Siri, श्रुतलेखन व गोपनीयता
Siri तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहे आणि तुम्ही काय शेअर करता हे निवडण्यासाठी तुम्हाला एनेबल करते.
Siri, श्रुतलेखन व गोपनीयता ‘Siri आणि श्रुतलेखन’ साठी डिफॉल्ट वर्तनाची रूपरेषा प्रदान करते. तुम्ही Siri आणि श्रुतलेखन सुरु केल्यास, अतिरिक्त डेटा संकलित, संग्रहित आणि रिव्ह्यू केला जातो. अधिक माहितीसाठी, www.apple.com/in/legal/privacy/data/en/improve-siri-dictation ला भेट द्या.
Siri आणि श्रुतलेखन
जेव्हा तुम्ही Siri वापरता, तेव्हा तुमचे डिव्हाइस Siri सेटिंगमध्ये तुम्ही जे बोलता त्यावर तुमच्या डिव्हाइसवर प्रक्रिया केली जात आहे का आणि ते Apple सर्व्हरला पाठवले गेलेले नाही हे दर्शवेल. अन्यथा, तुमचा ऑडिओ Apple सर्व्हरला पाठवला जाईल आणि त्यावर प्रक्रिया केली जाईल. जोपर्यंत तुम्ही ‘Siri आणि श्रुतलेखन’ मध्ये सुधारणा करण्याचा पर्याय निवडत नाही, तोपर्यंत तुमचा ऑडिओ डेटा Apple द्वारे संग्रहित केला जात नाही.
जेव्हा तुम्ही ‘श्रुतलेखन’ वापरता, तेव्हा तुमचे डिव्हाइस ‘कीबोर्ड सेटिंग’ मध्ये तुमच्या ऑडिओ आणि प्रतिलेखनांवर तुमच्या डिव्हाइसवर प्रक्रिया केली जात आहे का आणि ते Apple सर्व्हरला पाठवले गेलेले नाही हे दर्शवेल. अन्यथा, तुम्ही डिक्टेट केलेल्या गोष्टी सर्व्हरला पाठवल्या जातात आणि सर्व्हरवर त्यावर प्रक्रिया केली जाते, पण तुम्ही ‘Siri आणि श्रुतलेखन’ सुरू करत नाही तोपर्यंत ते संग्रहित केले जाणार नाही.
Apple हे तुम्ही केलेल्या विनंतीची श्रेणी आणि ती यशस्वीरित्या पूर्ण केली गेली का, डिव्हाइसचे तपशील, डिव्हाइसचे कॉन्फिगरेशन, कामगिरीची आकडेवारी, आणि जर तुम्ही Siri साठी स्थान सेवा सुरू केल्या असतील तर विनंती केली त्यावेळी तुमच्या डिव्हाइसचे अंदाजित स्थान ह्यासारख्या संबंधित विनंतीचा डेटा देखील संग्रहित करेल.
ट्रांसक्रिप्ट्स आणि कोणताही संबंधित विनंती डेटा समाविष्ट असलेली तुमच्या विनंतीची हिस्ट्री रॅण्डम, डिव्हाइसद्वारे जनरेट केलेल्या आयडेंटिफायरशी संबंधित असते जो दर तासाला अनेक वेळा रोटेट होतो आणि तो तुमच्या Apple अकाउंट किंवा ईमेल ॲड्रेसशी जोडलेला नसतो. Apple उत्पादने आणि सेवांमध्ये Siri, श्रुतलेखन, सर्च आणि इतर भाषा प्रक्रियेची मर्यादित फंक्शनॅलिटी विकसित करण्यासाठी आणि त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी, Apple हा डेटा दोन वर्षांपर्यंत राखून ठेवू आणि वापरू शकते. उदाहरणार्थ, ट्रान्सक्रिप्टचा वापर Siri, सर्च, व्हॉइस कंट्रोल, भाषांतर, आणि ऑटोमॅटिक स्पीच रेकग्निशन मॉडेलला उत्तम करण्यासाठी केला जाऊ शकतो. Apple तुमच्या Siri सोबतच्या संवादांची काही ट्रांसक्रिप्ट्सही रिव्ह्यू करू शकते आणि ह्या संवादांपैकी जे निवडक संवाद रिव्ह्यू केले गेले आहेत, ते उत्पादन आणि सेवांमध्ये सातत्याने सुधारणा करण्यासाठी दोन वर्षांपेक्षा अधिक काळ जतन केले जाऊ शकतात.
‘Siri आणि श्रुतलेखन’ ह्यांच्याशी तुमच्या आंतरक्रियांची हिस्ट्री तुमच्या डिव्हाइसवर संग्रहित केली जाते आणि तुमचा Siri चा अनुभव वैयक्तिकृत करण्यासाठी वापरली जाऊ शकते.
