वॉलेट मधील ID व गोपनीयता
‘वॉलेट’ मधील ओळखपत्रे लोकांना त्यांचे ओळखपत्र सादर करण्याचा सोपा, वेगवान आणि अधिक सुरक्षित मार्ग प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेली आहेत.
![]()
- तुमच्या डिजिटल ओळखपत्र जारी करणाऱ्या अधिकाऱ्यांना एकतर Apple असेल किंवा तुमचे सरकार असेल, ह्यापैकी कोणालाही तुम्ही तुमचे ओळखपत्र कधी आणि कोणाला सादर करता ह्याबद्दल माहिती नसते.
- Apple तुमच्या ओळखपत्राच्या इमेजेस स्टोअर करू शकत नाही. फसवणूक टाळण्यासाठी आणि तुमचा ID ‘वॉलेट’ मध्ये डिस्प्ले करण्यासाठी Apple तुमच्या ओळखपत्रातील केवळ मर्यादित माहिती वापरते.
- तुमचे ओळखपत्र ‘वॉलेट’ मध्ये सादर करताना, तुमचे डिव्हाइस तुम्हाला विनंती केलेली विशिष्ट माहिती दाखवेल आणि तुमच्या पुष्टीकरणाशिवाय ती माहिती सादर करणार नाही.
- तुमचे ओळखपत्र ‘वॉलेट’ मार्फत समाविष्ट करताना, तुमच्या ओळखीविषयीची माहिती आणि तुमचे Apple अकाउंट, आणि डिव्हाइसच्या वापराचे पॅटर्न्स आणि सेटिंगबद्दलची माहिती तुमच्या ओळख पडताळणीसाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी डिजिटल ओळखपत्र जारी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून वापरली जाईल.
- तुमचे ओळखपत्र समाविष्ट करत असताना Live Photo आणि रेकॉर्ड केलेल्या चेहरा व डोक्याची हालचाल ह्यासारखी तुम्ही सबमिट केलेली अतिरिक्त पडताळणी माहिती Apple कडून ह्या फीचरसाठी फसवणूक टाळण्यासाठी वापरली जाईल आणि डिजिटल ओळखपत्र जारी करणाऱ्या अधिकाऱ्याने तुमचे ओळखपत्र ‘वॉलेट’ मध्ये समाविष्ट करणे अधिकृत करेपर्यंत किंवा नकार देईपर्यंतच राखून ठेवली जाईल.
‘वॉलेट’ मधील ID लोकांना त्यांचे ओळखपत्र सादर करण्याचा सोपा, वेगवान आणि अधिक सुरक्षित मार्ग प्रदान करतात.
तुमचे ओळखपत्र समाविष्ट केले जात आहे
‘वॉलेट’ मार्फत तुमचे शासकीय ओळखपत्र समाविष्ट करणे
ओळखपत्र समाविष्ट करण्यासाठी, तुम्हाला तुमचा चालकाचा परवाना किंवा शासकीय ओळखपत्र ह्यासारख्या सरकारी ओळखपत्राच्या पुढील आणि मागील बाजूचे छायाचित्र काढण्यास सांगितले जाईल. तुम्ही प्रदान करत असलेल्या इमेजेस तुमच्या जारीकर्त्या सरकारी अधिकाऱ्यांकडून स्वीकारल्या जातील ह्याची खात्री करण्यास मदत करण्यासाठी तुमचे डिव्हाइस इमेजेसची गुणवत्ता आणि प्रकाराचे मूल्यांकन करेल. तुमच्या ओळख पत्राच्या इमेजेस डिव्हाइसवर एनक्रिप्ट केल्या जातात आणि तुमच्या जारीकर्त्या सरकारी अधिकाऱ्यांकडे पाठवल्या जातात, ज्या ते त्यांच्या थर्ड पार्टी ओळख पडताळणी सेवा प्रदात्याबरोबर शेअर करू शकतात; Apple तुमच्या ओळखपत्राच्या इमेजेस पहात किंवा स्टोअर करत नाही. तुमचे डिव्हाइस तुमच्या ओळखपत्रावरील बारकोड वाचेल आणि ओळख पडताळणी आणि फसवणुकीला प्रतिबंध करण्यासाठी Apple बरोबर नाव, पत्ता व जन्मदिनांक शेअर करेल. Apple च्या अंतर्निहित प्लॅटफॉर्मवर फिचरला सपोर्ट करण्यासाठी आणि फसवणूकीला प्रतिबंधित करण्यासाठी, ओळख माहितीची पडताळणी यशस्वी झाली की नाही यासारखे पडताळणीचे निकाल यांच्या बद्दलच्या माहितीला संग्रहित करणे Apple पुढे सुरू ठेवू शकेल, परंतु Apple अंतर्निहित ओळख माहिती(जसे की तुमच्या बारकोडने वाचलेली जन्मतारीख) संग्रहित करणार नाही.
