NFC व SE प्लॅटफॉर्म व गोपनीयता
NFC व SE प्लॅटफॉर्म तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहे आणि तुमचे डिफॉल्ट संपर्करहित ॲप निवडण्यासाठी तुम्हाला एनेबल करते.
![]()
- तुमच्या प्रदेशात NFC व SE प्लॅटफॉर्मची उपलब्धता ठरवण्यासाठी तुमचे डिव्हाइस तुमच्या स्थानासंबंधित माहितीचा वापर करेल.
- जेव्हा तुम्ही NFC व SE प्लॅटफॉर्म वापरुन तुमच्या डिव्हाइसवर क्रेडेंशिअल समाविष्ट करता, तेव्हा तुमच्या डिव्हाइसवर क्रेडेंशिअल सेट अप करण्यासाठी Apple तुमचे Apple अकाउंट आणि डिव्हाइस आयडेंटिफायर वापरेल.
- Apple द्वारे असा NFC व SE प्लॅटफॉर्म डेटा, ज्याचा संबंध तुमच्याबरोबर जोडला जाऊ शकत नाही, त्याचा वापर केवळ बिलिंगसाठी केला जाईल.
NFC व SE प्लॅटफॉर्म तुम्हाला स्टोअरमध्ये, तुमचे क्रेडेन्शिअल दाखवण्यासाठी तुमच्या आवडीचे काँटॅक्टलेस ॲप वापरण्याची अनुमती देते.
NFC व SE प्लॅटफॉर्म वापरत आहे
उपलब्धता निश्चित करणे
जेव्हा तुम्ही NFC आणि SE प्लॅटफॉर्मचा वापर करून तुमच्या प्राध्यानित संपर्करहित ॲपवर कोणतेही क्रेडेंन्शिअल प्राप्त करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुमचे डिव्हाइस, Apple नाही, NFC आणि SE प्लॅटफॉर्मची उपलब्धता निश्चित करण्यासाठी तुमच्या स्थान आणि डिव्हाइस सेटिंग संबंधित माहितीचा वापर करते. तुमचे डिव्हाइस उपलब्धतेची निश्चिती करू शकत नसल्यास, तुम्ही तुमच्या काँटॅक्टलेस ॲपवर क्रेडेन्शिअल समाविष्ट करू शकणार नाहीत. तुमचे डिव्हाइस विशिष्ट डिफॉल्ट संपर्करहित ॲपच्या प्राधान्यांची उपलब्धता जाणून घेण्यासाठी तुमची स्थानविषयक माहितीदेखील वापरेल, आणि उपलब्ध प्राधान्ये सेटिंग > ॲप्स > [ॲपचे नाव] > ‘डिफॉल्ट संपर्करहित ॲप’ मध्ये डिस्प्ले करेल. तुम्ही NFC आणि SE प्लॅटफॉर्म सपोर्ट करत असलेल्या प्रदेशात नसताना तुमच्या डिफॉल्ट संपर्करहित ॲपची प्राधान्ये बदलल्यामुळे NFC आणि SE प्लॅटफॉर्म उपलब्ध नसताना तुम्हाला क्रेडेंन्शिअल सादर करण्यासाठी तुमचे प्राधान्यित संपर्करहित ॲप वापरण्याला प्रतिबंध केला जाऊ शकेल.
तुमच्या डिव्हाइसवर क्रेडेन्शिअल जोडणे
तुम्ही तुमच्या प्राधान्यकृत संपर्करहित ॲपवर क्रेडेन्शिअल समाविष्ट करता तेव्हा, Apple तुमच्या सुरक्षित घटकावर क्रेडेन्शिअल सुरक्षितरित्या प्राप्त करण्यासाठी तुमचे Apple अकाउंट आणि तुमच्या डिव्हाइसचा हार्डवेअर आयडेंटिफायरचा वापर करेल. Apple ला, तुमच्या संपर्करहित ॲप प्रोव्हायडरला, आणि तुमच्या क्रेडेन्शिअल जारीकर्त्याला तुमचे पुरवण्यात आलेले क्रेडेन्शिअलना अपडेट करणे किंवा हटवण्यासारख्या गोष्टी संपर्करहित ॲपमध्ये व्यवस्थापित करता येण्यासाठी अनुमती देण्यासाठी, Apple ही माहिती वापरेल आणि स्टोअर करेल. तुमच्या क्रेडेन्शिअलची लाइफसायकल मॅनेज करण्यासाठी वापरलेल्या जाणाऱ्या माहितीमध्ये क्रेडेन्शिअल जारीकर्त्याकडून तुमच्या क्रेडेन्शिअलना कसे कॉन्फिगर केले आहे, आणि संपर्करहित ॲप या प्रदाताबद्दलच्या माहितीचा समावेश असतो. तुम्ही जेव्हा तुमच्या प्राधान्यकृत संपर्करहित ॲपसह NFC आणि SE प्लॅटफॉर्मचा वापर करता तेव्हा Apple तुमचे क्रेडेन्शियल तपशील पाहत किंवा स्टोअर करत नाही.
