Apple संशोधन ॲप व गोपनीयता
Apple संशोधन ॲप तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहे आणि तुम्ही काय शेअर करता हे निवडण्यासाठी तुम्हाला एनेबल करते.
![]()
- तुमच्या iOS डिव्हाइस वरील पासकोड तुमच्याकडे असल्यास, Apple संशोधन ॲपने संकलित केलेली किंवा ॲक्सेस केलेली कोणतीही माहिती एनक्रिप्ट केलेल्या स्वरुपात संग्रहित केली जाते. संशोधन डेटामध्ये तुमची संपर्क माहिती, लोकसंख्याशास्त्रीय माहिती, आरोग्याची माहिती, तुमच्या Apple संशोधन ॲप वापराविषयीची माहिती व iOS आणि watchOS डिव्हाइसमधील सेन्सर आणि वापरलेल्या डेटाचा समावेश असू शकतो.
- Apple संशोधन ॲप मधील माहिती तुम्ही त्या अभ्यासासाठी संमतीपत्रावर स्वाक्षरी करुन त्या अभ्यासात जॉइन झाल्यांनतर आणि Apple Research ॲपमध्ये ज्या माहितीचा अभ्यास संकलित किंवा ॲक्सेस करू शकतो ती माहिती अधिकृत केल्यानंतरच शेअर केली जाईल.
- अभ्यासाचा भाग म्हणून तुम्ही तुमची माहिती Apple सह शेयर करण्याचा पर्याय निवडल्यास, Apple द्वारे मॅनेज केलेल्या सर्व्हरवर ट्रान्सफर आणि स्टोअर केल्यानंतर तुमची माहिती एनक्रिप्ट केली जाईल. Apple संशोधन ॲपद्वारे संकलित केलेली कोणतीही माहिती (जसे की तुमचे नाव, ईमेल ॲड्रेस, आणि फोन नंबर) तुम्हाला थेट ओळखू शकणारी कोणतीही माहिती Apple वाचू शकणार नाही.
- तुम्ही तुमच्याकडून एनरोल केलेल्या प्रत्येक अभ्यासासाठी तुमच्या माहितीचे संकलन आणि वापर मॅनेज करू शकता, आणि तुम्ही कोणत्याही क्षणी अभ्यासासह डेटा शेअर करणे थांबवू शकता.
Apple संशोधन ॲप तुम्हाला iOS, watchOS आणि इतर डिव्हाइसकडून संकलित केलेली काही माहिती शेअर करण्याची अनुमती देऊन तुम्हाला तुमच्या iPhone चा वापर करून Apple संशोधन अभ्यासात शोध घेणे, नावनोंदणी करणे आणि सहभागी होण्याची अनुमती देते.
तुम्ही नावनोंदणी केलेल्या प्रत्येक अभ्यासासाठी वैयक्तिक डेटासह तुमच्या माहितीचे संकलन आणि वापर मॅनेज करू शकता. तुमच्या iOS डिव्हाइस वरील पासकोड तुमच्याकडे असल्यास, Apple संशोधन ॲपने संकलित केलेली किंवा ॲक्सेस केलेली कोणतीही माहिती एनक्रिप्ट केलेल्या स्वरुपात संग्रहित केली जाते.
Apple संशोधन ॲप मधील माहिती तुम्ही त्या अभ्यासासाठी संमतीपत्रावर स्वाक्षरी करुन त्या अभ्यासात जॉइन झाल्यांनतर आणि Apple Research ॲपमध्ये ज्या माहितीचा अभ्यास संकलित किंवा ॲक्सेस करू शकतो ती माहिती अधिकृत केल्यानंतरच शेअर केली जाईल. अभ्यासाचा भाग म्हणून तुम्ही तुमची माहिती Apple सह शेयर करण्याचा पर्याय निवडल्यास, Apple द्वारे मॅनेज केलेल्या सर्व्हरवर ट्रान्सफर आणि स्टोअर केल्यानंतर तुमची माहिती एनक्रिप्ट केली जाईल. Apple संशोधन ॲपद्वारे संकलित केलेली (तुमचे नाव, ईमेल ॲड्रेस, आणि फोन नंबर यासारखी) तुम्हाला थेट ओळखू शकणारी कोणतीही माहिती Apple वाचू शकणार नाही.
