स्थान सेवा व गोपनीयता

स्थान सेवा तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी डिझाइन केलेल्या आहेत आणि तुम्ही काय शेअर करता हे निवडण्यासाठी तुम्हाला एनेबल करतात.


विविध प्रकारच्या स्थान आधारित सेवा उपलब्ध करून देण्यासाठी स्थान सेवा तुमच्या iPhone किंवा Apple Watch च्या वर्तमान स्थानाच्या आधारावर माहिती गोळा करण्याची आणि त्याचा वापर करण्याची अनुमती Apple आणि थर्ड पार्टी ॲप आणि संकेतस्थळांना देतात. उदाहरणार्थ, एखादे ॲप तुमचा स्थान डेटा आणि स्थान सर्च क्वेरीचा वापर जवळपासचे कॉफी शॉप किंवा थिएटर शोधण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी करू शकते किंवा तुमचे डिव्हाइस तुमच्या सध्याच्या स्थानाच्या आधारे ऑटोमॅटिकली त्याचा काल विभाग सेट करू शकते.

ह्यासारखी फीचर्स वापरण्यासाठी, तुम्हाला तुमच्या iPhone वर स्थान सेवा एनेबल कराव्या लागतील आणि प्रत्येक ॲप आणि संकेतस्थळाला स्थान सेवांकडून स्थान डेटा प्राप्त होण्यापूर्वी तुमची अनुमती द्यावी लागेल. ॲप तुमच्या स्थान डेटाच्या मर्यादित ॲक्सेसची (केवळ तुम्ही ॲप किंवा अंदाजित स्थान वापरत असता तेव्हा) किंवा संपूर्ण ॲक्सेसची (जेव्हा तुम्ही ॲप किंवा अचूक स्थान वापरत नसाल तेव्हाही) विनंती करू शकते.

तुम्ही स्थान सेवा एनेबल केलेल्या असो किंवा नसोत, सुरक्षिततेच्या कारणांसाठी, जेव्हा आपत्कालीन कॉल केला जातो, तेव्हा प्रतिसाद प्रयत्नांच्या मदतीसाठी तुमच्या iPhone ची स्थान माहिती वापरली जाऊ शकते.

स्थान सेवा तुमच्या डिव्हाइसचे स्थान शोधण्यासाठी, क्राउड सोर्स्ड Wi-Fi हॉटस्पॉट आणि मोबाइल टॉवर स्थानांसह GPS आणि Bluetooth (उपलब्ध असेल तेथे) ह्यांच्या समावेशासह डिव्हाइस सेन्सर वापरतात.

तुमचा पेअर केलेला iPhone जवळपास असल्यास, Apple Watch त्याचे स्थान वापरू शकते.

स्थान सेवा एनेबल करून, ह्यासारख्या स्थान आधारित सिस्टीम सेवादेखील एनेबल केल्या जातील :

