टेक्स्ट संदेश फिल्टरिंग व गोपनीयता
टेक्स्ट संदेश फिल्टर तुम्हाला अज्ञात RCS, SMS आणि MMS संदेश शोधण्याचा आणि फिल्टर करण्याचा मार्ग प्रदान करतात.
तुम्ही थर्ड पार्टी टेक्स्ट संदेश फिल्टर इन्स्टॉल करू शकता आणि वापरू शकता. तुम्ही असे केल्यास, थर्ड पार्टी फिल्टर प्रदाता तुम्हाला अज्ञात प्रेषकांकडून प्राप्त होणाऱ्या इनकमिंग RCS, SMS आणि MMS संदेशांमध्ये समाविष्ट असलेले सर्व टेक्स्ट आणि कॉण्टेण्ट ॲक्सेस करू शकतो. ह्या संदेशांमध्ये बॅंका किंवा इतर संस्थांमधील पडताळणी कोड, तसेच RCS, SMS आणि MMS संदेशांमध्ये असलेली इतर वैयक्तिक किंवा संवेदनशील माहिती समाविष्ट असू शकते. जेव्हा तुम्ही थर्ड पार्टी प्रोव्हायडरचे टेक्स्ट संदेश स्पॅम फिल्टर वापरता, तेव्हा तुम्ही फिल्टर प्रोव्हायडरच्या नियम, गोपनीयता धोरण आणि पद्धतींच्या अधीन असता. आम्ही तुम्हाला त्या तृतीय पक्षांच्या अटी, गोपनीयता धोरणे आणि व्यवहारांविषयी जाणून घेण्यासाठी प्रोत्साहित करतो. थर्ड पार्टी टेक्स्ट ‘संदेश’ स्पॅम फिल्टर काढून टाकण्यासाठी, सेटिंग > ॲप्स > संदेश > ‘अज्ञात व स्पॅम’ वर जा, आणि यादीमधून फिल्टर काढून टाका.
तुम्ही तीन वेळा टेक्स्ट संदेशाला प्रतिसाद दिल्यानंतर किंवा प्रेषकाला तुमच्या ‘संपर्क’ मध्ये समाविष्ट केल्यानंतर, त्या प्रेषकाचे टेक्स्ट संदेश अज्ञात प्रेषक म्हणून फिल्टर केले जाणार नाहीत.
ब्राझील आणि भारतामधील ‘संदेश’ यूझरसाठी
यूझरना त्यांचे संदेश व्यवस्थापित करण्यात मदत करण्यासाठी टेक्स्ट संदेश फिल्टरला डिफॉल्टनुसार एनेबल केले जाते. ऑन डिव्हाइस मशीन लर्निंग वापरून, अज्ञात प्रेषकांकडील संदेश दोन उपश्रेणीमध्ये क्रमवार लावले जाऊ शकतात : व्यवहार किंवा जाहिरात. टेक्स्ट संदेश फिल्टर ‘संदेश’ मधून कोणताही कॉण्टेण्ट किंवा डेटा Apple ला पाठवत नाही. तुम्ही सेटिंग > ॲप्स > संदेश > ‘अज्ञात व स्पॅम’ वर जाऊन आणि यादीमध्ये ‘काहीही नाही’ सिलेक्ट करून कोणत्याही वेळी ‘टेक्स्ट संदेश’ फिल्टर डिसेबल करू शकता.
2025-12-12