Apple Vision Pro ॲप व गोपनीयता
तुम्ही काय शेअर करता ते निवडण्यासाठी तुम्हाला एनेबल करण्याबरोबरच तुमच्या माहितीचे संरक्षण करण्यासाठी Apple Vision Pro ॲप डिझाइन करण्यात आले आहे.
![]()
- App Store सारख्या ॲप्समध्ये उपलब्ध असलेल्या कॉण्टेण्टचे प्रिव्ह्यूज आणि तुमच्या Apple Vision Pro शी संबंधित माहिती डिस्प्ले करण्यासाठी आणि तुम्हाला नोटिफिकेशन्स पाठवण्यासाठी Apple Vision Pro ॲप तुमच्या Apple अकाउंटशी संबंधित आयडेंटिफायर्स वापरते.
- जेव्हा तुम्ही Apple Vision Pro ॲप वापरता, तेव्हा तुम्ही इतर ॲप्समधील कॉण्टेण्ट वापरू शकता, ज्यामध्ये Spatial Gallery, Apple TV, आणि App Store चा समावेश असतो. तुमचा डेटा त्याच्या सेवेशी संबंधित अशा विशिष्ट गोपनीयता नोटिशीच्या अधीन राहून गोळा केला जाईल.
- तुमच्या प्रिस्क्रिप्शनची माहिती एंड टू एंड एनक्रिप्शन वापरून सिंक केली गेलेली आहे.
तुमच्या माहितीचे संरक्षण करण्यासाठी आणि तुम्ही काय शेअर करता ते निवडण्यासाठी तुम्हाला एनेबल करण्यासाठी Apple Vision Pro ॲप डिझाइन केलेले आहे. जेव्हा आम्ही डेटा संकलित करतो, तेव्हा आम्ही हा डेटा का संकलित करत आहोत आणि आम्हाला हे करणे गरजेचे का आहे, हे तुम्हाला माहीत असणे महत्त्वाचे समजतो.
Apple Vision Pro ॲप वापरणे
Apple Vision Pro ॲप तुम्हाला तुमच्या Apple Vision Pro डिव्हाइसबद्दलचा नवीन कॉण्टेण्ट आणि माहिती एकाच ठिकाणी ॲक्सेस करण्याची अनुमती देते. जेव्हा तुम्ही Apple Vision Pro ॲप वापरता, तेव्हा Apple तुमच्या Apple अकाउंटशी जोडलेला आयडेंटिफायर ॲपमधील Spatial Gallery, App Store, आणि Apple TV सारख्या Apple ॲप्समध्ये उपलब्ध असलेले कॉण्टेण्टचे प्रिव्ह्यूज डिस्प्ले करण्यासाठी वापरते. त्याचप्रमाणे, जर तुम्ही Apple Vision Pro ॲपमध्ये डिस्प्ले केला गेलेला असा डेटा वापरत असाल जो इतर Apple ॲप्समध्ये उपलब्ध आहे, तर तुम्ही त्या ॲप्समधील कॉण्टेण्ट बघू शकाल आणि तुमचा डेटा त्यांच्या ॲपशी संबंधित विशिष्ट अशा गोपनीयता नोटिशीच्या अधीन राहून गोळा केला जाईल.
तुमच्या Apple Vision Pro शी संबंधित डिव्हाइसचा अनुक्रमांक, किंवा त्यावर नवीनतम अपडेट प्राप्त झाला की नाही अशासारखी माहिती तुम्हाला दाखवण्यासाठी Apple Vision Pro तुमचा Apple अकाउंटशी लिंक्ड असलेला आयडेंटिफायर देखील वापरतो.
ॲपमधील तुमच्या ZEISS ऑप्टिकल इन्सर्ट्सच्या प्रिस्क्रिप्शनची माहिती Apple VisionPro ॲप दाखवते. तुमच्या प्रिस्क्रिप्शनची माहिती एंड टू एंड एनक्रिप्शन वापरून सिंक केलेली असते त्यामुळे Apple ती ॲक्सेस करू शकत नाही.
Apple कडे पाठवली जाणारी माहिती Apple तृतीय पक्षाच्या विश्वासू सेवा प्रदात्याबरोबर प्रोसेस किंवा संग्रहित करू शकते.
तुमच्याशी संवाद साधणे
तुम्हाला नोटिफिकेशन्स पाठवण्यासाठी आम्ही डिव्हाइस आयडेंटिफायर वापरतो. तुमच्या iOS डिव्हाइसवर नोटिफिकेशन प्राधान्ये अपडेट करण्यासाठी, सेटिंग > नोटिफिकेशन्स > Apple Vision Pro ॲपवर जा.
राखणे
Apple चे गोपनीयता धोरण किंवा आमच्या सेवेसंबंधी विशिष्ट गोपनीयता नोटिशींमध्ये वर्णन केल्याप्रमाणे किंवा कायद्यानुसार आवश्यक अशा उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी गरजेचे असेल तोपर्यंतच Apple वैयक्तिक डेटा राखून ठेवते. राखून ठेवण्याच्या कालावधीचे मूल्यमापन करत असताना, संकलित केलेला वैयक्तिक डेटा राखून ठेवणे खरेच आवश्यक आहे का ह्याचे आम्ही प्रथम काळजीपूर्वक तपासणी करतो आणि जर राखून ठेवणे आवश्यक असेल तर कायद्याने परवानगी असेल इतक्या संक्षिप्त कालावधीसाठी वैयक्तिक डेटा राखून ठेवण्याच्या दृष्टीने काम करतो. तुम्हाला तुमच्या Apple Vision Pro ॲपच्या वापराविषयी काही प्रश्न असल्यास किंवा आमच्या डेटा संरक्षण अधिकाऱ्याशी संपर्क साधायचा असल्यास, तुम्ही www.apple.com/in/legal/privacy/contact यावर आमच्याशी संपर्क साधू शकता.
वैयक्तिक डेटा प्रोसेस करण्यासाठी लागू होणारे कायदेशीर आधार
सर्वसामान्यपणे आम्ही तुमच्या Apple बरोबरच्या कराराच्या सेवा देण्यास आवश्यक असेल त्यानुसार आणि आमच्या कायदेशीर आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी तुमचा Apple Vision Pro वरील वैयक्तिक डेटा प्रोसेस करतो. जिथे संमती उचित कायदेशीर आधार असतो, तिथे आम्ही त्याला लागू होणाऱ्या स्थानिक कायद्यानुसार प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो.
लागू होणारा स्थानिक कायदा जेथे परवानगी देतो, तेथे आम्ही आमच्या किंवा थर्ड पार्टीच्या कायदेशीर स्वारस्यांच्या प्रयोजनांसाठी जसे आवश्यक वाटेल त्याप्रमाणे तुम्हाला Apple Vision Pro ॲप आणि इतर Apple उत्पादने, सेवा आणि तुम्हाला स्वारस्य वाटेल अशा ऑफर्सबद्दल माहिती पाठवण्यासाठी वैयक्तिक डेटा प्रोसेस करतो.
Apple ने संकलित केलेली माहिती नेहमी Apple च्या गोपनीयता धोरणानुसार हाताळली जाईल, जे www.apple.com/in/privacy वर मिळू शकते.
2025-12-12