  • राउटिंग आणि ट्रॅफिक : तुम्ही प्रवास करत असता (उदाहरणार्थ, चालताना किंवा वाहन चालवताना), तेव्हा तुमचा iPhone वेळोवेळी GPS डेटा, प्रवासाची गती आणि दिशा, आणि वायुभार माहिती निनावी आणि एनक्रिप्ट केलेल्या स्वरूपात Apple ला पाठवेल, जेणेकरून क्राउड सोर्स्ड रस्त्यावरील ट्रॅफिक, रस्ते, पदपथ आणि वातावरणीय सुधारणा डेटाबेस वाढवण्यासाठी त्यांचा वापर करता येईल. त्याशिवाय, जेव्हा तुम्ही स्वारस्याच्या ठिकाणाजवळ (उदाहरणार्थ एखादा व्यवसाय किंवा बाग) एखादे ॲप उघडता तेव्हा तुमचा iPhone निनावी आणि एनक्रिप्ट केलेल्या स्वरूपात Apple ला स्थान डेटा पाठवेल, जो Apple समुच्चित करू शकते आणि यूझरना ते स्वारस्याचे ठिकाण उघडे आहे का आणि किती गर्दी आहे हे कळवण्यासाठी वापरू शकते.
  • महत्त्वाची स्थाने व मार्ग : तुमच्यासाठी कोणती ठिकाणे आणि मार्ग महत्त्वपूर्ण आहेत हे जाणून घेण्यासाठी, तुमच्या iPhone आणि तुमच्या Apple अकाउंटसह iCloud मध्ये साइन इन केलेली इतर डिव्हाइसेस तुम्ही अलीकडे भेट दिलेल्या ठिकाणांचा, तसेच त्या ठिकाणांना तुम्ही किती वेळा आणि केव्हा भेट दिली आणि तिथे जाण्यासाठी तुम्ही कोणता मार्ग घेता याचा ट्रॅक ठेवतील. तुमची महत्त्वाची स्थाने आणि मार्ग तुमच्या डिव्हाइसेसच्या दरम्यान एंड टू एंड एनक्रिप्शनचा वापर करून सिंक केलेली आहेत आणि Apple द्वारे वाचली जाऊ शकत नाहीत. ह्याचा वापर तुम्हाला वैयक्तिकृत सेवा देण्यासाठी केला जातो, जसे की ‘छायाचित्र’ ॲपमध्ये अधिक चांगल्या आठवणी बनवणे आणि तुम्ही ‘भेट दिलेली ठिकाणे’ आणि ‘प्राधान्य दिलेले मार्ग’ आणि ‘अंदाजित गंतव्यस्थाने’ ॲपबरोबर (जिथे उपलब्ध असेल) शेअर करण्यास एनेबल करणे जेणेकरून अंदाजित मार्ग सुचवण्यासारख्या फीचर्सना सपोर्ट करता येईल.
  • स्थान अचूकता सुधारा : स्थान सेवा प्रदान करण्यासाठी आणि सुधारण्यासाठी Wi-Fi हॉटस्पॉट आणि मोबाइल टॉवर स्थानांच्या या क्राउड सोर्स डेटाबेसमध्ये वाढ करण्यासाठी, तुमचा iPhone वेळोवेळी जवळपासच्या Wi-Fi हॉटस्पॉट्स आणि मोबाइल टॉवर्सची (जेथे डिव्हाइसद्वारे सपोर्ट केले जाते) जिओ टॅग केलेली स्थाने Apple ला निनावी पद्धतीने आणि एनक्रिप्टेड स्वरूपात पाठवेल.
  • सूचना व सर्च : तुमच्या iPhone चे स्थान Apple ला अधिक जास्त संबंधित शिफारशी प्रदान करण्यासाठी पाठवले जाईल. जर तुम्ही स्थान आधारित सूचनांसाठी स्थान सेवा बंद केल्या, तर Apple ला तुमचे अचूक स्थान पाठवले जाणार नाही. सुसंबद्ध सर्च सूचना आणि बातम्या प्रदान करण्यासाठी, भौगोलिक प्रदेशाला जुळवून तुमच्या स्थानाचा अंदाज घेण्यासाठी Apple तुमच्या इंटरनेट कनेक्शनचा IP ॲड्रेस वापरू शकते.
  • अलर्ट्स व शॉर्टकट्स ऑटोमेशन : तुमच्या स्थानाचा वापर तुमचा iPhone आणि Apple Watch तुम्हाला भौगोलिकदृष्ट्या उपयुक्त अलर्ट, जसे की, एखाद्या विशिष्ट ठिकाणी पोहोचल्यानंतर एखाद्याला कॉल करायचा आहे, तुमच्या पुढच्या अपॉइंटमेंटसाठी कधी निघायचे हे सांगणारा रिमाइंडर किंवा तुम्ही सध्या कुठे आहात याच्या आधारे एखाद्या ॲप किंवा शॉर्टकट शिफारस प्रदान करण्यासाठी करेल.
  • माझे स्थान शेअर करा : तुम्ही तुमचे सध्याचे स्थान तात्पुरते किंवा सध्या चालू ठेवून ‘संदेश’ आणि ‘शोधाशोध’ ह्यासारख्या काही विशिष्ट ॲपमधून ते इतरांबरोबर शेअर करणे निवडू शकता.
  • ‘होम’ ॲक्सेसरीज : तुमचा iPhone तुम्ही विशिष्ट स्थानावर पोहोचल्यावर किंवा तिथून निघाल्यावर ॲक्सेसरीज नियंत्रित करण्यासाठी तुमच्या स्थानाचा वापर करेल, जसे की तुम्ही घरी येता तेव्हा लाइट सुरू करणे किंवा तुम्ही घरी येण्यापूर्वी तुमच्या थर्मोस्टॅटला तुम्ही प्राधान्य देता अशा तापमानावर सेट करणे.
  • सिस्टीम कस्टमायझेशन : तुमचा iPhone तुमच्या सध्याच्या स्थानाचा वापर करून सिस्टीमचे दिसणे, व्यवहार आणि सेटिंग कस्टमाइझ करेल, उदाहरणार्थ, तुम्ही घरी असताना ऑप्टिमाइज केलेल्या बॅटरी चार्जिंग ऑटोमॅटिकली एनेबल करणे. हा कस्टमायझेशन डेटा तुमच्या डिव्हाइसवरच राहतो.
  • Apple Pay मर्चंट ओळख : तुम्ही तुमच्या प्रत्यक्ष Apple Card चा वापर केल्यावर, तुमचा iPhone मर्चंटची अचूक नावे प्रदान करण्यात मदत करण्यासाठी तुमच्या सध्याच्या स्थानाचा वापर करेल.
  • आपत्कालीन कॉल व SOS : जेव्हा आपत्कालीन सेवांना आधीपासूनच स्थान प्रदान करण्यात आलेल्या स्थानाव्यतिरिक्त दुसऱ्या स्थानाला आपत्कालीन कॉल केला जातो, तेव्हा तुमचा iPhone किंवा Apple Watch वर्धित आपत्कालीन डेटा सेवांच्या माध्यमातून पूरक डेटा उपलब्ध करुन देईल. तुमचे सध्याचे स्थान तुमच्या वैयक्तिक संपर्क कार्ड (माझे कार्ड) मधील घर किंवा कार्यस्थळाच्या पत्त्याजवळ असल्यास, ह्या डेटामध्ये रस्त्याच्या पत्त्याच्या माहितीचा सामावेश असू शकतो. तुम्ही ‘संदेश’ ॲप अनइन्स्टॉल केलेले नसल्यास, आपत्कालीन SOS सुरू केल्याने कॉलच्या अखेरीस तुमच्या आपत्कालीन संपर्कांना देखील स्थानाची माहिती पाठवली जाईल.

