्रहित केली जाणार नाही. तुम्हाला माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यात मदत करण्यासाठी, तुम्ही रिवॉर्डसह पैसे देण्याचे निवडल्यास, तुमच्या सध्याच्या रिवॉर्डची शिल्लक फेच करण्यासाठी आणि ती डिस्प्ले करण्यासाठी, व्यवहारासाठी आकारले जाणारे रिवॉर्ड पॉइंट (किंवा त्याबरोबरीचे) आणि व्यवहारानंतर शिल्लक रिवॉर्डची संख्या Apple तुमच्या कार्ड फीचर आणि लाभांविषयी तसेच व्यवहार मर्चंट आणि रकमेविषयी माहिती वापरू शकेल. तुम्हाला तुमच्या आर्थिक स्वास्थ्यासाठी योग्य इन्स्टॉलमेंट प्लॅन निवडण्यात मदत करण्यासाठी, Apple तुमच्या सहभागी जारीकर्त्यांना मर्चंट आणि रकमेसह माहिती प्रदान करते, ज्याचा वापर ते पात्रतेचे मूल्यमापन करण्यासाठी आणि Apple डिस्प्ले करण्यासाठी इन्स्टॉलमेंटचे पर्यायांची यादी प्रदान करण्यासाठी करतात. Apple Pay ची वर्धित पेमेंट वैशिष्ट्ये ती ज्याप्रकारे तुमच्याशी लिंक करण्यात आली आहेत त्यानुसार प्रदान करण्यासाठी Apple ही प्रक्रिया करण्यात आलेली माहिती राखून ठेवत नाही.

तुम्ही पेमेंट अधिकृत केल्यावर, मर्चंटने विनंती केलेली इतर माहिती देखील प्रदान केली जाते, जसे की डिव्हाइस किंवा मर्चंट विषयक अकाउंट नंबर, तुमचा शिपिंग ॲड्रेस किंवा ईमेल ॲड्रेस. तुम्ही मर्चंटला पेमेंट करण्यासाठी सोशल मीडिया किंवा जनरेटिव्ह AI ॲपसारखे थर्ड पार्टी ॲप किंवा संकेतस्थळ वापरत असल्यास, त्या थर्ड पार्टी ॲप किंवा संकेतस्थळाला मर्चंटने विनंती केलेल्या इतर माहितीचा ॲक्सेस मिळू शकतो. Apple ला ही माहिती फक्त Apple Pay व्यवहार सुलभ करण्यास वापरण्यासाठी आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही Apple Pay चा वापर करता, तेव्हा तुमच्या क्रेडिट, डेबिट, किंवा प्रीपेड कार्डचा नंबर प्रदान केला जात नाही.

सबस्क्रिप्शनसारखे कोणतेही आवर्ती किंवा मर्चंटद्वारे आकारले जाणारे शुल्क तुम्ही अधिकृत केले असल्याची खात्री करण्यासाठी तुम्ही पात्र Apple Pay पेमेंट पद्धती सहभागी होणाऱ्या मर्चंटना देण्याचे निवडता तेव्हा तुमचे जारीकर्ता आणि/किंवा पेमेंट नेटवर्क अशाप्रकारच्या शुल्कासाठी वापरला जाणारा विशिष्ट मर्चंट अकाउंट नंबर मंजूर करेल आणि जनरेट करेल. तुम्ही विशिष्ट कारवाई न करता केवळ त्या विशिष्ट मर्चंटसाठीचा अकाउंट नंबर सहभागी मर्चंटकडून व्यवहार अधिकृत करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. Apple ला कोणते मर्चंट तुमच्या विशिष्ट मर्चंटसाठीच्या अकाउंट नंबरशी संबंधित आहेत हे माहीत असेल, परंतु तुम्ही काय खरेदी केलेत किंवा त्यासाठी किती पैसे दिलेत हे माहीत नसेल. तुम्ही ‘वॉलेट’ मधील विशिष्ट मर्चंटसाठीचे अकाउंट नंबर कार्डवर टॅप करून आणि कार्डाचे तपशील पाहण्यासाठी ‘अधिक’ बटणावर टॅप करू शकता.

