Safari व गोपनीयता
Safari तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहे आणि तुम्ही काय शेअर करता हे निवडण्यासाठी तुम्हाला एनेबल करते.
संकेतस्थळांकडून तुम्हाला Safari मध्ये ट्रॅक करण्यासाठी वापरला जाऊ शकणारा डेटा काढून टाकण्यासाठी किंवा ब्लॉक करण्यासाठी Safari सेटिंगचा वापर करा. ही प्राधान्ये बघण्यासाठी सेटिंग > ॲप > Safari वर जा.
क्रॉस-साइट ट्रॅकिंग करण्याला प्रतिबंध करा
काही संकेतस्थळे थर्ड पार्टी कॉण्टेण्ट प्रोव्हायडरचा वापर करतात. थर्ड पार्टी कॉण्टेण्ट प्रदाता उत्पादने आणि सेवांची जाहिरात करण्यासाठी सर्व संतकेस्थळांवर तुम्हाला ट्रॅक करू शकतो.
हा पर्याय चालू असल्यावर, जोपर्यंत तुम्ही थर्ड पार्टी कॉण्टेण्ट प्रोव्हायडरवर जात नाही तोपर्यंत ट्रॅकिंग डेटा वेळोवेळी हटवला जातो.
IP ॲड्रेस लपवा
इंटेलिजेंट ट्रॅकिंग प्रतिबंध ट्रॅकरला थांबवण्याकरिता ऑन-डिव्हाइस मशीन लर्निंगचा वापर करून तुम्हाला अज्ञात ट्रॅकिंगपासून संरक्षित करण्यात मदत केली जाते तसेच त्या दरम्यान संकेतस्थळ सामान्यपणे काम करत असते. वेगवेगळ्या एंटिटीकडून ऑपरेट केल्या जाणाऱ्या दोन स्वतंत्र रिलेच्या माध्यमातून तुमचे काही वेब ट्रॅफिक पाठवून इंटेलिजेंट ट्रॅकिंग प्रतिबंधची क्षमता ‘IP ॲड्रेस लपवा’ ने वाढवली जाते. पहिल्याला तुमचा इंटरनेट प्रोटोकॉल (IP) ॲड्रेस माहीत असतो परंतु त्या संकेतस्थळाची माहिती नसते ज्याच्यावर तुम्ही जात आहात. गंतव्य संकेतस्थळाची एक सामान्य ओळख आणि स्थान प्रदान करण्याऐवजी, दुसऱ्या एंटिटिला त्या संकेतस्थळाची माहिती असते ज्याच्यावर तुम्ही जात आहात, परंतु त्याला तुमच्या IP ॲड्रेसची माहिती नसते. अशा प्रकारे, कोणत्याही एंटिटीला तुमची आणि तुम्ही पाहिलेली संकेतस्थळे, अशा दोन्हींची ओळख करण्याची माहिती नसते.
तुम्ही रिले आर्किटेक्चरच्या माध्यमातून काही ठराविक ट्रॅफिक पाठवणे निवडू शकता. प्रायव्हेट रिले सदस्य सेटिंग > ॲप्स > Safari > ‘IP ॲड्रेस लपवा’ वर जाऊन आणि ‘ट्रॅकर्स आणि संकेतस्थळे’ वर टॅप करून प्रायव्हेट रिलेमार्फत सर्व ट्रॅफिक पाठवणे निवडू शकतात. ह्या व्यतिरिक्त, सर्व युझर्स सेटिंग > ॲप्स > Safari > ‘IP ॲड्रेस लपवा’ वर जाऊन आणि ‘केवळ ट्रॅकर्स’ वर टॅप करून रिले आर्किटेक्चर मार्फत ज्ञात ट्रॅकरसह ट्रॅफिक पाठवणे निवडू शकतात. तुम्ही सेटिंग > ॲप > Safari > ‘IP ॲड्रेस लपवा’ वर जाऊन आणि ‘ऑफ करा’ वर टॅप करून ‘IP ॲड्रेस लपवा’ कोणत्याही क्षणी डिसेबल करू शकता.
