मानांकन व छायाचित्रे व गोपनीयता

तुम्ही ज्या छायाचित्रांचे योगदान देता त्यांना तुमच्या Apple अकाउंटला लिंक केले जाते. वैयक्तिक डेटा नसलेल्या इमेजचा वापर सेवा सुधारण्यासाठी केला जाऊ शकतो, आणि आमच्या अटींची पूर्तता न करणाऱ्या सॅम्पल इमेजचा वापर भविष्यात असा कॉण्टेण्ट फिल्टर करण्याची आमची क्षमता सुधारण्यासाठी केला जाऊ शकतो. तुमच्या अंदाजे स्थानाची माहिती Apple ला पाठवली जाईल आणि तिचा वापर विश्वसनीयतेची पुष्टी करण्यासाठी केला जाईल.
 

मानांकने व छायाचित्रे तुम्हाला तुमच्या आवडीच्या पॉइंटवर (‘POI’) इमेज, मानांकने, किंवा इतर कॉण्टेण्ट (‘सबमिशन’) पोस्ट करण्याची अनुमती देतात.


Privacy Icon

  • सेवेतील अखंडता राखण्यासाठी तुम्ही शेअर केलेली छायाचित्रे तुमच्या Apple अकाउंटला लिंक केली जातात. नियमितपणे रोटेट होणारी मानांकने आयडेंटिफायरशी संबंधित केलेली असतात आणि तुमच्या Apple अकाउंटला लिंक केलेली नसतात.
  • ‘मानांकने व छायाचित्रे’ च्या बाहेरील नकाशा आणि ‘समस्या कळवा’ ह्या तुमच्या इतर ॲक्टिव्हिटी तुमच्या Apple अकाउंटशी लिंक केलेल्या नाहीत आणि तुम्ही ॲप वापरता तेव्हा स्वतःला रीसेट करणाऱ्या रॅण्डम आयडेंटिफायरशी संलग्न राहतात.
  • वैयक्तिक डेटा नसलेल्या इमेजचा वापर उत्पादन आणि सेवा सुधारण्यासाठी केला जाऊ शकतो, आणि आमच्या अटींची पूर्तता न करणाऱ्या सॅम्पल इमेजचा वापर भविष्यात असा कॉण्टेण्ट फिल्टर करण्याची आमची क्षमता सुधारण्यासाठी केला जाऊ शकतो.

मानांकने व छायाचित्रे आणि सर्व Apple सेवांना सुरुवातीपासून तुमच्या गोपनीयतेची सुरक्षा करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. केवळ तुमचा अनुभव उत्तम करण्यासाठी आम्ही आम्हाला आवश्यक असलेला डेटा संकलित करण्यासाठी खूप मेहनत घेतो. जेव्हा आम्ही डेटा संकलित करतो, तेव्हा आम्ही हा डेटा का संकलित करत आहोत आणि आम्हाला हे करणे गरजेचे का आहे, हे तुम्हाला माहीत असणे महत्त्वाचे समजतो, जेणेकरून तुम्ही अचूक निवड करू शकाल.

मानांकने व छायाचित्रे प्रदान करणे

तुमच्या आवडीच्या POI चे छायाचित्र अपलोड करण्यासाठी, तुमच्याकडे Apple अकाउंट असायला हवे. तुमचे अंदाजित स्थान आणि तुमच्या इमेजशी संबंधित स्थान माहिती देखील Apple कडे पाठवली जाईल आणि सबमिशनच्या विश्वसनीयतेची पुष्टी करण्यासाठी वापरली जाईल. तुमचे छायाचित्र सबमिशन तुमच्या Apple अकाउंटला जोडले जाईल. नियमितपणे रोटेट होणारी तुम्ही सबमिट केलेली मानांकने आयडेंटिफायरशी संबंधित असतात आणि तुमच्या Apple अकाउंटला लिंक केलेली नसतात. आम्ही तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित नसलेली तुमच्या सबमिशनच्या वापराबाबतची ॲनालिटिक्स अशा प्रकारचा वैयक्तिक नसलेला डेटादेखील संकलित करतो.

