Apple TV ॲप व गोपनीयता
Apple TV ॲप तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहे आणि तुम्ही काय शेअर करता हे निवडण्यासाठी तुम्हाला एनेबल करते.
![]()
- Apple TV ॲप तुमच्या आवडीचे टिव्ही कार्यक्रम आणि चित्रपटांना एका जागी ठेवते आणि तुम्हाला त्यांच्या शिफारशी देखील करते ज्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता.
- Apple तुमच्या खरेदी, डाउनलोड, Apple TV ॲपमधील ॲक्टिव्हिटी, तुम्ही पाहत असलेला कॉण्टेण्ट, आणि Apple TV ॲपमध्ये आणि तुमच्या सपोर्ट केलेल्या डिव्हाइसमधील कनेक्ट केलेल्या ॲपमध्ये तुम्ही तो कॉण्टेण्ट कुठे पाहता ह्यासारखी माहिती संकलित करते. आम्ही ही माहिती सेवा प्रदान करण्यासाठी आणि तुमच्यासाठी आणि इतरांसाठी Apple TV ॲप सुधारण्यासाठी वापरतो.
- तुमच्या गरजेनुसार फीचर तयार करण्यासाठी आणि वैयक्तिकृत शिफारसी प्रदान करण्यासाठी आणि तुम्हाला नोटिफिकेशन पाठवण्यासाठी, आम्ही तुमच्या खरेदी, डाउनलोड, Apple TV ॲपमधील ॲक्टिव्हिटी, तुम्ही पाहत असलेला कॉण्टेण्ट आणि तुम्ही तो कुठे पाहता ह्यासारखी माहिती संकलित करतो. खाली वर्णन केल्याप्रमाणे, तुम्ही ह्या उद्देशासाठी डेटा वापरण्याची निवड रद्द करू शकता.
- App Store मधील जाहिराती, Apple News, आणि ‘स्टॉक’, जेथे उपलब्ध आहेत, हे तुमच्याशी संबंधित आहेत ह्याची खात्री करण्यासाठी जाहिराती प्रदान करण्यासाठी, आम्ही तुम्ही खरेदी आणि डाउनलोड केलेले चित्रपट आणि TV शो ह्याबद्दलची माहिती देखील वापरतो. खाली वर्णन केल्याप्रमाणे, तुमच्याकडे ह्या जाहिरातीच्या संदर्भात पर्याय आहेत.
- ओळखण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यात मदतीसाठी, तुमचे फोन कॉल किंवा तुम्ही पाठवलेल्या आणि प्राप्त केलेल्या ईमेलच्या अंदाजे संख्येच्या माहितीसह तुम्ही तुमच्या डिव्हाइसचा वापर कसा करता, ह्या माहितीचा वापर तुम्ही खरेदी करण्याचा प्रयत्न करत असताना डिव्हाइस विश्वसनीयता स्कोअरची गणना करण्यासाठी केला जाईल. ‘सबमिशन’ अशा रितीने डिझाइन करण्यात आलेली आहेत की Apple तुमच्या डिव्हाइसवरील मूळ मूल्यांना जाणून घेऊ शकत नाही. स्कोअर आपल्या सर्व्हरवर एका निश्चित वेळेसाठी स्टोअर केले जातात.
Apple TV ॲपमुळे तुम्हाला तुमच्या आवडीचे टिव्ही शोज आणि चित्रपट एकाच ठिकाणी पाहता येतात. तुम्ही Apple कडून भाड्याने घेतलेला किंवा खरेदी केलेला कॉण्टेण्ट पाहू शकता. उपलब्ध असल्यास, तुम्ही Apple TV सदस्यता, Apple TV चॅनल्स आणि तुमच्या कनेक्ट केलेल्या थर्ड पार्टी व्हिडिओ ॲप्सद्वारे कॉण्टेण्ट ॲक्सेस करू शकता. तुम्ही हा सर्व कॉण्टेण्ट एकाच Apple TV मध्ये साइन इन केलेल्या, समर्थन असणाऱ्या व्हिडिओ ॲपवरून ॲक्सेस करू शकता.
Apple TV ॲप प्रदान करणे
Apple TV ॲपमध्ये सेवा आणि फीचर प्रदान करण्यासाठी आम्ही तुमचा वैयक्तिक डेटा वापरतो. ह्या माहितीमध्ये तुमचे अकाउंट आणि पेमेंटच्या माहितीचा समावेश आहे, जी तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन ॲक्सेस करू शकता आणि बदलू शकता.
Apple एकाच Apple अकाउंटवर साइन इन केलेल्या आणि सपोर्ट असणाऱ्या कोणत्याही डिव्हाइसवर Apple TV ॲपमध्ये तुम्ही काय खरेदी करता आणि काय बघत आहात ह्याविषयीची माहिती संग्रहित करते. Apple तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित केलेली माहिती संग्रहित करते, जेणेकरून तुम्ही तुमच्या सर्व सपोर्ट केलेल्या डिव्हाइसवर काय बघत आहात हे आम्ही दाखवू शकू. तुम्ही थर्ड पार्टी ॲपमध्ये साइन इन केल्यावर, तुम्ही त्या सेवांची सदस्यता घेतले आहे की नाही ह्या माहितीचा वापर तुमच्यासाठी उपलब्ध असलेला कॉण्टेण्ट दाखवण्यासाठी केला जातो. तुम्ही थर्ड पार्टी ॲपला Apple TV ॲपशी कनेक्ट होण्याची परवानगी दिल्यास, तुमच्या सदस्यतेच्या स्टेटससह तुम्ही तुमच्या सपोर्ट असणाऱ्या कोणत्याही डिव्हाइसवर त्या ॲपमध्ये काय पाहता ह्याविषयी माहिती Apple संकलित करेल आणि संग्रहित करेल. Apple Music आणि ‘रिमोट’ सारखे सपोर्ट असलेला कॉण्टेण्ट असणारी Apple ॲप्स तुम्ही Apple TV ॲप वापरणे सुरू केल्यावर ऑटोमॅटिकली कनेक्ट होतील.