बिलिंगसाठी Apple सह शेअर केलेली माहिती
तुम्ही NFC आणि SE प्लॅटफॉर्मच्या साहाय्याने तुमच्या संपर्कारहित ॲपला क्रेडेंन्शिअल नेमून देता किंवा ते क्रेडेंन्शिअल वापरता तेव्हा Apple तुमच्या संपर्कारहित ॲप प्रोव्हायडरला बिल करण्यासाठी तुमच्याशी जोडता येणार नाही अशी माहिती वापरेल. तुमचे डिव्हाइस तुमच्या संपर्करहित ॲपमध्ये समाविष्ट केलेल्या क्रेडेन्शिअलच्या प्रमाण आणि प्रकार आणि तुम्ही किती वेळा तुमचे क्रेडेन्शिअल सादर केले गेले आहेत त्याची गणनेच्या बाबत मर्यादित माहिती शेअर करेल. तुमचे डिव्हाइस ही माहिती केवळ बिलिंगच्या उद्देशाने तुमच्याशी न जोडलेल्या स्वरूपात Apple सोबत शेअर करेल. तुम्ही तुमच्या संपर्कारहित ॲपवरून जेव्हा क्रेडेन्शियल सादर करता तेव्हा तुमची व्यवहार संबंधित माहिती Apple पाहत किंवा स्टोअर करून ठेवत नाही.
वैयक्तिक डेटा प्रोसेस करण्यासाठी लागू होणारे कायदेशीर आधार
सेवा प्रदान करण्यासाठी आणि आमच्या कायदेशीर बंधनांचे पालन करण्यासाठी आम्ही आवश्यकतांनुसार तुमचा NFC आणि SE प्लॅटफॉर्म व्यक्तिगत डेटा प्रक्रिया करतो. जिथे संमती उचित कायदेशीर आधार असतो, तिथे आम्ही त्याला लागू होणाऱ्या स्थानिक कायद्यानुसार प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो.
जिथे लागू होणारे कायदे निर्देशित करतात, तिथे आम्ही आमच्या किंवा थर्ड पार्टीच्या तर्कसंगत स्वारस्यांच्या उद्देशांसाठी गरजेनुसार वैयक्तिक डेटाच्या खालील श्रेणींवर क्रिया करतो, ज्यामध्ये त्यांच्याबद्दलच्या या माहितीचा समावेश असतो :
- तुमचे स्थान
- डिव्हाइसचा प्रकार, सॉफ्टवेअर व्हर्जन, आणि डिव्हाइसचा सीरिअल नंबर ह्यासारखे तुमचे डिव्हाइस
- तुमच्या ईमेल ॲड्रेस सारखे तुमचे Apple अकाउंट
- तुमच्या इन्स्टॉल केलेल्या संपर्करहित ॲपवर तुमचा NFC आणि SE प्लॅटफॉर्मवरील वापर जसे की प्रत्येक संपर्करहित ॲपला वापरण्यासाठी दिलेले क्रेडेन्शियल आणि क्रेडेन्शियलचा तुमच्याकडून वापराबद्दलची माहिती
या कायदेशीर स्वारस्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे :
- तुमच्या प्राधान्यकृत संपर्करहित ॲपमध्ये क्रेडेन्शियल्स जोडणे आणि मॅनेज करणे
- NFC आणि SE प्लॅटफॉर्म ऑपरेट करणे आणि संपर्करहित ॲप प्रदात्याचे आणि क्रेडेन्शियल जारीकर्त्यांचे बिल तयार करणे
- फसवणूक आणि इतर नुकसानकारक ॲक्टिव्हिटी टाळणे
Apple द्वारे गोळा केलेली माहिती नेहमी Apple च्या गोपनीयता धोरणानुसार हाताळली जाईल, जे www.apple.com/in/privacy येथे मिळू शकते.
2025-12-12