iCloud कीचेन व गोपनीयता

iCloud कीचेन तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहे आणि तुम्ही काय शेअर करता हे निवडण्यासाठी तुम्हाला एनेबल करते.


iCloud कीचेन तुम्ही iCloud मध्ये जतन केलेल्या संकेतस्थळांचे यूझरनेम्स, पासवर्ड्स, क्रेडिट कार्ड नंबर्स आणि मुदत समाप्तीचा दिनांक स्टोअर करते आणि त्यांना तुम्ही मान्यता दिलेल्या सर्व iOS 7 किंवा त्यानंतरच्या डिव्हाइसेस आणि तुमच्या Mac संगणकांवर रन होणाऱ्या OS X Mavericks (10.9) किंवा त्यानंतरच्या व्हर्जनवर अद्ययावत ठेवते.

जेव्हा तुम्ही iCloud कीचेन सुरू कराल, तेव्हा तुम्ही यूझरनेम, पासवर्ड किंवा क्रेडिट कार्डची माहिती प्रविष्ट केल्यावर Safari चे ऑटोफिल फीचर ती जतन करण्यासाठी तुम्हाला प्रॉम्प्ट करेल. एकदा जतन केल्यानंतर, यूझरनेम, पासवर्ड किंवा क्रेडिट कार्डची माहिती ऑटोफिल केली जाईल, जेणेकरून तुम्हाला ते पुन्हा प्रविष्ट करावे लागणार नाहीत. Safari ऑटोफिल आणि iCloud कीचेनमध्ये तुमचा क्रेडिट कार्ड सुरक्षा कोड संग्रहित केला जाणार नाही. उदाहणार्थ, Safari मध्ये खरेदी करत असताना, तुम्हाला जे क्रेडिट कार्ड वापरायचे आहे ते सिलेक्ट करा आणि Safari ऑटोमॅटिकली क्रेडिट कार्डचा नंबर व समाप्तीची दिनांक भरेल. खरेदी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आत्ता देखील सुरक्षा कोड प्रविष्ट करण्याची गरज असेल. Safari चा ‘पासवर्ड जनरेटर’ तुमच्या ऑनलाइन अकाउंटसाठी यूनिक, अंदाज लावण्यास अवघड पासवर्ड सुचवू शकेल आणि ते स्टोअर करून ठेवण्यासाठी iCloud ‘कीचेन’ चा वापर करेल. तुम्ही बॅकअपने तुमचे डिव्हाइस रीस्टोअर केल्यास, iCloud कीचेन तुमच्या जतन केलेल्या अकाउंटमध्ये ऑटोमॅटिकली साइन इन करू शकते. iCloud कीचेन सेट अप करण्याविषयी अधिक माहितीसाठी, support.apple.com/109016 वर जा.

तुमची iCloud ‘कीचेन’ तुमच्या डिव्हाइसवर पाठवली जात असताना आणि iCloud वर स्टोअर केले जात असताना एनक्रिप्ट केलेले असते, आणि ते Apple कडून वाचले जात नाही.

2025-12-12