विशिष्ट वर्धित फसवणूक प्रतिबंधासह कार्डसाठी, तुम्ही जेव्हा ऑनलाइन किंवा इन ॲप व्यवहार करण्याचा प्रयत्न करता तेव्हा डिव्हाइसवरील फसवणूक प्रतिबंध मूल्यांकने विकसित करण्यासाठी तुम्ही वॉलेटसाठी तुमची स्थान सेवा एनेबल केली असल्यास, डिव्हाइस तुमच्या Apple अकाउंट, डिव्हाइस आणि स्थानाविषयक माहितीचे मूल्यमापन करेल. Apple Pay व्यवहार फसवणूक प्रतिबंध मूल्यांकने विकसित करण्यासाठी, डिव्हाइसवरील फसवणूक प्रतिबंध मूल्यांकनांचे आउटपुट, परंतु अंतर्निहित नसलेला डेटा Apple कडे तुमच्या डिव्हाइस आणि अकाउंटविषयी असलेल्या माहितीसह एकत्रितपणे पाठवण्यात येईल, जो Apple माहीत असतो. व्यवहाराच्या वेळी फसवणूक टाळण्यासाठी, शिपिंग ॲड्रेस आयडेंटिफायर आणि उपलब्ध असल्यास IP ॲड्रेससह ही व्यवहार फसवणूक प्रतिबंध मूल्यांकने तुमच्या पेमेंट नेटवर्कसह एकत्रितपणे शेअर केली जाऊ शकतात. शिपिंग ॲड्रेस आयडेंटिफायर प्रत्येक पेमेंट नेटवर्कनुसार बदलते आणि ते तुमच्या डिव्हाइसवरील विशिष्ट कार्ड वापरून वेगवेगळ्या व्यवहारांसाठी शिपिंग ॲड्रेस एकसारखेच असल्याची पुष्टी करण्यासाठी अशाप्रकारे वापरले जाते की ज्याने अंतर्निहित पत्ते उघड होणार नाहीत. तुम्ही वॉलेटमधील तुमच्या पेमेंट क्रेडेन्शियलच्या मागील बाजूस जाऊन हा वर्धित फसवणूक प्रतिबंध कार्डावर लागू केला आहे की नाही ते तपासून पाहू शकता. फसवणूक प्रतिबंध मूल्यमापन तुमच्या पेमेंट नेटवर्कसह शेअर होण्यापासून टाळण्यासाठी तुम्ही दुसरे एखादे कार्ड सिलेक्ट करू शकता.

जेव्हा तुम्ही एखाद्या ॲपचा वापर करता किंवा Safari वरून संकेतस्थळावर जाता जे Apple Pay चा वापर iOS, watchOS, किंवा macOS मध्ये करतात, तेव्हा ॲप किंवा संकेतस्थळ तुम्ही त्या डिव्हाइसवर Apple Pay एनेबल केले आहे की नाही हे तपासू शकते. iOS डिव्हाइसवर, किंवा Mac वर Safari मध्ये ज्यावर कार्ड जोडले जाऊ शकत नाही अशा एखाद्या संकेतस्थळावर गेल्यावर, संकेतस्थळ एकच Apple अकाउंट वापरून iPhone किंवा Apple वर Apple Pay सेट अप केले आहे की नाही हे तपासू शकते. तुम्ही तुमच्या सेटिंग बदलून Apple Pay एनेबल केलेले आहे की नाही हे तपासण्यापासून संकेतस्थळांना डिसेबल करू शकता. तुमच्या iOS, iPadOS, किंवा visionOS डिव्हाइसवर, सेटिंग > ॲप्स > Safari > ‘ॲडव्हांस्ड’ वर जा आणि बंद करण्यासाठी ‘Apple Pay साठी तपासा’ टॅप करा. तुमच्या Mac वर, Safari > सेटिंग > ‘ॲडव्हांस्ड’ वर जा आणि ‘Apple Pay आणि Apple Card तपासण्यासाठी संकेतस्थळांना अनुमती द्या’ डीसिलेक्ट करा.

