सुरक्षा फीचर व गोपनीयता
सुरक्षा फीचर तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी डिझाइन केलेली आहेत आणि तुम्ही काय शेअर करता हे निवडण्यासाठी तुम्हाला एनेबल करतात.
![]()
- आपत्कालीन सेवांना कॉल करण्यासाठी सुरक्षा फीचर वापरत असताना, कॉल किंवा टेक्स्ट सत्र सुरू केले गेल्यास, प्रतिसाद प्रयत्नांमध्ये मदतीसाठी त्यामध्ये तुमच्या डिव्हाइसच्या स्थानाचा समावेश होऊ शकतो, मग तुम्ही स्थान सेवा एनेबल केलेली असेल किंवा नसेल तरीही.
- कॉल समाप्त झाल्यावर, तुमचे डिव्हाइस कदाचित तुमच्या स्थानासह तुमच्या आपत्कालीन संपर्कांना संदेश पाठवेल आणि त्यांना कळवेल की आपत्कालीन SOS ट्रिगर केला गेला आहे.
- काही सुरक्षा फीचर ऑटोमॅटिकली एनेबल केले जाऊ शकतात.
आपत्कालीन SOS
जेव्हा तुम्ही आपत्कालीन कॉल सुरू करणारे आपत्कालीन SOS फीचर वापरता, तेव्हा डिस्पॅचरला तुम्हाला सहाय्य करता यावे म्हणून त्या कॉलमध्ये तुमचे स्थान (तुम्ही स्थान सेवा एनेबल केलेल्या आहेत किंवा नाहीत) आणि वैद्यकीय ID (एनेबल केलेला असल्यास) ह्यांचा समावेश केलेला असू शकतो. तुमचा स्थान डेटा आणि एनक्रिप्ट केलेली मेडिकल ID माहिती Apple ला पाठवली जाते जेणेकरून Apple हे तपासू शकेल की तुमच्या क्षेत्रात ‘वर्धित आपत्कालीन डेटा’ सेवेला समर्थन आहे की नाही आणि ते आपत्कालीन सेवांना डेटा प्रदान करू शकेल. तुमच्या क्षेत्रात सपोर्ट असल्यास, भागीदार आपत्कालीन सेवा डिलीव्हर करण्यासाठी Apple कडून तुमची माहिती परत मिळवू शकतात. Apple तुमच्या वैद्यकीय ID ची माहिती वाचू शकत नाही. कॉल समाप्त झाल्यानंतर आणि तुम्ही संदेश ॲप अनइन्स्टॉल केलेले नसल्यास, तुम्ही संदेश रद्द करत नाही तोपर्यंत, तुमच्या आपत्कालीन संपर्कांना आणि चेक इन सेशन सक्रिय असल्यास चेक इन संपर्कांना ऑटोमॅटिकली संदेश प्राप्त होईल, ज्यामध्ये तुम्ही आपत्कालीन सेवांना कॉल केला आहे असे सांगितले जाते. ह्या संदेशात तुमच्या सध्याच्या स्थानाचा देखील समावेश आहे आणि मर्यादित कालावधीसाठी, तुमचे स्थान बदलल्यावर तुमचे डिव्हाइस तुमच्या आपत्कालीन संपर्कांना आणि सक्रिय चेक इन संपर्कांना अपडेट पाठवेल. तुम्हाला तुमच्या आपत्कालीन संपर्कांना किंवा सक्रिय चेक इन संपर्कांना तुमचे स्थान पाठवायचे नसल्यास, तुमच्या iPhone किंवा Apple Vision Pro मध्ये सेटिंग > गोपनीयता व सुरक्षा > स्थान सेवा > ‘सिस्टीम सेवा’ वर जा आणि ‘आपत्कालीन कॉल व SOS’ वर टॅप करून ते बंद करा.
For more information about Emergency SOS & Privacy, visit www.apple.com/in/legal/privacy/data/en/emergency-sos.
वैद्यकीय ID विषयी अधिक जाणून घेण्यासाठी, सेटिंग > आरोग्य > वैद्यकीय ID > ‘आपत्कालीन ॲक्सेस’ वर जा आणि 'अधिक जाणून घ्या’ वर टॅप करा.
स्थान सेवांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, www.apple.com/in/legal/privacy/data/en/location-services ला भेट द्या.