तुम्ही तुमच्या पसंतीचे टोपणनाव वापरुन नकाशामध्ये दिसणाऱ्या तुमच्या सर्व छायाचित्रांसाठी सार्वजनिक क्रेडिट मिळवू शकता. तुम्ही क्रेडिट प्राप्त करणे निवडल्यास, ‘नकाशा’ मध्ये तुम्ही सबमिट केलेल्या सर्व छायाचित्रांवरील तुमचे टोपणनाव इतर नकाशा यूझरना दिसेल. तुम्ही तुमच्या iOS, iPadOS, किंवा visionOS डिव्हाइस वर नकाशे > [तुमचा फोटो किंवा आद्याक्षरे] > प्राधान्ये > छायाचित्र क्रेडिट वर जाऊन आणि ‘क्रेडिट दाखवणे बंद करा’ किंवा ‘तुमचे टोपणनाव संपादित करणे’ वर टॅप करून किंवा Mac वर नकाशे > सेटिंग > मानांकन आणि छायाचित्रेवर जाऊन क्रेडिट प्राप्त करणे बंद करू शकता किंवा टोपणनाव बदलू शकता. बदलांना लागू करण्यासाठी काही दिवस लागू शकतात.

तुम्ही नकाशांना छायाचित्रे देणाऱ्या कंपनीना देखील नकाशामध्ये तुमच्याकडून समाविष्ट केल्या जाणाऱ्या छायाचित्रांचा वापर त्यांच्या स्वतःच्या उत्पादनांमध्ये आणि सेवामध्ये करण्याची अनुमती देऊ शकता. तुम्ही त्या कंपन्यांना तुमची छायाचित्रे वापरण्याची अनुमती देण्याचे ठरवल्यास, Apple ती छायाचित्रे आणि त्यांची स्थाने शेअर करेल मात्र तुमची ओळख स्पष्ट करणारी माहिती शेअर करणार नाही. तुम्ही ‘सेटिंग’ > ‘ॲप्स’ > ‘नकाशा’ > ‘छायाचित्राचा वापर’ वर जाता आणि ‘छायाचित्र प्रोव्हायडरना iOS, iPadOS, किंवा visionOS डिव्हाइसवर तुमची छायाचित्रे वापरण्याची अनुमती द्या’ बंद करता, किंवा Mac वर ‘नकाशा’ > ‘सेटिंग’ > ‘मानांकन आणि छायाचित्र’ मध्ये जाऊन ‘छायाचित्र प्रोव्हायडरना तुमचे छायाचित्र वापरण्याची अनुमती द्या’ डिसिलेक्ट करता तेव्हा त्या कंपन्यांना भविष्यात तुमचे छायाचित्र वापरता येणार नाही. बदलांना लागू करण्यासाठी काही दिवस लागू शकतात.

तुम्ही मानांकन आणि छायाचित्रे वापरता तेव्हा तुमचा वैयक्तिक डेटा अथवा इतरांबद्दलचा वैयक्तिक डेटा (उदाहरणार्थ, व्यक्तीची ओळख स्पष्ट करणाऱ्या इमेजेस) विषद करणाऱ्या इमेज स्वीकारल्या जाणार नाहीत.

तुम्ही अलीकडे भेट दिली असल्यास किंवा POI चे छायाचित्र घेतले असल्यास नकाशा तुम्हाला मानांकन किंवा छायाचित्र सबमिट करण्याबाबत सुचवू शकेल. या सूचना ऑन-डिव्हाइस प्रक्रियेचा वापर करून पूर्ण केल्या जातात आणि त्या Apple कडून वाचले जाऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या iOS, iPadOS, किंवा visionOS डिव्हाइसवर सेटिंग > ॲप > नकाशा वर जाऊन आणि ‘मानांकने आणि छायाचित्र सूचना दाखवा’ डिसेबल करून आणि तुमच्या Mac वर नकाशा > सेटिंग > ‘मानांकने आणि छायाचित्र’ वर जाऊन आणि ‘मानांकने आणि छायाचित्र सूचना दाखवा’ डीसिलेक्ट करून या सूचना प्राप्त न करणे निवडू शकता.

मानांकने व छायाचित्रे सुधारणे

‘मानांकने आणि छायाचित्रे’ मध्ये आम्ही सर्वाधिक संबद्ध आणि वैविध्यपूर्ण इमेजन POI प्लेसकार्डावर डिस्प्ले करण्याचे आणि त्यांना क्रमित करण्याचे ध्येय ठेवतो. उत्पादन आणि सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी तुमच्या सबमिशनचा वापर केला जाईल. आम्ही अशा उद्देशासाठी कोणतीही इमेज वापरण्यापूर्वी आम्ही कोणताही वैयक्तिक डेटा काढून टाकतो आणि सबमिशनला तुमच्या Apple अकाउंटपासून असंबद्ध करतो.

