हवामान व गोपनीयता
‘हवामान’ तुमच्या माहितीचे संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
![]()
- तुम्ही ‘हवामान’ ला तुमचे स्थान ॲक्सेस करण्याची अनुमती दिल्यास, संबंधित हवामान अंदाज प्रदान करण्यासाठी तुमचे स्थान Apple ला पाठवले जाईल. तुमचे स्थान तुमच्या ओळखीशी संबंधित नसते.
- तुम्ही फॉलो करत असलेल्या स्थानासाठी तुम्ही अंदाजाची विनंती केल्यास, ती माहिती त्या स्थानाचा अंदाज प्रदान करण्यासाठी Apple कडे पाठवली जाईल. हे तुमच्या ओळखीशी संबंधित नाही.
- तुम्ही खराब हवामान नोटिफिकेशन्स एनेबल केल्यास, Apple तुमच्या Apple अकाउंटशी अशा नोटिफिकेशनच्या देश किंवा प्रदेशासह सहयोग करू शकतो.
तुमच्या माहितीची गोपनीयता आणि सुरक्षा हे Apple मधील सर्वांसाठी प्राधान्य आहे. केवळ तुमचा अनुभव उत्तम करण्यासाठी आम्ही आम्हाला आवश्यक असलेला डेटा संकलित करण्यासाठी खूप मेहनत घेतो. जेव्हा आम्ही डेटा संकलित करतो, तेव्हा आम्ही हा डेटा का संकलित करत आहोत आणि आम्हाला हे करणे गरजेचे का आहे, हे तुम्हाला माहीत असणे महत्त्वाचे समजतो, जेणेकरून तुम्ही अचूक निवड करू शकाल. Apple च्या प्रत्येक उत्पादन आणि सेवेप्रमाणे, ‘हवामान’ देखील त्या तत्त्वांना लक्षात घेऊन डिझाइन केलेले आहे.
हवामान ॲपला समजून घेण्यासाठी आणि सुधारण्यासाठी, तुम्ही एखाद्या दिवशी पहिल्यांदा ॲप लाँच करता, त्याबद्दलची मर्यादित माहिती Apple गोळा करते. ही माहिती तुमच्या ओळखीशी जोडली जात नाही.
तुम्ही ‘हवामान’ ला तुमचे स्थान ॲक्सेस करण्याची अनुमती दिल्यास, संबंधित हवामान अंदाज प्रदान करण्यासाठी तुमचे स्थान Apple ला पाठवले जाईल. तुम्ही फॉलो करत असलेल्या स्थानासाठी तुम्ही अंदाजाची विनंती केल्यास, ती माहिती त्या स्थानाचा अंदाज प्रदान करण्यासाठी Apple कडे पाठवली जाईल. ह्या शिवाय, ॲपमध्ये ह्या स्थानांना लेबल करण्यासाठी ‘हवामान’ उपलब्ध असेल तिथे, तुमचे घर आणि कार्यस्थळाचे स्थान ॲक्सेस करेल. तुमचे घर आणि कार्यस्थळाचे पत्ते अपडेट करण्यासाठी तुम्ही संपर्क ॲपमध्ये माझे कार्डचा वापर करू शकता. तुम्ही कोणत्याही क्षणी हे लेबल देखील बंद करू शकता. तुमच्या iOS किंवा iPadOS डिव्हाइसवर, सेटिंग > ॲप > ‘हवामान’ वर जा, नंतर ‘घर आणि कार्यस्थळ’ बंद करण्यासाठी टॅप करा. Mac वर, हवामान > सेटिंग > सामान्य वर जा आणि सिलेक्ट केलेले घर व कार्यस्थळ रद्द करा. अंदाज प्रदान करण्यासाठी Apple कडून संकलित केली जाणारी माहिती तुमच्या ओळखीशी लिंक केली जात नाही.