Apple कडून एकत्रित केलेल्या क्राउड सोर्स्ड स्थान डेटामध्ये वैयक्तिकरित्या तुमची ओळख केली जात नाही.

तुम्ही ‘भेट दिलेली ठिकाणे’ आणि ‘प्राधान्य दिलेले मार्ग’ आणि ‘अंदाजित गंतव्यस्थाने’ ॲपबरोबर (जिथे उपलब्ध असेल) शेअर करणे निवडू शकता. जर तुम्ही तुमची ‘भेट दिलेली ठिकाणे’ शेअर करणे निवडले तर रेस्टॉरंट्स किंवा पार्क्ससारख्या फक्त तुम्ही अलीकडे भेट दिलेल्या ठिकाणांबद्दलचा डेटा ॲपबरोबर शेअर केला जाईल. तुम्ही तुमची ‘भेट दिलेली ठिकाणे’ शेअर करणे सुरू केल्यावर फक्त तुम्ही ज्या ठिकाणांना भेटी द्याल त्याबद्दलचा डेटा ॲपबरोबर शेअर केला जाईल. जर तुम्ही ‘प्राधान्य दिलेले मार्ग’ आणि ‘अंदाजित गंतव्यस्थाने’ शेअर करणे निवडले, तर तुम्ही नेहमी जात असलेल्या मार्गांची आणि तुम्ही भेट देण्याची शक्यता असणाऱ्या गंतव्यस्थानांबद्दलची माहिती ॲपबरोबर शेअर केली जाईल. तुम्ही ‘भेट दिलेली ठिकाणे’ आणि ‘प्राधान्य दिलेले मार्ग’ आणि ‘अंदाजित गंतव्यस्थाने’ ॲपबरोबर शेअर करण्यासाठी तुम्ही ‘महत्त्वपूर्ण स्थाने व मार्ग’ एनेबल केले पाहिजेत आणि ॲपला तुमच्या सध्याच्या स्थानाचा ॲक्सेस द्यायला पाहिजे.