सॅटेलाइटच्या माध्यमातून आपत्कालीन SOS
अपवादात्मक परिस्थितीत जेव्हा आपत्कालीन सेवांपर्यंत पोहोचण्यासाठी इतर कोणताही मार्ग उपलब्ध नसतो तेव्हा उपग्रहामार्फत आपत्कालीन SOS तुम्हाला आपत्कालीन सेवांशी कनेक्ट करण्यात मदत करू शकतात. ह्या सेवेसाठी संदेश ॲपची आवश्यकता आहे आणि कदाचित सर्व स्थाने किंवा परिस्थितीत उपलब्ध नसेल.
आपत्कालीन सेवांना संदेश पाठवण्यासाठी आणि त्यांच्याकडून संदेश प्राप्त करण्यासाठी कोणत्याही अडथळ्याशिवाय आकाश स्पष्ट दिसणे आणि तुमच्या डिव्हाइस आणि उपग्रहामध्ये योग्य अलाइनमेंट असणे आवश्यक आहे. उपग्रहाचे कनेक्शन तुमच्या पारंपरिक नेटवर्कपेक्षा खूप वेगळ्या प्रकारे काम करते. परिणामी, पारंपरिक टेक्स्ट संदेशांच्या तुलनेत संदेश पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो आणि उपलब्धतेमध्ये व्यत्यय येऊ शकतो.
काही स्थानांवर, तुम्ही थेट आपत्कालीन सेवा केंद्रासह संदेशाचे आदानप्रदान करू शकता. तुमच्या स्थानी सेवा देणारे आपत्कालीन सेवा सेंटर टेक्स्ट संदेश प्राप्त करू शकत नसल्यास, ते तृतीय पक्षाचे रिले प्रोव्हायडर तुम्हाला टेक्स्ट संदेश पाठवेल, आणि तुमच्यावतीने आपत्कालीन सेवांना कॉल करेल. युनायटेड स्टेट्समध्ये, थेट आपत्कालीन सेवांना पाठवले जाणारे टेक्स्ट फक्त लॅटिन वर्णमालेला सपोर्ट करते.
मोबाइल सेवा किंवा Wi-Fi व्हॉइस कनेक्शन उपलब्ध झाल्यास, तुम्ही फोनद्वारे आपत्कालीन सेवांशी संपर्क साधला पाहिजे. तथापि, तुम्ही असे केल्यास, तुम्ही कदाचित तुम्हाला उपग्रह सत्र प्रदान करणाऱ्या आपत्कालीन सेवा प्रोव्हायडरशी कनेक्ट होणार नाही.
उपग्रहामार्फत आपत्कालीन SOS सुविधा उपग्रह उपलब्धतेच्या अधीन असते आणि फंक्शनॅलिटी कायम ठेवण्यासाठी सॉफ्टवेअर अपडेट करावे लागू शकते.
जेव्हा तुम्ही उपग्रहामार्फत आपत्कालीन SOS वापरून टेक्स्ट पाठवता, तेव्हा तुमचे संदेश एनक्रिप्ट केलेल्या स्वरूपात पाठवले जातात आणि संबंधित आपत्कालीन सेवा प्रदाता किंवा थर्ड पार्टी रिले प्रदात्याकडे पाठवण्यासाठी Apple द्वारे डिक्रिप्ट केले जातात. तुमचे संदेश आपत्कालीन सेवा केंद्र आणि रिले प्रोव्हायडरद्वारे तुम्हाला प्रदान करण्यात येणाऱ्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि लागू कायद्याचे पालन करून राखून ठेवले जाऊ शकतात.
तुमचे टेक्स्ट संदेश स्थानिक आपत्कालीन सेवा संस्थेकडे रूट करण्यासाठी आणि प्रतिसाद देणाऱ्या व्यक्तींना तुमच्यापर्यंत पोहोचण्यात मदत करण्यासाठी, जेव्हा तुम्ही उपग्रहामार्फत आपत्कालीन SOS वापरता तेव्हा तुमचे स्थान Apple, आपत्कालीन सेवा टेक्स्ट रूटिंग प्रोव्हायडर आणि थर्ड पार्टी रिले प्रोव्हायडर ह्यांच्याबरोबर शेअर केले जाते. ‘शोधाशोध’ मध्ये उपग्रहामार्फत शेअर केलेली स्थाने एंड टू एंड एनक्रिप्शन केलेल्या स्वरूपात पाठवली जातात आणि Apple ला ते ॲक्सेस करता येत नाही.