Apple संशोधन ॲपने संकलित केलेल्या किंवा ॲक्सेस केलेल्या संशोधन डेटामध्ये पुढील माहितीचा समावेश असू शकतो :
- संशोधन प्रोफाइल माहिती : तुमच्या पहिल्या अभ्यासामध्ये नोंदणी करताना, Apple संशोधन ॲपमध्ये प्रोफाइल तयार करण्यासाठी तुम्हाला काही माहिती प्रदान करण्यासाठी सांगितले जाईल, ज्यामध्ये तुमचे नाव, ईमेल ॲड्रेस, फोन नंबर आणि जन्मदिनांक ह्यासारखी माहिती समाविष्ट असते. तुम्हाला Apple संशोधन ॲपच्या कोणत्याही अभ्यासामध्ये सहभागी होण्याआधी ह्या प्रोफाइलवर माहिती प्रदान करावी लागेल. तुम्ही काही अभ्यासांसाठी पात्र आहात की नाही हे निश्चित करण्यासाठी तुमच्या प्रोफाइल माहितीचा वापर केला जाऊ शकतो. पात्रतेच्या हेतूने तुमच्या प्रोफाइल माहितीची प्रक्रिया डिव्हाइसवर केली जाते. Apple कडे तुमची संपर्क माहिती किंवा तुमचा पूर्ण जन्म दिनांक ह्यांचा ॲक्सेस राहणार नाही.
- लोकसंख्याशास्त्रीय माहिती : तुम्हाला लिंग आणि वांशिकता ह्यासारखी काही लोकसंख्याशास्त्रीय माहिती प्रदान करण्यासाठी सांगितले जाऊ शकते. अभ्यासामध्ये सहभागी होण्याआधी तुम्हाला कोणतीही लोकसंख्याशास्त्रीय माहिती प्रदान करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही काही अभ्यासांसाठी पात्र आहात की नाही हे निश्चित करण्यासाठी तुमच्या लोकसंख्याशास्त्रीय माहितीचा वापर केला जाऊ शकतो. पात्रतेच्या हेतूने तुमच्या लोकसंख्याशास्त्रीय माहितीची प्रक्रिया डिव्हाइसवर केली जाते.
- माझी आरोग्य माहिती : तुमच्या आरोग्य ॲपमध्ये माहिती असल्यास, तुम्ही काही विशिष्ट निरीक्षणांसह ही माहिती शेअर करणे निवडू शकता. ह्या माहितीमध्ये तुमच्या आरोग्य नोंदी, ॲक्टिव्हिटी, शरीराचे मोजमाप, जीवनावश्यक, औषधे, मानसिक स्वास्थ्य, गतिशीलता, पोषण, झोप, श्वसनसंबंधी, लक्षणे ह्यासारखी माहिती आणि ऋतुचक कालावधी आणि त्याच्याशी संबंधित लक्षणे ह्यासारखी प्रजनन संबंधित माहिती ह्यांचा समावेश असू शकतो. तुम्ही सर्वेक्षण आणि कार्यांमार्फत क्लेमची माहिती आणि आरोग्याशी संबंधित इतर माहिती शेअर करणे देखील निवडू शकता.
- Apple संशोधन ॲप वापर माहिती : ही Apple संशोधन ॲप त्यामध्ये विशिष्ट अभ्यासांचा तुमचा वापर आणि आतंरक्रियांशी संबंधित माहिती असते. उदाहरणार्थ, ह्यामध्ये दिलेल्या अभ्यासामध्ये नोंदणी केल्यावर, तुम्हाला प्राप्त होणारे अभ्यासासंबंधित नोटिफिकेशन आणि तुम्ही ह्या नोटिफिकेशनवर दिलेला प्रतिसाद ह्यांची माहिती; तुम्ही सुरू केलेल्या आणि पूर्ण केलेल्या अभ्यासासंबंधित कार्यांची संख्या; संशोधन ॲपवरून पाठवल्या जाणाऱ्या डेटाचे प्रमाण आणि त्याचा कालावधी; तुम्ही संशोधन ॲप कसे लॉन्च करता; आणि संशोधन ॲपच्या फंक्शनिंग संबंधित माहिती समाविष्ट असू शकते.