आयडेंटिटी कार्ड ज्याचे आहे तीच व्यक्ती वॉलेटमध्ये आयडेंटिटी कार्ड समाविष्ट करत असल्याची खात्री करून घेण्यासाठी तुम्हाला स्वतःचे लाइव्ह छायाचित्र काढण्यास सांगितले जाईल. तुमचे डिव्हाइस तुमच्याकडून प्रदान केल्या जाणाऱ्या Live Photo च्या स्थिर फ्रेमच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करेल ज्यामुळे हे निश्चित केले जाऊ शकेल की तुमच्याकडून प्रदान केले जाणारे स्थिर फ्रेम छायाचित्र तुमच्या जारीकर्ता सरकारी अधिकाऱ्यांना स्वीकारार्ह असेल. तुमच्या Live Photo मधील ही स्थिर फ्रेम डिव्हाइसवर एनक्रिप्ट केली जाईल आणि तुमच्या जारीकर्त्या सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्याकडे ओळखपत्रासाठी फाइलवर असलेल्या इमेजबरोबर तुलना करण्यासाठी पाठवली जाईल. तुमचे जारीकर्ते सरकारी अधिकारी या स्थिर फ्रेम छायाचित्रावर त्यांच्या गोपनीयता धोरणांनुसार प्रक्रिया करतील, ज्यामुळे कदाचित त्यांना चेहऱ्याची ओळख करणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची अनुमती दिली जाईल. फसवणुकीला प्रतिबंध करण्यास मदत करण्यासाठी, तुमच्या जारीकर्त्या सरकारी अधिकाऱ्यांकडे तुमचे स्थिर फ्रेम छायाचित्र सबमिट केले जाण्यापूर्वी, तो Live Photo जिवंत व्यक्तीचा आहे आणि तीच जिवंत व्यक्ती ‘वॉलेट’ मध्ये तिचे ओळखपत्र समाविष्ट करण्याचा भाग म्हणून तिचे स्थिर फ्रेम छायाचित्र सबमिट करत असल्याची खात्री करण्यास मदत करण्यासाठी तुमच्या Live Photo चे तुमचे डिव्हाइस आणि Apple कडून मूल्यांकन केले जाईल. तुम्हाला चेहऱ्याच्या आणि डोक्याच्या एकामागोमाग एक अशा अनेक हालचाली करण्यास देखील सांगितले जाऊ शकेल ज्याचे तुमच्या Live Photo प्रमाणेच डिव्हाइस आणि Apple कडून मूल्यमापन केले जाईल. तुमच्या Live Photo किंवा लागू असल्यास तुमच्या हालचालीबद्दलची माहिती, मात्र Live Photo किंवा हालचालींचे रेकॉर्डिंग नव्हे, अशा प्रकारे संग्रहित केली जाते की ती तुमच्या ID जोडण्याच्या प्रक्रियेदरम्यान तुमच्याशी संबद्ध होते.