तुम्ही खराब हवामानासंबंधी नोटिफिकेशन्स एनेबल करणे निवडल्यास, उपलब्ध असेल तेथे, तुम्ही ज्या स्थानासाठी अशी नोटिफिकेशन एनेबल केली असतील, तिथे ‘हवामान’ ॲप प्रदेशानुसार प्रतिसाद देते. एखादा प्रदेश म्हणजे देश असू शकतो किंवा काही देशांसाठी (जसे की यू. एस. आणि कॅनडा), एखादा प्रदेश किमान 5,00,000 नागरिक संख्या असलेला परिसर असू शकतो. ज्या प्रदेशांसाठी तुम्ही अशी नोटिफिकेशन सक्षम केली आहेत, त्यांची यादी Apple ला पाठवली जाईल आणि ती तुमच्या Apple अकाउंटबरोबर जोडली जाऊ शकते. हे फीचर एनेबल करण्यासाठी आणि तुमच्या डिव्हाइसवर नोटिफिकेशन देण्यासाठी Apple प्रदेशांची यादी वापरते. ज्या विशिष्ट स्थानांसाठी तुम्ही खराब हवामानासंबंधी नोटिफिकेशन एनेबल केली असतील, त्या स्थानांसाठी ’हवामान’ ॲप तुमच्या डिव्हाइसवरील प्रादेशिक नोटिफिकेशन फिल्टर करते, जेणेकरून तुम्हाला संबंधित नोटिफिकेशन मिळतील.
उपलब्ध असतील तेव्हा तुमच्या संभाव्य प्रवासाच्या गंतव्यस्थानाविषयी ‘खराब हवामानाच्या नोटिफिकेशन्स’ एनेबल करणे निवडू शकता. जर ‘महत्त्वाची स्थाने आणि मार्ग’ एनेबल केले गेले तर नजीकच्या भविष्यात तुम्ही कुठे प्रवास कराल ह्याचा अंदाज लावण्यासाठी तुमचे डिव्हाइस ऑन डिव्हाइस प्रोसेसिंग वापरू शकते. जर तुमची ‘हवामान’ ॲपची परवानगी ‘कायम’ ला सेट केली असेल आणि ‘’हवामान’ ॲप सेटिंगमध्ये खराब हवामानाच्या नोटिफिकेशन्स’ ‘सुचवलेली स्थाने’ ला एनेबल केलेल्या असतील, तर संबंधित खराब हवामानाची नोटिफिकेशन्स तुम्हाला डिलिव्हर करण्यासाठी ‘हवामान’ अंदाज केलेली प्रवासाची गंतव्यस्थाने ॲक्सेस करू शकेल आणि वापरू शकेल. तुमच्या सध्याच्या स्थानांच्या खराब हवामानाच्या नोटिफिकेशन्ससह Apple तुमच्या संभाव्य प्रवासाच्या गंतव्यस्थानांना तुमच्या Apple अकाउंटबरोबर जोडते.
तुम्ही तुमच्या iOS आणि iPadOS डिव्हाइसेसवर ‘अधिक’ > नोटिफिकेशन्स वर टॅप करून ‘हवामान’ ॲपमध्ये तुमच्या सध्याच्या आणि अंदाज केलेल्या स्थानांच्या खराब हवामानाच्या नोटिफिकेशन्सच्या समावेशासह नोटिफिकेशन्स मॅनेज करू शकता. Mac वर, हवामान > सेटिंग > ‘नोटिफिकेशन्स’ वर जा.
त्याव्यतिरिक्त, जर तुम्ही स्मार्ट स्टॅक्स विजेट वापरले आणि विजेट सूचना एनेबल केल्या, तर ‘हवामान’ ॲप तुमच्या संभाव्य प्रवासाच्या गंतव्यस्थाने तुमच्या होम स्क्रीनवर आणि ‘आजचा व्ह्यू’ वर दिसण्यासाठी ‘हवामान’ विजेट देऊ शकते हे ‘हवामान’ ॲप स्थान परवानगी ‘कायम’ ला सेट केली असेल तर आणि ‘स्थान सेवा’ सेटिंगमध्ये ‘महत्त्वाची स्थाने व मार्ग’ एनेबल केली असतील तर होऊ शकते. तुमचे डिव्हाइस तुमच्यासाठी विजेट डिस्प्ले करायचे की नाही हे ठरवते.
Apple द्वारे गोळा केलेली माहिती नेहमी Apple च्या गोपनीयता धोरणानुसार हाताळली जाईल, जे www.apple.com/in/privacy येथे मिळू शकते.
2025-12-12