माझे खेळ व गोपनीयता
माझे खेळ तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहे आणि तुम्ही काय शेअर करता हे निवडण्यासाठी तुम्हाला एनेबल करते.
![]()
- तुम्ही फॉलो करत असलेल्या खेळ, लीग, संघ आणि मैदानी खेळाडूंची माहिती Apple संकलित करते आणि सर्व सपोर्ट केलेल्या Apple ॲपवर ती माहिती सिंक करते. खेळांमधील तुमच्या आवडी तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित केल्या जातात.
- आम्ही Apple Sports, Apple TV, आणि Apple New सह Apple ॲपमध्ये तुमचा अनुभव वैयक्तिकृत करण्यासाठी, आणि तुम्हाला नोटिफिकेशन पाठवण्यासाठी, तुम्ही फॉलो करत असलेल्या तुमच्या खेळांमधील आवडींविषयी माहिती वापरतो.
- तुमच्या Apple ॲपवरील तुमच्या क्रीडासंबंधित आवडींचे सिंकिंग तुम्ही कोणत्याही वेळी बंद करू शकता. ‘माझे खेळ’ सिंकिंग बंद केल्याने सपोर्ट केलेल्या ॲपमध्ये क्रीडा फीचर वापरण्याची तुमची क्षमता मर्यादित होऊ शकते.
माझे खेळ तुम्हाला तुमच्या सर्व Apple ॲप आणि डिव्हाइसवर एक खेळ अनुभवण्याची अनुमती देते. तुम्ही फॉलो करत असलेल्या आवडत्या संघाला आणि खेळांना सपोर्ट केलेल्या सर्व Apple ॲप आणि डिव्हाइसवर सिंक केले जाईल जे एकाच Apple अकाउंटवरून साइन इन केलेले आहेत.
माझे खेळ देऊ करणे आणि त्यामध्ये सुधारणा करणे
तुम्ही ‘माझे खेळ’ साठी सिंक करणे चालू केल्यास Apple स्पोर्ट्स, Apple TV, आणि Apple News यांसारख्या सपोर्ट करणाऱ्या ॲप्समध्ये तुम्ही फॉलो करत असलेल्या टीम्स आणि इतर खेळातील स्वारस्ये ऑटोमॅटिकली सपोर्ट करणाऱ्या इतर ॲप्समध्ये फॉलो केली जातील. जिथे उपलब्ध आहे, तिथे तुमच्याकडून फॉलो केले जाणारे खेळ, लीग, टिम आणि ॲथलिट यांच्या समावेशासह तुम्ही ज्यांच्या बरोबर आंतरक्रिया करता यांच्या समावेशासह माझे खेळ च्या वापराबद्दलची माहिती Apple संकलित करते आणि ती माहिती तुमच्या Apple अकाउंटशी संबद्ध करून स्टोअर करते. Apple ही माहिती ‘Apple खेळ’, Apple TV, आणि Apple News यांच्या समावेशासह सर्व सपोर्टेड Apple ॲपवर तुमच्या खेळाविषयी स्वारस्यांशी सिंक करण्यास आणि Apple News च्या न्यूजलेटर्ससारख्या ॲप्स आणि संबंधित सर्व्हिसमधील तुमचा अनुभव वैयक्तीकृत करण्यासाठी वापरते. Apple त्रुटी आणि क्रॅशबद्दलच्या माहितीप्रमाणेच या माहितीचा वापर देखील ‘माझे खेळ’ आणि सपोर्ट करत असलेल्या ॲप आणि सर्व्हिसमध्ये सुधारणा करण्यासाठी करते.
‘माझे खेळ’ सिंक केल्यामुळे तुम्हाला सर्व समर्थित Apple ॲपवर एक सारखा खेळ अनुभव प्राप्त होतो आणि तुमच्या खेळासंबंधीच्या आवडीबद्दल लेख आणि इव्हेंट यासारखे कॉण्टेण्ट Apple खेळ’, Apple TV, आणि Apple News यासारख्या सपोर्ट असलेल्या सर्व Apple ॲप्स आणि संबंधित सेवांवर दिसून येईल. तुम्ही तुमच्या खेळातील आवडींना कोणत्याही वेळी सिंक करण्यासाठी सपोर्ट करणाऱ्या ॲपच्या सेटिंगमधून ‘माझे खेळ’ वापरणे बंद करायचे निवडू शकता. ‘माझे खेळ’ सिंकिंग बंद केल्याने काही ॲपमध्ये क्रीडा फीचरची उपलब्धता मर्यादित होऊ शकते.