तुमचे Apple अकाउंट, डिव्हाइसच्या वापराचे पॅटर्न्स आणि सेटिंग, तुम्ही तुमचे शासकीय ओळखपत्र (तुमची स्थान सेवा एनेबल असल्यास) समाविष्ट करण्याच्या वेळी तुमच्या डिव्हाइसचे स्थान आणि तुमचा Live Photo, किंवा चेहरा आणि डोक्याच्या हालचाली ह्याविषयीची माहिती फसवणुकीस प्रतिबंध करण्यासाठी Apple बरोबर शेअर केली जाईल. Apple ह्या माहितीच्या आधारावर फसवणूक संकेतकांना तुमच्या जारीकर्त्या सरकारी अधिकाऱ्यांबरोबर फसवणुकीस प्रतिबंध करण्यासाठी शेअर करेल. Apple नव्हे तर तुमचे जारी करणारे सरकारी अधिकारी ‘वॉलेट’ मध्ये तुमचे ओळखपत्र समाविष्ट करण्यास अधिकृत करायचे की नाही हे ठरवतील. काही प्रकरणांमध्ये, तुमचा जारीकर्ता सरकारी अधिकारी अधिक माहिती मागू शकेल किंवा प्रत्यक्ष जाऊन भेटण्यास सांगू शकेल. Apple ह्या वस्तुस्थितीविषयी संबंधित माहिती प्राप्त करू शकते की तुमच्या जारीकर्त्या सरकारी अधिकाऱ्याला अतिरिक्त पडताळणीची आणि पडताळणीच्या प्रकाराची आवश्यकता होती (जसे व्यक्तिशः उपस्थित राहणे); Apple फीचरला मॅनेज करण्यासाठी आणि अधिक चांगले बनवण्यासाठी ही माहिती अशाप्रकारे राखून ठेवते की तिला फक्त तेवढ्या वेळीच तुमच्याबरोबर लिंक केली जाऊ शकेल जेव्हा जारीकर्ता सरकारी अधिकारी ‘वॉलेट’ मध्ये तुमचे ओळखपत्र समाविष्ट करणे अधिकृत करण्याच्या बाबतचा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये असतो. काही प्रकरणामध्ये, तुमचा जारीकर्ता सरकारी अधिकारी तुम्हाला त्याच्या अतिरिक्त माहितीच्या रिव्ह्यूनंतर पडताळणी कोड प्रदान करू शकेल. हा पडताळणी कोड डिव्हाइसवर एनक्रिप्ट केलेला असतो आणि जारीकर्त्या सरकारी अधिकाऱ्याकडे पाठवला जातो; Apple पडताळणी कोड पहात किंवा तो स्टोअर करून ठेवत नाही. तुमचा जारीकर्ता सरकारी अधिकारी त्याच्या अधिकृत मंजुरीबद्दलची माहिती (उदाहरणार्थ, रिव्ह्यू केले जात आहे, स्वीकारले आहे) Apple ला देईल जेणेकरून Apple कदाचित तुमच्या डिव्हाइसवर अपडेट्स पाठवेल आणि वॉलेटमधील तुमचे ओळखपत्र मॅनेज करण्यास मदत करेल.
‘वॉलेट’ मार्फत तुमचे डिजिटल ID कार्ड समाविष्ट करणे
हे फीचर केवळ युनायटेड स्टेट्स मध्येच उपलब्ध आहे.
