आपत्कालीन SOS व गोपनीयता
आपत्कालीन SOS तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहे आणि तुम्ही काय शेअर करता हे निवडण्यासाठी तुम्हाला एनेबल करते.
![]()
- आपत्कालीन सेवांना कॉल करण्यासाठी आपत्कालीन SOS वापरत असताना, डिस्पॅचरला तुम्हाला सहायता करण्याची अनुमती देण्यासाठी कॉलमध्ये तुमच्या स्थानाचा समावेश होऊ शकतो, मग तुम्ही स्थान सेवा एनेबल केलेल्या असो किंवा नसो.
- कॉल समाप्त झाल्यावर आणि जर तुम्ही संदेश ॲप अनइन्स्टॉल केले नसेल, तर तुम्ही तुमच्या आपत्कालीन संपर्कांना तुमचे स्थान आणि तुम्ही आपत्कालीन सेवांना कॉल केल्याच्या नोटिफिकेशनसह संदेश पाठवण्याचा पर्याय निवडू शकता.
आपत्कालीन SOS ने, तुम्ही मदतीसाठी त्वरित आणि सहजपणे कॉल आणि तुमच्या आपत्कालीन संपर्कांना सतर्क करू शकता. जेव्हा तुम्ही आपत्कालीन SOS ने कॉल करता, तेव्हा तुमचे डिव्हाइस ऑटोमॅटिकली स्थानिक आपत्कालीन नंबरला कॉल करते. काही देश किंवा प्रदेशांमध्ये, तुमची आपत्कालीन सेवा म्हणून डिझाइन करून हवी असलेली सेवा तुम्हाला निवडावी लागण्याची शक्यता आहे. डिस्पॅचरला सहाय्यता करण्याची अनुमती देण्यासाठी या कॉलमध्ये तुमच्या स्थानाचा, समावेश केला जाऊ शकतो, जरी तुम्ही स्थान सेवा एनेबल केली असेल किंवा नसेल. एकदा का कॉल संपल्यावर, तुम्ही आपत्कालीन सर्व्हिसना कॉल केला आहे असे सांगणाऱ्या संदेशासह; तुमच्या आपत्कालीन संपर्कांना सूचित करण्याचे तुम्ही निवडू शकता. ह्या संदेशामध्ये तुमचे सध्याचे स्थानदेखील समाविष्ट केले जाते. iPhone वर आरोग्य ॲपमध्ये तुमचे वैद्यकीय ID संपादित करून तुम्ही आपत्कालीन संपर्कांना मॅनेज करू शकता.
मर्यादित कालावधीसाठी, तुमचे डिव्हाइस तुमच्या आपत्कालीन संपर्कांना तुमचे स्थान जसे बदलेल त्यानुसार ‘संदेश’ ॲप वापरून अपडेट पाठवेल. असे झाल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होईल. तुम्ही तुमच्या Apple Watch वर आपत्कालीन SOS वापरता; तेव्हा तुम्ही तुमच्या Apple Watch वरील नोटिफिकेशनमध्ये ‘शेअर करणे थांबवा’ वर टॅप करून ह्या अपडेटना थांबवू शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या iPhone वर आपत्कालीन SOS चा वापर करता, तेव्हा तुमच्या iPhone वरील स्टेटस बारवर टॅप करून आणि ‘आपत्कालीन स्थान शेअर करणे बंद करा’ निवडून तुम्ही ह्या अपडेटना बंद करू शकता.
स्थान सेवा डिसेबल केलेल्या असल्यास, तुमच्या आपत्कालीन संपर्कांना तुमच्या स्थानासह सूचित करण्यासाठी त्या तात्पुरत्या एनेबल केल्या जातील. तुमचे स्थान शेअर केले जात असताना, तुम्हाला 24 तासांसाठी दर चार तासांनी थांबण्याचे रिमाइंडर मिळत राहतील. तुम्हाला तुमचे स्थान तुमच्या आपत्कालीन संपर्कांना पाठवायचे नसल्यास, तुमच्या iPhone वरील सेटिंग > गोपनीयता आणि सुरक्षा > स्थान सेवा > सिस्टीम सेवांवर जा आणि आपत्कालीन कॉल आणि SOS बंद करण्यासाठी टॅप करा.
2025-12-12