iCloud प्रायव्हेट रिले व गोपनीयता
iCloud प्रायव्हेट रिले तुम्हाला अधिक सुरक्षित आणि खाजगी मार्गाने वेबशी कनेक्ट करण्याची आणि वेब ब्राउझ करण्याची अनुमती देते.
iCloud प्रायव्हेट रिले (‘प्रायव्हेट रिले’) ही iCloud+ सदस्यतेचा भाग म्हणून ऑफर केली जाणारी नवीन इंटरनेट गोपनीयता सेवा आहे जी तुमच्या Safari वेब ब्राउझिंगची सुरक्षा करते, जेणेकरून कोणतीही एंटिटी, अगदी Apple किंवा नेटर्वक प्रोव्हायडरदेखील तुम्हाला तुमच्या इंटरनेट ब्राउझिंगशी जोडू शकणार नाही. प्रायव्हेट रिले एनक्रिप्ट न केलेल्या ट्रॅफिकला देखिल एनक्रिप्ट करतो जेणेकरून तुमचे डिव्हाइस तसेच क्वेरी डोमेन नेम सर्व्हर (DNS) मध्ये राहतात — ही अशी सिस्टीम आहे जी संकेतस्थळांच्या नावांचे रूपांतर इंटरनेट प्रोटोकॉल (IP) ॲड्रेसमध्ये करते — ज्यामुळे तुमची गोपनीयता अधिक सुरक्षित ठेवली जाते. प्रायव्हेट रिले केवळ iOS, iPadOS, visionOS, आणि macOS वर उपलब्ध आहे.
तुमच्या इंटरनेट कनेक्शन विनंत्या वेगवेगळ्या एंटिटीकडून चालवल्या जाणाऱ्या दोन वेगवेगळ्या रिलेमार्फत रूट होतात. पहिल्याला तुमचा IP ॲड्रेस माहीत असतो परंतु त्या संकेतस्थळाची माहिती नसते ज्याच्यावर तुम्ही जात आहात. डेस्टिनेशन संकेतस्थळाची एक सामान्य ओळख आणि स्थान प्रदान करण्याऐवजी, दुसऱ्या एंटिटिला त्या संकेतस्थळाची माहिती असते ज्याच्यावर तुम्ही जात आहात, परंतु त्याला तुमच्या IP ॲड्रेसची माहिती नसते. अशा प्रकारे, कोणत्याही एका एंटिटीला तुमची आणि तुम्ही पाहिलेली संकेतस्थळे अशा दोन्हींची ओळख करण्याची माहिती नसते.
तुमच्या गोपनीयतेची सुरक्षा करण्यास परंतु त्याचबरोबर संकेतस्थळांना तुमच्या प्रदेशातच कॉण्टेण्ट उपलब्ध करून देण्याची परवानगी देण्यासाठी, प्रायव्हेट रिले तुमच्या मूळ IP ॲड्रेसच्या सार्वजनिक स्वरूपात माहिती असलेल्या स्थानावरून अंदाजित प्रदेशाची गणना करतात. तुमचे डिव्हाइस ही अंदाजे प्रदेश माहिती एनक्रिप्ट केलेल्या स्वरूपात दुसऱ्या रिलेला पाठवते, तो या माहितीचा वापर जेनेरिक IP ॲड्रेस मिळवण्यासाठी करते ज्याला अंतिम डेस्टिनेशनला पाठवले जाते. प्रायव्हेट रिलेचा वापर करताना, तुम्ही तुमच्या जवळच्या व्यवसायांना शोधण्यास सक्षम असाल, परंतु संकेतस्थळ फक्त IP ॲड्रेस पाहतील जे कोणत्याही अंदाजे क्षेत्राशी मिळते जुळते असतील आणि कोणत्याही विशिष्ट व्यक्तीशी जुळणारे नाहीत. तुम्ही तुमच्या iOS, iPadOS, किंवा visionOS डिव्हाइसवर सेटिंग > [तुमचे नाव] > iCloud > प्रायव्हेट रिले > ‘IP ॲड्रेस स्थान’ वर जाऊन, ‘देश आणि काल विभाग वापरा’ चालू करण्यासाठी टॅप करून हे स्थान सेटिंग डिसेबल करू शकता आणि संकेतस्थळांना कमी अचूक स्थान माहिती प्रदान करू शकता. Mac वर, सिस्टीम सेटिंग > [तुमचे नाव] > iCloud > प्रायव्हेट रिले वर जा.
तुम्ही सेटिंग > [तुमचे नाव] > iCloud > प्रायव्हेट रिले वर जाऊन, नंतर ‘प्रायव्हेट रिले’ बंद करण्यासाठी टॅप करून प्रायव्हेट रिले कोणत्याही क्षणी डिसेबल करू शकता. तुम्ही तुमच्या iOS आणि iPadOS, किंवा visionOS डिव्हाइसवर सेटिंग > Wi-Fi वर जाऊन, तुमच्या नेटवर्क पुढील ‘माहिती’ बटणावर टॅप करून, आणि त्यानंतर iCloud प्रायव्हेट रिले बंद करण्यासाठी टॅप करून विशिष्ट Wi-Fi नेटवर्कसाठी प्रायव्हेट रिले कोणत्याही क्षणी डिसेबल करू शकता. Mac वर, सिस्टीम सेटिंग > [तुमचे नाव] > iCloud > प्रायव्हेट रिले वर जा, ‘पर्याय’ वर क्लिक करा, त्यानंतर ‘iCloud प्रायव्हेट रिले’ डिसेबल करण्यासाठी ‘बंद करा’ वर क्लिक करा.
Apple कडून वैयक्तिक डेटा तोपर्यंतच ठेवून घेतला जाता जोपर्यंत Apple चे गोपनीयता धोरण किंवा आमच्या सेवा-विशिष्ट गोपनीयता नोटिशीमध्ये सांगितलेल्या उद्देशांसह त्याच्या संग्रहणाच्या उद्देशाच्या पूर्ततेसाठी आवश्यक असतो किंवा कायद्याने त्याला राखून ठेवणे आवश्यक असते. राखून ठेवण्याच्या कालावधीचे मूल्यांकन करत असताना, आम्ही सर्वप्रथम संकलित केलेला वैयक्तिक डेटा राखून ठेवणे आवश्यक आहे का याचे लक्षपूर्वक तपासणी करतो आणि, तो राखून ठेवणे आवश्यक असल्यास, कायद्याने परवानगी दिलेल्या सर्वात कमी कालावधी साठी वैयक्तिक डेटाला राखून ठेवण्याचे काम करतो.
Apple ने संकलित केलेली माहिती नेहमी Apple च्या गोपनीयता धोरणानुसार हाताळली जाईल, जे www.apple.com/in/privacy वर मिळू शकते
2025-12-12