तुमचा डिजिटल ID समाविष्ट करण्यासाठी, तुमच्या पासपोर्टमध्ये तुमच्या डिव्हाइसला ‘इ पासपोर्ट’ चिप ॲक्सेस करण्याची अनुमती देण्यासाठी तुम्हाला तुमचा iPhone वापरून ‘मशीन रिडेबल झोन’ (MRZ) टेक्स्ट तुमच्या पासपोर्ट छायाचित्र पृष्ठावर स्कॅन करण्यास सांगितले जाईल. इ पासपोर्ट वाचण्यासाठी, तुमच्या डिव्हाइसमधील सूचनेप्रमाणे, तुम्हाला तुमचा iPhone तुमच्या पासपोर्टवर ठेवणे गरजेचे आहे. इ पासपोर्ट मधील माहिती प्रमाणित करण्यासाठी तुमचे डिव्हाइस MRZ आणि इ पासपोर्ट डेटा Apple ला पाठवेल. तुमच्या डिव्हाइसवर तुमचा डिजिटल ID प्रदान करण्यासाठी आणि मॅनेज करण्यात मदत करण्यासाठी, त्याचप्रमाणे फसवणूक टाळण्यासाठी, Apple तुमच्या पासपोर्ट माहितीचा काही भाग एनकोड आणि स्टोअर करते. पासपोर्ट ज्याचा आहे तीच व्यक्ती वॉलेटमध्ये डिजिटल ID कार्ड समाविष्ट करत असल्याची खात्री करून घेण्यासाठी, शासकीय ओळखपत्रासाठी वर वर्णन केल्याप्रमाणेच तुम्ही स्वतःचा Live Photo काढणे आवश्यक असेल. डिजिटल ID साठी, डिजिटल ID जारीकर्ता अधिकारी म्हणून ही माहिती केवळ Apple ला पाठवली जाते, आणि तुमच्या राज्य सरकार किंवा केंद्रसरकारला पाठवली जात नाही. तुमचा डिजिटल ID जारी करायचा की नाही, आणि फसवणूक टाळण्यासाठी, तुमचा Live Photo, तुमचे Apple अकाउंट, डिव्हाइस वापराचे पॅटर्न्स आणि सेटिंग, आणि तुम्ही डिजिटल ID कार्ड (तुमची स्थान सेवा एनेबल असल्यास) समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत असतानाचे डिव्हाइसचे स्थान ह्याबद्दलची माहिती Apple संग्रहित करेल आणि वापरेल. तुम्ही तुमचा ID समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेत असताना तुमचे Live Photo, आणि तो Live Photo नसल्याची माहिती तुमच्याशी संबंधित अशा पद्धतीने स्टोअर केली जाते. तुम्ही Apple ला तुमचा Live Photo मॅन्युअली रिव्ह्यू करण्याची अनुमती देण्याचे निवडल्यास, पुढील ‘ओळखपत्र सुधारणे’ विभागामध्ये सांगितल्याप्रमाणे, कदाचित Apple कडून थोड्या काळासाठी Live Photo स्टोअर केला जातील.
तुमचे ओळखपत्र जारीकर्त्या अधिकाऱ्याच्या ॲपमार्फत समाविष्ट करणे
हे फीचर केवळ जपानमध्येच उपलब्ध आहे.
जारीकर्त्या सरकारी अधिकाऱ्यांच्या ॲपमार्फत ‘वॉलेट’ मध्ये ओळखपत्र समाविष्ट करण्यासाठी, तुम्हाला जारीकर्त्या अधिकाऱ्यांच्या अटी आणि शर्तींशी सहमत होणे गरजेचे असेल आणि तुम्हाला तुमची ओळख जारीकर्त्या सरकारी अधिकाऱ्यांना सिद्ध करण्यासाठी आणि तुमच्या ओळखपत्रासाठी PIN किंवा पासवर्ड सेट अप करण्यासाठी पायऱ्या पूर्ण करणे गरजेचे असेल. तुमचा PIN किंवा पासवर्ड जारीकर्त्या सरकारी अधिकाऱ्यांच्या ॲपमार्फतच अपडेट केला जाऊ शकतो. Apple ला जारीकर्त्या सरकारी अधिकाऱ्यांच्या ॲपमध्ये कोणतीही माहिती मिळत नाही. Apple नव्हे तर तुमचे जारी करणारे सरकारी अधिकारी ‘वॉलेट’ मध्ये तुमचे ओळखपत्र समाविष्ट करण्यास अधिकृत करायचे की नाही हे ठरवतील.