Apple अकाउंट पेमेंट पद्धतीचे संरक्षण

तुम्हाला Apple च्या इकोसिस्टीममध्ये तुमच्या पेमेंट पद्धती मॅनेज करण्यात मदत करण्यासाठी, Apple तुमच्या Apple अकाउंटच्या फाइलवर पेमेंट पद्धत म्हणून समाविष्ट करण्यासाठी कोणत्याही Apple Pay पेमेंट पद्धती पात्र आहेत की नाही हे तपासते आणि त्या पेमेंट पद्धती सेटिंग > [तुमचे नाव] > पेमेंट व शिपिंग > पेमेंट पद्धती समाविष्ट करा > ‘पेमेंट पद्धती’ मध्ये डिस्प्ले करते. जेव्हा तुम्ही तुमच्या Apple अकाउंटवरून व्यवहार करता, तेव्हा Apple फाइलवरील कोणत्याही Apple अकाउंट पेमेंट पद्धती Apple Pay साठी योग्य आहेत की नाही हे देखील तपासेल. तसे असल्यास, तुमची पेमेंट माहिती सुरक्षित ठेवण्यात मदत करण्यासाठी, Apple त्या पेमेंट पद्धतीसाठी Apple Pay एनेबल करू शकते. तुम्ही तुमच्या iOS, iPadOS, किंवा visionOS डिव्हाइसवर सेटिंग > [तुमचे नाव] > ‘पेमेंट व शिपिंग’ वर जाऊन तुमची Apple अकाउंट पेमेंट पद्धत कधीही बदलू शकता. तुमच्या Mac वर, सिस्टीम सेटिंग > [तुमचे नाव] > ‘पेमेंट व शिपिंग’ वर जा.

Apple तुमची पेमेंट माहिती संक्रमित करते, परंतु ती संग्रहित करत नाही

तुमची पेमेंटविषयक माहिती ॲप, संकेतस्थळे आणि व्यवसाय चॅटमध्ये सुरक्षितपणे प्रसारित करण्यासाठी Apple कडे एनक्रिप्ट केलेल्या स्वरूपामध्ये पाठवली जाते, जिथे ती संक्षिप्त स्वरुपात डिक्रिप्ट केली जाते आणि विशिष्ट मर्चंट ‘की’ ने पुन्हा एनक्रिप्ट केली जाते, जेणेकरून केवळ मर्चंट, डेव्हलपर किंवा त्यांच्या पेमेंटवर प्रक्रिया करणारे तुमची पेमेंट विषयक माहिती डिक्रिप्ट करू शकतात. Mac वर जेव्हा तुम्ही पेमेंट करता ज्यावर कार्ड समाविष्ट केले जाऊ शकत नाही, तेव्हा Mac आणि अधिकृत डिव्हाइस Apple सर्व्हरमार्फत एनक्रिप्ट केलेल्या चॅनलवरून संवाद साधतात. तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखले जाऊ शकेल अशी ह्यामधील कोणतीही माहिती Apple स्वतःजवळ ठेवत नाही.

Apple Pay तुम्हाला थर्ड पार्टी ब्राउझरमध्ये पेमेंट करण्याची आणि व्यवहार अधिकृत करण्यासाठी Apple Pay ला सपोर्ट करणारे डिव्हाइस वापरण्याची देखील अनुमती देते. हे फीचर वापरत असताना, तुम्हाला तुमचे शिपिंग आणि पेमेंट तपशील अपडेट करण्याची आणि तुमची अधिकृतता प्रदान करण्याची अनुमती देण्यासाठी Apple थर्ड पार्टी ब्राउझर आणि तुमच्या अधिकृत डिव्हाइसमध्ये Apple सर्व्हरद्वारे संवाद चॅनल तयार करेल. तुमची शिपिंग आणि बिलिंगची माहिती आणि तुमच्या खरेदीशी संबंधित कर किंवा शिपिंग शुल्कांसारख्या मर्चंट शुल्कांबाबतची माहिती Apple ला संक्षिप्त स्वरूपामध्ये दिसत राहील. तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखले जाऊ शकेल अशी ह्यामधील कोणतीही माहिती Apple स्वतःजवळ ठेवत नाही.