तुम्ही काय बघत आहात याविषयीच्या माहितीमध्ये तुम्ही कोणता कॉण्टेण्ट प्ले करत आहात, तुम्ही तो कधी प्ले केला, कोणत्या डिव्हाइसवर प्ले केला आणि कॉण्टेण्ट कुठे पॉज केला किंवा कुठे बघणे थांबवले यांचा समावेश असतो. आम्ही Apple TV चॅनल्स आणि तुमच्या Apple TV सदस्यतेच्या सर्व प्लेबॅक ॲक्टिव्हिटीची तपशीलवार हिस्ट्री देखील गोळा करतो.
तुम्ही Apple TV ॲपला तुमचे स्थान ॲक्सेस करण्याची अनुमती दिल्यास लाइव्ह स्पोर्ट्स, इव्हेंट्स आणि बातम्यांसारख्या स्थानिक कॉण्टेण्टच्या समावेशासह ब्राउझ करण्यासाठी किंवा पाहण्यासाठी तुमच्या प्रदेशात काय उपलब्ध आहे हे ठरवण्यासाठी तुमच्या स्थानाचा वापर केला जाईल. काही कॉण्टेंटमध्ये भौगोलिकदृष्ट्या संबंधित जाहिरातींचा समावेश असतो. तुम्ही सिलेक्ट केलेला कॉण्टेण्ट प्ले करण्यासाठी आपल्याकडे आवश्यक परवाना अधिकार आहेत ह्याची खात्री करण्यासाठी तुम्ही ज्या देशातून किंवा प्रदेशातून सेवा ॲक्सेस करत आहात ते ठरवण्यासाठी Apple तुमच्या इंटरनेट कनेक्शनच्या IP ॲड्रेसचा स्वतंत्रपणे वापर करू शकते. हे निश्चित झाल्यानंतर आम्ही IP ॲड्रेस आणि IP ॲड्रेसवरून मिळवलेली कोणतीही स्थान माहिती काढून टाकतो.
Apple TV ॲपमध्ये सुधारणा करणे
Apple तुमच्या Apple TV ॲप आणि अकाउंटच्या वापराविषयी माहिती संकलित करते, ज्यामध्ये तुम्ही वापरत असलेले फीचर (उदाहरणार्थ, ‘बॅगने चालू ठेवा’ किंवा लायब्ररी), तुम्ही सर्च केलेले आयटम, नोटिफिकेशनसह तुमचे संभाषण, तुम्ही ब्राउझ केलेली किंवा बघितलेली कॉण्टेण्ट पृष्ठे, ॲपमधील त्रुटी किंवा क्रॅश आणि तुमचा बिलिंग झिप कोड ह्यांचा समावेश असतो. तुम्हाला ओळखू शकणार नाही अशी अंदाजे स्थान माहिती आणि तुम्ही काय बघता ह्याविषयीची ही माहिती आम्ही तुमच्यासाठी आणि इतरांसाठी सेवेमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि ती ऑप्टिमाइझ करण्यासाठी वापरतो. आम्ही डिव्हाइसचा प्रकार, तुमचे डिव्हाइस ज्या चॅनलच्या माध्यमातून प्राप्त केले गेले होते ते चॅनल, तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमचे व्हर्जन, तुमच्या डिव्हाइवरील फ्री स्पेसचे प्रमाण ह्यासारखी तुमच्या डिव्हाइसची माहिती देखील संकलित करतो. विनंती केलेला कॉण्टेण्ट डाउनलोड केला जाऊ शकतो की नाही ह्याचे मूल्यमापन करण्यासाठी, डिव्हाइसचा वापर आणि स्टोरेजसंबंधी सामान्य कल समजून घेण्यासाठी, आणि तुमचे डिव्हाइस Wi-Fi किंवा मोबाइल डेटाला कनेक्ट केलेले आहे की नाही हे समजून घेण्यासाठी आम्ही ही माहिती वापरू शकतो. उदाहरणार्थ, तुमच्या डिव्हाइसची फ्री स्पेस जाणून घेतल्याने आम्हाला असे फीचर तयार करण्यात मदत मिळते ज्याचा वापर करुन तुम्ही ‘खरेदी’ मध्ये डाउनलोड न करता तुमच्या iPhone वर चित्रपट खरेदी करू शकता. तुम्ही इतर यूझरबरोबर कॉण्टेण्ट पाहण्यासाठी ‘SharePlay’ वापरत असल्यास, Apple TV ॲप तुम्ही एखाद्या ‘SharePlay’ सेशन दरम्यान तो कॉण्टेण्ट पाहिला आणि सेशनमध्ये सहभागी झालेल्या डिव्हाइसची संख्या ह्याविषयी माहिती संकलित करेल, मात्र ‘SharePlay’ सेशनमध्ये सहभागी झालेल्यांना ओळखण्यासाठी कोणतीही माहिती संकलित करणार नाही.
Apple TV ला समर्थन देणारी मॉडल सुधारण्यासाठी आम्ही Apple TV सर्च डेटा वापरतो. उदाहरणार्थ, एकत्रित केलेल्या Apple TV सर्च क्वेरीचा वापर Apple TV सर्च मॉडेलला अधिक चांगले करण्यासाठी केला जातो.