जेव्हा तुम्ही ‘Siri आणि श्रुतलेखन वापरता’, तेव्हा तुमचे डिव्हाइस Apple ला इतर संदर्भित डेटा पाठवू शकते, ज्यामध्ये ‘Siri विनंतींसह वापरा’ सह ज्या थर्ड पार्टी ॲपना एकत्र करण्याची तुम्ही अनुमती देता त्यांचा समावेश असतो, जसे की :
- संपर्क नावे, टोपणनावे आणि नातेसंबंध (उदाहरणार्थ, ‘माझे वडील’), तुम्ही तुमच्या संपर्कांमध्ये त्यांना सेट केले असल्यास
- संबोधनाचे स्वरूप, भाषा आणि प्रदेश सेटिंगमध्ये सेट केले असल्यास
- तुमच्या आवडीचे संगीत आणि पॉडकास्ट
- तुमच्या आणि तुमच्या कौटुंबिक शेअरिंग सदस्यांच्या डिव्हाइसेसची नावे
- होम ॲपमधील ॲक्सेसरीज, घरे, दृश्ये, शेअर केलेल्या घरातील सदस्यांची नावे आणि Apple TV यूझर प्रोफाइल
- छायाचित्रातील लोकांची नावे, अलार्मची नावे आणि रिमाइंडर याद्यांची नावे ह्यासारखे आयटमचे लेबल
- तुमच्या डिव्हाइसवर इन्स्टॉल केलेल्या ॲपची आणि तुम्ही Siri मार्फत समाविष्ट केलेल्या शॉर्टकटची नावे
हा डेटा रॅण्डम, डिव्हाइसने उत्पन्न केलेल्या अशा आयडेंटिफायरशी संबंधित असतो जो तुमच्या Apple अकाउंट किंवा ईमेल ॲड्रेसशी जोडलेला नसतो. Apple कडून ह्याचा वापर केवळ Siri ला तुमची विनंती समजली का हे ठरवण्यासाठी आणि तुमच्या iOS डिव्हाइसला आणि कोणत्याही कनेक्ट केलेले डिव्हाइस जसे की, तुमचे Apple Watch, HomePod, किंवा सपोर्ट करणाऱ्या HomeKit ॲक्सेसरी, ह्यांना तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यात आणि तुम्ही काय बोलता ते ओळखण्यात मदत करण्यासाठी केला जातो.
हा संदर्भित डेटा, तसेच तुमचे Siri ट्रान्सक्रिप्ट आणि संबंधित विनंती डेटाचा वापर मार्केटिंग प्रोफाइल बनवण्यासाठी केला जात नाही आणि कधीही कोणाला विकला जात नाही.
थर्ड पार्टी ॲप्स
जेव्हा Siri तुमच्या वतीने थर्ड पार्टी ॲप किंवा सेवेशी आंतरक्रिया करते तेव्हा, तुम्ही त्या ॲप किंवा सेवेच्या अटी आणि शर्ती आणि गोपनीयता धोरणाच्या अधीन असता. ह्याव्यतिरिक्त, तुम्ही ट्रांसक्रिप्शनसाठी ॲप्सना ’स्पीच रेकग्निशन’ वापरण्याची अनुमती देण्याचे निवडल्यास, ट्रांसक्राइब होणारा ऑडिओ डेटा Apple कडे पाठवला जाऊ शकतो.
Siri सूचना
Siri सूचना स्थानिक, ऑन डिव्हाइस प्रक्रियांचा वापर तुम्ही तुमचे डिव्हाइस आणि ॲप्सना कसे वापरतात हे जाणून घेण्यासाठी करते जेणेकरून तुमचा अनुभव वैयक्तिकृत केला जाऊ शकेल. तुमची Safari ब्राउझिंग हिस्ट्री, ईमेल, संदेश, इमेज, नोटिफिकेशन, आणि संपर्क, तसेच इतर इन्स्टॉल केलेल्या ॲपने देऊ केलेली किंवा योगदान दिलेली माहिती यासारखी संग्रहित माहिती वापरून Siri शॉर्टकट सूचवू शकते आणि सर्च, शेअर शीट, दिनदर्शिका, तपासा, व्हिज्युअल तपासा, Safari, ॲप, आणि आदिंमध्ये सूचना प्रदान करू शकते. उदाहरणार्थ, छायाचित्रात कोण आहे ह्या आधारावर शेअर शीटमध्ये छायाचित्र कोणाबरोबर शेअर केले गेले पाहिजे हे सुचवण्यासाठी Siri ऑन-डिव्हाइस इंटेलिजन्सचा वापर करू शकते. सूचनांचा वापर Apple सेवा वैयक्तिकृत करण्यासाठी केला जाऊ शकतो परंतु त्या Apple च्या सर्व्हरवर संग्रहित केल्या जात नाहीत किंवा इतर थर्ड पार्टी ॲप्सबरोबर शेअर केल्या जात नाहीत. जेव्हा तुम्ही Siri ने सुचवलेले शॉर्टकट रन करता तेव्हा तुम्ही ॲपच्या अटी आणि शर्ती आणि गोपनीयता धोरणांच्या अधीन असता.