Apple Pay ऑर्डर ट्रॅकिंग

Apple Pay वरून खरेदी केल्यानंतर तुम्हाला ऑर्डर ट्रॅकिंग प्रदान करण्यासाठी सहभागी होणारा मर्चंट तुमच्या डिव्हाइससाठीची डिव्हाइस मर्यादित ऑर्डर तुमची ऑर्डर ट्रॅक करण्यासाठी वापरण्यासाठी पाठवतो. आणि Apple मर्चंटला त्या मर्चंटसाठी विशिष्ट डिव्हाइस आयडेंटिफायर आणि मर्चंट डिव्हाइसना ऑर्डर अपडेट देऊ शकेल असे Push टोकन प्रदान करते. Apple मर्चंट अपडेट देऊ करते मात्र ऑर्डरबद्दलची माहितीही स्टोअर करत नाही, तसेच किती प्रमाणात, किती वेळा किंवा कोणते मर्चंट ऑर्डरबद्दल अपडेट पाठवतात हेदेखील ट्रॅक करत नाही. ऑर्डर ट्रॅकिंग माहिती ही तुमच्या डिव्हाइसवर स्थानिकरित्या स्टोअर केली जाते आणि ती Apple द्वारे ॲक्सेस करता येणार नाही अशी एनक्रिप्ट केलेली कॉपी सिंक करून सर्व डिव्हाइसवर अप-टू-डेट ठेवली जाते. तुम्ही ‘वॉलेट’ मध्ये ‘अधिक’ बटणावर टॅप करून, त्यानंतर ‘ऑर्डर्स’ वर टॅप करून, ‘विशिष्ट ऑर्डर वर टॅप करुन आणि ‘ऑर्डर मॅनेज करा’ वर टॅप करुन तुमच्या Apple Pay ऑर्डर्स कधीही मॅनेज करू शकता. तुम्ही ‘वॉलेट’ मध्ये ‘अधिक’ बटणावर टॅप करून, त्यानंतर ‘ऑर्डर्स’ वर टॅप करून, ‘विशिष्ट ऑर्डर’ वर टॅप करुन, ‘अधिक’ बटणावर टॅप करुन, त्यानंतर ‘नोटीफिकेशन्स म्यूट करा’ वर टॅप करुन ऑर्डर्सचे नोटीफिकेशन्स देखील मॅनेज करू शकता.

तुम्ही तुमच्या अकाउंटमधून साइन आउट करता तेव्हा तुमचे डिव्हाइस त्याला अपडेट मिळत असलेल्या ऑर्डरविषयी अजूनही मर्यादित माहिती राखून ठेवू शकते. ही माहिती डिव्हाइसच्या यूझरना दिसणार नाही, ती थोड्या वेळासाठी राखून ठेवली जाईल आणि केवळ तुमच्या ऑर्डरच्या माहितीचा अवैध ॲक्सेस थांबवण्यासाठी साइन आउट नंतर डिव्हाइसवर अपडेट पाठवले जाणे थांबवण्यात मदतीसाठी तुमचे डिव्हाइस तिचा वापर करेल.

थर्ड पार्टी ॲपसह अकाउंट ॲक्टिव्हिटी शेअर करणे

तुम्ही तुमचे Apple Card, सेव्हिंग, Apple Cash आणि इतर कनेक्ट केलेले कार्डाच्या अकाउंटचे तपशील तसेच, App Store वरील तुमच्या विश्वासू सहभागी वैयक्तिक वित्तव्यवस्थापन ॲप ह्यासह व्यवहाराची हिस्ट्री शेअर करू शकता. ॲपना ‘वॉलेट’ मध्ये Apple Pay वरून तुमच्या अकाउंटमधील ॲक्टिव्हिटी पाहण्याच्या क्षमतेची विनंती करणे आवश्यक आहे. तुम्ही ह्या ॲपसह शेअर करत असलेल्या डेटावर तुमचे नियंत्रण असते आणि तुम्ही जे शेअर करता त्यामध्ये तुम्ही कोणत्याही वेळी बदल करू शकता. तुम्ही थर्ड पार्टी ॲपसह शेअर करण्यासाठी निवडलेली अकाउंट ॲक्टिव्हिटी ॲपच्या गोपनीयता धोरणानुसार हाताळली जाईल. तुम्ही तुमची अकाउंट ॲक्टिव्हिटी शेअर केल्यावर तुमचे अकाउंटचे तपशील किंवा व्यवहार हिस्ट्री Apple पाहत किंवा स्टोअर करत नाही.