तुमच्या डिव्हाइसवर तुमच्या ओळखपत्राची प्रोव्हिजन करणे
एकदा का डिजिटल ओळखपत्र जारीकर्ता अधिकाऱ्यांनी तुमचे ओळखपत्र ‘वॉलेट’ मध्ये समाविष्ट करणे अधिकृत केले की, तुमच्या ओळखपत्रावर दिसणारी माहिती एनक्रिप्ट केलेल्या फॉरमॅटमध्ये स्टोअर केली जाते जी केवळ तुमच्या डिव्हाइसवरील ‘Secure Enclave’ वापरूनच डीक्रिप्ट केली जाऊ शकते. तुम्ही ‘वॉलेट’ मध्ये जाऊन, तुमच्या ओळखपत्राची मागील बाजू पाहून, ‘चालक परवान्याची माहिती’ किंवा ‘शासकीय ओळखपत्राची माहिती’, ‘डिजिटल ID ची माहिती’ किंवा ‘कार्डची माहिती’ वर टॅप करून तपशील पाहण्यासाठी ऑथेंटिकेट करून ही माहिती कधीही बघू शकता. Apple द्वारे ही माहिती पाहिली जाऊ शकत नाही. Secure Enclave बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, support.apple.com/guide/security/secure-enclave-sec59b0b31ff/web ला भेट द्या.
तुमच्या ‘वॉलेट’ मध्ये ओळखपत्राचे संरक्षण करणे
तुमच्या ओळखपत्राला अनधिकृत पद्धतीने ॲक्सेस केले जाण्यापासून किंवा सादर केले जाण्यापासून संरक्षित करण्यास मदत करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या ओळखपत्राला एखाद्या Face ID दिखावटीशी किंवा Touch ID साठी वापरल्या जाणाऱ्या बायोमेट्रिक आयडेंटिफायरशी जोडण्यास सांगितले जाईल. तुमचा ID किंवा तुमच्या ID वरील माहिती सादर करण्यासाठी विशिष्ट पद्धतीने आणि सेट अप केला जात असताना तुम्ही तुमच्या ID सह जोडलेल्या विशिष्ट बायोमेट्रिक आयडेंटिफायर लावण्याची आवश्यकता असते. तुमच्या डिव्हाइसच्या सेटिंगच्या आधारावर पर्यायी ऑथेंटिकेशन पर्याय उपलब्ध होऊ शकतात. तुमची ऑथेंटिकेशन पद्धत Apple नव्हे तर तुमचे डिव्हाइस स्टोअर करून ठेवते. जर तुम्ही तुमचे ऑथेंटिकेशन बदलू इच्छित असाल, तर तुम्ही तुमचे ओळखपत्र हटवले पाहिजे आणि नवीन ऑथेंटिकेशनसह ‘वॉलेट’ मध्ये पुन्हा समाविष्ट केले पाहिजे.
तुमचे ओळखपत्र सादर करणे
तुमचे ओळखपत्र व्यक्तिशः सादर करण्यासाठी, तुमच्या ओळखीची आणि तुमच्या विनंती केलेल्या ओळखपत्रातील विशिष्ट माहितीबद्दल विनंती कोण करत आहे ह्याबद्दल माहितीसह संमतीपत्र प्राप्त करण्यासाठी तुमचा iPhone किंवा Apple Watch ओळखपत्र रीडरच्या जवळ होल्ड करा. अधिकृतता मिळाल्यावर, तुमचे डिव्हाइस ओळख रीडरसह थेट, एंड-टू-एंड एनक्रिप्ट केलेले चॅनेल स्थापित करेल आणि अधिकृत केलेली माहिती ट्रान्समिट करेल.
जेव्हा तुम्ही सहभागी ट्रांसपोर्टेशन सिक्युरिटी ॲडमिनिस्ट्रेशन (TSA) चेकपॉइंट्सवर तुमचा डिजिटल ID सादर करता, तेव्हा तुमचा डिजिटल ID असे इंडिकेटर प्रदान करेल जे REAL ID चा स्वीकार्य पर्याय असेल. तुमचा डिजिटल ID हा रिअल ID डॉक्युमेंट नाही. इतर थर्ड पार्टी ओळखपत्र रीडर देखील हया इंडिकेटरची विनंती करू शकतात आणि प्राप्त करू शकतात. जेव्हा तुम्ही तुमचा डिजिटल ID सादर करता तेव्हा जर थर्ड पार्टी ओळखपत्र रीडर हे इंडिकेटर संकलित करत असेल, तर हे संमतीपत्रावर आणि तुमच्या सादर करण्याच्या हिस्ट्रीमध्ये दिसेल. तुमचा डिजिटल ID तुमच्या पासपोर्ट वरून तयार केल्याने, जेव्हा तुम्ही डिजिटल ID सादर करता, तेव्हा विनंती करणारी पार्टी तुम्ही यू. एस. नागरिक असल्याचा निष्कर्ष काढू शकते.