Apple TV ॲप वैयक्तिकृत करणे
तुमच्यासाठी सर्वाधिक संबंधित असलेला कॉण्टेण्ट शोधण्यात मदत करण्यासाठी आम्ही Apple TV ॲप वैयक्तिकृत करतो. उदाहरणार्थ, तुम्ही ह्यापूर्वी पाहिलेल्या चित्रपटांच्या आधारावर आम्ही तुम्हाला तुमच्या स्वरस्यानुसार चित्रपटांची शिफारस करू, आणि आम्ही तुम्हाला तुमच्या Apple TV ॲपमधील ॲक्टिव्हिटीच्या आधारावर अधिक संबंधित ‘सर्च परिणाम’ प्रदान करू. वैयक्तिकीकरण प्रदान करण्यासाठी, आम्ही Apple TV ॲपमधील तुम्ही काय बघता, तुमची खरेदी, सदस्यता, डाउनलोड्स, सर्चेस, ब्राउझिंग आणि इतर ॲक्टिव्हिटीसह माहितीचा, तसेच तुमच्या अकाउंटकडून तुमच्या वयासारख्या माहितीचा वापर करतो.
Apple TV ॲपला सपोर्ट करणाऱ्या सर्व डिव्हाइसेसवर वैयक्तिकरण प्रदान करण्यासाठी Apple ने तुम्ही या डिव्हाइसवर Apple TV ॲपमध्ये जे बघता त्याविषयीच्या माहितीचा वापर करू नये असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही ‘सेटिंग’ मध्ये जाऊन ‘प्ले हिस्ट्री वापरा’ बंद करू शकता. तुमच्या iOS, iPadOS, visionOS किंवा tvOS डिव्हाइसवर, सेटिंग > ॲप > TV > ‘प्ले हिस्ट्री वापरा’ वर जा. Mac वरील Apple TV ॲपमध्ये, व्हिडिओ > सेटिंग > प्लेबॅक वर जा, त्यानंतर ‘बघण्याची हिस्ट्री वापरा’ डीसिलेक्ट करा.
तुमच्या Apple अकाउंटसाठी ‘वैयक्तिकृत शिफारसी’ बंद करून तुम्ही App Store, Apple Books, iTunes Store, Apple TV, Apple Podcasts, आणि Apple च्या सदस्यतांसाठी वैयक्तिकरण फीचर बंद करू शकता. तुमच्या iOS, iPadOS, किंवा visionOS डिव्हाइसवर, सेटिंग > [तुमचे नाव] > मीडिया व खरेदी > ‘अकाउंट बघा’ वर जा, त्यानंतर वैयक्तिकृत शिफारसी बंद करण्यासाठी टॅप करा.
तुमच्याशी संवाद साधणे
तुमच्याकडे असलेली Apple उत्पादने, तुमच्या Apple सेवांच्या सदस्यता आणि तुम्ही डाउनलोड केलेले Apple ॲप आणि तुमचा बिलिंगचा झिप कोड ह्यासारख्या तुमच्या अकाउंटशी संबंधित माहितीचा वापर Apple One च्या समावेशासह Apple TV ॲप आणि इतर Apple उत्पादने, सेवा, आणि तुम्हाला आवड असू शकेल अशा ऑफर ह्याविषयी कम्युनिकेशन्स करण्यासाठी Apple कडून केला जाऊ शकतो. तुमच्या डिव्हाइसच्या सीरिअल नंबरसारखे तुमच्या डिव्हाइसचे तपशील किंवा तुमच्या संबंधित App Store सदस्यतेविषयीचे तपशील ह्यांचा वापर Apple च्या ऑफरसाठी पात्रता तपासण्यासाठी केला जाऊ शकतो. तुम्ही कौटुंबिक शेअरिंग गटात असल्यास, Apple तुम्हाला कौटुंबिक शेअरिंगमार्फत उत्पादने, सेवा आणि तुम्हाला उपलब्ध असलेल्या ऑफरविषयी कम्युनिकेशन करू शकते. तुम्ही Apple One ची सदस्यता खरेदी केली असल्यास, तुम्ही सदस्यता घेतलेल्या त्या प्रत्येक सेवांच्या फीचरविषयी आम्ही कदाचित तुम्हाला ईमेल आणि Push नोटिफिकेशन पाठवू. Apple TV ॲपमध्ये उपलब्ध असलेली नवीन फीचर्स, कॉण्टेण्ट आणि ऑफर्सविषयी ईमेल्स आणि नोटिफिकेशन्स पाठवण्यासाठी Apple कडून Apple TV ॲपमधील तुमच्या ॲक्टिव्हिटीच्या माहितीचा वापर केला जाऊ शकतो. तुम्ही account.apple.com वर जाऊन तुमची ईमेल प्राधान्ये बदलू शकता आणि हे ईमेल प्राप्त करणे बंद करू शकता. तुमच्या iOS, iPadOS, किंवा visionOS डिव्हाइसवर नोटिफिकेशन प्राधान्ये अपडेट करण्यासाठी सेटिंग > नोटिफिकेशन > TV वर जा.
जाहिरात
Apple TV ॲपमध्ये, तुम्ही Apple TV ॲपला तुमचे स्थान ॲक्सेस करण्याची अनुमती दिल्यास, तुमच्या स्थानाचा वापर भौगोलिकदृष्ट्या संबंधित जाहिराती दाखवण्यासाठी केला जाऊ शकतो.
App Store, Apple News आणि ‘स्टॉक’ सारख्या इतर ॲपसाठी, वैयक्तिकृत जाहिरात सेटिंग सुरू केली असल्यास, Apple चा जाहिरात प्लॅटफॉर्म तुम्ही Apple कडून कोणते चित्रपट आणि टिव्ही कार्यक्रम खरेदी करता याविषयी माहितीच्या समावेशासह तुमच्या माहितीचा वापर ह्या ॲपमध्ये अशा जाहिराती दाखवण्यासाठी करू शकतो ज्या तुमच्याशी अधिक संबंधित आहेत.
तुम्हाला Apple च्या जाहिरात प्लॅटफॉर्मवरून तुमच्या आवडींसाठी लक्ष्यित जाहिराती प्राप्त करायच्या नसल्यास, तुम्ही ‘वैयक्तिकृत जाहिराती’ बंद करण्याचा पर्याय निवडू शकता. वैयक्तिकृत जाहिराती बंद केल्याने Apple ला जाहिरात लक्ष्यीकरणासाठी तुमची माहिती वापरण्यापासून प्रतिबंधित केले जाईल. ह्यामुळे तुम्हाला प्राप्त होणाऱ्या जाहिरातींची संख्या कमी होणार नाही, परंतु त्या जाहिराती तुमच्याशी कमी संबंधित असू शकतात.