वैयक्तिक डेटा प्रोसेस करण्यासाठी लागू होणारे कायदेशीर आधार

सेवा प्रदान करण्यासाठी आणि आमच्या कायदेशीर जबाबदाऱ्यांचे पालन करण्यासाठी, आवश्यकतेनुसार, सामान्यतः Apple बरोबरच्या तुमच्या कराराच्या कार्यक्षमतेसाठी आम्ही Apple Pay च्या तुमच्या वैयक्तिक डेटावर प्रक्रिया करतो. जिथे संमती उचित कायदेशीर आधार असतो, तिथे आम्ही त्याला लागू होणाऱ्या स्थानिक कायद्यानुसार प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो.

जिथे लागू होणारे कायदे निर्देशित करतात, तिथे आम्ही आमच्या किंवा थर्ड पार्टीच्या कायदेशीर स्वारस्यांच्या उद्देशांसाठी गरजेनुसार वैयक्तिक डेटाच्या पुढील श्रेणी प्रोसेस करतो, ज्यामध्ये पुढील माहितीचा समावेश असतो :

  • तुमचे अकाउंट सक्रिय आहे की नाही यासारखे तुमचे अकाउंट
  • डिव्हाइसचा प्रकार, सॉफ्टवेअर व्हर्जन, आणि डिव्हाइसचा सीरिअल नंबर ह्यासारखे तुमचे डिव्हाइस
  • पासवर डिस्प्ले केलेल्या माहितीसारखा तुमचा पास
  • पास अपडेट करण्यासाठी थर्ड पार्टींनी अधिकृत केलेले यासारखे तुमचे पास जारीकर्ता
  • तुमचा Apple Pay चा वापर, उदाहरणार्थ, तुम्ही समाविष्ट केलेल्या Apple Pay पासची संख्या
  • तुमचे स्थान

या कायदेशीर स्वारस्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे :

  • पास समाविष्ट करणे आणि मॅनेज करणे
  • तुमच्यासाठी आणि इतरांसाठी सेवा सुधारण्यात आणि त्या ऑप्टिमाइझ करण्यात मदत करणे
  • तुमच्याशी सर्वाधिक संबंधित असलेली फीचर शोधून काढण्यात तुमची मदत करणे
  • पात्रता तपासत आहे
  • तुम्ही विनंती केलेल्या सेवा प्रदान करणे
  • तुम्हाला Apple Pay आणि अशी इतर संबंधित Apple उत्पादने, सेवा आणि ऑफरविषयी कम्युनिकेशन्स पाठवणे ज्यामध्ये तुम्हाला स्वारस्य असू शकते
  • फसवणूक आणि इतर नुकसानकारक ॲक्टिव्हिटी टाळणे

इतर माहिती

वॉलेट आणि Apple Pay फीचरची पात्रता जाणून घेण्यासाठी तुम्ही वॉलेटमध्ये एखाद्या कार्डावर टॅप करता तेव्हा Apple, कार्ड जिथे लागू केले गेले तो देश लक्षात घेऊन आणि लागू करणारे फीचरमध्ये सहभागी आहेत का ते लक्षात घेऊन फीचर पात्रता तपासून पाहू शकते.

तुम्ही स्थान सेवा चालू केलेली असेल तर तुम्ही तुमचे डिव्हाइस स्टोअरमध्ये खरेदीसाठी वापरल्याक्षणी तुमच्या डिव्हाइसचे स्थान Apple कडे निनावी पद्धतीने पाठवले जाईल आणि त्याचा वापर Apple Pay ला वॉलेट कार्डच्या व्यवहार हिस्ट्रीमधील व्यवसाय नावांची अचूकता सुधारण्यासाठी केला जाईल आणि Apple Maps, Apple Pay, आणि वॉलेटमध्ये सुधारणा करण्यासाठी कदाचित एकत्रित स्वरूपात राखून ठेवले जाऊ शकेल. तुम्ही तुमच्या iOS, iPadOS, किंवा visionOS डिव्हाइसवर सेटिंग > ‘गोपनीयता व सुरक्षा’ > स्थान सेवा > ‘सिस्टीम सेवा’ वर जाऊन आणि ‘Apple Pay मर्चंट ओळख’ बंद करण्यासाठी टॅप करून Apple Pay ची ही स्थान-आधारित फंक्शनॅलिटी कोणत्याही क्षणी डिसेबल करू शकता. तुमच्या Mac वर, ‘सिस्टीम सेटिंग’ > ‘गोपनीयता व सुरक्षा’ > ‘स्थान सेवा ‘वर जा, नंतर ‘वॉलेट बंद करा’ वर क्लिक करा.