केवळ जपानी ओळखपत्रांसाठी, आयडेंटिटी रीडरवर सादर करण्यास त्यावर टॅप करण्याआधी तुम्हाला तुमचे ओळखपत्र ‘वॉलेट' मध्ये सिलेक्ट करून प्री आर्म करणे गरजेचे असेल. जपानी पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चरला तुमचे ओळखपत्र सादर करताना, ‘वॉलेट’ विनंती केलेल्या विशिष्ट माहितीबद्दलची माहिती डिस्प्ले करणार नाही.
ज्या ॲप्सना त्यांच्या वस्तू किंवा सेवा ॲक्सेस करण्यासाठी वयाचा किंवा ओळखीचा दाखला देणे आवश्यक असते ती तुमच्यासमोर विशिष्ट माहितीची विनंती करत असल्याची आणि विनंती करणारे ॲप ती माहिती किती काळासाठी स्टोअर करेल हे दर्शवणारी संमती पत्रिका सादर करतील. अधिकृतता मिळाल्यावर, तुमचे डिव्हाइस एनक्रिप्ट केलेला पेलोड ट्रान्समिट करेल ज्यामध्ये ॲपसाठी अधिकृत केलेली माहिती समाविष्ट असेल. एनक्रिप्ट केलेल्या पेलोडमध्ये तुमच्या डिजिटल ओळखपत्र जारीकर्ता सरकारी अधिकाऱ्याची डिजिटल स्वाक्षरी समाविष्ट असते जी तुमच्या ओळखपत्राबाबत एकमेव अशी असते जी ॲपला तुमचे ओळखपत्र वैध असल्याची पडताळणी करण्याची अनुमती देते.
तुम्ही केव्हा, कुठे आणि कोणासमोर तुम्ही तुमचे ओळखपत्र सादर केले होते आणि सादर केलेली विशिष्ट माहिती अशाप्रकारची मागील सादरीकरणे तुम्ही वॉलेटमधील ‘तुमचे ओळखपत्र’ वर टॅप करून बघू शकता. ही माहिती तुमच्या डिव्हाइसद्वारे उत्पन्न केली गेली आहे; Apple किंवा तुमचे जारी करणारे सरकारी अधिकारी ह्यापैकी कोणालाही तुम्ही तुमचे ओळखपत्र कधी, कोठे किंवा कोणाला सादर केले ह्याची माहिती नसते किंवा ते त्याची नोंद ठेवत नाहीत. जपानमध्ये, जपानी सरकार रुग्णालयामध्ये तुमचे ओळखपत्र सादर करताना गरजेनुसार विनंती केलेल्या सेवा प्रदान करण्यासाठी तुम्ही सादर केलेल्या गोष्टींबद्दल कदाचित माहिती मिळवू शकते.
तुमचे ओळखपत्र मॅनेज केले जात आहे
तुम्ही तुमचे ओळखपत्र ‘वॉलेट’ मध्ये तुमच्या ओळखपत्रावर टॅप करून कधीही मॅनेज करू शकता. तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यात मदत करण्यासाठी आणि तुमच्या ओळखपत्राची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी, तुम्ही तुमचे ओळख तपशील पाहू शकण्यापूर्वी तुम्हाला ते ऑथेंटिकेट करण्यास सांगितले जाईल. तुमच्या ओळखपत्राची माहिती अपडेट करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी, तुम्हाला तुमच्या जारीकर्त्या सरकारी अधिकाऱ्याशी संपर्क साधावा लागेल. ‘वॉलेट’ मध्ये तुमचे ओळखपत्र मॅनेज करण्यास मदत करण्यासाठी, तुमचे जारी करणारे सरकारी अधिकारी तुमचे ओळखपत्र अजूनही वैध आहे की नाही हे ठराविक काळाने Apple ला सांगतील. Apple ला तुमच्या जारीकर्त्या सरकारी अधिकाऱ्याकडून तुमचा पत्ता अपडेट केला होता की नाही किंवा ओळखपत्राची स्थिती बदलली होती की नाही (उदाहरणार्थ, सक्रिय वरुन निष्क्रिय करणे) ह्याबाबतची ओळखपत्राच्या अपडेटची माहिती देखील प्राप्त होईल. Apple ला तुमच्या प्रत्यक्ष अपडेट करण्यात आलेल्या पत्त्याच्या अपडेटसारखे तपशील प्राप्त होणार नाहीत. तुम्ही वॉलेटमध्ये ओळखपत्र ठेवत असताना तुमच्या ओळखपत्राची स्थिती बदलली आहे की नाही यासारख्या ओळखपत्राच्या अपडेटविषयीची माहिती Apple राखून ठेवेल; ही माहिती केवळ फसवणुकीला प्रतिबंध करण्यासाठी आणि सुरक्षेच्या उद्देशांसाठी वापरली जाईल.