फसवे संकेतस्थळ चेतावणी
जेव्हा फसवे संकेतस्थळ चेतावणी एनेबल केले जाते, तेव्हा Safari इशारा देते की तुम्ही बघत असलेले संकेतस्थळ संशयास्पद फिशिंग किंवा मालवेअर संकेतस्थळ आहे. फिशिंग हा यूझरनेम, पासवर्ड आणि इतर अकाउंट माहिती ह्यासारखा वैयक्तिक डेटा चोरण्याचा फसवा प्रयत्न आहे. फसवे संकेतस्थळ बॅंक, वित्तीय संस्था किंवा ईमेल सर्व्हिस प्रोव्हायडर ह्यासारखे वैध संकेतस्थळ असल्याचे दाखवते. मालवेअर संकेतस्थळे धोकादायक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न करू शकतात ज्याने तुमच्या संगणकाची हानी होऊ शकते किंवा तुमचा वैयक्तिक डेटा चोरीला जाऊ शकतो. संकेतस्थळावर जाण्याआधी, Safari संकेतस्थळाच्या ॲड्रेसवरून मिळालेली माहिती Google सुरक्षित ब्राउझिंगला आणि Apple ला पाठवू शकते, ज्याने तपासले जाऊ शकते की संकेतस्थळ फसवे आहे की नाही किंवा मालवेअर आढळले आहे की नाही. सेटिंग > सामान्य > भाषा आणि प्रदेश मध्ये चीन मेनलॅण्ड किंवा हाँगकाँगला त्यांचा प्रदेश म्हणून सेट करणाऱ्या यूझरसाठी तपासण्याकरिता Safari कडून Tencent सुरक्षित ब्राउझिंग देखील वापरले जाऊ शकते. प्रत्यक्ष संकेतस्थळाचा ॲड्रेस सुरक्षित ब्राउझिंग प्रोव्हायडर बरोबर कधीच शेअर केला जात नाही. Google (आणि, त्या यूझरसाठी ज्यांनी चीन मेनलॅण्ड किंवा हाँगकाँग त्यांचा प्रदेश म्हणून सेट केले आहे, Tencent) देखील तुमचा IP ॲड्रेस लॉग करू शकते जेव्हा त्यांना माहिती पाठवली जाते. तुम्ही सेटिंग > ॲप > ‘Safari’ वर जाऊन आणि ‘फसवे संकेतस्थळ इशारा’ बंद करण्यासाठी टॅप करून Safari मध्ये कोणत्याही क्षणी ‘फसवे संकेतस्थळ इशारा’ डिसेबल करू शकता.
गोपनीयतेचे संरक्षण करणारे जाहिरातीचे विश्लेषण
जेव्हा गोपनीयतेचे संरक्षण करणारे जाहिरातीचे विश्लेषण एनेबल केले जाते, तेव्हा संकेतस्थळे आणि जाहिरातदारांना जाहिरात बघण्यासाठी आणि क्लिक करण्यासाठी ॲट्रिब्युट करण्यात मदत करण्यासाठी तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करून Safari कडून संकेतस्थळाला ॲट्रिब्युशन रिपोर्ट प्रदान केले जातील. Safari मार्फत IP ॲड्रेस सुरक्षा वापरून, कोणत्याही डेटा स्टोरेजशिवाय, कोणत्याही कुकीजशिवाय आणि 24 व 48 तासांमध्ये रॅण्डम पद्धतीने विलंब करून समर्पित मोडमध्ये मर्यादित डेटासह ॲट्रिब्युशन अहवाल पाठवता जाईल. ॲट्रिब्युशन रिपोर्टमध्ये कोणताही वैयक्तिक डेटा नसतो.
तुम्ही सेटिंग > ॲप > ‘Safari’ वर जाऊन आणि ‘गोपनीयतेचे संरक्षण करणारे जाहिरातीचे विश्लेषण’ बंद करण्यासाठी टॅप करून Safari मध्ये कोणत्याही क्षणी ‘गोपनीयतेचे संरक्षण करणारे जाहिरातीचे विश्लेषण’ डिसेबल करू शकता.
Apple Pay साठी तपासा
जेव्हा तुम्ही iPhone, iPad, Apple Vision Pro, किंवा Apple Watch वर Apple Pay वापरत असलेल्या ॲप किंवा संकेतस्थळावर असता, तेव्हा ते तपासू शकतात की तुम्ही त्या डिव्हाइसवर Apple Pay एनेबल केलेले आहे की नाही. तुम्ही तुमच्या iOS, iPadOS, किंवा visionOS डिव्हाइसवर सेटिंग > ॲप > Safari > ‘ॲडव्हान्स्ड’ वर जाऊन आणि ‘Apple Pay साठी तपासा’ बंद करण्यासाठी टॅप करून तुम्ही पहात असलेली संकेतस्थळे Apple Pay एनेबल केलेली आहेत की नाही हे तपासून कोणत्याही क्षणी डिसेबल करू शकता.
