ClassKit व गोपनीयता
ClassKit विद्यार्थ्यांची गोपनीयता लक्षात ठेवून डिझाइन केलेले आहे.
तुमच्या शाळेने किंवा संस्थेने (‘संस्था’) विद्यार्थी प्रगती फीचर एनेबल केल्यास, प्रगतीचा अहवाल देणारे ॲप, पुस्तकातील धडा वाचणे, गणिताची समीकरण सोडवणे, किंवा प्रश्नमंजुषा सोडवणे यासारख्या दिलेल्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुमच्या प्रगतीच्या डेटाचा अहवाल देते. रिपोर्ट केलेल्या प्रोग्रेस डेटामध्ये नियुक्त ॲक्टिव्हिटीच्या प्रारंभ आणि समाप्तीच्या वेळांच्या आधारावर घालवलेला वेळ; पूर्णत्वाची टक्केवारी; होय/नाही, बरोबर/चूक आणि पूर्ण/अपूर्ण यासारखे बायनरी मूल्य; शब्दसंख्या आणि कमावलेले गुण यासारखे अंक मूल्य; आणि प्रश्नमंजुषेचे गुण यासारखी गुणसंख्या यांचा समावेश असू शकेल. प्रगती अहवालाला सपोर्ट करणारी प्रत्येक ॲक्टिव्हिटी कमीत कमी व्यतित केलेल्या वेळेचा डेटा पाठवते. हा डेटा प्रगती अहवाल देणाऱ्या ॲप कडून Apple कडे पाठवला जातो आणि तुमच्या संस्थेशी शेअर केला जातो जेणेकरुन तुमचे शिक्षक नेमून दिलेल्या ॲक्टिव्हिटी वरील तुमची शैक्षणिक प्रगती उत्तमरित्या समजू शकतील.
प्रगती डेटा तुमच्या संस्थेच्या निर्देशानुसार तुमच्या शिक्षकाकडून प्रगती कळणाऱ्या ॲपमध्ये स्पष्ट स्वरूपात नेमून दिलेल्या ॲक्टिव्हिटीसाठी कळवला जातो आणि तेव्हाच केला जातो, जेव्हा तुम्ही तुमच्या संस्थेने बनवलेल्या आणि नेमून दिलेल्या तुमच्या व्यवस्थापित केलेल्या Apple अकाउंटमध्ये साइन इन केलेले असेल. तुम्ही शेअर केल्या जात असलेल्या iPad वरून किंवा तुमच्या घरी असलेल्या iPad वरून तुमच्या मॅनेज केलेल्या Apple अकाउंटवर साइन इन केले असता पहिल्यांदा प्रगती अहवाल ॲक्सेस केल्यावर तुम्हाला विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबतच्या अहवालाची ऑनस्क्रीन सूचना प्राप्त होईल. तुम्ही प्रगतीचा-अहवाल देणाऱ्या ॲप्समधील नेमून दिलेल्या ॲक्टिव्हिटींवर जसे काम करू लागता तसे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अहवाल देण्याबाबतचा ऑनस्क्रीन नोटिफिकेशन बॅनर तात्पुरता दाखवला जाईल.
शालेय कार्य सुधारणे
तुमची संस्था ‘स्कूलवर्क’मध्ये सुधारणा करण्यासाठी Apple ला तुमच्या प्रगतीच्या डेटासह तुमच्या ‘स्कूलवर्क’च्या वापराच्या डेटावर मशीन लर्निंगसारख्या पद्धतींचा वापर करून प्रक्रिया करण्याची अनुमती देऊ शकते. डेटावर प्रक्रिया केली जाण्यापूर्वी, तो तुमच्याशी लिंक केला जाऊ नये यासाठी तो वैविध्यपूर्ण गोपनीयतेसारख्या गोपनीयता राखण्याच्या तंत्रांच्या अधीन असतो. उदाहरणार्थ, Apple तुमच्या डि-आयडेटिफाइ किंवा सम्मुचित केलेला स्कूलवर्क डेटा वापरातील ट्रेंड समजून घेण्यासाठी, यूझर अनुभव कस्टमाइझ करण्यासाठी, आणि स्कूलवर्कसाठी नवीन शैक्षणिक फीचर विकसित करण्यासाठी प्रोसेस करू शकते. तुमच्या संस्थेने हे वैशिष्ट्य एनेबल केल्यावर तुम्ही तुमच्या मॅनेज केलेल्या Apple अकाउंटवरून पहिल्यांदा ‘स्कूलवर्क’ ॲक्सेस केले असता तुम्हाला एक ऑनस्क्रीन नोटिफिकेशन प्राप्त होईल. तुमच्या संस्थेकडे या फीचरमुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांना वेगवेगळे करण्याची क्षमता असते. बंद करण्यासाठी तुमच्या संस्थेशी संपर्क साधा.