सेटिंग > गोपनीयता व सुरक्षा > Apple जाहिरातवर जाऊन तुम्ही तुमच्या वैयक्तिकृत जाहिरात सेटिंग बदलू शकता.
Apple जाहिराती आणि गोपनीयता याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी www.apple.com/in/legal/privacy/data/en/apple-advertising पहा.
App Store, Apple News आणि ‘स्टॉक’ वर वैयक्तिकृत जाहिराती बंद करण्याचा पर्याय कसा निवडायचा याबद्दल जाणून घेण्यासाठी support.apple.com/105131 पहा.
भागीदारांच्या माध्यमातून Apple TV सदस्यता
जर तुमचा मोबाइल नेटवर्क प्रोव्हायडर Apple TV सदस्यता किंवा विनामूल्य ट्रायल्स प्रदान करत असेल, तर तुम्ही मोबाइल नेटवर्क प्रोव्हायडर भागीदाराच्या मार्फत पात्र आहात की नाही हे निश्चित करण्यासाठी Apple द्वारे तुमचा फोन नंबर तपासला जाऊ शकतो. तुम्ही मोबाइल नेटवर्क प्रोव्हायडर किंवा इतर Apple भागीदारमार्फत Apple TV सदस्यतेसाठी किंवा फ्री ट्रायलसाठी साइन अप केले असल्यास, तुमचे अकाउंट ओळखण्यासाठी आणि तुम्ही तुमची सदस्यता सक्रिय केली आहे हे मोबाइल नेटवर्क प्रोव्हायडर किंवा इतर भागीदाराला कळवण्यासाठी Apple तुमचा फोन नंबर किंवा भागीदाराने शेअर केलेला युनिक अकाउंट आयडेंटिफायर वापरेल. आम्ही तुमच्या फोन नंबर किंवा तुमच्या सदस्यतेशी संबंधित युनिक आयडेंटिफायरचा साइन इनच्या वेळेस तुमच्या अकाउंटची पडताळणी करण्यासाठी आणि तुमच्या अकाउंटबरोबर तुमची Apple TV सदस्यता कनेक्ट करण्यासाठी वापर करू.
पार्टनर अकाउंट कनेक्ट होत आहे
Apple आणि आमचे काही पार्टनर्स तुम्हाला तुमचे पार्टनर अकाउंट आणि तुमचे Apple अकाउंट कनेक्ट करण्याची अनुमती देऊ शकतात जेणेकरून तुम्ही Apple TV ॲपमध्ये आणि पार्टनरच्या प्लॅटफॉर्मवर दोन्ही ठिकाणी Apple TV सदस्यता कॉण्टेण्ट पाहू शकता. जेव्हा तुम्ही तुमचे पार्टनर अकाउंट कनेक्ट करणे निवडता, तेव्हा Apple ला पार्टनरकडील तुमच्या अकाउंटविषयी काही माहिती प्राप्त होते, पण Apple फक्त पार्टनर ID सह तुमच्या Apple TV सदस्यतेचे स्टेटस स्टोअर करते.
Apple तुमच्यासाठी आणि इतरांसाठी फीचर आणि Apple TV ॲप ऑप्टिमाइझ करण्यासाठी आणि सुधारण्यासाठी तुमच्या सदस्यतेचे स्टेटस आणि तुम्ही तुमच्या Apple अकाउंटसह पार्टनर अकाउंट कनेक्ट करता की नाही याबद्दलची माहिती वापरते.
थर्ड पार्टीसोबत शेअरिंग
आमची उत्पादने आणि सेवा प्रदान करण्यासाठी, Apple ला ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी मदत करण्यासाठी आणि App Store, Apple News आणि ‘स्टॉक’ मध्ये दाखवण्याच्या उद्देशाने Apple च्या वतीने जाहिराती विकण्यासाठी आम्ही Apple सह काम करणाऱ्या आमच्या महत्त्वपूर्ण भागीदारांना तुमच्या कॉण्टेण्ट खरेदीविषयी काही वैयक्तिक नसलेला डेटा उपलब्ध करुन देण्यास बांधील आहोत. उदाहरणार्थ, आम्ही तुमचे व्यवहार,बघण्याची ॲक्टिव्हिटी, आणि प्रदेश ह्याबद्दलचा वैयक्तिक नसलेला डेटा, तसेच वयोगट आणि लिंग ह्यासारखी एकत्रित केलेली यूझर लोकसंख्याशास्त्रीय माहिती (जी तुमच्या Apple अकाउंटमधील तुमचे नाव आणि संबोधन ह्यासारख्या माहितीवरून अनुमानित केली जाऊ शकते), कॉण्टेण्ट ओनरसारख्या Apple TV धोरणात्मक भागीदारांसह शेअर केली जाऊ शकते, जेणेकरून ते त्यांच्या सर्जनशील कार्याची कार्यक्षमतेचे मोजमाप करू शकतील, रॉयल्टी आणि लेखांकन संबंधी आवश्यकता पूर्ण करू शकतील, आणि त्यांची संबंधित उत्पादने आणि सेवा सुधारू शकतील.
