भाषांतर व गोपनीयता

भाषांतर ॲप आणि ‘पूर्ण सिस्टीममध्ये भाषांतर’ तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहेत आणि तुम्ही काय शेअर करता हे निवडण्यासाठी तुम्हाला एनेबल करते.


भाषांतर करण्यासाठी तुम्ही निवडलेला ऑडिओ आणि टेक्स्ट (इमेज ओळखलेल्या टेक्स्टसह) तुमच्या विनंत्या प्रोसेस करण्यासाठी कदाचित Apple ला पाठवला जाऊ शकतो. तुमच्या विनंत्या रॅण्डम, रोटेट होणारा आयडेंटिफायर ह्याच्याशी संबंधित आहेत, तुमचा Apple अकाउंट, ईमेल पत्ता किंवा तुमच्या इतर Apple सेवांच्या वापरातून Apple ला मिळालेला डेटा ह्यासंदर्भात नाहीत. डीफॉल्ट म्हणून, Apple तुमच्या ऑडिओ संभाषणांची आणि तुमच्या टेक्स्ट इनपुट्सची प्रतिलेखने दोन वर्षांसाठी स्टोअर करते आणि प्रतिलेखनांचा हा सबसेट रिव्ह्यू करू शकते. ‘भाषांतर’, सिस्टीमव्यापी भाषांतर आणि Siri सारख्या इतर नैसर्गिक भाषा प्रक्रिया फीचरच्या सतत चालू असणाऱ्या सुधारणेसाठी रिव्ह्यू केलेल्या विनंत्यांचा लहान सबसेट दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी राखून ठेवला जाऊ शकतो.

तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर भाषा डाउनलोड करू शकता. तुम्ही ज्या भाषांमध्ये भाषांतर करत आहात त्या दोन्ही भाषा डाउनलोड केल्या गेल्यावर, तुमच्या डिव्हाइसवर प्रोसेसिंग होते.

तुम्हाला इजा होऊ शकते किंवा दुखापत होऊ शकते अशा परिस्थितीत, उच्च जोखमीच्या परिस्थितीत, नॅव्हिगेशनसाठी किंवा कोणत्याही वैद्यकीय स्थितीचे निदान किंवा उपचार करण्यासाठी ‘भाषांतर’ वर अवलंबून राहू नये.

तुम्ही ‘Siri व श्रुतलेखन सुधारा’ निवडून, Apple ला तुमची ऑडिओ संभाषणे स्टोअर आणि रिव्ह्यू करण्यासाठी अनुमती देऊन ‘भाषांतर’ चे आवाजाचे भाषांतर सुधारण्यात मदत करू शकता. असे करण्यासाठी सेटिंग > गोपनीयता व सुरक्षा > ॲनालिटिक्स व सुधारणे वर जा, आणि ‘Siri व श्रुतलेखन सुधारा’ सुरू करण्यासाठी टॅप करा.

2026-02-11