आपत्कालीन सत्रादरम्यान तुम्ही तुमचे स्थान आणि आपत्कालीन परिस्थितीचे स्वरूप ह्याविषयीच्या माहितीसह तुमच्या संभाषणाचे ट्रान्सक्रिप्ट आधीपासून निवडलेल्या आपत्कालीन संपर्कांसह आपत्कालीन सेवांसोबत शेअर करणे निवडू शकता. तुम्ही कधीही स्क्रीनच्या शीर्षस्थानी ‘शेअर करणे थांबवा’ वर टॅप करुन तुमच्या सेशनचे ट्रान्सक्रिप्ट शेअर करणे थांबवू शकता.
आपत्कालीन SOS लाइव्ह व्हिडिओ
आपत्कालीन कॉल दरम्यान, तुम्ही आपत्कालीन सेवांच्या विनंतीवरून आपत्कालीन सेवांसह लाइव्ह व्हिडिओ शेअर करण्याचा किंवा मीडिया अपलोड करण्याचा पर्याय निवडू शकता. तुम्ही ‘कॉल बंद करा’ वर टॅप करून आणि त्यानंतर ‘कॅमेरा शेअर करणे थांबवा’ किंवा ‘कॉल बंद करा’ वर टॅप करून कोणत्याही वेळी तुमचा लाइव्ह व्हिडिओ शेअर करणे थांबवू शकता. तुम्ही मीडिया कॉण्टेण्ट अपलोड करणे निवडल्यास, तुम्ही आपत्कालीन कॉल बंद केल्यानंतरही तुमचा कॉण्टेण्ट अपलोड होत राहील. आपत्कालीन सेवा शेअर केलेला मीडिया कॉण्टेण्ट रेकॉर्ड किंवा जतन करू शकते. लाइव्ह व्हिडिओ आणि अपलोड केलेला मीडिया एंड टू एंड एनक्रिप्शन केलेल्या स्वरूपात पाठवले जातात आणि Apple ला ते बघता किंवा ॲक्सेस करता येत नाही.
हे फीचर वापरण्यासाठी, तुम्ही ‘आपत्कालीन कॉल व SOS’ चालू केलेले असले पाहिजे. हे करण्यासाठी, सेटिंग > गोपनीयता व सुरक्षा > स्थान सेवा > ‘सिस्टीम सेवा’ वर जा आणि ‘आपत्कालीन कॉल व SOS’ सुरू करण्यासाठी त्यावर टॅप करा.
‘आपत्कालीन SOS लाइव्ह व्हिडिओ’ कदाचित सर्व स्थानांवर किंवा परिस्थितीत उपलब्ध नसेल.
पडत असल्याचे ओळखणे
तुम्ही तुमचे वॉच घातलेले जर Apple Watch SE किंवा Apple Watch Series 4 किंवा त्यानंतरच्या व्हर्जनने जोरात पडल्याचे ओळखले, तर गरज पडल्यास ‘पडत असल्याचे ओळखणे’ अलर्ट तुम्हाला आपत्कालीन सेवांशी कनेक्ट करण्यात मदत करू शकतो. तुम्ही आपत्कालीन सेवांशी संपर्क साधणे निवडू शकता किंवा अलर्ट डिस्मिस करू शकता. जर तुमच्या Apple Watch ने तुम्ही हालचाल करत आहात असे ओळखले, तर ते तुम्ही अलर्टला प्रतिसाद देण्याची प्रतीक्षा करेल आणि आपत्कालीन सेवांना ऑटोमॅटिकली कॉल करणार नाही. जर तुमच्या Apple Watch ने असे ओळखले की तुम्ही जवळपास एका मिनिटापासून हालचाल करत नाही, तर तुमच्या मनगटावर टॅप करत आणि आवाजाच्या स्वरूपात अलर्ट देऊन ते 30 सेकंदाचा काउंटडाउन सुरू करते. जेव्हा काउंटडाउन संपेल, तुमचे Apple Watch ऑटोमॅटिकली आपत्कालीन सेवा तसेच आपत्कालीन संपर्कांना संपर्क करते.