जर तुम्ही Apple नसलेल्या डिव्हाइसवर व्हिडिओ ॲपमध्ये साइन इन केले, तर ॲप कार्यरत करण्यासाठी Apple प्लॅटफॉर्म प्रोव्हायडरसोबत माहिती शेअर करू शकतो, जेणेकरून तुमच्या Apple TV सदस्यतेकडील कॉण्टेण्ट प्लॅटफॉर्मवर दिसेल, आणि सर्च परिणाम आणि वैयक्तिकृत शिफारसी प्रदान करण्यासारख्या प्लॅटफॉर्म फीचरला स्पोर्ट करता येईल. ह्यामध्ये तुम्ही Apple TV ॲप उघडले आहे का आणि, जिथे उपलब्ध असेल तिथे तुम्ही Apple TV आणि Apple TV चॅनल्सची सदस्यता घेतली आहे का ह्याविषयी माहिती समाविष्ट असू शकते. तुम्ही तुमच्या Apple च्या नसलेल्या डिव्हाइसच्या Apple TV सेटिंगमध्ये तुमची सदस्यता माहिती शेअर करणे थांबवण्याचा पर्याय निवडू शकता, परंतु असे केल्यास प्लॅटफॉर्मवर Apple TV कॉण्टेण्ट ज्या मार्गांनी दिसतो ते मर्यादित होऊ शकतात.
सपोर्ट असलेल्या नॉन Apple डिव्हाइसेसवर, तुमची Apple TV सदस्यता, Apple TV चॅनल्ससह तुम्ही Apple TV ॲपवर काय बघता, खरेदी करता किंवा भाड्याने घेता आणि (जिथे उपलब्ध असेल तिथे) इतर कॉण्टेण्ट तुमच्या थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म प्रोव्हायडरबरोबर शेअर करायचे की नाही हे तुम्ही निवडू शकता. ह्यामध्ये तुमचे प्रोफाइल नाव किंवा इतर माहिती समाविष्ट असू शकते ज्याचा वापर Apple TV ॲपवरील तुमच्या डेटाला तुमच्या Apple नसलेल्या डिव्हाइसवरील तुमच्या अकाउंट किंवा प्रोफाइलशी जुळवण्यासाठी केला गेला आहे. तुमचा प्लॅटफॉर्म प्रोव्हायडर Apple TV ॲपवरील तुमच्या माहितीचा वापर तुम्ही सध्या बघत आहात असे कार्यक्रम दाखवणे आणि वैयक्तिकृत शिफारसींसारखे प्लॅटफॉर्म फीचर एनेबल करण्यासाठी करू शकतो. तुम्ही तुमच्या Apple च्या नसलेल्या डिव्हाइसच्या Apple TV ॲपच्या सेटिंगमध्ये जाऊन हे बंद करू शकता. काही डिव्हाइसवर, हे तुम्हाला प्लॅटफॉर्मच्या सेटिंगवर निर्देशित करू शकते.
तुम्ही Apple च्या नसलेल्या डिव्हाइसवर Apple TV ॲपमध्ये साइन इन करणे निवडल्यास, कोणता डेटा संकलित केला, वापरला आणि शेअर केला जातो हे समजून घेण्यासाठी प्लॅटफॉर्म प्रोव्हायडरच्या अटी, गोपनीयता धोरणे आणि पद्धती तुम्ही रिव्ह्यू केल्या पाहिजेत.
रिटेंशन
व्यवसायाची गरज, संदर्भित बांधिलकी आणि कायदेशीर आवश्यकतांनुसार आम्ही वेगवेगळ्या कालावधीसाठी Apple TV ॲपवरील तुमची खरेदी, डाउनलोड आणि बघण्याच्या ॲक्टिव्हिटीशी संबंधित वैयक्तिक डेटा राखून ठेवतो. खरेदी आणि डाउनलोडसाठी, रिटेन्शन कालावधी कमीत कमी 10 वर्षांचा असण्याची आवश्यकता आहे, परंतु चीनसारख्या प्रदेशात कालावधी 30 वर्षे असू शकतो. आम्ही तुमच्या खरेदीचा आणि डाउनलोड केलेल्या कॉण्टेण्टचा रेकॉर्ड तोपर्यंत राखतो जोपर्यंत आमच्याकडे तुमचे अकाउंट आहे, ज्यामुळे आमच्या लागू अटींनुसार तो कॉण्टेण्ट डाउनलोड करता येईल. आम्ही ब्राउझिंग ॲक्टिव्हिटी आणि सर्च ह्यासारखी इतर माहिती दोन वर्षांपर्यंत राखून ठेवतो. तुमच्याकडून अकाउंट बंद केल्यावर किंवा Apple TV ॲप वापरणे थांबवल्यानंतरही व्यवहारांसारखी काही माहिती, परंतु तुमच्या स्टोअर केलेल्या कार्डचे तपशील नाही, व्यावसायिक नोंदी म्हणून राखून ठेवली जाऊ शकते.
जेव्हा तुम्ही पेमेंट कार्डचा वापर करता, तेव्हा Apple भविष्यातील खरेदी, आवर्ती व्यवहार किंवा तुम्ही अधिकृत केलेल्या इतर वापरांसाठी तुमचे कार्ड नंबर आणि बिलिंग माहिती स्वतःजवळ ठेवू शकते आणि ऑटोमॅटिकली अपडेट करू शकते. Apple ही माहिती तुमच्या वित्तीय संस्था किंवा पेमेंट नेटवर्कवरून प्राप्त करू शकते आणि फसवणूक प्रतिबंधन आणि पडताळणीसाठी देखील वापरू शकते.