खाजगी ब्राउझिंग
खाजगी ब्राउझिंग एनेबल केलेले असल्यास, Safari तुम्ही पाहिलेली पृष्ठे, ऑटोफिल माहिती लक्षात ठेवत नाही आणि तुमचे उघडे असलेले टॅब iCloud मध्ये संग्रहित करत नाही किंवा तुमच्या सर्व डिव्हाइसमध्ये सिंक करत नाही. संकेतस्थळे तुमच्या डिव्हाइसवर संग्रहित केली जाणारी माहिती बदलू शकत नाहीत, ज्याने त्यासारख्या संकेतस्थळांवर असलेल्या सेवा खाजगी ब्राउझिंग बंद करेपर्यंत वेगळ्या पद्धतीने काम करू शकतात.
नोट : जेव्हा खाजगी ब्राउझिंग एनेबल केलेले असते, तेव्हा ॲड्रेस बार लाइटऐवजी डार्क दाखवला जातो.
वेबपृष्ठ भाषांतर
भाषा निश्चित करण्यासाठी तुम्ही पाहिलेल्या प्रत्येक वेबपृष्ठाचे Safari कडून विश्लेषण केले जाते. हे निर्धारण पूर्णपणे तुमच्या डिव्हाइसवर बनवलेले असते. तुमचे प्राधान्य असलेल्या कोणत्याही भाषेत वेबपेजचे भाषांतर होऊ शकत असल्यास, तुम्ही ‘भाषांतर’ निवडू शकता. तुम्ही भाषांतर केल्यास, भाषांतर करण्यासाठी वेबपृष्ठाचे कॉण्टेण्ट (पूर्ण टेक्स्टसह) Safari कडून Apple च्या सर्व्हरवर पाठवले जातील. भाषांतर पूर्ण झाल्यावर, Apple कडून वेबपृष्ठाचे सर्व कॉण्टेण्ट डिस्कार्ड केले जातील.
जर वेबपृष्ठ खाजगी ब्राउझिंग मोडमध्ये बघितले गेले नसेल, तर Safari वेबपृष्ठाचा ॲड्रेस देखील Apple ला पाठवेल. Apple ची उत्पादने, सेवा आणि तंत्रज्ञान सुधारण्यासाठी Apple कडून पाच वर्षांपर्यंत ॲड्रेस संग्रहित केले जातील. जसे की Apple तुम्ही भाषांतर करत असलेल्या वेबपृष्ठांचा कॉण्टेण्ट संग्रहित करत नाही, केवळ सार्वजनिकरित्या ॲक्सेस करण्यायोग्य वेबपृष्ठांचा वापर Apple ची उत्पादने, सेवा आणि तंत्रज्ञान सुधारण्यासाठी केला जाईल.
Apple ला पाठवले जाणारे वेबपृष्ठ कॉण्टेण्ट आणि ॲड्रेस तुमच्या Apple अकाउंट, ईमेल ॲड्रेस किंवा इतर Apple सेवा वापरण्यासाठी Apple कडे असलेल्या इतर डेटाशी संबंधित नसते.
तुम्हाला उत्तम ब्राउझिंग अनुभव प्रदान करण्यासाठी, एखादे विशिष्ट वेबपृष्ठ भांषातरित केल्यानंतर, जेव्हा तुम्ही त्याच टॅबमध्ये त्याच डोमेनमध्ये इतर वेबपृष्ठांवर जाता तेव्हा ते देखील भाषांतरित केले जाऊ शकते. Safari द्वारे भाषांतर करणे ऑटोमॅटिकली थांबवले जाईल जेव्हा तुम्ही अशा वेबपृष्ठावर जाता जे आता त्याच मूळ भाषेत नाही किंवा वेबपृष्ठ वेगळ्या डोमेनवर आहे.