तुमचा पासपोर्ट पुन्हा जारी केल्यानंतर, डिजिटल ID संदर्भात अपडेट्स प्राप्त होत नाहीत. तुमचा डिजिटल ID अपडेट करण्यासाठी, तुम्हाला तुमचा डिजिटल ID हटवणे आणि तुमचा नवीन पासपोर्ट वापरुन नवीन डिजिटल ID समाविष्ट करणे गरजेचे आहे.
तुम्ही ‘वॉलेट’ मध्ये तुमच्या ओळखपत्राच्या मागील बाजूस जाऊन ‘चालकाचा परवाना काढून टाका’ किंवा ‘शासकीय ओळखपत्र काढून टाका’ किंवा ‘डिजिटल ID काढून टाका’ किंवा ‘कार्ड काढून टाका’ वर टॅप करून ‘वॉलेट’ मधून तुमचे ओळखपत्र कधीही हटवू शकता. तुमचे आयडेंटिटी कार्ड काढल्याने सर्व प्रकारची सादर करण्याची हिस्ट्री तुमच्या डिव्हाइसमधून हटवली जाईल.
ओळखपत्रांमध्ये सुधारणा करणे
तुम्ही Apple ला ही माहिती प्रदान करण्याचा पर्याय निवडल्यास, तुम्हाला ‘वॉलेट’ साठी ओळखपत्र जारी करायचे की नाही ह्याबाबतच्या जारीकर्त्या सरकारी अधिकाऱ्याच्या निर्णयासह Apple निनावी पद्धतीने तुमचे वय, लिंग, वंश / जात (उपलब्ध असल्यास) आणि तुमचा चालकाचा परवाना किंवा शासकीय ओळखपत्रानुसार दिसणारा त्वचेचा रंग अशी माहिती गोळा करेल. Apple ह्या माहितीचा वापर ओळख पडताळणी प्रक्रियेतील पक्षपातावर लक्ष ठेवण्यासाठी करेल. तुम्ही तुमच्या iOS डिव्हाइसवर सेटिंग > गोपनीयता व सुरक्षा > ‘ॲनालिटिक्स व सुधारणा’ वर जाऊन ही माहिती रिव्ह्यू करू शकता किंवा तुमच्या संमतीमध्ये बदल करू शकता. जेव्हा तुम्ही जारीकर्त्या सरकारी अधिकाऱ्यांच्या ॲपमार्फत प्रोव्हिजन करता, तेव्हा तुम्ही ‘ओळखपत्रांमध्ये सुधारणा करणे’ हा पर्याय निवडू शकत नाही.
जेव्हा तुम्ही वॉलेटमध्ये तुमचा डिजिटल ID किंवा शासकीय ओळखपत्र समाविष्ट करता, तेव्हा Apple तुम्हाला वॉलेट अनुभवातील ID सुधारण्यात मदत करण्यासाठी, Apple मधील मानवी रिव्ह्यूअरच्या लहान टीमला तुमचे Live Photo बघण्याची अनुमती देण्यास सांगू शकते. जर तुम्ही Apple ला तुमच्या Live Photo चा रिव्ह्यू करण्याची अनुमती दिली, तर Apple तुमचे Live Photo 30 दिवसांत रिव्ह्यू करेल आणि हटवेल.
