डायरी लिहिण्याच्या सूचना व गोपनीयता

डायरी लिहिण्याच्या सुचना तुम्हाला सूचनांसाठी कोणता डेटा वापरायचा आणि ‘डायरी’ ॲपसह काय शेअर करायचे हे निवडण्यासाठी एनेबल करुन तुमच्या माहितीचे संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.


डायरी लिहिण्याच्या सूचना दैनंदिन क्षण आणि विशेष इव्हेंटला हुशारीने एकत्रित करते

डायरी लिहिण्याच्या सूचना कडून तुम्हाला वैयक्तिकृत सूचना प्रदान करण्यासाठी, क्षण आणि इव्हेंटना बुद्धिमानपणे गटबद्ध करण्यासाठी ऑन डिव्हाइस प्रक्रियेचा वापर केला जातो. तुमच्या डिव्हाइसवर संग्रहित केली जाणारी माहिती वापरून, डायरी लिहिण्याच्या सूचना तुम्हाला आठवण राहण्यासाठी आणि लिहिण्यासाठी विशेष आठवणींची शिफारस करू शकते. डायरी लिहिण्यासंबंधी सूचना वापरणाऱ्या जर्नलिंग ॲप्ससोबत कोणत्या सूचना शेअर केल्या जाव्यात याला तुम्ही नियंत्रण करता.

डायरी लिहिण्याच्या सूचना तुमच्या ॲक्टिव्हिटीज मधील सूचना (उदाहरणार्थ, वर्कआउटचा प्रकार, कालावधी, मार्ग, कॅलरीज आणि हृदयाची गती), मीडियाचा वापर (जसे, तुम्ही कोणते पॉडकास्ट किंवा गीत ऐकले, कलाकाराचे नाव आणि ट्रॅकचे नाव), संपर्क (जसे, तुम्ही टेक्स्ट, कॉल आणि FaceTime च्या माध्यमातून कुणाशी संवाद साधला), छायाचित्रे (उदाहरणार्थ, तुमच्या लायब्ररीमधील छायाचित्रे आणि व्हिडिओ, तुमच्या लायब्ररीमधील लोक आणि पाळीव प्राण्यांची नावे, शेअर केलेले अल्बम, दृश्यांचे वर्गीकरण आणि आठवणी), महत्त्वाची स्थाने (जसे, तुम्ही अलीकडे भेट दिलेल्या जागा, ज्यामध्ये तुम्ही सहभागी झालेल्या इव्हेंट्सचा समावेश असेल, त्याचप्रमाणे तसेच तुम्ही किती वेळा आणि केव्हा तिथे गेला होता, जेणेकरून तुमच्यासाठी कोणती स्थाने महत्त्वाची आहेत हे कळू शकेल) आणि मनःस्थिती (तुम्ही नोंदवत असलेले मूड आणि भावना) ह्यामधील सूचनांचा समावेश करू शकते.

तुम्ही ‘डायरी लिहिण्याच्या सूचना’ एनेबल करता तेव्हा तुमचे वर्कआउट, मीडिया वापर, संवाद आणि छायाचित्रे यांच्या माहितीसह तुमच्या iPhone वर स्टोअर केलेला मागील मर्यादित डेटा तुमच्यासाठी अर्थपूर्ण सूचना तयार करण्यासाठी वापरला जाईल. तुम्ही डेटाच्या श्रेणींना iPhone मध्ये सेटिंग> गोपनीयता आणि सुरक्षा > ‘डायरी लिहिण्याच्या सूचना’ मध्ये जाऊन आणि विशिष्ट श्रेणी चालू किंवा बंद करण्यासाठी त्यावर टॅप करून त्यांना तुमच्या डायरी लिहिण्याच्या सूचनामध्ये समाविष्ट करण्याच्या दृष्टीने कस्टमाइझ करू शकता. जर एकापेक्षा अधिक जर्नलिंग ॲप कडून डायरी लिहिण्यासंबंधी सूचनांचा वापर केला जात असल्यास, तुमच्या डायरी लिहिण्यासंबंधी सूचनांमध्ये समाविष्ट केल्या जाणाऱ्या श्रेणींची तुमची निवड सर्व ॲपवर लागू होतील. तुम्ही iPhone मध्ये सेटिंग > गोपनीयता आणि सुरक्षा > डायरी लिहिण्याच्या सूचना मध्ये जाऊन ‘हिस्ट्री क्लिअर करा’ वर टॅप करून देखील जर्नलिंग ॲपवर शेअर न केलेल्या सूचनांची हिस्ट्री क्लिअर करू शकता. तुम्ही iPhone मध्ये सेटिंग > गोपनीयता आणि सुरक्षा > ‘डायरी लिहिण्याच्या सूचना’ मध्ये जाऊन ‘सर्व बंद करा’, वर टॅप करून ‘डायरी लिहिण्याच्या सूचना’ बंद करू शकता. सर्व सूचना बंद करण्याचा तुमचा निर्णय डायरी लिहिण्यासंबंधी सूचना वापरणाऱ्या सर्व जर्नलिंग ॲप्ससाठी लागू होईल. जर तुम्हाला तुमच्या iPad वर डायरी लिहिण्याच्या सूचना पाहण्याची इच्छा नसेल, तर तुम्ही सेटिंग > [तुमचे नाव] > iCloud > सर्व पहा > डायरी लिहिण्याच्या सूचना वर जाऊन आणि सिंक बंद करण्यास्तही टॅप करून सूचना सिंक करणे बंद करू शकता.

