तुमच्या मुलांसाठी Apple Watch व गोपनीयता

‘तुमच्या मुलांसाठी Apple Watch’ तुम्हाला कुटुंबातील सदस्याचे Apple Watch तुमच्या iPhone शी पेअर करण्याची अनुमती देते. काही फीचरसाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्याच्या Apple Watch मधून काही डेटा प्राप्त करण्यासाठी विनंती करावी लागेल.
 

तुमच्या मुलांसाठी Apple Watch हे तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आणि काय शेअर करायचे, हे निवडण्याची मुभा तुम्हाला देण्यासाठी डिझाइन केलेले आहे.


Privacy Icon

  • ‘तुमच्या मुलांसाठी Apple Watch’ तुम्हाला कुटुंबातील सदस्याचे Apple Watch तुमच्या iPhone शी पेअर करण्याची अनुमती देते.
  • ‘तुमच्या मुलांसाठी Apple Watch’ वर उपलब्ध असलेल्या काही watchOS फीचर्सना वैयक्तिक डेटाच्या वापराची आवश्यकता असू शकते.
  • काही विशिष्ट फीचर्ससाठी, तुम्हाला तुमच्या कुटुंब सदस्याच्या Apple Watch मधून काही विशिष्ट डेटा मिळवण्याची विनंती करण्याची किंवा संबंधित ॲक्टिव्हिटीचे लॉग्ज पाहण्याची क्षमता मिळेल. ह्यामध्ये तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा आरोग्य डेटा, स्कूलटाइम अनलॉक, स्थान आणि संपर्क डेटा ह्यासारख्या गोष्टींचा समावेश असतो. आरोग्य आणि स्कूलटाइम अनलॉकसाठी, ही माहिती Apple कडे केवळ संबंधित माहिती आणि लॉग शेअर करण्याची अनुमती देण्यासाठी एंड-टू-एंड एनक्रिप्टेड असेल.

‘तुमच्या मुलांसाठी Apple Watch’ तुम्हाला कुटुंबातील सदस्याचे Apple Watch तुमच्या iPhone शी पेअर करण्याची अनुमती देते. ‘तुमच्या मुलांसाठी Apple Watch’ साठी तुम्ही आणि तुमचे कुटुंब सदस्य एकाच कौटुंबिक शेअरिंगचा भाग असणे आणि तुम्ही तुमच्या कुटुंब गटाचे कुटुंब व्यवस्थापक किंवा आईवडील/पालक असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे कौटुंबिक शेअरिंग नसेल तर ते तुम्हाला सेटअप करावे लागेल, किंवा तुमच्या कुटुंब सदस्याकडे Apple अकाउंट नसल्यास, तुम्हाला तो तयार करण्याची गरज भासेल.

‘तुमच्या मुलांसाठी Apple Watch’ सह, काही विशिष्ट watchOS फीचर्स कुटुंबातील सदस्याचे Apple Watch तुमच्या iPhone च्या जवळ नसताना देखील वापरासाठी उपलब्ध असतील. ‘तुमच्या मुलांसाठी Apple Watch’ मध्ये सगळीच watchOS फीचर्स उपलब्ध असतील असे नाही. Apple Watch मध्ये मोबाइल प्लॅन नसल्यास किंवा कुटुंब सदस्याच्या वयानुसार कॉल करण्यासारखी अतिरिक्त watchOS फीचर्स उपलब्ध नसू शकतात. जेव्हा तुम्ही मोबाइल सेवा क्षमतेसह ‘तुमच्या मुलांसाठी Apple Watch’ मध्ये Apple Watch समाविष्ट करता, तेव्हा मोबाइल सेवा प्लॅन कॉन्फिगर करता यावेत, ह्यासाठी Apple Watch चा अनुक्रमांक आणि मोबाइल सेवेचे हार्डवेअर आयडेंटिफायर्स Apple ला पाठवले जातील.