जेव्हा ऑटोडायलने केलेला कॉल कनेक्ट होतो, तेव्हा तुमचे Apple Watch एक ऑडिओ संदेश प्ले करते जो आपत्कालीन सेवांना हे सूचित करतो की तुमच्या Apple Watch ने जोरात पडल्याचे ओळखले आहे आणि त्यानंतर अक्षांश आणि रेखांशच्या स्वरूपात तुमचे सध्याचे स्थान शेअर करते. हा कॉल तुमचे स्थान शेअर करेल, तुम्ही ‘स्थान सेवा’ एनेबल केलेल्या असो किंवा नसो. जर तुम्ही ह्याआधी आपत्कालीन कॉल दरम्यान वैद्यकीय ID शेअर केला जाण्याचा पर्याय एनेबल केला असल्यास, तुमचा वैद्यकीय ID ऑटोमॅटिकली आपत्कालीन सेवांसह देखील शेअर केला जाईल (केवळ ‘युनायटेड स्टेट्स’ आणि ‘कॅनडा’ मध्ये). कॉल समाप्त झाल्यानंतर आणि तुम्ही संदेश ॲप अनइन्स्टॉल केलेले नसल्यास, तुमचे Apple Watch 10 सेकंदांचा काउंटडाउन सुरू करेल, त्यानंतर तुमच्या आपत्कालीन संपर्कांना आणि ‘चेक इन’ सेशन सक्रिय असल्यास ‘चेक इन’ संपर्कांना तुमच्या स्थानासह संदेश पाठवेल आणि सुचित करेल की तुमच्या डिव्हाइसने जोरात पडल्याची घटना ओळखली आहे आणि आपत्कालीन सेवांना कॉल केला आहे. तुम्ही 10 सेकंदांच्या काउंटडाउन दरम्यान तुमच्या आपत्कालीन संपर्कांना आणि सक्रिय चेक इन संपर्काला संदेश पाठवणे रद्द करण्याचा पर्याय निवडू शकता. तुमच्या Apple Watch ला तुमच्या वैद्यकीय ID वरून तुमचे आपत्कालीन संपर्क मिळतात.
खाली पडण्याची घटना ओळखली गेल्यास, ऑटोडायल कॉल आपत्कालीन सेवांशी कनेक्ट होऊ शकत नसल्यास, आणि तुम्ही हालचाल करत नसल्यास, तुमचा iPhone संदेश ॲप वापरून आपत्कालीन सेवांना टेक्स्ट स्वरूपात ऑटोमॅटिकली मर्यादित माहिती (उदाहरणार्थ, तुमचे स्थान, बॅटरी लाइफ आणि आपत्तीचे स्वरूप) पाठवण्यासाठी उपग्रह कनेक्टिव्हिटीमार्फत आपत्कालीन SOS वापरण्याचा प्रयत्न करू शकतो. तुम्ही संदेश ॲप अनइन्स्टॉल केले नसेल तर, तुमच्या वतीने तुमच्या आपत्कालीन संपर्कांना आणि सक्रिय चेक इन संपर्काला देखील मर्यादित माहिती (उदाहरणार्थ, तुमचे स्थान, आपत्तीचे स्वरूप) पाठवली जाईल.
Apple Watch ने विचारल्यावर तुम्ही पडला नाहीत असे उत्तर देईपर्यंत पडण्याच्या घटना आरोग्य ॲपमध्ये ऑटोमॅटिकली नोंदवल्या जातात. पडण्याच्या घटनेची हिस्ट्री तपासण्यासाठी, तुमच्या iPhone वर आरोग्य ॲप उघडा आणि ‘ब्राउझ करा’ > इतर डेटा > ‘पडण्याची संख्या’ वर जा.
तुम्ही तुमच्या iPhone वर माझे वॉच > आपत्कालीन SOS वर जाऊन, त्यानंतर ‘पडत असल्याचे ओळखणे चालू किंवा बंद करण्यासाठी टॅप करून तुम्ही Apple Watch ॲपमध्ये ‘पडत असल्याचे ओळखणे’ एनेबल किंवा डिसेबल करु शकता. ‘पडत असल्याचे ओळखणे’ चालू केले असल्यास, तुम्ही ‘नेहमी चालू’ किंवा ‘केवळ वर्कआउट दरम्यान चालू’ वर टॅप करू शकता. जर तुम्ही तुमचे Apple Watch किंवा आरोग्य ॲप सेट करताना तुमचे वय प्रविष्ट केले असेल आणि तुमचे वय 55 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल तर ‘पडत असल्याचे ओळखणे’ ऑटोमॅटिकली चालू होते. जर तुमचे वय 18 ते 55 वर्ष असेल, तर केवळ वर्कआउट दरम्यान ‘पडत असल्याचे ओळखणे’ ऑटोमॅटिकली चालू होते. तुमच्या घड्याळाला आपत्कालीन सेवांना ऑटोमॅटिकली कॉल करता यावा ह्यासाठी ‘मनगट ओळखणे’ एनेबल करणे आवश्यक आहे. Apple Watch वर असे करण्यासाठी, सेटिंग > ‘पासकोड’ वर जा आणि ‘मनगट ओळखणे’ चालू करण्यासाठी टॅप करा. ‘पडत असल्याचे ओळखणे’ केवळ 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी उपलब्ध आहे. Apple Watch पडण्याच्या सर्व घटना ओळखू शकत नाही.