Apple Pay मध्ये सुधारणा करण्यात मदत करण्यासाठी, Apple तुमच्या Apple Pay च्या वापराविषयीची माहिती संकलित करते आणि कोणीही वैयक्तिकरित्या तुम्हाला ओळखू शकणार नाही अशा पद्धतीने ती संग्रहित करते. ह्या माहितीमध्ये तुम्हाला कार्ड यशस्वीरित्या समाविष्ट करण्यासाठी किंवा Apple Pay वापरून व्यवहार करण्यासाठी लागणारा वेळ यांचा समावेश असतो. तुम्ही गेल्या आठवड्यात Apple Pay वरून खरेदी केली होती का, अशाप्रकारच्या माहितीसह तुम्ही Apple Pay वर सक्रियपणे व्यवहार करता की नाही हे दर्शविणारे सिग्नलही Apple कडे राखून ठेवलेले असतात. हे सिग्नल तुमच्या डिव्हाइसवर मोजले जातात आणि खरेदी किंवा ॲक्टिव्हिटीची माहिती Apple सह शेअर करण्याची आवश्यकता नसते. Apple ही माहिती Apple ची इतर उत्पादने आणि सेवा सुधारण्यासाठी, मार्केटिंगसाठी आणि फसवणूक टाळणे आणि सुरक्षिततेच्या उद्देशाने वापरू शकते.

तुमच्या कार्डचा वापर आणि Apple Pay शी संबंधित त्याचा वापर यांवर यापुढे देखील कोणत्याही कार्डधारक, यूझर, मर्चंट करार किंवा Apple Pay ची फीचर वापरण्यासाठी लागू असलेल्या इतर अटी आणि शर्ती नियंत्रण ठेवतील आणि अशा अटींमध्ये अतिरिक्त गोपनीयता धोरणांचा समावेश असू शकेल. Apple किंवा Apple Pay देऊ करणाऱ्यांशी संलग्न असलेले हे बॅंक नाहीत आणि ही सूचना तुम्हाला तुमच्या बॅंकेकडून प्राप्त होणाऱ्या कोणत्याही सूचनांव्यतिरिक्त आहे. Apple Pay च्या वापराशी संबंधित फसवणूक घडत असल्याची Apple ला शंका असल्यास, फसवणुकीची शक्यता असलेले Apple अकाउंट आणि व्यवहार तुमच्या कार्ड जारीकर्त्याशी किंवा पेमेंट नेटवर्क प्रोव्हायडरशी फसवणुकीला प्रतिबंध करण्यासाठी शेअर केले जाऊ शकतात.

ह्या सूचनेमध्ये वर्णन केल्याप्रमाणे आणि Apple च्या गोपनीयता धोरणानुसार किंवा कायद्याने आवश्यक असेल त्यासह, Apple द्वारे ज्या उद्देशांसाठी डेटा संकलित केला गेला होता त्या उद्देशांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक कालावधीपुरताच वैयक्तिक डेटा राखून ठेवला जातो. राखून ठेवण्याच्या कालावधीचे मूल्यमापन करत असताना, संकलित केलेला वैयक्तिक डेटा राखून ठेवणे खरेच आवश्यक आहे का ह्याची आम्ही काळजीपूर्वक तपासणी करतो आणि जर राखून ठेवणे आवश्यक असेल तर कायद्याने परवानगी असेल इतक्या संक्षिप्त कालावधीसाठी वैयक्तिक डेटा राखून ठेवण्याच्या दृष्टीने काम करतो.

Apple ने संकलित केलेली माहिती नेहमी Apple च्या गोपनीयता धोरणानुसार हाताळली जाईल, जे www.apple.com/in/privacy वर मिळू शकते.

2025-12-12