तुमच्याशी संवाद साधणे
तुमच्याकडे असलेली Apple उत्पादने आणि Apple सेवांच्या तुमच्या सदस्यता यासारख्या तुमच्या अकाउंटशी संबंधित माहितीचा वापर तुमच्या माझे खेळ आणि अन्य खेळासंबंधी स्वारस्यांबरोबर Apple One च्या समावेशासह माझे खेळ आणि अन्य खेळांतील तुमच्या रुचीसह, तसेच इतर Apple उत्पादने, सेवा, आणि तुम्हाला रुची असू शकेल अशा ऑफर याविषयी कम्युनिकेशन्स करण्यासाठी Apple कडून केला जाऊ शकतो. Apple तुम्ही फॉलो करत असलेले खेळ, लीग्ज, टीम्स आणि ॲथलीटबद्दलच्या माहितीचा वापर तुम्हाला Apple TV आणि Apple News सारख्या ‘माझे खेळ’, ना सपोर्ट करणाऱ्या ॲप्सवरून त्या ॲप्समध्ये उपलब्ध असलेल्या नवीन फीचर, कॉण्टेण्ट आणि त्या ॲपमध्ये असलेल्या ऑफरबद्दल तुम्हाला ईमेल आणि Push नोटिफिकेशन पाठवण्यासाठी करू शकेल. तुम्ही account.apple.com वर जाऊन तुमची ईमेल प्राधान्ये बदलू शकता आणि हे ईमेल प्राप्त करणे बंद करू शकता. 'माझे खेळ' ला सपोर्ट करणाऱ्या ॲपसाठी iOS, iPadOS, किंवा visionOS डिव्हाइसवर तुमची नोटिफिकेशन प्राधान्ये अपडेट करण्यासाठी, Apple TV नोटिफिकेशनसाठी सेटिंग > नोटिफिकेशन > TV वर, आणि Apple News नोटिफिकेशनसाठी सेटिंग > नोटिफिकेशन > News वर जा. Mac वर, सिस्टीम सेटिंग > नोटिफिकेशन वर जा आणि ‘TV’ किंवा ‘News’ वर क्लिक करा.
जाहिरात
वैयक्तिकृत केलेल्या जाहिराती सेटिंग चालू केले असल्यास Apple चा ॲडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म तुमच्या माहितीचा वापर तुमच्याशी अधिक संबद्ध असलेल्या जाहिराती दाखवण्यासाठी करू शकेल. Apple News आणि स्टॉक्समधील जाहिराती संबद्ध असल्याची काळजी घेण्यासाठी Apple चा ॲडाव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म तुमच्या खेळातील स्वारस्यांबाबतची माहिती वापरू शकेल.
तुम्हाला Apple च्या जाहिरात प्लॅटफॉर्मवरून तुमच्या आवडींसाठी लक्ष्यित जाहिराती प्राप्त करायच्या नसल्यास, तुम्ही ‘वैयक्तिकृत जाहिराती’ बंद करण्याचा पर्याय निवडू शकता. वैयक्तिकृत जाहिराती बंद केल्याने Apple ला जाहिरात लक्ष्यीकरणासाठी तुमची माहिती वापरण्यापासून प्रतिबंधित केले जाईल. ह्यामुळे तुम्हाला प्राप्त होणाऱ्या जाहिरातींची संख्या कमी होणार नाही, परंतु त्या जाहिराती तुमच्याशी कमी संबंधित असू शकतात.
तुम्ही तुमच्या iOS, iPadOS किंवा visionOS डिव्हाइस वर सेटिंग > गोपनीयता व सुरक्षा > Apple जाहिरात वर जाऊन आणि ‘वैयक्तिकृत जाहिराती’ बंद करण्यासाठी टॅप करून वैयक्तिकृत जाहिराती बंद करू शकता. Mac वर, सिस्टीम सेटिंग > गोपनीयता व सुरक्षा > Apple जाहिरात वर जा, आणि सिलेक्ट केलेल्या वैयक्तिकृत जाहिराती रद्द करा.