क्रॅश डिटेक्शन
जर तुमच्या iOS 16 किंवा त्यानंतरचे व्हर्जन असलेल्या iPhone 14 किंवा त्यानंतरच्या मॉडेलने (सर्व मॉडेल्स), Apple Watch Series 8 किंवा त्यानंतरचे व्हर्जनने, Apple Watch SE (दुसरी जनरेशन), आणि watchOS 9 किंवा त्यानंतरच्या व्हर्जनसह Apple Watch Ultra किंवा त्यानंतरच्या व्हर्जनने किंवा नंतरच्या मॉडेलने तीव्र स्वरूपाचे कार क्रॅश झाल्याचे ओळखले, तर आपत्कालीन सेवांना कॉल करण्यासाठी अलर्ट ट्रिगर केला जाईल. तुम्ही अलर्ट डिस्मिस करणे किंवा आपत्कालीन सेवांशी संपर्क साधणे निवडू शकता. डिस्मिस केले नाही तर तुमचे डिव्हाइस अलार्म वाजवेल आणि 10 सेकंद अलर्ट डिस्प्ले करेल. तुम्ही अजून 30 सेकंदांच्या काउंटडाउननंतरही प्रतिसाद दिला नसेल, तर तुमचे डिव्हाइस आपत्कालीन सेवांना कॉल करेल.
जेव्हा ऑटोडायलने केलेला कॉल कनेक्ट होतो, तेव्हा तुमचे डिव्हाइस एक ऑडिओ संदेश प्ले करते जो आपत्कालीन सेवांना हे सूचित करतो की तुमच्या डिव्हाइसने कार क्रॅशची घटना ओळखली आहे आणि त्यानंतर अक्षांश आणि रेखांशाच्या स्वरूपात तुमचे सध्याचे स्थान शेअर करते. हा कॉल तुमचे स्थान शेअर करेल, जरी तुम्ही स्थान सेवा एनेबल केली असेल किंवा नसेल. जर तुम्ही ह्याआधी आपत्कालीन कॉल दरम्यान वैद्यकीय ID शेअर केला जाण्याचा पर्याय एनेबल केला असल्यास, तुमचा वैद्यकीय ID ऑटोमॅटिकली आपत्कालीन सेवांसह देखील शेअर केला जाईल (केवळ ‘युनायटेड स्टेट्स’ आणि ‘कॅनडा’ मध्ये). कॉल समाप्त झाल्यानंतर आणि तुम्ही संदेश ॲप अनइन्स्टॉल केलेले नसल्यास, तुमचे डिव्हाइस 10 सेकंदांचा काउंटडाउन सुरू करेल, त्यानंतर तुमच्या आपत्कालीन संपर्कांना आणि ‘चेक इन’ सेशन सक्रिय असल्यास ‘चेक इन’ संपर्कांना तुमच्या स्थानासह संदेश पाठवेल आणि कळवेल की तुमच्या डिव्हाइसने कार अपघाताची घटना ओळखली आहे आणि आपत्कालीन सेवांना कॉल केला आहे. तुम्ही 10 सेकंदांच्या काउंटडाउन दरम्यान तुमच्या आपत्कालीन संपर्कांना आणि सक्रिय चेक इन संपर्काला संदेश पाठवणे रद्द करण्याचा पर्याय निवडू शकता. तुमच्या डिव्हाइसला तुमच्या वैद्यकीय ID वरून तुमचे आपत्कालीन संपर्क मिळतात. आपत्कालीन संपर्कांना आणि सक्रिय चेक इन संपर्कांना नोटिफिकेश पाठवल्यानंतर, तुमचे डिव्हाइस आपत्कालीन सेवांना संपर्क करण्याचा, वैद्यकीय ID माहिती उघडण्याचा किंवा अलर्ट बंद करण्याचा पर्याय डिस्प्ले करणे चालू ठेवेल. iPhone आणि Apple Watch कार अपघाताच्या सर्व घटना ओळखू शकत नाहीत. अपघात झाला आहे की नाही हे ठरवण्यासाठी स्थान माहितीचा वापर केला जाऊ शकतो.