काही विशिष्ट फीचर्ससाठी, तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्याच्या Apple Watch मधून काही डेटा प्राप्त करण्यासाठी विनंती करू शकाल. ह्यामध्ये तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य, स्थान आणि संपर्क डेटा समावेश असतो. तुमच्या कुटुंब सदस्याकडे हा डेटा शेअर करण्याची किंवा हा डेटा तुमच्यासोबत शेअर करणे थांबवण्याची क्षमता असू शकते. जर तुम्ही तुमच्या कुटुंब सदस्याचा आरोग्य डेटा ॲक्सेस करण्यासाठी विनंती केली, तर सदस्याला त्यांच्या वॉचवर सूचित केले जाईल. तुमच्या कौटुंबिक सदस्यांनी त्यांचा ‘आरोग्य’ संबंधित डेटा तुमच्यासोबत शेअर करण्याचे निवडल्यास ही माहिती एंड-टू-एंड एनक्रिप्शन केलेल्या स्वरूपात Apple कडे पाठवली जाईल. ही माहिती शेअर करणे एनेबल करण्यासाठी Apple ला अनुमती देण्यासाठी हा डेटा केवळ तुमच्या Apple अकाउंटशी जोडला जाईल.

‘स्कूलटाइम’ सह, तुम्ही Apple Watch ची ठराविक फीचर्स वापरण्यावर निर्बंध असलेल्या कालावधीबाबत जाणून घेऊ शकता. जर तुमच्या कुटुंब सदस्याने ‘स्कूलटाइम’ मध्ये त्यांचे Watch अनलॉक केले तर तुम्ही तुमच्या iPhone वरील Apple Watch ॲपमध्ये ते अनलॉक झाल्याचे पाहू शकता. ही माहिती Apple कडे एंड टू एंड एनक्रिप्ट केलेल्या स्वरूपात पाठवली जाते, परंतु ती तुमच्या Apple अकाउंटशी वेगळ्या प्रकारे जोडलेली राहील ज्यामुळे Apple कडून अनलॉक करण्याची माहिती प्रदान केली जाऊ शकेल.

‘तुमच्या मुलांसाठी Apple Watch’ सह तुम्ही तुमच्या iPhone वर तुमच्या कुटुंबातील सदस्याच्या Apple Watch वरील लॉग्ज आणि स्क्रीनशॉट्स देखील बघू शकता.

तुम्ही तुमच्या iPhone वरील Apple Watch ॲपमधून ‘तुमच्या मुलांसाठी Apple Watch’ कधीही डिसेबल करू शकता आणि तुमच्या कुटुंबातील सदस्य Apple Watch वरील सेटिंगमधून ‘तुमच्या मुलांसाठी Apple Watch’ डिसेबल करू शकतात. तुमच्या कुटुंबातील सदस्य Apple Watch वरील ‘सेटिंग’ मध्ये जाऊन तुमच्याबरोबर डेटा शेअर करण्यासारखी प्राधान्ये कधीही बदलू देखील शकतात.

ह्या सूचनेमध्ये वर्णन केल्याप्रमाणे आणि Apple च्या गोपनीयता धोरणानुसार किंवा कायद्याने आवश्यक असेल त्याप्रमाणे, ज्या उद्देशांसाठी वैयक्तिक डेटा संकलित केला गेला होता त्या उद्देशांची पूर्तता होईपर्यंतच Apple तो डेटा राखून ठेवते. राखून ठेवण्याच्या कालावधीची तपासणी करत असताना,संकलित केलेला वैयक्तिक डेटा राखून ठेवणे खरेच आवश्यक आहे का याचे आम्ही काळजीपूर्वक परीक्षण करतो आणि जर राखून ठेवणे आवश्यक असेल तर कायद्याने परवानगी असेल इतक्या संक्षिप्त कालावधीसाठी वैयक्तिक डेटा राखून ठेवण्याच्या दृष्टीने काम करतो.

कायम, Apple द्वारे ‘तुमच्या मुलांसाठी Apple Watch’ च्या वापरापासून किंवा ‘तुमच्या मुलांसाठी Apple Watch’ मधून एनेबल केलेल्या कोणत्याही फीचर्सच्या वापरापासून गोळा केलेली माहिती Apple च्या www.apple.com/privacy येथे मिळू शकणाऱ्या गोपनीयता धोरणानुसार हाताळली जाईल.

2025-12-12