Apple ‘वॉलेट’ मधील ओळखपत्रे सुधारण्यासाठी तुमचे नाव किंवा जन्मदिनांकासारखी तुमच्या ओळखपत्रावरच डिस्प्ले केलेली माहिती वापरणार नाही. तुमच्याशी लिंक न केलेला ओळखपत्राचा डेटा फीचरमध्ये आणि Apple ची इतर उत्पादने आणि सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी राखून ठेवला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, यूझरना अनुभवामध्ये सुधारणा करण्यासाठी वॉलेटमध्ये ओळखपत्र समाविष्ट करताना कुठे अडचणी येतात याबाबतची निनावी आणि एकत्र केलेली माहिती Apple राखून ठेवू शकते. Apple तुमच्याकडून गोळा केलेली किंवा तुमच्या जारीकर्त्या सरकारी अधिकाऱ्याकडून ह्या फीचरशी संबंधित प्राप्त झालेली माहिती वॉलेटमधील ओळखपत्रे सुधारित करण्यासाठी निनावी देखील करू शकते. उदाहरणार्थ, ‘वॉलेट’ मध्ये तुमचे ओळखपत्र समाविष्ट करत असताना सबमिट केलेल्या इमेजच्या गुणवत्तेची माहिती आणि इमेजेस जारीकर्त्या सरकारी अधिकाऱ्याने स्विकारल्या होत्या की नव्हत्या ह्याबद्दलची माहिती Apple ला प्राप्त होईल. उदाहरणार्थ, Apple ही माहिती निनावी करू शकते आणि ती तुमच्या डिव्हाइसच्या सबमिट केलेल्या इमेजेसचे मूल्यमापन करण्यात सुधारणा करण्यासाठी किंवा यूझरना राज्याच्या जारीकर्त्या अधिकाऱ्यांना स्वीकारार्ह असलेल्या इमेजेस कशा घ्यायच्या ह्याबाबतच्या योग्य सूचना प्रदान करण्यास मदत करण्यासाठी वापर करू शकते.
इतर
Apple कडून आमच्या सेवा प्रदात्यासह माहिती शेअर केली जाऊ शकते, ज्यांना ही नोटिस आणि Apple सूचनांसह सुसंगतपणे माहिती हाताळणे बंधकारक असते, प्राप्त होणाऱ्या कोणत्याही वैयक्तिक डेटाला सुरक्षित ठेवण्यासाठी रास्त सुरक्षा उपायांचा वापर करणे आवश्यक असते आणि त्यांनी सेवा समाप्त झाल्यानंतर लवकरात लवकत वैयक्तिक डेटा हटवायला हवा जोपर्यंत ही माहिती बाळगणे कायदेशीरपणे आवश्यक नसेल किंवा अन्यथा तुमची संमती नसेल.
Apple ने वैयक्तिक डेटा ज्या उद्देशांसाठी संकलित केला होता ते उद्देश पूर्ण होईपर्यंतच या नोटिशीमध्ये वर्णन केल्यानुसार आणि Apple च्या गोपनीयता धोरणाला अनुसरून किंवा कायदेशीर आवश्यकतेनुसार तो डेटा राखून ठेवला जातो. राखून ठेवण्याच्या कालावधीची तपासणी करत असताना,संकलित केलेला वैयक्तिक डेटा राखून ठेवणे खरेच आवश्यक आहे का याचे आम्ही काळजीपूर्वक परीक्षण करतो आणि जर राखून ठेवणे आवश्यक असेल तर कायद्याने परवानगी असेल इतक्या संक्षिप्त कालावधीसाठी वैयक्तिक डेटा राखून ठेवण्याच्या दृष्टीने काम करतो.
Apple ने संकलित केलेली माहिती नेहमी Apple च्या गोपनीयता धोरणानुसार हाताळली जाईल, जे www.apple.com/in/privacy वर मिळू शकते.
2025-12-12