तुमच्या डिव्हाइसेससाठी स्थान सेवा एनेबल करून, तुम्ही Apple आणि तिच्या भागीदार व परवानाधारकांना स्थान व रस्ते वाहतुकीवर आधारित उत्पादने आणि सेवा प्रदान करणे आणि त्यामध्ये सुधारणा करणे ह्यासाठी तुमच्या स्थान डेटा आणि स्थान सर्च क्वेरीच्या प्रेषण करणे, संकलन करणे, देखभाल करणे, प्रक्रिया करणे ह्यासाठी आणि वापरासाठी सहमती आणि संमती देता.

तुम्ही कोणत्याही क्षणी स्थान सेवा डिसेबल करू शकता. असे करण्यासाठी, सेटिंग > गोपनीयता व सुरक्षा > स्थान सेवा वर जा, आणि एकतर वैश्विक स्थान सेवा बंद करण्यासाठी टॅप करा किंवा ‘कधीही नाही’ वर सेट करुन प्रत्येक स्थानाचा वापर करणाऱ्या ॲप किंवा फीचरचे वैयक्तिक स्थान स्विच बंद करा. तुम्ही ॲपच्या स्थान सेटिंगमध्ये जाऊन ॲपबरोबर तुमची ‘भेट दिलेली ठिकाणे’, ‘प्राधान्य दिलेले मार्ग’ आणि ‘अंदाजित गंतव्यस्थाने’ शेअर करणे बंद करणे निवडू शकता. सर्व संकेतस्थळांसाठी ‘स्थान सेवा’ डिसेबल करण्यासाठी, Safari संकेतस्थळांच्या ‘स्थान सेवा’ सेटिंग ‘कधीच नाही’ वर सेट करा. तुम्ही सिस्टीम सेवांवर टॅप करून नंतर प्रत्येक स्थानावर आधारित सिस्टीम सेवा बंद करण्यासाठी टॅप करून, स्थान आधारित सिस्टीम सेवांना डिसेबल देखील करू शकता. स्थान सेवा स्विचची स्थिती कोणतीही असली तरीही, तुमच्या अंदाजित स्थानाचा अंदाज लावण्यासाठी, ॲप्स किंवा संकेतस्थळे, तुमच्या इंटरनेट कनेक्शनचा IP ॲड्रेस ह्यासारख्या इतर माहितीचा वापर करू शकतील.

जर तुम्ही ॲप्स आणि संकेतस्थळांना स्थान सेवांमधून तुमचा स्थान डेटा वापरण्याची अनुमती दिली, तर तुम्ही त्यांच्या नियम आणि गोपनीयता धोरण आणि पद्धतींच्या अधीन आहात. ते तुमचे स्थान आणि इतर माहिती कशी वापरतात हे समजून घेण्यासाठी तुम्ही अशा ॲप्स आणि संकेतस्थळांच्या अटी, गोपनीयता धोरण आणि कार्यपद्धती रिव्ह्यू केल्या पाहिजेत.

Apple ने संकलित केलेली माहिती नेहमी Apple च्या गोपनीयता धोरणानुसार हाताळली जाईल, जे www.apple.com/in/privacy वर मिळू शकते.

2026-02-11