स्थान सेवा
तुम्ही Siri साठी ‘स्थान सेवा’ सुरू केलेल्या असल्यास, तुम्ही विनंती करता त्यावेळी तुमच्या डिव्हाइसचे स्थान तुमच्या विनंत्यांच्या उत्तराची अचूकता सुधारण्यात ’Siri आणि श्रुतलेखन’ ला मदत करण्यासाठी Apple ला पाठविले जाईल. सुसबंद्ध प्रतिसाद आणि सूचना प्रदान करण्यासाठी, भोगोलिक प्रदेशाला जुळवून तुमच्या स्थानाचा अंदाज बांधण्यासाठी Apple तुमच्या इंटरनेट कनेक्शनच्या IP ॲड्रेसचा वापर करू शकते.
iCloud सिंकिंग
तुम्ही iCloud चा वापर केल्यास, तुमचे Siri सेटिंग आणि ‘Siri सूचना’ वैयक्तिकरण एंड टू एंड एनक्रिप्शनचा वापर करून तुमच्या सर्व Apple डिव्हाइसवर सिंक केले जाईल. तुम्ही Siri सेट अप केले असल्यास, प्रत्येक डिव्हाइसवर वैयक्तिकृत Siri ओळख अधिक चांगली करण्यासाठी तुमच्या विनंतीचा छोटा नमुना एंड टू एंड एनक्रिप्शनचा वापर करून सिंक देखील केला जाईल. वैयक्तिकृत स्पीच रेकग्निशन मॉडेल आणि Siri आणि ‘श्रुतलेखन’ सह डिव्हाइसवर केल्या जाणाऱ्या तुमच्या आंतरक्रिया तुमच्या ऑन डिव्हाइस माहितीचा वापर करू शकतात, जेणेकरून अचूकता आणि मॉडलच्या कामगिरीमध्ये सुधारणा करता येईल. तुमच्या जवळपासचे टायमर, अलार्म, शेअर केलेल्या मीडियाचे स्टेटस आणि जर तुम्ही HomePod वर ‘वैयक्तिक विनंत्या’ सुरू केले असेल तर तुमचे डिव्हाइसवरील फोन कॉलचे स्टेटस आणि अशा डिव्हाइसमधील निकटता स्थानिकरित्या तुमच्या जवळपासच्या Apple डिव्हाइसबरोबर शेअर केली जाऊ शकते जेणेकरून इतर लोक तुमच्या जवळपासच्या Siri एनेबल केलेले असलेल्या डिव्हाइसवरून त्यांना नियंत्रित करू शकतील.
तुमच्याकडे निवड आणि नियंत्रण आहे
तुम्ही कोणत्याही क्षणी Siri किंवा श्रुतलेखन डिसेबल करू शकता. Siri बंद करण्यासाठी, सेटिंग > Siri > ‘Siri शी बोला’ वर जा आणि ‘ऑफ करा’ वर टॅप करा, आणि सेटिंग > Siri > ‘Siri शी बोला’ वर जा आणि “Siri साठी होम दाबा” किंवा “Siri साठी साइड बटण दाबा” बंद करण्यासाठी टॅप करा. ‘श्रुतलेखन’ बंद करण्यासाठी, सेटिंग > सामान्य > ‘कीबोर्ड’ वर जा, नंतर ‘श्रुतलेखन एनेबल करा’ बंद करण्यासाठी टॅप करा. जर तुम्ही Siri आणि श्रुतलेखन दोन्ही बंद केले, तर तुमच्या डिव्हाइसवर स्टोअर केलेल्या आणि तुमचा अनुभव वैयक्तिकृत करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या Siri आणि श्रुतलेखन विनंत्यांच्या ट्रांसक्रिप्ट्स हटवल्या जातील.
तुमच्या डिव्हाइसवर स्टोअर केलेली Siri आणि श्रुतलेखन विनंत्यांची ट्रान्सक्रिप्ट्स तुम्ही सेटिंग्ज > Siri > ‘Siri व श्रुतलेखन हिस्ट्री’ ह्यावर जाऊन, ‘Siri व श्रुतलेखन हिस्ट्री हटवा’ ह्या पर्यायावर टॅप करून हटवू शकता.
