आरोग्य नोंदी व गोपनीयता
आरोग्य नोंदी तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहे आणि तुम्ही काय शेअर करता हे निवडण्यासाठी तुम्हाला एनेबल करते.
आरोग्य नोंदी तुम्हाला तुमच्या आरोग्य सेवा प्रदात्यासह थेट कनेक्शनद्वारे तुमच्या iPhone किंवा iPad मध्ये आरोग्य नोंदी ऑटोमॅटिकली डाउनलोड करण्याची अनुमती देते. तुम्हाला ह्या फीचरसह प्राप्त झालेल्या कोणत्याही आरोग्य नोंदी एनक्रिप्ट स्वरुपात संग्रहित आणि तुमच्या डिव्हाइसवर पासकोडने संरक्षित केलेल्या असतात.
तुम्हाला आरोग्य नोंदींना सपोर्ट करतील अशा हेल्थकेअर प्रोव्हायडर शोधून देण्यास तुमची मदत करण्यासाठी Apple तुमच्या प्रोव्हायडरचा सर्च नावाने करू शकते. तुमच्या संमतीने, तुमच्या डिव्हाइसच्या स्थानाचा वापर भौगोलिकरित्या संबंधित परिणाम प्रदान करण्यासाठी केला जाईल. जेव्हा तुम्ही तुमच्या आरोग्य देखभाल प्रदात्याला लोकेट करता, तेव्हा तुम्हाला तुमच्या पेशंट लॉगिन माहितीने प्रमाणित करण्यास सांगितले जाईल. आरोग्य नोंदी तुमच्या iPhone किंवा iPad मध्ये ऑटोमॅटिकली डाउनलोड केल्या जातील. तुमचे डिव्हाइस एका सुरक्षित टोकनचा वापर करेल ज्याचा वापर आरोग्य नोंदी प्राप्त करण्यासाठी केला जाईल. आरोग्य ॲप तुमच्या रुग्णाची लॉग इन माहिती स्टोअर करत नाही.
तुमच्या आरोग्य नोंदींसारखा ‘आरोग्य’ ॲपवरील डेटा iCloud च्या साहाय्याने तुमच्या सर्व डिव्हाइसवर ऑटोमॅटिकली अप टू डेट ठेवला जाईल जो प्रवासादरम्यान आणि स्थिर असताना एनक्रिप्ट केलेल्या स्थितीमध्ये असेल. हे फीचर डिसेबल करण्यासाठी, सेटिंग > [तुमचे नाव] > iCloud वर जा आणि ‘आरोग्य’ बंद करण्यासाठी टॅप करा.
तुम्ही तुमचे अकाउंट काढून टाकून कोणत्याही क्षणी आरोग्य नोंदी प्राप्त करणे थांबवू शकता. असे करण्यासाठी, आरोग्य ॲप उघडा, ब्राउझ टॅबवर टॅप करा, तुमच्या प्रोफाइलवर टॅप करा, आरोग्य नोंदीवर टॅप करा, आणि तुम्हाला काढून टाकायचे आहे ते अकाउंट सिलेक्ट करा, नंतर ‘अकाउंट काढून टाका’ वर टॅप करा. तुमचे अकाउंट काढून टाकून, त्या अकाउंटशी संबंधित नोंदी तुमच्या डिव्हाइसवरून हटवल्या जातील.
जर तुम्ही पेशंट लॉगइन माहिती किंवा आरोग्य नोंदीच्या कॉण्टेण्टबरोबर काही समस्यांचा अनुभव घेत असल्यास, तुमच्या आरोग्य सेवा प्रदात्याशी संपर्क साधावा.
तुम्ही तुमच्या iPhone किंवा iPad वर डाउनलोड केलेल्या ‘आरोग्य नोंदीं’मध्ये तुमची संपूर्ण वैद्यकीय हिस्ट्री दिसणार नाही आणि त्याला तुमच्या अधिकृत आरोग्य नोंदींचा किंवा प्रोफेशनल वैद्यकीय निदानाचा पर्याय म्हणून लक्षात घेतले जाऊ नये. तुम्ही तुमच्या आरोग्याशी संबंधित कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या आरोग्य सेवा प्रोव्हायडरशी संपर्क साधायला हवा.
Apple ने संकलित केलेली माहिती नेहमी Apple च्या गोपनीयता धोरणानुसार हाताळली जाईल, जे www.apple.com/in/privacy वर मिळू शकते
2025-12-12