Wi-Fi कॉलिंग व गोपनीयता

Wi-Fi कॉलिंग तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहे आणि तुम्ही काय शेअर करता हे निवडण्यासाठी तुम्हाला एनेबल करते.


काही नेटवर्क प्रोव्हायडर्स तुम्हाला तुमच्या iOS, watchOS डिव्हाइसेस आणि तुमच्या Mac संगणकांवर Wi-Fi द्वारे (आणि/किंवा Wi-Fi सिग्नल कमजोर असल्यास किंवा उपलब्ध नसल्यास iPad च्या Wi-Fi + Cellular मॉडेल्सवर) कॉल्स करण्याची आणि प्राप्त करण्याची अनुमती देतात.

तुम्ही Wi-Fi कॉलिंग एनेबल केल्यास आणि Wi-Fi कॉलिंग एनेबल केलेल्या डिव्हाइसवरून Wi-Fi नेटवर्कशी कनेक्ट केल्यास, तुमच्या IP ॲड्रेसवर आधारित (किंवा लागू असल्यास मोबाइल नेटवर्कच्या), तुमचे नेटवर्क कनेक्शन ज्या देशाशी कनेक्ट केले गेले आहे, त्या देशाची माहिती, बिलिंग आणि सेवा उपलब्धतेच्या उद्देशाने तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरला पाठवली जाऊ शकते. जर तुम्हाला तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरसह ही माहिती शेअर करायची नसेल, तर तुम्ही तुमच्या iPhone वर आणि पेअर केलेल्या Apple Watch सह तुमच्या इतर डिव्हाइसेससाठी सेटिंग > ॲप्स > ‘फोन’ वर जाऊन आणि ‘ह्या iPhone वरील Wi-Fi कॉलिंग’ बंद करण्यासाठी टॅप करून आणि ‘इतर डिव्हाइसेससाठी Wi-Fi कॉलिंग समाविष्ट करा’ बंद करण्यासाठी टॅप करून Wi-Fi कॉलिंग बंद करू शकता. Wi-Fi कॉलिंग एनेबल असलेल्या तुमच्या इतर डिव्हाइसेसवर Wi-Fi कॉलिंग बंद करण्यासाठी, तुमच्या iPhone वर सेटिंग > ॲप्स > फोन > ‘इतर डिव्हासेसवर कॉल्स’ वर जा आणि ‘इतर डिव्हाइसेसवर कॉल्सना अनुमती द्या’ बंद करण्यासाठी टॅप करा, त्यानंतर डिव्हाइसेसच्या यादीमध्ये प्रत्येक डिव्हाइस बंद करण्यासाठी टॅप करा.

तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरला Wi-Fi किंवा मोबाइल डेटाच्या मार्फत शॉर्ट कोड कॉल (सार्वजनिक सेवांचा ॲक्सेस प्रदान करणाऱ्या संक्षिप्त नंबरवर केले जाणारे कॉल) पूर्ण करण्यासाठी, Apple कडून तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरला कोणत्या शहरातून कॉल केला गेला आहे याची माहिती देणे आवश्यक असते, जेणेकरून त्यांना योग्यप्रकारे कॉल रूट करता येईल. शॉर्ट कोड कॉल करताना तुम्ही ज्या शहरातून कॉल करत आहात त्याची माहिती तुम्हाला तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरसह शेअर करायची नसल्यास, तुम्ही तुमच्या iOS किंवा watchOS डिव्हाइसवर सेटिंग > गोपनीयता व सेटिंग > स्थान सेवा > सिस्टीम सेवांवर जाऊन, आणि ‘Wi-Fi कॉलिंग बंद करा’ वर टॅप करून Wi-Fi कॉलिंगसाठी स्थान सेवा बंद करू शकता. सिस्टीम सेटिंग > गोपनीयता व सुरक्षा > ‘स्थान सेवा’ वर जाऊन, त्यानंतर ‘सिस्टीम सेवा’ च्या पुढे ‘तपशील’ वर क्लिक करून आणि Wi-Fi कॉलिंग बंद करण्यासाठी क्लिक करून तुम्ही तुमच्या Mac वर Wi-Fi कॉलिंगसाठी स्थान सेवा बंद करू शकता. तुम्ही Wi-Fi कॉलिंगसाठी ‘स्थान सेवा’ बंद केल्यास, जेव्हा तुम्ही Wi-Fi कॉलसाठी शॉर्ट कोड नंबर डायल केल्यावर तुमचे डिव्हाइस तुम्ही कोणत्या शहरात आहात हे ओळखू शकणार नाही किंवा तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरला हे पाठवू शकणार नाही, परिणामी तुमचा नेटवर्क प्रोव्हायडर तुमचा कॉल योग्यरित्या राउट किंवा कनेक्ट करू शकणार नाही.

मोबाइल सेवा उपलब्ध असेल तेव्हा तुमच्या iPhone वरून आपत्कालीन कॉल त्यामार्फत रूट केले जातील. मोबाइल सेवा उपलब्ध नसल्यास आणि तुम्ही Wi-Fi कॉलिंग एनेबल केले असल्यास, आपत्कालीन कॉल Wi-Fi वरून देखील केला जाऊ शकतो. तुम्ही स्थान सेवा एनेबल केलेल्या असो किंवा नसो, तुमच्या डिव्हाइसच्या स्थानाच्या माहितीचा वापर आपत्कालीन कॉलसाठी प्रतिसाद प्रयत्नांना मदत करण्यासाठी केला जाऊ शकतो. तथापि, तुमचा नेटवर्क प्रोव्हायडर आपत्कालीन सेवा रूट करण्याच्या उद्देशाने तुमचा बिलिंग पत्ता किंवा तुम्ही नेटवर्क प्रोव्हायडरला प्रदान केलेला दुसरा पत्ता यांना वापरणे निवडू शकतो. तुम्ही तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरसाठी तुमच्या ॲड्रेसची माहिती तुमच्या iOS डिव्हाइसवर सेटिंगमध्ये जाऊन आणि तुमच्या Mac वर FaceTime सेटिंगमध्ये जाऊन अपडेट करू शकता. तुम्ही ही माहिती अप-टू-डेट ठेवायला हवी. असे न केल्यास, कदाचित आपत्कालीन सेवांना तुमच्या वास्तविक स्थानावर योग्य प्रकारे रूट करण्यापासून रोखले जाऊ शकेल. स्थान विश्वसनीयतेच्या कारणास्तव, पारंपरिक मोबाईल किंवा फिक्स्ड लाइन सेवांवर आपत्कालीन कॉल करण्यास प्राधान्य दिले जाते आणि अशा कॉलसाठी केवळ अखेरचा पर्याय म्हणून Wi-Fi कॉलिंग फीचर वापरले गेले पाहिजे.

Wi-Fi कॉलिंगविषयी अधिक माहितीसाठी, तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरच्या अटी, गोपनीयता धोरण आणि पद्धतीना संदर्भित करा. Apple ने संकलित केलेली माहिती नेहमी Apple च्या गोपनीयता धोरणानुसार हाताळली जाईल, जे www.apple.com/in/privacy वर मिळू शकते.

2025-12-12