Touch ID व गोपनीयता

Touch ID तुमच्या माहितीचे संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.


Touch ID तुम्हाला तुमचे डिव्हाइस अनलॉक करण्यासाठी आणि Apple Pay, App Store, आणि Apple Books वरून खरेदी करण्यासाठी तुमच्या बोटाच्या ठशाचा वापर करू देते.

Touch ID चा वापर तुमच्या iPhone, iPad, किंवा Mac ला अनलॉक करण्यासाठी केला जाऊ शकतो. Touch ID सेन्सर वापरून, Touch ID बोटाचा ठसा नोंदणी केलेल्या बोटाच्या ठशाशी जुळतो की नाही हे ठरवतो. Touch ID च्या इतर वापरांमध्ये Apple Pay ने पैसे देणे, App Store मध्ये खरेदी करणे, ॲपमध्ये ऑथेंटिकेट करणे ह्यांचा समावेश होतो.

Touch ID डेटा — तुमच्या बोटाच्या ठशाच्या गणितीय मांडणीच्या समावेशासह — Secure Enclave मध्ये एनक्रिप्ट केलेला आणि संरक्षित केलेला असतो. Touch ID तुमच्या बोटाच्या ठशांच्या कोणत्याही इमेज स्टोअर करत नाही, त्याऐवजी ते फक्त गणितीय मांडणीवर अवलंबून राहते. स्टोअर केलेल्या ह्या डेटातून तुमच्या बोटाच्या ठशांची प्रत्यक्ष इमेज पुन्हा मिळवणे कोणालाही शक्य नाही. जुळणारी अचूकता सुधारण्यासाठी Touch ID वेळोवेळी नोंदणी केलेल्या बोटाच्या ठशांची गणितीय मांडणी अपडेट करेल. Touch ID शी हा डेटा तंतोतंत जुळत असल्याचे आढळल्यास ते हा डेटा अपडेट देखील करेल; परंतु त्यानंतर डिव्हाइस अनलॉक करण्यासाठी पासकोड प्रविष्ट केला जातो.

Touch ID डेटा तुमच्या डिव्हाइसच्या बाहेर जात नाही, आणि iCloud किंवा कोठेही ह्याचा बॅकअप कधीच घेतला जाऊ शकत नाही.

Touch ID वर तुमचे नियंत्रण आहे

तुम्ही Touch ID मध्ये एनरोल केल्यास, ते कसे वापरले जावे हे तुम्ही नियंत्रित करू शकता किंवा ते कोणत्याही क्षणी डिसेबल करू शकता. उदाहरणार्थ, तुम्हाला तुमचा iPhone किंवा iPad अनलॉक करण्यासाठी Touch ID चा वापर करायचा नसल्यास, सेटिंग > Touch ID व पासकोड वर जा, तुमचा पासकोड प्रविष्ट करा, नंतर ‘iPhone अनलॉक करा’ किंवा ‘iPad अनलॉक करा’ बंद करण्यासाठी टॅप करा. Mac वर, सिस्टीम सेटिंग > Touch ID व पासवर्ड वर जा, नंतर ‘तुमचा Mac अनलॉक करण्यासाठी Touch ID चा वापर करा’ बंद करण्यासाठी क्लिक करा.

Touch ID डिसेबल करण्यासाठी, iPhone किंवा iPad वर, सेटिंग > ‘Touch ID व पासकोड’ वर जा, तुमचा पासकोड प्रविष्ट करा, नंतर ‘हाताचे ठसे’ विभागाअंतर्गत स्टोअर केलेल्या प्रत्येक हाताच्या ठशावर टॅप करा आणि प्रत्येक स्टोअर केलेल्या हाताच्या ठशासाठी ‘हाताचा ठसा हटवा’ वर टॅप करा. Mac वर, सिस्टीम सेटिंग > ‘Touch ID व पासवर्ड’ वर जा, नंतर तुम्हाला काढून टाकायच्या असलेल्या बोटाच्या ठशांवर क्लिक करा आणि स्क्रीनवर प्रॉम्प्ट आल्यानंतर हटवण्याची पुष्टी करा. असे केल्याने, तुमच्या डिव्हाइसमधून बोटाचे नोंदणीकृत ठशांच्या गणितीय मांडणीसह Touch ID डेटा हटवला जाईल. तुम्ही ’शोधाशोध’ च्या साहाय्याने तुमचे डिव्हाइसचा डेटा खोडण्याचे किंवा रीसेट करायचे निवडल्यास किंवा सर्व कॉण्टेण्ट आणि सेटिंग खोडल्यामुळे Touch ID चा सर्व डेटा हटवला जाईल.

Touch ID आणि ॲप

सपोर्ट केलेल्या ॲपमध्ये, तुम्ही Touch ID ऑथेंटिकेशन एनेबल करू शकता. ऑथेंटिकेशन यशस्वी झाले असेल तेव्हाच ॲपना सूचित केले जाते. ॲप नोंदणी केलेल्या बोटाच्या ठशांशी संबंधित Touch ID डेटा ॲक्सेस करू शकत नाहीत.

2025-12-12