प्ले हिस्ट्री क्लिअर करा
तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन Apple TV ॲपमधील तुमची प्ले हिस्ट्री क्लिअर करू शकता. तुमच्या iOS, iPadOS किंवा visionOS डिव्हाइसवर Apple TV ॲपमध्ये अकाउंट > गोपनीयता व ॲक्सेस > ‘प्ले हिस्ट्री क्लिअर करा’ वर जा. Mac वरील Apple TV ॲपमध्ये, TV > सेटिंग > ॲडव्हांस्ड > ‘प्ले हिस्ट्री क्लिअर करा’ वर जा. tvOS वर, सेटिंग > ॲप > TV > ‘प्ले हिस्ट्री क्लिअर करा’ वर जा. ह्यामुळे तुमच्या वॉचलिस्टमधून सर्व TV कार्यक्रम आणि चित्रपट काढून टाकले जातील आणि तुमच्या अकाउंटमध्ये कोणतीही प्लेबॅक हिस्ट्री असल्यास ती असंबद्ध केली जाईल. हे समान Apple अकाउंट वापरणाऱ्या Apple डिव्हाइसवर संग्रहित केलेल्या आणि वापरलेल्या तुमच्या प्ले डेटावर लागू केले जाईल. जर तुम्ही Apple नसलेले डिव्हाइस वापरत असाल आणि प्लॅटफॉर्म प्रोव्हायडरसोबत तुम्ही काय पाहता हे शेअर करणे निवडल्यास, तुमची प्ले हिस्ट्री क्लिअर केल्याने प्लॅटफॉर्म प्रोव्हायडरने संग्रहित केलेल्या प्ले डेटावर परिणाम होणार नाही. त्या प्रोव्हायडरद्वारे संग्रहित केलेला डेटा तुम्ही हटवू शकता का हे समजून घेण्यासाठी तुम्ही त्या प्लॅटफॉर्मच्या प्रोव्हायडरच्या अटी, गोपनीयता धोरणे आणि कार्यपद्धती रिव्ह्यू केल्या पाहिजेत.
एपिसोडला दाबून ठेवून आणि वॉचलिस्टमधून हटवा निवडून तुम्ही तुमच्या वॉचलिस्टमधून वेगवेगळे आयटम हटवू शकता. त्याच मेनूमध्ये, जर तुम्ही ‘अलीकडे पाहिलेले मधून काढून टाका’ निवडले तर वैयक्तिकृत शिफारसी उत्पन्न करण्यासाठी वापरले जाण्यापासून देखील तो एपिसोड काढून टाकला जाईल. तथापि, Apple रिपोर्टिंग आणि रॉयल्टीच्या आवश्यकतांसाठी, Apple TV चॅनेल्स आणि Apple TV सदस्यतेच्या प्ले हिस्ट्रीची रेकॉर्ड्स राखून ठेवेल.
थर्ड पार्टीची कनेक्ट केलेली ॲप्स
तुम्ही तुमच्या सहभागी थर्ड पार्टी ॲप्सना Apple TV ॲपशी कनेक्ट होण्याची परवानगी दिली पाहिजे, जेणेकरून तुम्ही ह्या ॲपवर काय बघता हे Apple सह शेअर करणे सुरू करता येऊ शकेल. जेव्हा तुम्ही Apple TV ॲप सेट करता, तुम्हाला एकाच वेळी अनेक ॲप्लिकेशनना परवानगी देण्यास सांगितले जाऊ शकते. ॲप्सपैकी काही ॲप्स असे असू शकतात जे तुम्ही अद्याप त्या डिव्हाइसवर इन्स्टॉल केलेले नसतील, आणि नंतर ते इन्स्टॉल केल्यावर त्यावर तुमची प्राधान्ये लागू केली जाऊ शकतात. तुम्ही परवानगी दिलेली असेल किंवा नसेल, तुम्हाला सेटिंगमध्ये प्रत्येक ॲपसाठी तुमची प्राधान्ये बदलता येऊ शकतात.
तुमचे एखादे थर्ड पार्टी ॲप ह्यापुढे Apple TV ॲपशी कनेक्ट ठेवायचे नाही ह्याविषयी तुम्ही कोणत्याही क्षणी निर्णय घेतल्यास, तुम्ही Apple TV ॲपमधून ते ॲप डिस्कनेक्ट करू शकता आणि Apple थर्ड पार्टी ॲपकडून तुमचा प्ले डेटा संकलित करणे थांबवेल. तुमच्या iOS, iPadOS किंवा visionOS डिव्हाइसवर Apple TV ॲपमध्ये, अकाउंट > ‘कनेक्ट केलेले ॲप’ वर जा, थर्ड पार्टी ॲप निवडा आणि ते बंद करा. tvOS वर, सेटिंग > ॲप > TV > ‘TV सोबत कनेक्ट करा’ वर जा, थर्ड पार्टी ॲप निवडा आणि ते बंद करा. Apple TV ॲपमधून थर्ड पार्टी ॲप काढून टाकताना, तुम्ही ‘प्ले हिस्ट्री काढून टाका आणि क्लिअर करा’ पर्याय निवडून, तुम्ही त्या ॲपमधून जो कॉण्टेण्ट बघितला आहे त्याबद्दलची Apple ने संकलित केलेली प्ले डेटा माहिती हटवण्याचा पर्याय देखील निवडू शकता. कोणत्याही वेळी, तुम्ही वर वर्णन केल्याप्रमाणे तुमची प्ले हिस्ट्री क्लिअर करुन, तुम्ही Apple TV ॲपमध्ये जो सर्व थर्ड पार्टी कॉण्टेण्ट बघता त्याबद्दल Apple ने संकलित केलेला तुमचा सर्व प्ले डेटा हटवण्याचा पर्याय निवडू शकता. इथे वर्णन केलेल्या कोणत्याही उदाहरणात प्ले हिस्ट्री क्लिअर केल्याने फक्त तुमचा थर्ड पार्टी ॲपचा प्ले डेटा क्लिअर होतो जो Apple TV ॲपसाठी Apple द्वारे राखून ठेवला आणि वापरला जातो. हे थर्ड पार्टी ॲप प्रोव्हायडरद्वारे स्वतंत्रपणे राखलेल्या कोणत्याही प्ले डेटाला प्रभावित करणार नाही (उदाहरणार्थ, त्यांच्या स्वतःच्या ॲप किंवा त्यांच्या सर्व्हरवर असलेला).
सहभागी थर्ड पार्टी ॲप तुमचा प्ले डेटा आणि संबंधित माहिती कशी वापरतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यासाठी, तुम्ही त्यांच्या अटी, गोपनीयता धोरणे आणि कार्यपद्धती रिव्ह्यू केल्या पाहिजेत.