Apple ॲडव्हर्टायझिंग आणि गोपनीयतेबद्दल www.apple.com/in/legal/privacy/data/en/apple-advertising वर अधिक जाणून घ्या.
Apple News आणि स्टॉक्समध्ये वैयक्तिकृत जाहिराती प्राप्त न करण्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी support.apple.com/105131 पहा.
थर्ड पार्टीसोबत शेअरिंग
आम्ही माझे खेळ च्या साहाय्याने खेळ, लीग, टीम आणि फॉलो केलेल्या ॲथलेट्स याबद्दलचा थोडा वैयक्तिक नसलेला डेटा आमच्या उत्पादनांना आणि सेवांना देण्यासाठी, Apple ना ग्राहकांशी मार्केट करण्यात मदत करणाऱ्या आणि Apple च्या वतीने जाहिरातींची विक्री करून Apple News आणि स्टॉकवर डिस्प्ले करण्यासाठी Apple सोबत काम करणाऱ्या धोरणात्मक भागीदारांशी शेअर करू. उदाहरणार्थ, Apple News च्या प्रकाशकांसोबत आणि इतर कॉटेण्ट प्रोव्हायडरसोबत त्यांच्या कॉटेण्टची कामगिरी समजून घेण्यास मदत करण्यासाठी Apple समुच्चित अहवाल शेअर करू शकेल.
वैयक्तिक डेटा प्रोसेस करण्यासाठी लागू होणारे कायदेशीर आधार
तुम्ही My Sports वापरल्यास, आम्ही सेवा प्रदान करण्यासाठी आणि आमच्या कायदेशीर आवश्यकतांचे पालन करण्यासाठी तुमच्या वैयक्तिक डेटावर काम करतो. जिथे संमती उचित कायदेशीर आधार असतो, तिथे आम्ही त्याला लागू होणाऱ्या स्थानिक कायद्यानुसार प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो.
जिथे लागू होणारे कायदे निर्देशित करतात, त्यानुसार आम्ही आमच्या किंवा थर्ड पार्टीच्या तर्कसंगत स्वारस्यांच्या उद्देशांसाठी गरजेनुसार वैयक्तिक डेटाच्या खालील श्रेणींवर क्रिया करतो, ज्यामध्ये त्यांच्याबद्दलच्या या माहितीचा समावेश असतो :
- तुम्हाला माझे खेळ आणि तुमच्या खेळांमधील आवडींविषयी त्याचप्रमाणे तुम्हाला आवडू शकतील अशी Apple ची इतर उत्पादने, सेवा आणि ऑफरविषयी संवाद पाठवणे
- तुमच्यासाठी आणि इतरांसाठी माझे खेळ आणि सपोर्ट केलेले Apple ॲप्स आणि सेवांमध्ये सुधारणा करा
वापरलेल्या डेटामध्ये हे समाविष्ट आहे :
- तुम्ही फॉलो करत असलेले खेळ, लीग, संघ आणि खेळाडू, तुम्ही संवाद साधत असलेली नोटिफिकेशन आणि त्रुटी व क्रॅशविषयी माहिती
- तुमच्या अकाउंटविषयी तपशील
रिटेन्शन
आम्ही तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित तुमच्या खेळांमधील स्वारस्यांविषयी आणि ‘माझे खेळ’ च्या वापराविषयीची माहिती सेवा प्रदान करता यावी यासाठी आवश्यकता असेल तोपर्यंत आणि तुम्ही माझे खेळ वापरणे थांबवल्यानंतर जास्तीत जास्त दोन वर्षांसाठी राखून ठेवतो. सपोर्ट असलेली ॲप तुमची माहिती त्यांच्या डेटा आणि गोपनीयता माहितीमध्ये वर्णन केल्यानुसार हाताळतील. Apple TV ॲप व गोपनीयतेविषयी www.apple.com/in/legal/privacy/data/en/apple-tv-app वर आणि Apple News व गोपनीयतेविषयी www.apple.com/in/legal/privacy/data/en/apple-news वर अधिक जाणून घ्या.
Apple ने संकलित केलेली माहिती नेहमी Apple च्या गोपनीयता धोरणानुसार हाताळली जाईल, जे www.apple.com/in/privacy वर मिळू शकते
2025-12-12