तुम्ही कोणत्याही क्षणी सेटिंग > Siri > ॲप > [ॲपचे नाव] > ‘Siri विनंत्यांसह वापरा’ वर जाऊन नियंत्रित करू शकता की कोणते ॲप ‘Siri विनंत्यांना अनुमती द्या’ सह एकत्र केले जाऊ शकतात.
जर तुम्हाला ॲप्समध्ये किंवा शेअर, सर्च करताना किंवा ऐकताना ‘Siri सूचना’ नको असतील तर, तुम्ही सेटिंग > Siri वर जाऊन आणि ‘ॲप लायब्ररीमध्ये दाखवा’, ‘Spotlight मध्ये दाखवा’, ‘शेअर करताना दाखवा’, किंवा ‘ऐकताना दाखवा’ बंद करण्यासाठी टॅप करून ‘Siri सूचना’ डिसेबल करू शकता.
तुम्ही Siri कडून वैयक्तिकृत केल्या जाणाऱ्या फीचर्सची आणि Siri कडून शॉर्टकट्ससाठी सुचवल्या जाणाऱ्या ॲप्सची पूर्ण यादी सेटिंग > ‘Siri’ वर जाऊन पाहू शकता. Siri वैयक्तिकृत करण्यासाठी ॲपकडून दिली जाणारी माहिती थांबवण्यासाठी, सेटिंग > ॲप्स > [ॲपचे नाव] वर जा, नंतर ‘ह्या ॲपवरून जाणून घ्या’ बंद करण्यासाठी त्यावर टॅप करा. Siri वैयक्तिकृत करण्यासाठी ॲप क्लिपद्वारे दिली जाणारी माहिती प्रदान करणे थांबवण्यासाठी, सेटिंग > Siri > ‘ॲप क्लिप’ वर जा आणि ‘ॲप क्लिपवरून जाणून घ्या’ बंद करण्यासाठी टॅप करा.
तुम्ही स्थान सेवा एनेबल केलेल्या असल्यास, तुम्ही सेटिंग > गोपनीयता व सुरक्षा > स्थान सेवा > Siri वर जाऊन आणि ‘कधीही नाही’ वर टॅप करून Siri साठी स्थान सेवा बंद करू शकता.
तुम्ही स्थान सेवा एनेबल केलेल्या असल्यास, तुम्ही सेटिंग > गोपनीयता व सुरक्षा > स्थान सेवा > ‘सिस्टीम सेवा’ वर जाऊन आणि ‘सूचना व सर्च’ बंद करण्यासाठी टॅप करून Siri सूचनांसाठी स्थान सेवा बंद करू शकता.
तुम्हाला तुमच्या डिव्हाइसवर Siri वैयक्तिकरण सिंक करायचे नसल्यास, तुम्ही सिस्टीम सेटिंग > [तुमचे नाव] > iCloud > ’iCloud वर जतन केलेले’ > ‘सर्व पहा’ वर जाऊन, आणि Siri बंद करण्यासाठी टॅप करून Siri डिसेबल करू शकता.
तुम्ही सेटिंग > स्क्रीन टाइम > कॉण्टेण्ट व गोपनीयता निर्बंध > ‘अनुमती असलेली ॲप्स व फीचर्स’ वर जाऊन आणि ‘Siri व श्रुतलेखन’ वर टॅप करून Siri आणि श्रुतलेखन एकत्रितपणे वापरण्याची क्षमता निर्बंधितही करू शकता.
तुम्ही सेटिंग > गोपनीयता व सुरक्षा > ‘स्पीच रेकग्निशन’ वर जाऊन कोणती ॲप्स ट्रांसक्रिप्शनसाठी Siri चा वापर करू शकतात हे नियंत्रित करू शकता.
Siri, श्रुतलेखन, किंवा Siri सूचना वापरून, तुम्ही हे स्वीकर करता आणि संमती देता कीApple आणि तिच्या उपकंपन्या व एजंट यांच्याकडून ह्या माहितीचे प्रेषण करणे, संकलन करणे, त्याची देखभाल करणे, प्रक्रिया करणे, आणि वर वर्णन केल्यानुसार, Apple उत्पादने आणि सेवांमधील Siri, श्रुतलेखन, सर्च, आणि इतर भाषा प्रक्रियेची मर्यादित फंक्शनॅलिटी प्रदान केली जाऊ शकेल आणि त्यांना अधिक चांगले बनवले जाऊ शकेल. Apple ही माहिती विश्वासू थर्ड पार्टी सेवा प्रदात्याकडे प्रोसेस आणि संग्रहित करू शकते. Apple ने संकलित केलेली माहिती नेहमी Apple च्या गोपनीयता धोरणानुसार हाताळली जाईल, जे www.apple.com/in/privacy वर मिळू शकते.
2026-02-11