हायलाइट्स
तुम्ही हायलाइट एनेबल केल्यास, Safari वेबपृष्ठावरील संबंधित माहिती ऑटोमॅटिकली ओळखेल आणि तुम्ही ब्राउझ करत असताना हायलाइट करेल. वेबपृष्ठावर जात असताना, संबंधित हायलाइट्स उपलब्ध असल्याचे निश्चित करण्यासाठी Safari वेबपृष्ठाच्या ॲड्रेसवरून मिळालेली माहिती OHTTP मधून Apple ला पाठवू शकते. जेव्हा तुम्ही पृष्ठासाठी संबंधित हायलाइट पाहण्यासाठी पृष्ठ मेन्यू आयकॉन सिलेक्ट करता, तेव्हा हायलाइट प्रदान करण्यासाठी Safari वेबपृष्ठाचा ॲड्रेस Apple ला पाठवू शकते. Apple ला पाठवली जाणारी सर्व माहिती तुमच्या Apple अकाउंट, ईमेल ॲड्रेस किंवा इतर Apple सेवा वापरण्यासाठी Apple कडे असलेल्या इतर डेटाशी संबंधित नसते. तुम्ही सेटिंग > ॲप > ‘Safari’ वर जाऊन आणि ‘हायलाइट चालू करा’ वर टॅप करून हायलाइट एनेबल करू शकता.
वेब एक्सटेन्शन
तुम्ही App Store वरून Safari एक्सटेंशन डाउनलोड करू शकता. तुमचे डिव्हाइस मॅनेज केलेले असल्यास, तुमचे एंप्लॉयर किंवा शैक्षणिक संस्था तुम्हाला Safari एक्सटेंशन समाविष्ट असलेले ॲप प्रदान करू शकतात. Safari एक्सटेंशन वापरण्यापूर्वी, तुम्हाला हे ‘Safari’ मध्ये किंवा सेटिंग > Safari > ‘एक्सटेंशन’ वर जाऊन चालू करावे लागेल. एकदा चालू केल्यावर, तुम्ही ज्या वेबपृष्ठांवर जाता ती वाचण्यासाठी किंवा बदलण्यासाठी एक्सटेंशनला परवानगी द्यावी लागेल. तुम्ही > सेटिंग >ॲप >Safari > एक्सटेंशनवर जाऊन एक्सटेंशन कोणती संकेतस्थळे वाचू शकते आणि बदलू शकते हे बदलू शकता.
जेव्हा तुम्ही थर्ड पार्टी वेब एक्सटेंशन वापरता, तेव्हा तुम्ही त्या थर्ड पार्टींच्या अटी आणि गोपनीयता धोरण व व्यवहारांच्या अधीन असतात. ते तुमची माहिती कशी वापरतात हे समजून घेण्यासाठी तुम्ही अशा एक्सटेन्शनच्या अटी, गोपनीयता धोरण आणि कार्यपद्धती रिव्ह्यू केल्या पाहिजेत.
iCloud सिंकिंग
तुम्ही तुमच्या खुल्या टॅब, टॅब गट, ऑटोफिल माहिती, बुकमार्क, वाचन यादी आणि हिस्ट्री ह्यासह तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर तुमची Safari माहिती सिंक्रोनाइझ करण्यासाठी iCloud वापरू शकता. तुम्ही सेटिंग > [तुमचे नाव] > iCloud > iCloud वर जतन केले > ‘सर्व बघा’ वर जाऊन Safari बंद करण्यासाठी टॅप करून कधीही हे फीचर बंद करू शकता.
ही फीचर वापरून, तुम्ही Apple आणि तिच्या उपकंपन्यांच्या आणि एजंटच्या प्रक्षेपण करणे, गोळा करणे, देखभाल, काम करणे, आणि ह्या माहितीच्या वर वर्णन केल्याप्रमाणे वापराला सहमती आणि संमती देता.
रिटेन्शन
Apple च्या गोपनीयता धोरणात किंवा आमच्या सेवा विशिष्ट गोपनीयता सूचनांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे किंवा कायद्यानुसार आवश्यक असलेल्या गोष्टींसह, Apple द्वारे ज्या उद्देशांसाठी डेटा संकलित केला गेला होता त्या उद्देशांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक कालावधीपुरताच Apple कडून वैयक्तिक डेटा राखून ठेवला जातो. राखून ठेवण्याच्या कालावधीचे मूल्यांकन करत असताना, आम्ही सर्वप्रथम संकलित केलेला वैयक्तिक डेटा राखून ठेवणे आवश्यक आहे का याची काळजीपूर्वक तपासणी करतो आणि, तो राखून ठेवणे आवश्यक असल्यास, कायद्याने परवानगी दिलेल्या सर्वात कमी कालावधीसाठी वैयक्तिक डेटाला राखून ठेवण्याचे काम करतो.
Apple ने संकलित केलेली माहिती नेहमी Apple च्या गोपनीयता धोरणानुसार हाताळली जाईल, जे www.apple.com/in/privacy वर मिळू शकते.
2025-12-12