शॉर्टकट शेअरिंग व गोपनीयता

शॉर्टकट ॲप तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहे आणि तुम्ही काय शेअर करता हे निवडण्यासाठी तुम्हाला एनेबल करते.


गॅलरीच्या बाहेरून प्राप्त होणारे शॉर्टकट तुम्ही रिव्ह्यू करायला हवे

वेबवरून डाउनलोड केलेले किंवा इतरांद्वारे तुमच्याबरोबर शेअर केलेले ‘शॉर्टकट’ Apple द्वारे रिव्ह्यू केले जाऊ शकत नाहीत आणि Apple चे त्या शॉर्टकटच्या कॉण्टेण्ट किंवा फंक्शनॅलिटीवर कोणतेही नियंत्रण नाही आणि कोणतेही दायित्व स्वीकारत नाही. तुम्ही वेबवरून डाउनलोड केलेले किंवा तुमच्यासह शेअर केलेले सर्व शॉर्टकट तुमच्या अपेक्षेनुसार काम करत आहेत ह्याची पुष्टी करण्यासाठी अधिक काळजी घेऊन रिव्ह्यू करायला हवेत.

तुमचे स्थान (अचूक किंवा अंदाजे), संपर्क, आरोग्य डेटा, पेमेंट माहिती किंवा तुमच्या डॉक्युमेंटचे कॉण्टेण्ट ह्यासारखा तुमचा वैयक्तिक डेटा कोणते शॉर्टकट ॲक्सेस करतात हे तुम्ही नियंत्रित करता. तुम्ही त्या शॉर्टकटसाठी असलेल्या तपशील विभागात शॉर्टकटकडे ॲक्सेस असलेला डेटा रिव्ह्यू आणि नियंत्रित करू शकता.

तुम्ही शेअर करत असलेले शॉर्टकट Apple ला पाठवले जातील

तुम्ही शॉर्टकट तयार केल्यास आणि शेअर केल्यास, तुमचा शेअर केलेला शॉर्टकट, त्यात एम्बेड केलेल्या कोणत्याही कॉण्टेंटसह, तुमच्या दिशानिर्देक्शानुसार शेअरिंग एनेबल करण्यासाठी Apple कडे पाठवला जाईल. शॉर्टकट आणि त्याचे कॉण्टेण्ट शेअर केलेल्या वेब लिंकचा ॲक्सेस मिळवणाऱ्या कोणाही व्यक्तीला उपलब्ध असतील, जी कदाचित तुमचे शेअर केलेले शॉर्टकट आणि त्यामध्ये असलेल्या सर्व कॉण्टेण्टची प्रत कॉपी करू शकेल, जतन करू शकेल, त्यात बदल करू शकेल आणि पुनर्वितरित करू शकेल. तुमच्याकडे आवश्यक अधिकार नसलेले कॉण्टेण्ट असलेले शॉर्टकट किंवा इतरांच्या अधिकारांचे किंवा कायद्याचे उल्लंघन करणारे शॉर्टकट तुम्ही तयार आणि शेअर करू नयेत. जरी तुम्ही शेअर करत असलेल्या शॉर्टकटचा Apple कदाचित रिव्ह्यू करत असेल, डिसेबल करत असेल, किंवा काढून टाकत असेल, तरी तुम्ही शेअर करत असलेल्या कोणत्याही शॉर्टकटचा रिव्ह्यू करण्याचे कोणतेही बंधन Apple वर नाही.

शेअर केलेल्या शॉर्टकटची संख्या ह्यासारखी शेअर केलेल्या शॉर्टकटविषयीची एकत्रित केलेली माहिती Apple अशाप्रकारे एकत्र करते ज्याने शॉर्टकटमध्ये सुधारणा करण्यासाठी तुमची वैयक्तिकरित्या ओळख केली जात नाही.

तुमच्याकडे शॉर्टकट ॲप सेटिंग ॲपमध्ये शॉर्टकट शेअरिंगला एनेबल करण्याचा पर्याय आहे.

iCloud वापरून ‘शॉर्टकट’ तुमच्या सर्व डिव्हाइसवर सिंक केले जाते. तुम्हाला शॉर्टकट सिंक करायचे नसल्यास, तुम्ही सेटिंग > [तुमचे नाव] > iCloud > ’iCloud वर जतन केलेले’ > ‘सर्व पहा’ वर जाऊन, आणि ‘शॉर्टकट’ बंद करण्यासाठी टॅप करून किंवा सेटिंग > ॲप > ‘शॉर्टकट’ वर जाऊन आणि ‘iCloud सिंक’ बंद करण्यासाठी टॅप करून तुमच्या iOS, iPadOS किंवा visionOS डिव्हाइसवर हे फीचर डिसेबल करू शकता. Mac वर, सिस्टीम सेटिंग > [तुमचे नाव] > iCloud > iCloud वर जतन केलेले > ‘सर्व पहा’ वर जा आणि सिलेक्ट केलेले शॉर्टकट रद्द करा, किंवा शॉर्टकट ॲपमध्ये, सेटिंग वर जा आणि सिलेक्ट केलेले iCloud सिंक रद्द करा.

Apple च्या गोपनीयता धोरणानुसार किंवा कायद्याने आवश्यक असेल त्यासह, Apple द्वारे ज्या उद्देशांसाठी डेटा संकलित केला गेला होता त्या उद्देशांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक कालावधीपुरताच वैयक्तिक डेटा राखून ठेवला जातो. राखून ठेवण्याच्या कालावधीचे मूल्यमापन करत असताना, संकलित केलेला वैयक्तिक डेटा राखून ठेवणे खरेच आवश्यक आहे का ह्याचे आम्ही काळजीपूर्वक तपासणी करतो आणि जर राखून ठेवणे आवश्यक असेल तर कायद्याने परवानगी असेल इतक्या संक्षिप्त कालावधीसाठी वैयक्तिक डेटा राखून ठेवण्याच्या दृष्टीने काम करतो.

Apple द्वारे गोळा केलेली माहिती नेहमी Apple च्या गोपनीयता धोरणानुसार हाताळली जाईल, जे www.apple.com/in/privacy येथे मिळू शकते.

2025-12-12