गट शिफारशी
जर तुम्ही Apple TV डिव्हाइसवर गट शिफारशी एनेबल करणे निवडले, तर तुम्ही काय पाहता ह्याबद्दलची माहिती त्याच Apple TV वर निवडलेल्या वापरकर्त्यांच्या कोणत्याही कॉम्बिनेशनसह गट शिफारशी करण्यासाठी वापरली जाईल. जर गटात मुलाचा अकाउंट असेल, तर मुलांसाठी शिफारशी समाविष्ट केल्या जातील, परंतु त्यांची पाहण्याची हिस्ट्री वापरली जाणार नाही. तुम्ही सेटिंग > ‘वापरकर्ते आणि अकाउंट’ ह्यावर जाऊन, तुमचे प्रोफाइल निवडून, नंतर ‘तुम्हा सर्वांसाठी’ निवडून कधीही तुमच्या अकाउंटसाठी गट शिफारशी बंद करू शकता.
tvOS आणि थर्ड-पार्टी TV वर Apple TV ॲप प्रोफाइल्स
तुम्ही tvOS वर आणि काही थर्ड TV वरील व्हिडिओ ॲपवर तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित प्रोफाइल्स तयार करू शकता, ज्यात मुलांच्या प्रोफाइलचा समावेश असू शकतो. त्या प्लॅटफॉर्म्सवरील Apple TV ॲपवर ह्या प्रोफाइल्सचा वापर केला जाऊ शकतो आणि त्या Apple TV ॲपवर वैयक्तिकृत अनुभव प्रदान करतात. प्रोफाइल्स ज्या Apple अकाउंटशी संबंधित असतात ती मॅनेजिंग प्रोफाइल आहे. तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित प्रोफाइल तयार करण्यासाठी, तुमचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे. तुम्ही प्रोफाइलसाठी नाव आणि इमेज निवडाल आणि प्रोफाइल लहान मुलासाठी आहे की नाही हे निर्दिष्ट कराल. प्रोफाइल सेटअप दरम्यान आणि सेटिंगमध्ये कधीही, तुम्ही तुमच्या Apple अकाउंटचा वापर करून खरेदी आणि भाड्याने घेण्याची प्रोफाइलची क्षमता नियंत्रित करू शकता. तुम्ही Apple TV ॲपसाठी कॉण्टेण्ट निर्बंध देखील सेट करू शकता. tvOS वर, सेटिंग > ॲप्स > TV > ‘कॉण्टेण्ट निर्बंध’ वर जा, प्रोफाइल सिलेक्ट करा आणि स्टेप्स फॉलो करा.
तुम्ही निवडलेल्या कॉण्टेण्ट मानांकनांच्या अधीन राहून, प्रोफाइल Apple कडून तुम्ही खरेदी किंवा भाड्याने घेतलेला कॉण्टेण्ट आणि तुमचे Apple TV सबस्क्रिप्शन आणि Apple TV चॅनेल ॲक्सेस करू शकते आणि बघू शकते. प्रोफाइल तुमच्या कनेक्ट केलेली थर्ड पार्टी व्हिडिओ ॲप्सदेखील ॲक्सेस करू शकते, पण कॉण्टेण्ट निर्बंध फक्त Apple TV ॲपला लागू होतात.
प्रोफाइल्सविषयी Apple गोळा करते आणि स्टोअर करते ती माहिती व्यवस्थापित प्रोफाइलच्या Apple अकाउंटशी संबंधित असते. यामध्ये, उदाहरणार्थ, प्रोफाइल काय बघते, ते कधी बघितले गेले, कोणत्या डिव्हाइसवर बघितले गेले आणि कॉण्टेण्टमध्ये प्रोफाइलची प्रगती याविषयीच्या प्लेबॅक ॲक्टिव्हिटीचा समावेश असतो.
मुलांच्या प्रोफाइलसाठी, आम्ही त्या प्रोफाइलच्या यूझरला Apple TV ॲपवर वयानुसार योग्य अनुभव प्रदान करण्यासाठी मुलांच्या प्रोफाइलशी संबंधित सततचा आयडेंटिफायर गोळा करू. आम्ही त्या प्रोफाइलच्या यूझरला Apple TV ॲप प्रदान करणे, प्रोफाइल फीचर आणि Apple TV ॲप सुधारणे आणि फसवणूक व सुरक्षिततेच्या उद्देशांसाठी आयडेंटिफायर आणि मुलाच्या प्रोफाइलचा ॲक्टिव्हिटी डेटा (सर्च आणि वॉच हिस्ट्रीसारखा) वापरू. आयडेंटिफायर आणि संबंधित माहिती असंबंधित हेतूंसाठी वापरली किंवा उघड केली जात नाही, हे निश्चित करण्यासाठी Apple योग्य उपाययोजना करेल.
व्यवस्थापित प्रोफाइलकडून मंजुरी मिळाल्यानंतर सेटिंगमध्ये प्रोफाइलला Apple अकाउंटमध्ये अपग्रेड केले जाऊ शकते. tvOS वर, सेटिंग > ‘प्रोफाइल आणि अकाउंट’ वर जा, प्रोफाइल सिलेक्ट करा, ‘Apple अकाउंट’ ला अपग्रेड करा सिलेक्ट करा आणि स्टेप्स फॉलो करा. जेव्हा प्रोफाइल अपग्रेड केली जाते, तेव्हा त्या प्रोफाइलने काय पाहिले याबद्दलची माहिती आणि पाहण्याच्या हिस्ट्रीशी संबंधित तपशील नवीन Apple अकाउंटला ट्रांसफर केले जातील आणि ते व्यवस्थापित करणाऱ्या प्रोफाइलशी संबंधित असणार नाहीत. तथापि, जेव्हा प्रोफाइल अपग्रेड केली जाते, तेव्हा खरेदी, सदस्यता आणि भाड्याने घेतलेल्या गोष्टी व्यवस्थापित करणाऱ्या प्रोफाइलशी संबंधित राहतील आणि प्रोफाइलच्या नवीन Apple अकाउंटला ट्रांसफर केल्या जाणार नाहीत किंवा त्याच्याशी संबंधित असणार नाहीत. सेटिंगमधील व्यवस्थापित प्रोफाइलद्वारे देखील प्रोफाइल कधीही हटवले जाऊ शकते. tvOS वर, सेटिंग > प्रोफाइल्स आणि अकाउंट्स वर जा, प्रोफाइल निवडा आणि ‘प्रोफाइल डिलीट’ करा निवडा. एकदा डिलीट केल्यावर, प्रोफाइल आणि त्याची वॉच हिस्ट्री व्यवस्थापित प्रोफाइलच्या Apple अकाउंटसाठी उपलब्ध नसेल.