संपर्कांसोबत घालवलेल्या क्षणांना प्राधान्य द्या

कोणत्या सूचना तुमच्यासाठी अधिक उपयुक्त किंवा संबंधित वाटू शकतील हे जाणून घेण्यासाठी ‘डायरी लिहिण्याच्या सूचना’ Bluetooth सिग्नलचा वापर करते. ‘संपर्कांसह व्यतित केलेल्या क्षणांना प्राधान्यक्रम द्या’ तुमच्या जवळपास असलेल्या तुमच्या परस्पर संपर्कांची संख्या ओळखण्यासाठी Bluetooth चा वापर करेल आणि परस्पर संपर्कांना तुम्हाला त्यांच्या जवळपासच्या संपर्कांमध्ये सामील करण्याची अनुमती देईल. संपर्क’ नावे आणि स्थाने तुमच्यासोबत शेअर केली जात नाहीत आणि तुमचे नाव आणि स्थाने संपर्कांशी शेअर केली जात नाहीत. जवळपासच्या संपर्कांची संख्या डिव्हाइसवर स्टोअर केली जाईल आणि तुम्ही ओळखत असलेल्या लोकांसोबत घालवलेल्या क्षणांना प्राधान्यकृत करण्यासाठी तिचा वापर केला जाईल. तुम्हाला जर्नलिंग सूचनांनी तुमच्या जवळपासच्या संपर्कांची संख्या वापरणे नको असल्यास किंवा संपर्कांनी तुम्हाला त्यांच्या जवळपासच्या संपर्कांमध्ये सूचनांना प्राधान्यकृत करण्यासाठी समाविष्ट करण्याची अनुमती देणे नको असल्यास सेटिंग > गोपनीयता आणि सुरक्षा > जर्नलिंग सूचनामध्ये जा आणि त्यानंतर ‘संपर्कांसोबत क्षण प्राधान्यकृत करणे बंद करा’ वर टॅप करा.

संपर्कांसोबतच्या क्षणांना प्राधान्यकृत करण्याशिवाय, ‘डायरी लिहिण्याच्या सूचना’ इतर अस्तित्त्वात असलेल्या डिव्हाइस सिग्नलचा वापर करू शकतात, जसे की AirDrop साठी Bluetooth, हे शोधून काढण्यासाठी की Apple (आवश्यक नाही की संपर्क) मोठ्या गटाबरोबर सूचनांची प्राधान्यता देण्यासाठी तुमच्या जवळपास आहे की नाही. नावे आणि स्थाने शेअर केलेली नाहीत — केवळ Apple डिव्हाइसची संख्या.

iCloud डायरी लिहिण्याच्या सूचना

तुम्ही iCloud वापरलेत, तर तुमच्या डायरी लिहिण्याच्या सूचना ट्रांझिटमध्ये असताना एनक्रिप्ट केल्या जातात आणि तुमच्या iCloud एनेबल्ड iPhone आणि iPad वर अद्ययावत ठेवल्या जातात. तुमच्याकडे डिफॉल्ट टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि पासकोड असल्यास, तुमच्या सर्व डायरी लिहिण्याच्या सुचना iCloud वर स्टोअर केल्या जात असताना एंड टू एंड एनक्रिप्ट केलेल्या असतात, ज्यामुळे Apple देखील त्या वाचू करू शकणार नाही. तुमच्या iCloud एनेबल्ड iPhone आणि iPad वर डायरी लिहिण्याच्या सूचना सिंक करण्यासाठी केवळ एक iPhone वापरला जाऊ शकतो. तुम्ही तुमच्या iPhone वर सेटींग > गोपनीयता व सुरक्षा > डायरी लिहिण्याच्या सूचना वर जाऊन, त्यानंतर ‘ ह्या iPhone वरून सिंक करा’ वर टॅप करून सूचना सिंक करण्यासाठी प्राथमिक iPhone बदलू शकता. तुम्ही iPhone किंवा iPad वर ‘डायरी लिहिण्याच्या सूचनांसाठी iCloud’ सेटिंग > [तुमचे नाव] > iCloud > सर्व पहा > डायरी लिहिण्याच्या सूचना वर जाऊन आणि सिंक करणे बंद करण्यासाठी टॅप करून डिसेबल करू शकता.