जर कारच्या गंभीर अपघाताची घटना ओळखली गेली असेल, ऑटोडायल कॉल आपत्कालीन सेवांशी कनेक्ट होऊ शकत नसेल आणि तुम्ही प्रतिसाद देत नसाल, तर तुमचा iPhone संदेश ॲपचा वापर करून आपत्कालीन सेवांना टेक्स्ट स्वरूपात ऑटोमॅटिकली मर्यादित माहिती (उदाहरणार्थ, तुमचे स्थान, बॅटरी लाइफ आणि आपत्तीचे स्वरूप) पाठवण्यासाठी उपग्रह कनेक्टिव्हिटी द्वारे ‘आपत्कालीन SOS’ वापरण्याचा प्रयत्न करू शकतो. तुम्ही संदेश ॲप अनइन्स्टॉल केले नसेल, तर तुमच्या वतीने तुमच्या आपत्कालीन संपर्कांना आणि सक्रिय चेक इन संपर्काला देखील मर्यादित माहिती (उदाहरणार्थ, तुमचे स्थान, आपत्तीचे स्वरूप) पाठवली जाईल.
तुम्ही सेटिंग > ‘आपत्कालीन SOS’ वर जाऊन > नंतर ‘जोरात टक्कर झाल्यास कॉल करा’ चालू किंवा बंद करण्यासाठी टॅप करून किंवा तुमच्या iPhone च्या Apple Watch ॲपमध्ये माझे वॉच > ‘आपत्कालीन SOS’ वर जाऊन, नंतर ‘जोरात टक्कर झाल्यास कॉल करा’ चालू किंवा बंद करण्यासाठी टॅप करून ‘टक्कर ओळखणे’ डिसेबल किंवा पुन्हा एनेबल करू शकता.
तुम्ही ‘क्रॅश डिटेक्शन’ डेटा तुमच्या iPhone वर इन्स्टॉल केलेल्या थर्ड पार्टी ॲप्लिकेशनबरोबर शेअर करणे देखील निवडू शकता. तुम्ही डेटा ॲक्सेस करण्याची अनुमती दिली आणि कारची टक्कर झाल्याची घटना घडली, तर थर्ड पार्टीला ऑटोमॅटिकली क्रॅशबद्दल सूचित केले जाईल, ज्यामध्ये स्थान डेटाचा समावेश असू शकतो.
तुमच्या iPhone ने कारची टक्कर ओळखल्यानंतर तुम्ही त्याला आपत्कालीन सेवांना कॉल करण्याची अनुमती दिल्यास, थर्ड पार्टीला अपघाताबद्दल सूचित करण्याआधी आपत्कालीन सेवांना कॉल केला जाईल. जर तुम्ही तुमच्या iPhone ला कारची टक्कर ओळखल्यानंतर आपत्कालीन सेवांना कॉल करण्याची अनुमती दिली नाही, आणि त्याने कारची टक्कर ओळखली आणि थर्ड पार्टी शेअरिंग चालू केलेले असेल, तर तुमचे डिव्हाइस तुम्हाला हे सूचित करण्यासाठी एक अलर्ट पाठवेल की अपघात झाल्याची घटना ओळखली गेली आहे, थर्ड पार्टीसह डेटा शेअर केला गेला आहे आणि शक्य असल्यास तुम्ही थर्ड पार्टी ॲप वापरले पाहिजे.
तुम्ही थर्ड पार्टीसह ‘क्रॅश डिटेक्शन’ चा डेटा शेअर करायचा का हे निवडू शकता. तुमच्या iPhone वर असे करण्यासाठी, सेटिंग > आपत्कालीन SOS वर जा आणि ‘ॲपसह टक्कर शेअर करा’ चालू करण्यासाठी टॅप करा.
एनहांस्ड अलर्ट्स
एनहांस्ड सुरक्षा अलर्ट्स तुमच्या iPhone आणि वॉचवर तुम्हाला भूकंप किंवा पूर यांसारख्या आपत्कालीन घटनेची सूचना देण्यासाठी सुरक्षा अलर्ट्स देऊ शकतात. हे अलर्ट्स Wi-Fi किंवा Bluetooth आणि उपलब्ध असल्यास, मोबाइल नेटवर्क ह्यासारख्या उपलब्ध कनेक्टिव्हिटीद्वारे पाठवले जातात. Apple तुमच्या डिव्हाइसच्या स्थानाचा वापर करून ठरवलेल्या तुमच्या सध्याच्या प्रदेशात एनहांस्ड सुरक्षा अलर्ट्स डिलिव्हर करू शकते. प्रदेश हा देश असू शकतो किंवा काही देशांसाठी (उदा. यू.एस.), प्रदेश हा राज्यांचा समूह असू शकतो. तुमचे Apple डिव्हाइस या प्रदेशाशी संबद्ध केले जाऊ शकते. Apple तुमच्या डिव्हाइसच्या एखाद्या प्रदेशामधील स्थानाविषयीची माहिती स्टोअर करत नाही.
