‘Apple ला रिपोर्ट करा’ व गोपनीयताला
‘Apple ला कळवा’ तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहे आणि तुम्ही काय शेअर करता हे निवडण्यासाठी तुम्हाला एनेबल करते.
![]()
- तुम्हाला हानिकारक आणि बेकायदेशीर नग्नता असलेली छायाचित्रे किंवा व्हिडिओ प्राप्त होतात, तेव्हा ‘Apple ला कळवा’ तुम्हाला Apple ला माहिती कळवण्याची अनुमती देते.
- अहवालांचे प्रशिक्षित व्यावसायिकांच्या पुनरावलोकन केले जाईल, आणि Apple ला आवश्यक वाटल्यास कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांबरोबर कदाचित शेअर केले जाईल.
- Apple ह्या अहवालामधील तपशील तुमच्या संभाषणामध्ये असलेल्या समाविष्ट असलेल्या इतर लोकांबरोबर शेअर करणार नाही.
तुम्हाला हानिकारक आणि बेकायदेशीररीत्या दाखवलेली नग्नता असलेला कॉण्टेण्ट प्राप्त झाल्यास किंवा तुम्हाला दिसून आल्यास, तुम्ही Apple ला रिपोर्ट पाठवू शकता. तुम्ही अहवाल सबमिट केल्यावर, चौकशी करून संभाव्य कारवाई करण्यासाठी आवश्यक असलेली किमान माहिती Apple गोळा करते आणि त्या माहितीवर प्रक्रिया करते. ह्या माहितीमध्ये पुढील गोष्टी समाविष्ट असू शकतात :
- तुमचे नाव आणि फोन नंबर ह्यासारखी तुमची संपर्क माहिती आणि संभाषणातील इतरांची संपर्क माहिती
- तुम्ही रिपोर्ट करत असलेल्या इमेजेस, व्हिडिओज किंवा फ्रेम्स
- iMessage मध्ये सबमिट केलेल्या रिपोर्टच्या बाबतीत, तुम्ही रिपोर्ट करत असलेल्या इमेज किंवा व्हिडिओच्या आधी आणि नंतर काही मर्यादित संदेशांमध्ये समाविष्ट असलेला कॉण्टेण्ट, आणि टाइमस्टॅम्प आणि प्रेषकाविषयी माहिती ह्यासारखा संबंधित मेटाडेटा
- तुम्ही अहवालात देण्यासाठी निवडलेल्या काही अतिरिक्त टिप्पण्या
अहवाल Apple ला सुरक्षितपणे पाठवण्यापूर्वी तो तुमच्या डिव्हाइसवर तयार आणि एनक्रिप्ट केला जातो. रिपोर्टचा ॲक्सेस अतिशय नियंत्रित असून तो फक्त प्रत्येक रिपोर्ट रिव्ह्यू करणाऱ्या प्रशिक्षित व्यावसायिकांनाच उपलब्ध आहे आणि आवश्यकता असल्यास, कायदे अंमलबजावणी अधिकाऱ्यांसह किंवा कायद्यानुसार आवश्यक असेल त्याप्रमाणे अहवाल शेअर करा.
वैयक्तिक डेटा प्रोसेस करण्यासाठी लागू होणारे कायदेशीर आधार
आम्ही तुमच्या व्यक्तिगत डेटावर सर्वसाधारणपणे Apple सोबतच्या तुमच्या कराराच्या कार्यवाहीसाठी प्रक्रिया करतो जसे की सेवा प्रदान करायला आणि आमच्या कायदेशीर बंधनाच्या पालनासाठी आवश्यक आहेत. जिथे संमती हाच उचित कायदेशीर आधार असतो, तिथे आम्ही त्याला लागू होणाऱ्या स्थानिक कायद्याचा आधार देण्याचा प्रयत्न करतो.
रिटेन्शन
वैयक्तिक डेटा ज्या उद्देशांसाठी गोळा केला असेल, त्या उद्देशांची पूर्तता करण्यासाठी Apple आवश्यक तेवढाच काळ तो राखून ठेवते. आम्ही Apple ला सबमिट केलेले अहवाल कायद्यानुसार दोन वर्षांसाठी राखून ठेवतो. राखून ठेवण्याच्या कालावधीचा हिशेब करत असताना आम्ही संकलित केलेला वैयक्तिक डेटा राखून ठेवणे आवश्यक आहे का याला काळजीपूर्वक तपासतो आणि तो राखून ठेवणे आवश्यक असल्यास कायद्याने परवानगी असलेल्या वैयक्तिक डेटा राखून ठेवण्याच्या सर्वात कमी कालावधीसाठी तो राखून ठेवतो.
Apple ने संकलित केलेली माहिती नेहमी Apple च्या गोपनीयता धोरणानुसार हाताळली जाईल, जे www.apple.com/in/privacy वर मिळू शकते.
2026-03-30