डायरी ॲप आणि थर्ड पार्टी ॲपसोबत ‘डायरी लिहिण्याच्या सूचना’ शेअर करणे

तुम्ही तुमच्यासाठी अर्थपूर्ण असलेले क्षण निवडून आणि त्यांना ॲपमध्ये जोडून जर्नलिंग ॲप्ससोबत कोणत्या सूचना शेअर केल्या जाव्यात यावर कंट्रोल करता. तुमच्या सूचना शेअर करण्यापूर्वी फक्त तुम्हीच त्यांना पाहू शकता. तुम्ही सेटिंग > गोपनीयता आणि सुरक्षा > जर्नलिंग सूचनामध्ये जाऊन आणि प्रायव्हेट ॲक्सेस वापरणारी ॲप पाहून जर्नलिंग सूचनांचा कोणती ॲप वापर करतात ते पाहू शकता.

तुम्ही डायरी ॲपने सूचना शेअर करणे निवडल्यास, तुमच्याकडे तुमच्या एंट्रीचे नियंत्रण असते. तुमचा फोन पासकोडने लॉक केलेला असताना डायरी ॲपमधील नोंदी एनक्रिप्ट केलेल्या स्वरूपामध्ये असतात. तुमच्याकडे डिफॉल्ट टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि पासकोड असल्यास, सर्व डायरी एंट्रीज iCloud वर स्टोअर केल्या जात असताना एंड-टू-एंड स्वरूपात एनक्रिप्ट केलेल्या असतात, ज्यामुळे Apple देखील त्या वाचू करू शकणार नाही. त्याशिवाय, तुम्ही सेकंडरी ऑथेंटिकेशन एनेबल करणे आणि तुमच्या डिव्हाइसचा पासकोड, Face ID, किंवा Touch ID च्या साहाय्याने डायरी ॲप लॉक करायचे निवडू शकता.

नोटिफिकेशन्स

तुम्ही जर्नलिंग सूचनांची नोटिफिकेशन्स एनेबल केल्यास, जर्नलिंग सूचनांकडून तुम्हाला क्षण आणि विशेष इव्हेंट बद्दल लिहिण्यासाठी प्रॉम्प्ट केले जाऊ शकेल. तुमची स्थाने ॲक्टिव्हिटी आणि ॲप यूसेज सारखे नित्यक्रम तुम्हाला कधी सूचित केले जाईल किंवा सेटिंगमध्ये कस्टम शेड्यूल कधी तयार करू शकाल हे ठरवतील. तुम्ही एकापेक्षा जास्त डायरी लिहिण्याच्या ॲपसाठी डायरी लिहिण्याच्या सूचना इनेबल केलेल्या असतील, तर तुम्ही कोणते डायरी लिहिण्याचे ॲप डायऱ्या लिहिण्याच्या सूचना तुम्ही उघडू इच्छिता हे सेटिंग > गोपनीयता व सुरक्षा > डायरी लिहिण्याच्या सूचना > नोटिफिकेशन्स > नोटिफिकेशन्स कस्टमाइझ करा > ह्यासह नोटिफिकेशन्स उघडा वर जाऊन आणि ॲप सिलेक्ट करण्यासाठी टॅप करून निवडू शकता. तुम्ही सेटिंग > गोपनीयता व सुरक्षा > ‘डायरी लिहिण्याच्या सूचना’ > ‘नोटिफिकेशन्स’ वर जाऊन आणि त्यांना बंद करण्यासाठी टॅप करून डायरी लिहिण्याच्या सूचना नोटिफिकेशन्स डिसेबल करू शकता.

Apple ने संकलित केलेली माहिती नेहमी Apple च्या गोपनीयता धोरणानुसार हाताळली जाईल, जे www.apple.com/in/privacy वर मिळू शकते.

2025-12-12