एनहांस्ड सुरक्षा अलर्ट्स डिफॉल्टनुसार चालू केलेले असतात. तुम्ही सेटिंग > नोटिफिकेशन्स > एनहांस्ड अलर्ट्स > एनहांस्ड सुरक्षा अलर्ट्स वर जाऊन , त्यानंतर एक किंवा अधिक प्रकारच्या एनहांस्ड सुरक्षा सूचना चालू किंवा बंद करण्यासाठी टॅप करून एनहांस्ड सुरक्षा अलर्ट्स डिसेबल किंवा पुन्हा एनेबल करू शकता. एनहांस्ड सुरक्षा अलर्ट्स Apple द्वारे डिलिव्हर केले जातात आणि ते तुमच्या स्थानिक सरकारद्वारे पाठवलेल्या सरकारी अलर्टपेक्षा वेगळे दिसतात आणि त्यांचा आवाज वेगळा असतो.
एनहांस्ड सुरक्षा अलर्ट्स वेळेवर प्राप्त होण्यात आणि त्यांची विश्वसनीयता सुधारण्यासाठी ‘अलर्टची डिलिव्हरी सुधारा’ तुमच्या अंदाजे स्थानाचा वापर करते. उदाहरणार्थ, ‘अलर्ट डिलिव्हरी सुधारा’ चालू असताना भूकंप अलर्ट्स अधिक जलद आणि अधिक विश्वसनीयपणे डिलिव्हर केले जाऊ शकतात. Apple तुमच्या अंदाजे स्थान स्टोअर करत नाही. तुम्ही सेटिंग > नोटिफिकेशन्स > एनहांस्ड अलर्ट्स > एनहांस्ड सुरक्षा अलर्ट्स > ‘अलर्ट डिलिव्हरी सुधारा’ येथे ‘अलर्ट डिलिव्हरी सुधारा’ एनेबल करू शकता.
एनहांस्ड अलर्ट्स प्राप्त करण्यासाठी, तुम्ही सेटिंग > गोपनीयता आणि सुरक्षा > स्थान सेवा > सिस्टिम सेवा > अलर्ट्स व शॉर्टकट्स ऑटोमेशन एनेबल केलेले असणे आवश्यक आहे.
होकायंत्र वेपॉइंट
वेपॉइंट म्हणून तुमचे सध्याचे स्थान समाविष्ट करण्यासाठी तुम्ही होकायंत्र ॲपचा वापर करू शकता, ज्यामुळे तुम्ही तयार केलेल्या प्रत्येक होकायंत्र वेपॉइंटमधील अंतर आणि दिशा तुम्हाला पाहता येईल. त्या व्यतिरिक्त, होकायंत्र ॲप ऑटोमॅटिकली दोन वेपॉइंट जनरेट करू शकते, ज्यामध्ये शेवटचा मोबाइल कनेक्शन वेपॉइंट, जो कनेक्टिव्हिटीसाठी मोबाइल रिसेप्शन असलेल्या शेवटच्या जागेचा अंदाज घेईल, आणि शेवटचा आपत्कालीन कॉल वेपॉइंट, जो या गोष्टीचा अंदाज घेईल की रूटवर कुठे तुमच्या iPhone किंवा Apple Watch ला कोणत्याही उपलब्ध नेटवर्क प्रोव्हायडरच्या नेटवर्ककडून शेवटचे कनेक्शन मिळाले होते, जेणेकरून आपत्कालीन कॉल केला जाऊ शकेल. ‘शेवटचा मोबाइल कनेक्शन वेपॉइंट’ किंवा ‘शेवटचा आपत्कालीन कॉल वेपॉइंट’ तयार करण्यासाठी, तुमच्या डिव्हाइसवर होकायंत्र ॲपवर ‘अचूक स्थान’ चालू केलेले असले पाहिजे, तसेच ‘महत्वपूर्ण स्थान’ एनेबल केलेले असले पाहिजे. तुम्ही होकायंत्र ॲपमध्ये वेपॉइंट निवडून, त्यानंतर स्क्रीनच्या तळाशी स्क्रोल करून आणि ‘वेपॉइंट हटवा’ निवडून, तुम्ही होकायंत्र ॲपमध्ये तयार केलेले होकायंत्र वेपॉइंट्स हटवू शकता.