फसवणूक आणि इतर नुकसानकारक ॲक्टिव्हिटी टाळणे
Apple TV ॲपमध्ये फसवणूक आणि इतर नुकसानकारक ॲक्टिव्हिटी टाळण्यासाठी देखील आम्ही वैयक्तिक डेटा संकलित करतो. ह्या माहितीमध्ये डिव्हाइसचे प्रकार आणि सॉफ्टवेअर व्हर्जन, स्थान माहिती (उपलब्ध असल्यास, तुमच्या इंटरनेट कनेक्शनच्या IP ॲड्रेसच्या भौगोलिक प्रदेशाशी अंदाजे जुळवलेले), डाउनलोड व खरेदी हिस्ट्री, आणि Apple TV ॲपसह असलेल्या आंतरक्रिया ह्यासारखी माहिती समाविष्ट असते. जेव्हा तुम्ही Fitness+ सदस्यता ऑटो-रिन्यू होण्यासाठी सेट करता, तेव्हा विनंतीवर प्रक्रिया करण्यासाठी आणि पेमेंट पार्टनरद्वारे अधिकृत करण्याआधी तुमच्या सध्याच्या सदस्यत्वाचा ॲक्सेस प्रदान करणे चालू ठेवायचा का नाही हे ठरवण्यासाठी Apple बरोबरच्या तुमच्या जुन्या व्यावसायिक संबंधांच्या माहितीचा वापर Apple कडून केला जाऊ शकतो.
जेव्हा तुम्ही खरेदी करण्याचा प्रयत्न करता तेव्हा, आम्ही तुमच्या डिव्हाइसवर डिव्हाइस ट्र्स्ट स्कोअरची देखील गणना करू शकतो, ज्यासाठी तुम्ही अंदाजे किती फोन कॉल किंवा ईमेल करता आणि प्राप्त करता यासह तुम्ही तुमचे डिव्हाइस कसे वापरता याबद्दलच्या माहितीचा वापर केला जातो. ‘सबमिशन’ अशा रितीने डिझाइन करण्यात आलेले आहे की Apple तुमच्या डिव्हाइसवरील अंतर्निहित मूल्यांना जाणून घेऊ शकत नाही. स्कोअर आमच्या सर्व्हरवर निश्चित वेळेसाठी संग्रहित केला जातो.
वैयक्तिक डेटावर प्रक्रिया करण्यासाठी लागू होणारे कायदेशीर आधार
आम्ही Apple TV ॲप मधील तुमच्या वैयक्तिक डेटावर सामान्यतः Apple बरोबर तुमच्या कराराच्या कामगिरीवर क्रिया करण्यास, जसे सेवा प्रदान करण्यासाठी आवश्यक असेल, आणि आमच्या कायदेशीर वचनबद्धतेचे पालन करण्यासाठी आवश्यक असेल त्यानुसार, क्रिया करतो. जिथे संमती उचित कायदेशीर आधार असतो, तिथे आम्ही त्याला लागू होणाऱ्या स्थानिक कायद्यानुसार प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो.
जिथे लागू होणारे कायदे निर्देशित करतात, तिथे आम्ही पुढील कारणांनी आमच्या किंवा थर्ड पार्टीच्या कायदेशीर स्वारस्यांच्या उद्देशांसाठी गरजेनुसार वैयक्तिक डेटावर क्रिया करतो :
- थर्ड पार्टी सेवांच्या समावेशासह तुमच्यासाठी उपलब्ध आणि संबंधित असलेली सामग्री प्रदर्शित करा आणि प्लेबॅकची अनुमती द्या
- ऑफरसाठी योग्यता तपासणे, तुमच्यासाठी आणि इतरांसाठी सेवांमध्ये सुधारणा करणे आणि त्या ऑप्टिमाइझ करण्यात मदत करणे, आणि तुम्हाला Apple TV ॲप आणि इतर Apple उत्पादने, सेवा आणि ऑफरविषयी सूचना पाठवणे ज्यामध्ये तुम्हाला स्वारस्य असू शकते
- फसवणूक आणि इतर नुकसानकारक ॲक्टिव्हिटी टाळा
वापरलेल्या डेटामध्ये हे समाविष्ट आहे :
- तुम्ही वापरता त्या फीचरसह Apple TV ॲपचा तुमचा वापर (उदाहरणार्थ, पाहणे चालू ठेवणे किंवा लायब्ररी), तुम्ही सर्च करता ते आयटम, नोटिफिकेशनसह तुमच्या आंतरक्रिया, तुम्ही ब्राऊझ करता आणि बघता ती कॉण्टेण्ट पृष्ठे, तुम्ही काय पाहता, खरेदी करता, कशाची सदस्यता घेता आणि काय डाउनलोड करता आणि ॲपमधील त्रुटी किंवा क्रॅशबविषयी माहिती
- तुमच्या डिव्हाइस आणि अकाउंटचे तपशील
- डिव्हाइस विश्वसनीयता स्कोअर
- तुमचे स्थान
Apple ने संकलित केलेली माहिती नेहमी Apple च्या गोपनीयता धोरणानुसार हाताळली जाईल, जे www.apple.com/in/privacy वर मिळू शकते.
2026-05-11