आमच्या अटींचे (www.apple.com/legal/internet-services/maps/ratings-photos) उल्लंघन करणाऱ्या सबमिशनना फिल्टर करून काढून टाकण्याचा आमचा प्रयत्न आहे. तुम्ही अशा प्रकारचा कॉण्टेण्ट सबमिट केल्यास, आमचा उद्देश ती पोस्ट केली न जाणे किंवा अंधूक केली जाते, तुमचे अकाउंट ब्लॉक केले जाऊ शकते, आणि काही विशिष्ट प्रकरणांमध्ये आम्ही तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित असलेल्या ईमेल ॲड्रेसच्या साहाय्याने तुमच्या संपर्क साधू. सेवेतील विश्वासार्हता कायम राखण्यासाठी आमच्या अटींचे पालन न करणाऱ्या इमेजचा नमुना भविष्यात असे कॉटेण्ट फिल्टर करून टाकण्याच्या आमच्या क्षमतेमध्ये सुधारणा करण्यासाठी देखील वापरला जाऊ शकेल.

थर्ड पार्टीसोबत शेअरिंग

Apple ला पाठवण्यात आलेल्या डेटावर विश्वासार्ह सेवा प्रदात्याकडून प्रक्रिया केली आणि स्टोअर केला जाऊ शकतो.

वैयक्तिक डेटा प्रोसेस करण्यासाठी लागू होणारे कायदेशीर आधार

आम्ही सेवा प्रदान करण्यासाठी आणि आमच्या कायदेशीर आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी आवश्यकता म्हणून ‘मानांकन व छायाचित्रे’ साठी तुमच्या वैयक्तिक डेटावर काम करतो. जिथे संमती उचित कायदेशीर आधार असतो, तिथे आम्ही त्याला लागू होणाऱ्या स्थानिक कायद्यानुसार प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो.

जिथे लागू होणारे कायदे निर्देशित करतात, तिथे आम्ही आमच्या किंवा थर्ड पार्टीच्या कायदेशीर स्वारस्यांच्या उद्देशांसाठी गरजेनुसार वैयक्तिक डेटाच्या पुढील श्रेणी पुढील कारणासाठी प्रोसेस करतो :

  • सबमिशनच्या विश्वासार्हतेची पुष्टी करा
  • सेवेची विश्वासार्हता राखा

वापरलेल्या डेटामध्ये हे समाविष्ट आहे :

  • तुमचे अंदाजे स्थान आणि तुमच्या इमेजशी संबंधित केलेली स्थान विषयक माहिती
  • आमच्या अटींची पूर्तता न करणाऱ्या इमेजचे सॅम्पल

रिटेन्शन

तुम्ही ‘मानांकन व छायाचित्र’ मध्ये सबमिट केलेली छायाचित्रे आम्ही राखून ठेवतो आणि ती तुम्ही हटवेपर्यंत किंवा अशाप्रकारचे कॉण्टेण्ट काढून टाकेपर्यंत किंवा privacy.apple.com वरील Apple च्या गोपनीयता धोरण पोर्टलद्वारे अकाउंट हटवण्याची विनंती करेपर्यंत किंवा कायद्याने आवश्यक असेल तोपर्यंत Apple अकाउंटवर स्टोअर करतो. तुम्ही नकाशा ॲप वापरून तुमची छायाचित्र सबमिशन हटवू शकता आणि तुमची मानांकने काढून टाकू शकता किंवा बदलू शकता. तुमचा वैयक्तिक डेटा हा मानांकने व छायाचित्रे यांच्याशी संबंधित असल्यामुळे तो कसा वापरला जातो याबाबत काही प्रश्न किंवा समस्या असल्यास, किंवा तुम्हाला आमच्या डेटा संरक्षण अधिकाऱ्याशी संपर्क साधायचा असल्यास, तुम्ही www.apple.com/in/legal/privacy/contact वर आमच्याशी संपर्क साधू शकता.

Apple ने संकलित केलेली माहिती नेहमी Apple च्या गोपनीयता धोरणानुसार हाताळली जाईल, जे www.apple.com/in/privacy वर मिळू शकते

2025-12-12