बॅकट्रॅक
काही क्षेत्रांमध्ये जिथे तुम्हाला तुमची पावले रिट्रेस करण्यात मदतीची आवश्यकता पडू शकते, तिथे Apple Watch वर उपलब्ध असलेले होकायंत्र ॲप आणि काही थर्ड पार्टी ॲप सुरक्षेच्या उद्देशाने तुमच्या अलीकडच्या स्थानांचा वन टाइम ॲक्सेस मागू शकतात. ही स्थाने कदाचित नेहमीच उपलब्ध नसतील, उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमचे घर किंवा शहरी क्षेत्रे ह्यासारख्या ओळखीच्या ठिकाणांपासून जवळ असाल. ह्या फीचरचा वापर करण्यासाठी, तुमच्या डिव्हाइसवर ‘महत्वपूर्ण स्थान’ एनेबल केले असले पाहिजे आणि ॲपसाठी ‘अचूक स्थान’ चालू केले असले पाहिजे.
इतर माहिती
काही सुरक्षा फीचर कदाचित सर्व डिव्हाइससाठी, किंवा प्रत्येक क्षेत्रात किंवा भाषेत उपलब्ध नसतील. काही क्षेत्रांमध्ये आणि देशांमध्ये अनेक आपत्कालीन सेवा नंबर असतात. या स्थानांसाठी, ‘पडत असल्याचे ओळखणे’ अलर्टसाठी Apple Watch रुग्णवाहिका सेवांशी संलग्न असलेल्या नंबरवर कॉल करेल.
वैयक्तिक डेटा प्रोसेस करण्यासाठी लागू होणारे कायदेशीर आधार
आम्ही सेवा देण्यासाठी आवश्यक असेल त्याप्रमाणे आणि आमच्या कायदेशीर कर्तव्यांचे पालन करण्यासाठी, आपत्कालीन SOS आणि उपग्रहामार्गे आपत्कालीन SOS मधील तुमच्या वैयक्तिक डेटावर प्रक्रिया करतो. जिथे संमती उचित कायदेशीर आधार असतो, तिथे आम्ही त्याला लागू होणाऱ्या स्थानिक कायद्यानुसार प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. जिथे लागू होणारे स्थानिक कायदे निर्देशित करतात, तिथे आपत्कालीन सेवा सुरू करण्यासाठी, फसवणूक किंवा गुन्हेगारी ॲक्टिव्हिटी रोखण्यासाठी, सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी, आणि आपत्कालीन SOS आणि उपग्रहामार्गे आपत्कालीन SOS यांची सिस्टीम आणि संरचना राखण्यात मदत व्हावी म्हणून आमच्या कायदेशीर स्वारस्यांसाठी आम्ही वैयक्तिक डेटाच्या खालील श्रेणींवर क्रिया करतो :
- तुमचे स्थान
- तुमच्या सेशनबद्दल माहिती, जसे की, आपत्कालीन सेवांशी संवाद साधण्याचा कालावधी आणि कॉण्टेण्ट
- तुमचे सिलेक्ट केलेले आपत्कालीन संपर्क
रिटेन्शन
Apple च्या गोपनीयता धोरणात किंवा आमच्या सेवा विशिष्ट गोपनीयता सूचनांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे किंवा कायद्यानुसार आवश्यक असलेल्या गोष्टींसह, Apple द्वारे ज्या उद्देशांसाठी डेटा संकलित केला गेला होता त्या उद्देशांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक कालावधीपुरताच Apple कडून वैयक्तिक डेटा राखून ठेवला जातो. राखून ठेवण्याच्या कालावधीची तपासणी करत असताना, संकलित केलेला वैयक्तिक डेटा राखून ठेवणे खरेच आवश्यक आहे का ह्याचे आम्ही काळजीपूर्वक परीक्षण करतो आणि जर राखून ठेवणे आवश्यक असेल तर कायद्याने परवानगी असेल इतक्या संक्षिप्त कालावधीसाठी वैयक्तिक डेटा राखून ठेवण्याच्या दृष्टीने काम करतो.
Apple ने संकलित केलेली माहिती नेहमी Apple च्या गोपनीयता धोरणानुसार हाताळली जाईल, जे www.apple.com/in/privacy वर मिळू शकते.
2025-12-12