पारदर्शकता आणि नियंत्रण
प्रगती अहवाल देणाऱ्या ॲपकडून कोणता प्रगती डेटा Apple ला पाठवला जातो आणि तुमच्या संस्थेसह शेअर केला जातो हे तुम्ही सेटिंग > वर्गातील प्रगती वर जाऊन पाहू शकता. तुमच्या डिव्हाइसवर ‘स्कूलवर्क’ इन्स्टॉल केलेले असल्यास तुम्ही तुमच्या प्रगती डेटाचे पूर्ण दृश्य देखील पाहू शकता.
Apple School Manager करारापत्रातील अटीनुसार तुमच्या प्रगती डेटासाठी तुमची संस्था जबाबदार असते. ‘विद्यार्थी प्रगती’ फीचर एनेबल करावयाचे की नाही हे तुमची संस्था कंट्रोल करते आणि विद्यार्थ्यांच्या विनंतीवर त्यांची प्रगती शेअर करणे बंद करण्याची क्षमता त्यांच्याजवळ असते. तुम्हाला तुमच्या संस्थेबरोबर तुमची प्रगती शेअर करणे थांबवायचे असल्यास किंवा तुम्ही तुमचा प्रगतीविषयक डेटा हटवायचा असल्यास, तुमच्या संस्थेशी संपर्क साधा.
Apple तुमचा प्रगती डेटा स्टोअर करत असताना स्थिर आणि प्रवासात असताना तो डेटा एनक्रिप्ट केलेल्या स्वरूपात असेल. तुमचा डेटा कशारीतीने स्टोअर केला जातो याबाबतच्या अधिक माहितीसाठी support.apple.com/102651 वरील आमचा iCloud सुरक्षा ओव्हरव्ह्यू पाहा.
रिटेन्शन
Apple तुमच्या संस्थेने सूचना दिल्याप्रमाणे कोणताही प्रगती डेटा राखून ठेवते. जर तुम्ही तुमचा डेटा हटवण्यास किंवा तुमचे मॅनेज केले जात असलेले Apple अकाउंट हटवण्यास तुमच्या संस्थेला सांगितल्यास आणि तुमच्या संस्थेने Apple ला तसे करण्याची सूचना दिल्यास Apple आपल्या सर्व्हरवरून डेटा 30 दिवसांच्या आत हटवेल.
तुमच्या संस्थेने तुम्हाला Apple School Manager मधील क्लासमधून काढून टाकल्यास, तुमचा त्या क्लाससाठीचा विद्यार्थी प्रगती डेटा हटवण्यात येईल. तुमच्या संस्थेकडून Apple School Manager क्लासचे काढून टाकल्या जाण्याने ते सर्व संबंधित डेटा देखील हटवेल.
डेव्हलपर
आम्ही ClassKit ला स्वीकारणाऱ्या सर्व डेव्हलपरवर अतिरिक्त बंधने ठेवली आहेत. आमच्या App Store वर एखादे ॲप प्रकाशित करण्याबाबत असलेल्या मानक आवश्यकतांची पूर्तता करण्याबरोबर, ClassKit चा अवलंब करणाऱ्या डेव्हलपरनी ClassKit चा वापर शैक्षणिक सेवा प्रदान करण्यासाठी करत असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. त्यांनी त्यांच्या संपूर्ण डेटाच्या वापरासाठी सुयोग्य आणि परिपूर्ण गोपनीयता धोरण देखील देणे आवश्यक आहे.
Apple कडून Apple School Manager कराराच्या अंतर्गत असलेल्या ज्यांना मॅनेज केलेल्या Apple अकाउंटची आवश्यकता असते अशा दिल्या जाणाऱ्या सेवांसंबंधी गोळा केलेली माहिती Apple च्या गोपनीयता धोरणानुसार हाताळली जाईल जे www.apple.com/in/privacy येथे आणि school.apple.com येथील Apple School Manager कराराच्या सेक्शन 3 आणि एक्झिबिट A येथे मिळू शकेल. Apple च्या गोपनीयता धोरण आणि Apple School Manager कराराचा विभाग 3 आणि एक्झिबिट A यांमध्ये काही परपस्परविरोध आढळल्यास Apple School Manager कराराचा विभाग 3 आणि एक्झिबिट A ला प्राधान्य दिले जाईल.
2025-12-12