- सेन्सर व यूसेज डेटा : ही सेन्सर आणि डिव्हाइस वापर माहिती केवळ काही विशेष आवश्यकता पूर्ण करणाऱ्या संशोधन अभ्यासांसाठी उपलब्ध असते, ज्यामध्ये संशोधन एथिक्स कमिटीने रिव्ह्यू केलेले अभ्यास देखील समाविष्ट असतात. तुम्ही जॉइन केलेल्या प्रत्येक अभ्यासासह शेअर करत असलेला ‘सेन्सर व यूसेज डेटा’ तुम्ही नियंत्रित करू शकता आणि तुम्ही कोणत्याही अभ्यासासह हा डेटा शेअर करणे कोणत्याही क्षणी थांबवू शकता. सेटिंग > गोपनीयता व सुरक्षा > ‘संशोधन सेन्सर व यूसेज डेटा’ ह्याविषयी अधिक जाणून घ्या.
- इतर डेटा प्रकार : Apple संशोधन ॲपमधील काही अभ्यास, ऑडिओ किंवा व्हिडिओ किंवा Apple संशोधन ॲपकडून केल्या गेलेल्या चाचण्या किंवा सर्व्हे आणि कार्यांमधून उत्पन्न केलेली माहिती ह्यासारखे अतिरिक्त डेटा प्रकार संकलित किंवा ॲक्सेस करू शकतात. प्रत्येक अभ्यास समहतीमध्ये लागू होण्यायोग्य डेटा ह्यासारखा संग्रह, वापर, आणि शेअरिंगचे वर्णन केले जाते.
तुमच्या डेटा टॅबवर जाऊन आणि ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करुन तुम्ही Apple संशोधन ॲपमधून संकलित केलेला किंवा ॲक्सेस केलेला कोणताही डेटा Apple संशोधन ॲपमध्ये कोणत्याही अभ्यासासह कोणत्याही क्षणी शेअर करणे थांबवू शकता.
तुम्ही कोणत्याही क्षणी कोणत्याही अभ्यासामध्ये सहभागी होणे देखील थांबवू शकता. तुम्ही अभ्यास टॅबमध्ये जाऊन संबंधित अभ्यास सिलेक्ट करून, आणि ‘ह्या अभ्यासातून बाहेर पडा’ वर टॅप करून Apple संशोधन ॲपमध्ये चालू असलेल्या कोणत्याही अभ्यासामधून बाहेर पडू शकता. Apple संशोधन ॲप हटवल्याने किंवा ऑफलोड केल्याने केवळ डेटा संकलन आणि शेअर करणे पॉज केले जाते — तुम्हाला कोणत्याही अभ्यापासून बाहेर काढले जात नाही. विशिष्ट रिटेन्शन धोरणे आणि संमती मागे घेण्यासाठी तुमच्याकडून घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचे वर्णन प्रत्येक अभ्यासाच्या ‘सूचित सहमती’ मध्ये केले जाईल.
तुमच्या Apple संशोधन ॲपमध्ये संग्रहित केलेल्या माहितीने तुमची संपूर्ण वैद्यकीय हिस्ट्री दिसणार नाही आणि तिला तुमच्या अधिकृत आरोग्य नोंदींसाठी किंवा कोणत्याही व्यावसायिक वैद्यकीय निदानासाठी वापरले जाऊ नये. तुम्ही तुमच्या आरोग्याशी संबंधित कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. तुमच्या Apple संशोधन ॲपमध्ये संग्रहित केलेल्या माहितीने तुमच्या पूर्ण अभ्यास नोंदींवर देखील परिणाम होणार नाही. तुम्हाला तुमच्या अभ्यास नोंदींविषयी काही प्रश्न असल्यास, तुम्ही तुमच्या प्रत्येक अभ्यासाच्या सहमतीमध्ये यादी केलेल्या संपर्कांकडून सल्ला घ्यायला पाहिजे.
तुमच्या ‘Apple संशोधन ॲप’ च्या वापरातून किंवा ‘Apple संशोधन ॲप’ च्या माध्यमातून एनेबल केलेल्या कोणत्याही फीचरमधून Apple ने संकलित केलेली कोणतीही माहिती Apple आरोग्य अभ्यास ॲप गोपनीयता धोरणानुसार हाताळली जाईल, जे www.apple.com/legal/privacy/apple-health-studies वर मिळू शकते.
2025-12-12